पोस्ट्स

भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 4

इमेज
                 मित्रानो आपली भारतीय रेल्वे जगातील एक प्रमुख सरकारी मालकीची वाहतूक सेवा आहे . आपण आपल्या भारतीय रेल्वेला कितीही शिव्या देत असलो तरी  भारतीय रेल्वेचे  महत्त्व कमी होत नाही..प्रवाश्यांच्या सोयीसाठी आजमितीला (हा ब्लॉग लिहीत असताना ) भारतीय रेल्वे तब्बल 17 प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवते . या 17 प्रकारच्या गाड्यांमध्ये  मी फक्त आपल्यासारख्या लोकांना सेवा देणाऱ्या गगाड्यांचा  समावेश केला आहे. माल वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचा  मी यामध्ये समावेश केलेला नाही . आपल्या भारताच्या विविध भागात या रेल्वेगाड्या चालवल्या जातात. त्यातील काही प्रकारच्या गाड्यांची माहिती आपण या ब्लॉगच्या तिसऱ्या भागात करून घेतली . ज्यांना ती माहिती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे                  तर मित्रानो आता बघूया इतर रेल्वे गाड्यांची माहिती . (1) अंत्योदय एक्स प्रेस : या गाड्यांमध्ये अनारक्षित  कोच असतात .  (प्रथम येती...

जरा याद करो उनको, जो लोटके घर ना आये

इमेज
                                   आपल्या भारताच्या इतिहासाकडे एक नजर टाकली असता  स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत अनेक भळभळत्या जखमा झालेल्या आपणस सहज दिसतात . आजपासून 11 वर्षपूर्वी झालेली मुंबईवरील दहशतवादी हल्याची जखम त्यापैकीच एक . पाकपुरस्कृत दहशवादी संघटना लष्करे ए तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईत 6 ठिकाणी सलग 4 दिवस दहशतवाद्यांनी हल्ला केला .यामध्ये अजमल कसाब या एका दशवाद्याला आपल्या शूर सुरक्षा दलांनी पकडले . बाकीचे दहशतवादी या हल्यात मारले गेले . यामध्ये निष्पाप 165  मृत्युमुखी पडले , ज्यात भारतीयांसह अन्य देशांचे नागरिक देखील होते . तर 302 जायबंदी झाले . आज 2019 साली या हल्ल्याला 11 वर्षे पूर्ण होताना या हल्यात शहीद झालेल्या आपल्या वीरांना आणि निष्पाप  नागरिकांना माझ्यातर्फे भावपूर्ण आदरांजली                       मुंबईवर 1993साली झालेल्या साखळी  बाम्बस्फोटानंतर  झालेल्या अनेक द...

संविधानाची ७० वर्षे

इमेज
                           दोन वर्षे ११ महिने १८ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर २६ नोव्हेंबर १९४९ ला भारताच्या संविधान समितीने  संविधान तयार केले . आजच्या २६ नोव्हेंबर २०१९ ला या घटनेला ७० वर्षे पूर्ण होतील . कोणत्याही देशाच्या वाटचालीत त्या देशाचे संविधान अत्यंत महत्वाची भूमिका बजावते . देशाची प्रगती तेथील राजकीय परिस्थिती तेथील संविधानावर अवलूंबून असते . आपल्या भारताचा शेजारी असणाऱ्या नेपाळ या देशात संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे झालेली परिस्थिती आपण बघत आहोच . पाकिस्तानची सध्याची   परिस्थितीसुद्धा त्याचे पहिले  संविधान निर्मितीला लागलेल्या विलंबामुळे  (आज पाकिस्तानात ३ रे संविधांची अंमलबजावणी सुरु आहे ) निर्माण झालेली आपण बघत आहोत .  त्यामुळे भारतासारख्या विविधेतेनेने नटलेल्या देशाचे संविधान तयार करणाऱ्या सर्व कायदेपंडितांना या निमित्याने विनम्र अभिवादन .           भारताचे संविधान तयार करताना घटना समितीमध्ये झालेली चर्चा उप...

हे बी घडतंय जगामंदी (भाग एक )

इमेज
                              सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना ,जगात अनेक घडामोडी घडत आहेत. जसे डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियोगाचा खटला , युनाटेड किंग्डम या देशात १२ डिसेंबरला होणाऱ्या मध्यवर्ती सार्वत्रिक निवडणुका आणि त्याचा संबंधित घडामोडी , दक्षिण अमेरिका खंडातील  अनेक देशात होणारे राजकीय आणि आर्थिक कारणामुळे  होणारी  आंदोलने ,तसेच चीनच्या हाँगकॉग  या प्रदेशातील स्थानिक निवडणुका, इंडोनेशिया, इराण या आशिया खंडातील  देशातील आंदोलने , फ्रान्सच्या महिलांनी राजधानी पॅरिसमध्ये  फ्रान्समध्ये युरोप खंडातील   सर्वाधिक होणाऱ्या महिला  अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष  जावे म्हणून काढलेला मोर्चा ही त्यांची काही प्रमुख उदाहरणे होय . यातील प्रत्येक घडामोंडीचा आपल्या भारतावर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडणार आहे . त्यामुळे या गोष...

वणवा कांगारूंच्या देशातील

इमेज
                                                               सध्या विविध घडामोडीनी आपला भारत आणि महाराष्ट्र  अक्षरशः ढवळून जात असताना, पृथ्वीगोलावर आपल्या भारताच्या साधारणः विरोधी बाजूवर असलेल्या ऑस्ट्रोलियच्या पूर्व बाजूला आतापर्यतच्या ज्ञात इतिहासातील सर्वात मोठ्या वणव्याने तेथील सरकारची अक्षरशः झोप उडवली आहे .  तेथील न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँड या दोन राज्यात आणीबाणी जाहीर जाहीर करण्यापर्यंत तेथील परिस्थिती बिघडली आहे . हा लेख लिहीत असताना त्यामध्ये किमान 8 लोकांच्या मृत्य झाल्याचे वृत्त आहे .            मित्रानो पृथ्वीगोलावर भारताच्या साधारणतः विरोधी बाजूवर असलेल्या ऑस्ट्रोलियच्या पूर्व बाजूला भूभागाचे आपणास काय त्याचे  असे सर्व साधारण आपणस वाटू शकेल ?  मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की , येव्हढ्या मोठ्या प्रमाणात  वणवा पसरण्याची  जी कारणे सांगित...

भाषा प्रेम खरे आणि बेगडी

इमेज
                                                       सध्या मराठी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या होणाऱ्या  मुख्यमंत्र्यांबाबबत इत्यंभूत माहिती देत असताना,  भारताच्या उत्तर बाजूला असणाऱ्या एका राज्यातील एका मानांकित विद्यापीठात मात्र वेगळेच नाट्य रंगतंय . आम्हला  एक भाषा  विषय शिकवायला अमुक एक प्राध्यापक  नको , या कारणासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे . सदर प्राध्यापक विषयातील तज्ज्ञ आहेत, त्यांच्यावर कोणत्याही भिन्नलिंगी व्यक्तीवर  कोणत्याही प्रकारचा अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलेला नाही . ते विद्यार्थ्यांना  समजेल अश्या पध्द्तीने शिकवतात . मात्र तरीही हे प्राध्यापक  या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना  नकोय . या विद्यार्थ्यांना  यासाठी फार मोठे आंदोलन करायला सुरवात केली आहे .विद्यार्थ्यांचे आंदोलन का  होत आहे ? याचा  मागोवा घेतल्यास मन निराश करणारी परिस्थिती सम...

या लोंढ्याना आवरायला हवे (भाग २ )

इमेज
                                                                         मित्रानो गेल्या  काही कालावधीत मी दोनदा नाशिक ते सुरत या दरम्यान प्रवास केला . या प्रवासादरम्यान मला आपली महाराष्ट्राची एसटी आणि अन्य राज्याची एसटी या दरम्यान काही फरक आढळले . ते तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . या लेखमालेतील हा दुसरा भाग , तुम्ही पहिला भाग या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघू शकता .                                        मला आढळलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्य राज्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस महाराष्ट्रात येण्याचे  अति प्रचंडप्रमाण आणि त्या तुलनेत आपल्या एसटी बसेस अन्य राज्यात जाण्याचे नगण्य प्रमाण . आपण रात्री पुण्याच्या स्वारगेटवर  बघा पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या आपल...