पोस्ट्स

अंताकडे वाटचाल?

इमेज
                       कोणतीही गोष्ट जर वापरात नसेल तर कालांतराने ती गोष्ट बंद नष्ट होते ,अथवा बंद होते . पुर्वी मानवास शेपटी होती तिचा वापर न केल्याने ती झडुन गेली आणि त्याची निशाणी म्हणून निव्वळ  माकडहाड राहिले . पोस्टाची एके काळची महत्वाची सेवा असलेल्या तारसेवेचा उपयोग कमी कमी होत गेला . परिणामी टपाल खात्याने तिलाच रामराम ठोकला . या पुर्वी जगात अनेक गोष्टी बंद झाल्या आहेत . त्यात अजून एका गोष्टीची भर पडणार का ? अशा प्रश्न आज मला एटिम मधून पैसे काढताना पडला त्यासाठीच आजचा हा पञप्रसंग  त्याचे असे झाले की काहि कारणा निमित्याने पैसै काढण्यासाठी एटीम मध्ये गेलो असता मी कार्ड मशिनमध्ये घातल्यावर  भाषा म्हणून मराठि निवडली खरी माञ पुढे काहिच कार्यवाहि होइना त्या मशिनमध्ये फक्त दाखवायला मराठी भाषेचा पर्याय दिला होता माञ त्याचा पुढिल संगणकिय प्रोग्रामच लिहला नव्हता . कारण काय असेल त्याचे ? वापरणारेच नाहीत तर कशाला उगिच लिहायचा . हेच असणार ना त्या मागचे कारण . म्हणजेच त्या मशिन पुरती मराठी बंद , वापरा हिंदी अथवा इंग्रज...

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्याने

इमेज
                            आज ६ जून अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस . त्या निमित्याने आज इतक्या वर्षांनी जेव्हा आपण त्यांचा राज्याभिषेकाच्या घटनेकडे  बघतो तेव्हा चटकन लक्षात येते , की त्यांनी राज्य कारभाराची भाषा ही मराठी अर्थात सर्वसामान्य जनतेची भाषा केली . आज आपण स्वतंत्र होऊन ७२ वर्षे होत आली आहेत,  मात्र आपण अजून आपला कारभार भारतातील प्रादेशिक भाषेत आणू शकलेलो नाही . आजही आपला बहुतांशी कारभार हा इंग्रजीत चालतो . हे इंग्रजीचे भूत आपल्या मानगुटीवरून इतक्या  वर्षांनी देखील उतरलेले नाही . ते जेव्हा उतरेल तोच खरा अर्थाने सुराज्य दिन म्हणायला हरकत नसावी .                   छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार मराठीत आणतांना खास राज्य व्यवहार कोष तयार केला . त्यावेळच्या राज्यकारभाराची प्रमुख भाषा असलेल्या फारशी भाषेतील शब्दांना अनेक मराठी शब्द दिले जे सहजतेने मराठीत स्वीकारले गेले . आजही नाही म्हणायला  आपल्या राज्य सरका...

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्याने

इमेज
              सध्याचा काळातील मानव समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल / तर विषम हवामान आणि उन्हाळ्याच्या दिवसात तापमानाचा उच्चांक प्रस्थापित होण्याचे दिवस तापमानाचे सध्या नवनवीन उच्चांक स्थापित होत आहे . या धावक्याकडे मानवाचे लक्ष वेधले जावे यासाठी दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरणदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे . १९८० पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे . सध्याचा विज्ञानाला ज्ञात अशी एकमेव सजीवसृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून या सजीव सृष्टीतील एका प्रगत जातीने उचललेले पाऊल म्हणजे हा दिवस .              गेल्या काही वर्षांपासून या दिवशी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातोय . झाडाचे नैसर्गिक चक्रातले महत्त्वाचे स्थान यामुळे अधोरेखित होतंय . झाडाचे महत्व आपल्याकडे संत वाड्यमयात सुद्धा सांगण्यात आलंय . त्यामुळे जे आपणाकडे होते , त्याला दृढ मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहता येऊ शकते .        आज बदलते हवामान  हा भारतापुढेच नव्हे , तर समस्त मानवाजातीपुढील हा सर...

समाज माध्यमे

इमेज
        समाज माध्यमे अत्यंत उपयोगी साधन आहे. आजकाल समाज माध्यामांविषयी नकारात्म्क जास्त्‍ ऐकायला मिळतयं विशेषत: पब्जी  या खेळामूळे त्या बाबत नकारात्म्क चित्र उभे केले आहे मात्र हे चित्र पुर्णपणे खरे नाही या समाज माध्यामांव्दारे रोजगार निर्मीतीच्या देखील संधी निर्माण आहेत हे ऐकून तूम्हाला कदाचित खोटे वाटेल मात्र हे खरे आहे. जर तूमच्या ब्लॉगला बहूसंख्य भेट देणारे असतील तर तुमच्या ब्लॉगवर गूगल जाहिराती देउ शकते त्याव्दारे तूम्ही चांगली अर्थप्राप्ती करू शकतात .     लिंकडन या समाज माघ्यामाव्दारे आपण आपले व्यावसाईक नातेसंबध अधीक दृढ करू शकतो . आपल्यापैंकी अनेक जणांना सन 2013 च्या सूमारास   झालेली भारतातील क्रांती आठवत असेलच अन्ना हजारेंच्या क्रांतीच्या व्यापक प्रसारा मागे समाज माध्यामांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे निव्व्ळ भारतातच नव्हे तर उत्तर   आफ्रिकी देशांमध्ये सूध्दा याच कारणातून यादवी सद्रश्य परिस्थीती निर्माण झाली होती हे पण आपण लक्षात घ्यायला हवे    प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे पण असतात तीच बाब या गोष्ट...

तंत्रज्ञानातील मराठी

इमेज
                            सध्याचे जग तंत्रज्ञानाचे जग म्हणून ओळखले जाते. गेल्या 25एक वर्षातील तंत्रज्ञानाचा विस्तार ेथरारूनप करून सोडणारा आहे.   यात आपल्या माय मराठीचे स्थान कुठे आहे याचा विचार करता   दुर्देवाने फारशे उत्साहवर्धक चित्र नाही .मात्र गेल्या काही वर्षात यात सकारात्म्क बदल होत आहेत मात्र अन्य्‍   भाषेचा विचार करता ही गती अत्यंत कमी आहे . मराठीतील साहित्य्‍ संमेलनात याची दखल अत्यंत कमी प्रमानात घेतली जाते असे माझे प्रामानिक मत आहे. आज विज्ञान क्षेत्रात अनेक नवनविन शोध दिवसागणिक लागत आहेत मात्र त्याची माहिती सहजसोप्या मराठी भाषेत उपलब्ध्‍ होत नाही   इंग्लीश भाषेतील गोष्ट्र्‍ मराठीत आणताना त्यातील कंस्प्ेट ला मराठीत आणताना त्याला संस्क्रत   भाषेत शोभेल अशा शब्द सुचवला जातो आणि नको ती मराठी असे वाटण्यासारखी परीस्थीती निर्माण होते . .विकीपिडीयावर अनेक विषयावर सर्च केले असता मल्याळम कन्न्ड गूजराती आदी भाषेत प्रचंड माहिती मिळते याउलट स्थिती मराठीत आहे. सध्या मराठीत अनेक ब्लॉग आहेत मरा...

35 वर्षानंतर

इमेज
                                  जून महीना सुरु झाल्यावर अनेक गोष्टीची आठवण होण्यास सुरुवात होते.  ज्यांनी परीक्षेचा वेळी फारशा अभ्यास केला नसतो अशा विद्यार्थांना परीक्षेच्या वेळी के लेल्या उचापतींची आठवण होते.  स्थानिक स्वराज्य संस्थाना नाले साफ न केल्याची आठवण होते . तसेच काही जणांना 25 जून1975 आणि  3जून 1984 ची आठवण होते.  भारताचा स्वातंञ्येतर राजकीय इतिहासातील मैलाचा दगड ठरणाऱ्या घटना या दिवशी घडल्या, ज्यांनी भारताचा वाटचालीला एका दिवसात बदलून टाकले. ,  25 जून1975 ला भारतात राजकीय आणीबाणी लादली गेली,  ज्यात तुरुगांत गेलेल्या लोकामधून आताचे विविध राजकारणी उदयास आले जसे प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे लालूप्रसाद यादव मुलायमसिंग वगैरे किंवा आताचे विविध पक्ष तयार झाले जसे समाजवादी पक्ष भाजपाचा वडील पक्ष असणारा जनसंघ आदी पक्ष .                         आणि  3जून 1984च्या दिवशी झालेली आँपरेशन ब्ल्यू स्टार...

माझे पहिले भाषणाची हकीगत

इमेज
             आपल्याकडे ६४ कला आहेत असे म्हंटले जाते . वक्त्तृवकला ही त्यापैकीच एक . नुकताच मी त्या प्रांतात प्रवेशकर्ता झालो . अर्थात  हे घडले ते अपघातानेच मी काही या क्षेत्रात प्रवेश करायचे काही ठरवले नव्हते . तसे मी बरे लिहायचो ( म्हणजे अजूनही लिहितो बरका ) त्यामुळे काही लोकांसी ओळखीही झाल्या आहेत . अशीच एक ओळख झाली एका व्याख्यान आयोजनकर्त्याशी . माझे लेखन बघून त्यांना काय वाटले कोणास ठाऊक ? त्यांनी मला त्यांचा व्याख्यानांत मला श्रोत्यांना पिळायची परवानगी दिली आणि माझा वक्त्तृवकला या प्रांतात प्रवेश झाला          व्याख्यानमालेच्या आयोजकांशी एक दोनदा बोलणे झाल्यावर अखेर विषय ठरला . विषय माझ्या नेहमीच्या लिखानपेटीतील नव्हता असो , विषय छान होता . जुन्या हिंदी चित्रपटातील नायिकेच्या प्रेमप्रकरणावर हा विषय बेतलेला होता .                 बर पहिल्यांदाच व्याख्यान देणार होतो आणि आयोजकांनी तुम्हाला दीड  तास देणार आहोत , त्याचा पुरेपूर वापर  करा . वेळेचा आधी संपवून टाकून आम्हाला...