पोस्ट्स

खाजगी रेल्वे विरुद्ध तोट्यातील सरकारी रेल्वे (भाग 1)

इमेज
                         गेल्या काही दिवसांपासून दोन बातम्यांनी भारतीय रेल्वेविश्व अक्षरशः ढवळून निघाले . त्यापैकी एका बातमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली . दुसऱ्या बातमीवर हा लेख लिहीत असताना तरी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आल्याचे  वृत्त नाही . पहिली बातमी म्हणजे  150 खाजगी रेल्वे चालवण्याचा निर्णय होय ज्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि दुसरी म्हणजे गेल्या 10 वर्षात सर्वात जास्त तोटा रेल्वेला होण्याची बातमी . मित्रानो या  दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित बाबी आहेत . आणि त्यांची बातमी पाठोपाठ येणे हे नक्कीच काळजी करण्यासारखे आहे .  मित्रानो ,  भारतीय रेल्वे जगातील सर्वात  मोठा रोजगार देणारा सार्वजनिक उपक्रम आहे . त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायलाच हवे .                          मित्रानो भारतीय रेल्वेमध्ये भारतीय तीन प्रकारे भरती होऊ...

पाउले चालती हिंदू ग्रोथ रेटकडे

इमेज
                    अमेरीकेतील एका चर्चेमध्ये राजशेखर नावाच्या अर्थतज्ञाने सन 1981मध्ये  भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात एक  कल्पना मांडली होती . जी कालांतराने हिंदू ग्रोथ रेट या नावाने प्रचलीत झाली होती . त्याकाळी भारतीय अर्थव्यवस्था सर्वसाधरण साडेतीन टक्याचा गतीने वाढत असे . त्यालाच काहिसा हस्यास्पद रितीने सांगण्यासठी त्यांनी ही संकल्पना वापरली होती . ज्यामध्ये ज्या प्रकारे धर्म बदल सहजतेने स्विकारत नाही ,  त्याच प्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था बदल स्विकारत नसल्याने ती खुप कमी गतीने वाढत असल्याचे सांगितले होते .पुढे  सन 1991च्या जूलै महिन्यात आर्थिक पातळीवर विलक्षण धक्का मिळाल्यावर यामध्ये झपाट्याने बदल झाले , आणि भारतीय अर्थव्यवस्था हिंदू ग्रोथ रेटच्या टप्यातून बाहेर येउन भारतीय अर्थव्यवस्था जगातील क्रमांक दोनची सर्वात वेगाने वढणारी अर्थव्यवस्था बनली                               .हा सर्व इतिहास येथे सांगण्याचा हेतू हा आहे की गेल्या काही दिवसापासू...

चित्रपटातील गीत ते 2+2 बैठक, मार्गे G-4 भारत जपान मैत्रीचा प्रवास (भाग 1)

इमेज
                          सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, आपला भारत जागतिक राजकारणात मोठ्या दौडाने आपला  अश्व पुढे  नेत आहे . याची साक्ष देणारी घटना नुकतीच भारत जपान मैत्रीसंदर्भात घडली . ती म्हणजे भारत आणि जपान यांच्या मध्ये झालेली  2+2 बैठक होय . दोन्ही देशाच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये ही बैठक पार  पडली . या बैठकीमध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली , कोणत्या मुद्यावर करार आणि Memorandum Of Understanding (MOU ) झाले . याची माहिती आपणास पारंपरिक माध्यमांतून आपणास मिळेलच.  . मला आपणाचे लक्ष वेधून घेयचे आहे . ते भारताचा   इथपर्यंत प्रवास कसा  झाला ? तर सुरवात करूया सविस्तर विवेचनला .                  मित्रानो मध्ययुगात चीनमार्फत बौद्धधर्म  जपानमध्ये पोहोचला . हे आपणास ज्ञात असेलच...

ब्रेक्सिटच्या वाटेवरच्या निवडणुका (भाग 5)

इमेज
               सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, जगाला धडकी भरेल  अश्या घडामोडी जगात घडत आहे .  ब्रेक्सिटच्या वाटेवरच्या युनाटेड किंग्डम या देशात 12 डिसेंबर2019 ला होणाऱ्या निवडणुका  या त्यापैकीच एक . (या ब्लॉगवरील ब्रेक्सिट विषयाची ही पाचवी पोस्ट . या आधीच्या पोस्ट  तुम्ही या ब्लॉग पोस्टच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात . ) युनाटेड  किंग्डम या देशातील महत्त्वाची वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसी ने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या  निवडणूकपूर्व मतदानकाल चाचणीनुसार (pre   election exit poll ) ब्रेक्सिटच्या विरोधी भूमिका असलेल्या सोशल डेमोक्रेटिक या पक्षाला लोकांचा कल मिळत आहे . मात्र लेबर   (मजूर  पक्ष ) पक्षामार्फत विभागवार प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानंतर यामध्ये बदल होऊ शकतो .लेबर   (मजूर पक्ष ) पक्षामार्फत दिनांक 29 नोव्हेंबरला 2...

विलुप्त होणाऱ्या गेंड्याच्या प्रजातीविषयी थोडेसे

इमेज
                 सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, पृथ्वीच्या जैवविविधेतेवरचे संकट म्हणता येईल , अशी घटना 23 नोव्हेंबर 2019 ला  मलेशिया या देशात घडली . मात्र आपल्या भारतीय माध्यमात या विषयी फारसे काही चर्चिले गेले नाही . तर चला मित्रानो माहिती करून घेउया या घटनेविषयी   मित्रांनो , सर्वात वजनदार  शाकाहारी प्राण्यांपैकी एक म्हणून   म्हणून  ज्या  प्राण्यांकडे बघितले जाते , तो म्हणजे गेंडा . या गेंड्याच्या एका प्रजातीविषयीच आजचा लेख आहे . तर, जगभरात गेंड्याच्या 5  प्रजाती आढळतात . त्यामध्ये आकाराने सर्वात लहान म्हणून ओळखली जाणारी प्रजाती म्हणजे सुमात्रीयन गेंडा . जो फक्त इंडोनेशिया आणि मलेशिया या देशात आढळतो . ( खरेतर या देशाच्या यादीतून मलेशिया आता वगळायला हवे ) युनोस्कोच्या  अत्यंत धोकादायक स्थितीत असणाऱ्या प्राण्यांच्या यादीत या प्रजातीच्या गेंड्याचा फार  वरचा क्रमांक ...

कालापाणी : भारत नेपाळ संबंधातील मिठाचा नवा खडा

इमेज
                                          सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना आपल्या भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ बरोबर आपला सीमावाद सुरु झाला आहे . आणि या वादाला कारणीभूत ठरला आहे एक नकाशा . 5 ऑगस्टला जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळे केल्यावर त्यांची सीमा ठरवणारा नकाशा भारताने 2 नोव्हेंबर 2019 ला प्रसिद्ध केला, आणि हाच नकाशा भारताच्या आणि नेपाळच्या बाबतीत वादाचा विषय ठरला आहे . नेपाळच्या  हद्दीतील कालापाणी भारताने स्वतःच्या क्षेत्रात दाखवले आहे, अशा आरोप नेपाळने 6 नोव्हेंबर 2019मध्ये पत्रकार परिषद घेऊन केला आहे .   त्याला  भारताने कडाडून विरोध केला आहे . भारताच्या सीमाविषयक नकाश्यात काहीच बदल करण्यात आलेला नाही . फक्त काश्मीर चा नकाशा बदलल्याने त्याचाच नकाशा बदलला आहे  . जेव्हा भारतात कोणतेही नवीन राज्य , जिल्हा निर्माण...

भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 4

इमेज
                 मित्रानो आपली भारतीय रेल्वे जगातील एक प्रमुख सरकारी मालकीची वाहतूक सेवा आहे . आपण आपल्या भारतीय रेल्वेला कितीही शिव्या देत असलो तरी  भारतीय रेल्वेचे  महत्त्व कमी होत नाही..प्रवाश्यांच्या सोयीसाठी आजमितीला (हा ब्लॉग लिहीत असताना ) भारतीय रेल्वे तब्बल 17 प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवते . या 17 प्रकारच्या गाड्यांमध्ये  मी फक्त आपल्यासारख्या लोकांना सेवा देणाऱ्या गगाड्यांचा  समावेश केला आहे. माल वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचा  मी यामध्ये समावेश केलेला नाही . आपल्या भारताच्या विविध भागात या रेल्वेगाड्या चालवल्या जातात. त्यातील काही प्रकारच्या गाड्यांची माहिती आपण या ब्लॉगच्या तिसऱ्या भागात करून घेतली . ज्यांना ती माहिती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे                  तर मित्रानो आता बघूया इतर रेल्वे गाड्यांची माहिती . (1) अंत्योदय एक्स प्रेस : या गाड्यांमध्ये अनारक्षित  कोच असतात .  (प्रथम येती...