पोस्ट्स

इसवी सन 1972 च्या पानावरून पुढे चालू

इमेज
                                   स्वातंञ्योत्तर भारताचा इतिहासात जे जे मोठे नैसर्गिक संकट आले त्यामध्ये 1972चा दुष्कळाचा समावेश करावाच लागेल . यावेळी लोकांना खायला अन्न न मिळाल्याने अनेक लोक निधन पावले . सध्या या दुष्कळाचा कहाण्या सांगितल्या जात आहेत .माञ त्यावेळेस लोकांना पिण्यासाठी पाणी होते , खायला अन्न नव्हते . तर आता खायला अन्न प्रचंड आहे पण पिण्यासाठी पाणी नाहीये . तसे बघायला गेले तर भारतात दर काही वर्षांनी मोठा दुष्काळ पडतोच . संत तुकाराम महाराज किंवा देव मामलेदार   महाराज यांच्या काळातील दुष्काळ प्रसिध्द आहेच . ब्रिटिश भारतात ( वसाहातवादी कालखंड )19व्या शतकाच्या अखेरच्या दोन शतकात भारतात प्रचंड दूष्काळ पडला होता . त्याचे ह्रुद्य द्रावक वर्णन इतिहासाची डाव्या नजरेतून मांडणी करणार्या जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटी (जेएनयू) येथील प्रसिध्द इतिहाससंशोधिका रोमीला थापर यांच्या पुस्तकातून दिसते . याच काळात दुष्काळाच्या प्रश्नासाठी स्ट्रँची कमिशन नेमले गेले होते ज्याने अनेक उपयुक्त स...

खैरात संपली गुणवत्ता घटली

इमेज
                                 आज लागलेल्या शालान्त परीक्षेच्या  निकालाचे  वैशिष्ट्य म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षांपासून देण्यात येणारी गुणांची खैरात या वर्षी कमी देण्यात आली  . परिणामी  यावर्षी गेल्या  बारा वर्षातील उत्तीर्णांच्या निच्चांकांची नोंद  करण्यात आली . जे एका अर्थाने योग्यच झाले . गुणवत्तेच्या सुजवटीला त्यामुळे काही प्रमाणात . आळा बसला . अन्यथा ही सुजवटी जर काही काळ  अशीच सुरु राहिली   तर भविष्यात या गोष्टीचे अनेक अनिष्ट परिणाम दिसून आले असते  .       गुणवत्ता यादी बंद करून देखील दहावीच्या परीक्षेला आलेले अवास्तव मह्त्व आणि त्यातून येणाऱ्या ताणाला विद्यार्थाना सामोरे जाण्यासाठी काहीशी सोपी केलेली परीक्षा  पद्धती यामुळे  गेल्या काही वर्ष[पासून अनेक उत्तीर्णांची संख्या फुगलेली दिसत होती . एकीकडे "स्वयंम", " प्रथम सारख्या समाजसेवी संघटनांचे शालेय गुणवत्तेबाबत झोप उडवणारे अहव...

मराठी अनूवादित साहित्य आणि मी

इमेज
                             गेले काही दिवस मी स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावरचे "अचेना अजाना विवेकानंद " नावाचे मुळचे बंगालीत असणारे माञ राजहंस प्रकाशनाने "अज्ञात विवेकानंद" नावाने मराठीत आणलेले पुस्तक वाचत आहे . मुळ पुस्तक बंगली साहित्यातले मानाचे समजले जाणारे आनंद आणी बंकिम पुरस्कार प्राप्त मणीशंकर मुख्योपाध्याय उर्फ शंकर यांनी लिहलयं प ुस्तक उत्तम आहे . ते जेव्हा वाचून संपेल तेव्हा पुस्तकाविषयी लिहीलच .मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते मराठीत येणाऱ्या  अनुवादीत पुस्तकांकडे अन्य भाषेतील खुप पुस्तके मराठीत अनुवादित होत आहेत माञ माझ्या अल्पशा अश्या अनुभवाचा नजरेतून बघीतले तर त्याचा तूलनेत खुपच कमी पुस्तके मराठीतून अन्य भाषेत भाषातरीत होतात .मराठीत सुध्दा प्रचंड स्वरुपात अत्यंत सकस साहीत्य निर्मीती होते माञ ही निर्मीती मराठीत्तेर भाषिकांना समजण्यासाठी आवश्यक असणारी ते साहित्य अन्य भाषेत अनुवादित होताना मला तरी आढळलेले नाही . माझे अनुभव विश अत्यंत तोकडे आहे याची मला पुर्ण जाणीव आहे .तरी जे काही अनुभव वि...

अंताकडे वाटचाल?

इमेज
                       कोणतीही गोष्ट जर वापरात नसेल तर कालांतराने ती गोष्ट बंद नष्ट होते ,अथवा बंद होते . पुर्वी मानवास शेपटी होती तिचा वापर न केल्याने ती झडुन गेली आणि त्याची निशाणी म्हणून निव्वळ  माकडहाड राहिले . पोस्टाची एके काळची महत्वाची सेवा असलेल्या तारसेवेचा उपयोग कमी कमी होत गेला . परिणामी टपाल खात्याने तिलाच रामराम ठोकला . या पुर्वी जगात अनेक गोष्टी बंद झाल्या आहेत . त्यात अजून एका गोष्टीची भर पडणार का ? अशा प्रश्न आज मला एटिम मधून पैसे काढताना पडला त्यासाठीच आजचा हा पञप्रसंग  त्याचे असे झाले की काहि कारणा निमित्याने पैसै काढण्यासाठी एटीम मध्ये गेलो असता मी कार्ड मशिनमध्ये घातल्यावर  भाषा म्हणून मराठि निवडली खरी माञ पुढे काहिच कार्यवाहि होइना त्या मशिनमध्ये फक्त दाखवायला मराठी भाषेचा पर्याय दिला होता माञ त्याचा पुढिल संगणकिय प्रोग्रामच लिहला नव्हता . कारण काय असेल त्याचे ? वापरणारेच नाहीत तर कशाला उगिच लिहायचा . हेच असणार ना त्या मागचे कारण . म्हणजेच त्या मशिन पुरती मराठी बंद , वापरा हिंदी अथवा इंग्रज...

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्याने

इमेज
                            आज ६ जून अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस . त्या निमित्याने आज इतक्या वर्षांनी जेव्हा आपण त्यांचा राज्याभिषेकाच्या घटनेकडे  बघतो तेव्हा चटकन लक्षात येते , की त्यांनी राज्य कारभाराची भाषा ही मराठी अर्थात सर्वसामान्य जनतेची भाषा केली . आज आपण स्वतंत्र होऊन ७२ वर्षे होत आली आहेत,  मात्र आपण अजून आपला कारभार भारतातील प्रादेशिक भाषेत आणू शकलेलो नाही . आजही आपला बहुतांशी कारभार हा इंग्रजीत चालतो . हे इंग्रजीचे भूत आपल्या मानगुटीवरून इतक्या  वर्षांनी देखील उतरलेले नाही . ते जेव्हा उतरेल तोच खरा अर्थाने सुराज्य दिन म्हणायला हरकत नसावी .                   छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार मराठीत आणतांना खास राज्य व्यवहार कोष तयार केला . त्यावेळच्या राज्यकारभाराची प्रमुख भाषा असलेल्या फारशी भाषेतील शब्दांना अनेक मराठी शब्द दिले जे सहजतेने मराठीत स्वीकारले गेले . आजही नाही म्हणायला  आपल्या राज्य सरका...

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्याने

इमेज
              सध्याचा काळातील मानव समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल / तर विषम हवामान आणि उन्हाळ्याच्या दिवसात तापमानाचा उच्चांक प्रस्थापित होण्याचे दिवस तापमानाचे सध्या नवनवीन उच्चांक स्थापित होत आहे . या धावक्याकडे मानवाचे लक्ष वेधले जावे यासाठी दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरणदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे . १९८० पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे . सध्याचा विज्ञानाला ज्ञात अशी एकमेव सजीवसृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून या सजीव सृष्टीतील एका प्रगत जातीने उचललेले पाऊल म्हणजे हा दिवस .              गेल्या काही वर्षांपासून या दिवशी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातोय . झाडाचे नैसर्गिक चक्रातले महत्त्वाचे स्थान यामुळे अधोरेखित होतंय . झाडाचे महत्व आपल्याकडे संत वाड्यमयात सुद्धा सांगण्यात आलंय . त्यामुळे जे आपणाकडे होते , त्याला दृढ मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहता येऊ शकते .        आज बदलते हवामान  हा भारतापुढेच नव्हे , तर समस्त मानवाजातीपुढील हा सर...

समाज माध्यमे

इमेज
        समाज माध्यमे अत्यंत उपयोगी साधन आहे. आजकाल समाज माध्यामांविषयी नकारात्म्क जास्त्‍ ऐकायला मिळतयं विशेषत: पब्जी  या खेळामूळे त्या बाबत नकारात्म्क चित्र उभे केले आहे मात्र हे चित्र पुर्णपणे खरे नाही या समाज माध्यामांव्दारे रोजगार निर्मीतीच्या देखील संधी निर्माण आहेत हे ऐकून तूम्हाला कदाचित खोटे वाटेल मात्र हे खरे आहे. जर तूमच्या ब्लॉगला बहूसंख्य भेट देणारे असतील तर तुमच्या ब्लॉगवर गूगल जाहिराती देउ शकते त्याव्दारे तूम्ही चांगली अर्थप्राप्ती करू शकतात .     लिंकडन या समाज माघ्यामाव्दारे आपण आपले व्यावसाईक नातेसंबध अधीक दृढ करू शकतो . आपल्यापैंकी अनेक जणांना सन 2013 च्या सूमारास   झालेली भारतातील क्रांती आठवत असेलच अन्ना हजारेंच्या क्रांतीच्या व्यापक प्रसारा मागे समाज माध्यामांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे निव्व्ळ भारतातच नव्हे तर उत्तर   आफ्रिकी देशांमध्ये सूध्दा याच कारणातून यादवी सद्रश्य परिस्थीती निर्माण झाली होती हे पण आपण लक्षात घ्यायला हवे    प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे पण असतात तीच बाब या गोष्ट...