पोस्ट्स

मंदीचे आरोग्यावरील संभाव्य परीणाम

इमेज
                    सध्या भारतात सर्वत्र आर्थिक मंदीची चर्चा होत आहे . मंदीच्या आर्थिक परीणामावर सरकार योग्य ती पाउले उचलेल , यात शंका नसावी . मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे , तीच्या सामाजिक परीणामावर , त्यातही मंदीमुळे व्यक्तींच्या  आरोग्याबाबत किंबहुना अधिक स्पष्टपणे सांगायचे झाल्यास लोकांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परीणामाविषयी .                     आपल्या भा र तात आरोग्यिविषयी त्यातही मानसिक आरोग्याबाबत प्रचंड प्रमाणात अनास्था आहे . परीणामी जगमान्य प्रमाणाच्या तूलनेत  लोकसंख्येचा विचार केला असता आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञ अत्यंत कमी आहेत . त्यामुळे येणाऱ्या मंदीच्या काळात हातचे काम गेल्याने, आर्थिक ओढाताण झाल्याने   येणाऱ्या नैराश्यावर मानसिक ताणतणावांना भारतीय कसे सामोर जातात , हे बघणे आवश्यक आहे . माझ्यामते हा प्रश्न जर व्यवस्थित हाताळला न गेल्यास आगीतून फुफाट्यात अशी आपली परीस्थिती होउशकते . शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या रूपाने आर्थिक प्रश्न किती विक्राळ स्...

वाढदिवस जगातील पहिल्या समुपदेशकाचा

इमेज
                                                                             भगवान श्रीकृष्ण यांची  जयंती समस्त भारतात फार मोठ्या उत्साहात  साजरी  करण्यात येते . भगवान श्रीकृष्ण  याना विविध रूपात पुजले जाते .  रणछोडदास कृष्ण , बाळकृष्ण  ,आदी स्वरूपातील कृष्ण ही त्याची प्रमुख रूपे . या सर्व रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णचे एक स्वरूप काहीसे दुर्लक्षित रहाते . ते म्हणजे समुपदेशक श्रीकृष्ण . जगाचा  इतिहासाच्या पौराणिक आणि  भौतिक या दोन्ही प्रकारे आढावा घेतल्यास आपणस हि गोष्ट लगेच लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण  हे  जगातील पहिले समुपदेशक आहेत . युद्धाच्या प्रसंगी व्दिधा  मनस्थिती असणाऱ्या अर्जुनाला त्यांनी समुपदेशन केले होते . त्याचा आधी कोणत्याही प्रकारात समुपदेशनाच्या उल्लेख आढळत नसल्याने भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले स...

नमो प्रशासनाचे हे बदल आपणास माहिती आहे का ?

इमेज
नुकताच मी पुण्याहून नाशिकला प्रवास केला . प्रवासातील सहप्रवासी गपिष्ट होता , त्याच्याशी विविध विषयावर मनोसोक्त गप्पा रंगल्या . त्याच्यात मोदी सरकारची विविध क्षेत्रातील कामगिरी आणि त्यांनी अवलंबल्या सुधारणा हा विषय देखील होता . बोलण्याच्या ओघात त्या सह प्रवाश्याने नमो सरकारतर्फे प्रस्तावित असणाऱ्या मात्र माध्यमांद्वारे फारश्या चर्चेत नसणाऱ्या गोष्टींबाबबत देखील भाष्य केले . या माध्यमात न आलेल्या गोष्टी  प्रामुख्याने वनांशी संबंधित होत्या .            त्या प्रवाश्याने सांगितले की ,  नमो सरकारतर्फे लवकरच भारतीय वन कायद्यांअंतर्गत सुधारणा करण्यात येणार आहेत. ज्यामुळे वनात राहणाऱ्या लोकांच्या अनेक हक्कांवर गदा येणार आहे . भारतीय वनहक्क नीती २००६ आणि पेसा या कायद्यावण्ये देण्यात येणाऱ्या अनेक हक्कांना त्यामुळे वनवासींना मुकावे लागणार आहे . सरकार जरी भारतीय वन हक्क कायद्यांत बदल करत असले तरी , जरी या कायद्याची आधारशीला म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल त्या भारतीय वननिती  २०१४ बाबत सरकारची भूमिका अद्याप संदिग्ध आहे . ती वननिती अद्याप सरकारने जाह...

73 ची उमर गाठली

इमेज
                      कविवर्य कुसुमाग्रज यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनला 50 वर्षे पुर्ण झाली , त्यावेळेस "स्वातंत्र्य देवतेची विनवणी " ही फटका या काव्यप्रकारातील कविता लिहली होती . त्याला 2019 या वर्षी  २३ वर्षे पूर्ण झाली .साधारणतः २५  वर्षाची एक पिढी समजली जाते . त्यानुसार  जवळपास एका पिढीचा कालावधी  पूर्ण झाला आहे . त्या कवितेत त्यांनी त्यावेळच्या समस्यांचा उहापोह करत , स्वतंत्रदेवता या समस्यांकडे लक्ष द्या असे सांगत आहे अशी कल्पना करून भारताच्या तत्कालीन समस्या मांडल्या होत्या . आज एव्हढ्या वर्षांनंतरही आजची परिस्थिती बघत असताना असपणास स्पष्ट दिसते की , त्या समस्या अजूनही  जैसे थेच आहेत .किंबहुना त्यांनी अधिकच आवक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे ./                           त्यांनी त्यांच्या कवितेत जाती व्यवस्थेवर , मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर , महिलांच्या  समस्येवर, नोकरशहांच्या  कार्यप्रणालीवर , विविध  ठिकाणी होणा...

एक राष्ट्र एक निवडणूक निव्वळ अशक्यच

सध्या एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर विचारमंथन सुरु आहे . माझ्या मते ही संकल्पना राबवतांना येणाऱ्या खर्चाबाबत फक्त भाष्य केले जाते  जे या प्रश्नाची फक्त एकच बाजू दशर्वते . प्रत्येक प्रश्नाला दोन बाजू असतात ,    त्यातील दुसऱ्या बाजूचा लेखाजोखा मांडण्यासाठी लेखनप्रपंच आपल्या कडे ईव्हीएम यंत्रामार्फत निवडणूका घेतल्या जातात . सध्या भिन्नभिन्न वेळी निवडणूका घेत असल्याने एकच इव्हीएम यंत्र वारंवार वापरता येते . एकत्रच निवडणूका घेत असल्यास किती ईव्हीएम मशीन लागतील, आणि एकदा वापरल्यावर परत पाच वर्षांनीच त्याचे काम, येवढी यंत्रे सांभाळयाची ती कशी ? आणि आपल्याकडील एका ईव्हीएम मशीनमध्ये एका वेळी फक्त सोळा नावे अंतर्भुत करता येतात . देशातील पक्षांची आणि अपक्षांची यादी बघता यावर कात्री लावल्याशिवाय एका इव्हिएम वर सर्व नावे येणे अशक्यच, म्हणजे लोकशाहीच्या तत्वावरच घाला घालावा लागणार . म्हणजेच ही संकल्पना कितीही स्त्युत असली तरी राबवतांना अनेक अडचणी येणार . त्यावर तोडगा काढल्याशिवाय ही संकल्पना राबवणे धोक्याचे ठरेल यात शंका नाही

नारायणराव पेशवे सत्तापिपासू राजकारणाचा बळी

इमेज
आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध राजघराणी राज्य करुन गेली . त्यापैकी प्राचीनयुगात सातवाहन घराणे आणि मध्ययुगात यादव घराणे अणि भोसले घराणे आणि पेशवा घराणे ही प्रमुख घराणी आहेत .या घराण्याचा काळात समाजव्यवस्था कोणत्या प्रकारची होती . यावर या आधी प्रचंड प्रमाणात लिहले गेले आहे .या घराण्याचा विविध व्यक्तींवर लिहलेलेसुद्धा प्रचंड  साहित्य उपलब्ध आहे. या सर्व घराणे आणि व्यक्तीमत्वातील एका व्यक्तीमत्वाने मला प्रचंड भुरळ घातली आहे . ते व्यक्तीमत्व म्हणजे घराण्यातील सत्तापिपासू काकामुळे ज्याचा अधिकारपदाची वस्त्रे हाती घेतल्यावर तीन महिन्यात किंवा  वयाची 18वर्षे आणि 20 दिवस पुर्ण  झाल्यावर खुन करण्यात आला , ते पेशव्यांमधील सर्वात कमी राजपदावर असणारे व्यक्तीमत्व अर्थात नारायणराव पेशवे           10 आँगस्ट 1755 ते 30 आँगस्ट 1783 हा त्यांचा कालखंड . त्यांची आणि माझी जन्मतारीख ही सारखीच 10आँगस्ट  . त्यामुळे असेल कदाचित मला नारायणराव पेशवे यांच्या विषयी विलक्षण कुतूहल आहे . त्यांचे अकाली निधन  झाल्यामुळे त्यात वाढच झाली आहे . द्वापारयुगात महाभारतातस...

नितीवाल्या लोकांची अनिती .

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्रात एकच मुद्दा गाजतोय तो म्हणजे पाउस . मराठवाड्यात  काहीच पाऊस नसल्याने आणि सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडल्याने हाहाकार माजला आहे . एकाच राज्यातील ही दोन शहरे मात्र अत्यंत विरोधी हवामान दाखवत आहे  याला कारणीभूत आहे . सध्याचे अत्यंत जलद गतीने बदलणारे हवामान ,  आणि या  प्रकाशाच्या वेगाला लाजवेल अश्या  पद्धतीने बदलत्या हवामानाला कारणीभूत आहे . जगाला सर्वत्र नीतिमत्तेचे धडे देणारा मात्र स्वतः मात्र अत्यंत अनीतीने वागणारा देश अर्थात युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका .      . जगातील सर्वाधिक नैसर्गिक साधनसंपत्तीची नासधूस करून पर्यावरणाची हानी करणारा हा देश .इतरांनी त्यातही प्रामुख्याने आपल्या भारताने आणि चीनने नैसर्गिक साधन संपत्तीच्या अत्यंत काळजीपूर्वक वापर करावा असे सल्ला देणारा हा देश . स्वतःची आर्थिक प्रगती झाली आहे . ही प्रगती करताना आपण प्रचंड प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीची वाट लावली आहे . आता इतर देशांना प्रगतीची संधी देताना स्वतःच्या नैसर्गिक साधसनसंपत्तीच्या उधळपट्टीला लगाम न  घाल...