पोस्ट्स

लोकपाल हाजीर हो

इमेज
                        सध्या सर्वत्र आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झालीये सत्ताधिकाऱ्यांवर अनेक मुद्दे निव्वळ  निवडणुकीचे असल्याचा आरोप विरोधकांकडून केला  जात आहे . ज्यामध्ये १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा होणाच्या आरोप मुख्यतः केला जातोय . मात्र २०१४ साली सध्याचे सत्ताधिकारी निववळ  हेच आश्वासन देऊन आलेले नव्हते  . तर आम्ही अत्यंत ताकदवान लोकपाल आणू , हे पण आश्वासन त्यावेळच्या विरोधात असणाऱ्या आणि सध्या सत्ताधिकाऱ्यानी दिले होते . याला मागच्या सरकारच्या काळात उघडकीस आलेल्या भष्टाराच्या प्रकरणांची पार्श्वभुमी होती. तेव्हा हा मुद्दा अत्यंत महत्तवाचा होता . किंबहुना तत्कालीन सरकारचा पराभव होण्यासाठी हेच  महत्तवाचे कारण होते . तेव्हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकावरचे आंदोलन विशेष चर्चेत होते . तेव्हा माजी भारतीय प्रशाकीय अधिकारी अरविंद केजरीवाल यांनी हाच धागा पकडून आम आदमी पार्टी अर्थात आपची स्थापना केली आणि दिल्लीतील सत्ता स्थापन केली त्यां...

बदलते जग आणि मी

इमेज
                                   सध्या आपण सर्वच प्रचंड मोठ्या स्थितांतरांतून जात आहेत . ज्यामध्ये माणूस एकीकडी समाजकेंद्रीत सोडून व्यक्तिकेंद्रित होता चालला आहे . मग आपल्याकडे होणारी भूमिपुत्रांची होणारी  अथवा अमेरिकेतील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची  भूमिका तसेच वाढत्या आत्महत्या ही सगळी त्याचीच उदाहरणे आहेत . सध्या पारंपरिक प्रकारचा रोजगाराच्या संधी कमी होता असताना पूर्वी विचार ही  केलेली क्षेत्रे रोजगारासाठी उपलबद्ध होत आहेत जसे उबेर इट झोम्याटयो , स्वीगी सारख्या सेवा क्षेत्रातील रोजगार उपलब्ध होत असताना टेलिकॉम क्षेत्राला आलेली मरगळ,  विविध ऑनलाईन रिचार्ज सुविधांमुळे मोबाईल  मरगळ . एन डी टी व्ही सारख्या वाहिन्या कॅमेरामन संस्कृतीला ब्रेक देत रिपोर्टर कडूनच स्लेफी च्या माध्यमातून करत असणाऱ्या रिपोर्टींग किंवा सध्या नव्याने उदयास  सिटीझन जर्नालिस्ट या प्रकारामुळे वर्तमानपत्रात असणाऱ्या पत्रकारांच्या कमी होणाऱ्या संधी किंवा ईमेलच्या सुविधेमुळे बीएसएनएल सारखय...

चित्रपटांचा नवीन ट्रेंड

इमेज
सध्या भाई व्यक्ती की वल्ली  अर्थात पु ल देशपांडे यांच्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्या पाश्र्वभूमीवर चित्रपट निर्मितीचा नवीन ट्रेंड विषयीचे माझे आकलन समर्थ रामदास स्वामी यांच्या 'जे जे आपणासी ठाव !ते ते  सकळांसी मांडावे !! शहाने करून सोडावे सकल जना !!!'  या उक्तीला जागत खास तुमच्यासाठी . हे लेखन परिपूर्ण नाही याची जाणीव ठेवून केलेला हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच  आवडेल अशी आशा आहे      शेवटाकडून विचार करायचा झाल्यास सध्या ज्याला इंग्रजीत बायोपिक म्हणतात त्या प्रकाराच्या चित्रपटांचे प्रमाण वाढलेले दिसते . या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेला भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट असो अथवा  मेरी कॉम यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो अथवा भाग मिल्खा भाग असो अथवा सध्या चर्चेत  असणारा ऍक्सिडेंटल  प्राय मिनिस्टर  हा चित्रपट असो अथवा सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो अथवा बाजीराव मस्तानी यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो ही यादी अजून पुढे वाढवता येऊ शकते . त्याच्या आधी चित्रपटांवर प्रेमावर आधारित चित्रपटांच...

तेलाचे राजकारण आणि मराठी पुस्तके

इमेज
                  आपल्या सर्वांच्या आयुष्याशी या ना त्या कारणाने जोडला गेलेला घटक म्हणजे जैवइंधने . या इंधनाविषयी आपल्या मराठीत लिहली गेलेली २ पुस्तके मी नुकतीच वाचली . ती म्हणजे "हा तेल नावाचा इतिहास आहे" आणि "एका तेलियाने " दोन्ही पुस्तके एकाच लेखकांनी लिहलेली आहे. लेखकाचे नाव आहे गिरीश कुबेर . जेव्हा  मला या पुस्तकांविषयी समजले तेव्हा अधाशीपणाने मी ती पुस्तके वाचून काढली. आपल्या मराठीत इतक्या  सोप्या भाषेत या विषयातील गुंतागुंत समजून सांगणारी पुस्तके मला तरी आढळली नाहीत कोणाला माहीती  असल्यास सांगावे मला आवडेल.  एका तेलियाने या पुस्तकात आखाती देशातील सत्ताधिकाऱ्याविषयी माहिती मिळते . अमेरिकेची या सत्ताधिकाऱ्याना कश्या प्रकारे फूस होती , या विषयी माहिती मिळते.  तेल आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे . त्याच्या किमती "ओपेक" या संघटनेमार्फत कश्या प्रकारे नियंत्रित करून जगाच्या आर्थिक मुठ्या आवळल्या जातात ? लोकशाहीविरोधी असूनही व्हिएतनाम सारखी भूमिका न घेता सौदी अरेबिया या देशातील राजघराण्याविषयी अमेरिकेची सह...

मानवा आता तरी जागो हो

इमेज
                        सध्या उत्तर भारतासह उत्तर महाराष्ट्र थंडीने गोठला आहे. सहा महिन्यापूर्वी हाच भाग वाढत्या तापमानामुळे होरपळत होता.  सहा महिन्यात तापमाना त इतकी उलथापालथ होण्याचे कारण म्हणजे हवामान बदल.होय. सध्याचा काळात समस्त मानवजातीसमोरील प्रश्न म्हणजे हवामान बदल होय .  मात्र आपल्या देशातील राजकारणी यांच्या मते हा मुद्दा अजून त्यांचा जाहीरनाम्यात आलेला आंही . तो जेव्हा येईल तो सुदिन म्हणावा . लागेल . सन २००० पासून चे रेकॉर्ड तपासले असता आपणास लक्षात येते की प्रत्येक वर्ष मागील वर्षांपेक्षा अधिक उष्ण आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकवर्ष मागील वर्षापेक्षा अधिक थंड होते .             अमेरिकेचे माजी अध्यक्ष अल गोर यांच्या An inconvenient truth  या लघुचित्रपटात अथवा day after  tomorrow या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे    सध्या होत आहे   ही फक्त सुरवात आहे भविष्यात यापूढे असेच हवामान अनूभवयास मिळणार आहे त्यामूळे म्हणावेसे वाटते की मानवा आता तरी जागा हो ...

कांदयाने आणले डोळ्यात पाणी

इमेज
       भारतातील प्रमुख कांदा उत्पादक   क्षेत्र असलेला नाशिक जिल्हा सध्या चर्चेत आहे तो कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे . अवघा १०० रुपये भाव दर क्विंटल मागे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीये . परिणामी अत्यंत मातीमोल भावाने कांदा    विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून देण्याकडे शेतकऱयांचा कल   आहे . या मागच्या कारंणाची   मीमांसा केली असता आपणास लक्षात येते की या मागची सर्व करणे मुख्यतः सुलतानी आहेत . गेल्या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांन   भरभरून कांद्याचे उपादान घेतले . मात्र सुलतानी संकटामुळे त्या कांद्याला बाजारपेठांचा उपलब्ध नाहीये परिणामी मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे .त्यामुळे भाववाढी मुळे शिला दीक्षित अश्या सारखा राजकरण्याना रडवणारा कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे                              ना...

महाराष्ट्राची एसटी आणि अन्य राज्यातील एसटी एक तुलना

इमेज
                मी नुकताच पुणे नाशिक कर्नाटक परीवहन महामंडळाच्या व्होल्वो गाडीने  तर नाशिक पुणे गुजरात परीवहन महामंडळाच्या साध्या बसने  प्रवास केला. त्यासाठी मला  अनुक्रमे 460 आणि 260 रुपये लागले .  त्यावेळी आलेल्या अनुभवाचे हे कथन               महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या शिवशाही या बसचे नाशिक पुणे भाडे 410 रुपये आहे. याउलट अत्यंत कमी कर असल्याने कर्नाटकच्या व्होल्वाबस चे भाडे 460 रुपये आहेत. आता नाशिक पुणे शिवनेरी बंद आहेत. मात्र त्या जेव्हा चालू होत्या तेव्हा त्यांचे भाडे 600 रुपये होते. शिवनेरी बस बंद केल्यावर 18% भाववाढ करण्यात आली . त्यानुसार त्यांचे भाडे 108 रुपयांनी वाढून 708 रुपये झाले असते . मी गुजरातच्या बस डायव्हर यांच्यासी एकदा बोललो असता त्यानी सांगितले होते की "आम्ही महाराष्ट्रात ज्या  सेवा देतो  त्यांचे वेळापत्रक  महाराष्ट्र तयार करतो  जर आम्ही तयार केले तर तुमचे डब्बे मोकळे फिरतील...