पोस्ट्स

अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस

इमेज
             आपल्या महाराष्ट्राला अत्यंत गौरवशाली इतिहास  लाभलेला आहे हे आपण जाणताच,  त्याचप्रमाणे अनेक भौगोलिक चमत्कार सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आहेत . त्यामुळेच असेल कदाचित देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आपल्या महाराष्ट्रात आहेत, आणि हे सर्व जर आपणास एकाच वेळी बघायचे असेल तर .? आपणास महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याला अर्थात अहमदनगर जिल्ह्याला भेट देणे क्रमप्राप्त आहे .  काय नाही,  अहमदनगर जिल्ह्यात ?संत ज्ञानेश्वर यांना लोकभाषेतून गीतेवरील भाष्य स्फुरले ते याच अर्थात अहमदनगर जिल्ह्यात अख्या भारताला सहकाराच्या मंत्र याच अहमदनगर जिल्ह्यातून देण्यात आला .  कोळशाच्या राखेतून उभारलेले भारतातील पहिले धरण  भाटघर धरण हे याच जिल्ह्यातील . एक महत्वाचा नैसर्गिक चमत्कार असणारे 4 एकरावरील वडाचे झाड याच जिल्ह्यातील . या  अश्या विविधतेने नटलेल्या जिल्ह्याचे मुख्यालय अर्थात अहमदनगर शहराची बातच काही और . एकेकाळचे उत्कृष्ठ शहरनियोजनाचा मापदंड ठरवणारे शहर म्हणजे अहमदनगर , आपल्या भारतातील सर्व प्रका...

शेतकरी कर्जमाफी आणि बँकिंग प्रणालीची मूलभूत सूत्रे

इमेज
           सध्या सर्वत्र शेतकरी कर्जमाफीची चर्चा मोठ्या जोरात  सुरु आहे . शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारते की नाही हा वादाचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवूया . मात्र मी एम बी ए करत असताना शिकलेल्या बँकिंग विषयातील ज्ञानानुसार असे कर्ज माफ करणे हे बँकिंग प्रणालीच्या मूलभूत सुत्रासी पूर्णतः विसंगत आहे ते कसे विसंगत आहे हे सांगण्यासाठी आजचे लेखन .तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठात एम बी ए करताना  बँकिंग विषयात मी शिकलो की , बँकेचे मुख्य कार्य हे कर्ज देणे आहे , त्यासाठी आवश्यक असणारे भागभांडवल ती लोकांकडून ठेवीच्या स्वरूवपात स्वीकारते . लोकांनी ठेवी बँकेत ठेवाव्यात म्हणून ती त्यांना काही प्रमाणात व्याज देते . यासाठी आणि इतर आस्थापनावरील खर्च भरून निघण्यासाठी बँका या ज्यांना कर्ज देतात त्यांच्या कर्जावरील व्याज दर हा ते ठेवीदारांना देत असलेल्या दरांपेक्षा अधिक ठेवतात . कर्जावरील व्याजदरांमुळे मिळणाऱ्या नफ्यातून त्या इतर सर्व खर्च भागवतात . काही जण वरचे विवेचन वाचून म्हणतील याचा आणि शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा ...

महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेला झालेला कर्करोग .......

इमेज
                 आज फेसबुकवर सहज सर्फिंग करत असताना एका दैनिकाच्या बातमीच्या कात्रणांचा फोटो दिसला . बातमी आपल्या महाराष्ट्र एसटी विषयी होती . त्या बातमीत सांगितले होते की आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या लांब पल्ल्याचा आणि आंतरराज्य बसेस कमी असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळास प्रचंड प्रमाणात तोटा होत आहे . मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे . माझे आजचे लेखन महाराष्ट्राच्या एसटीला असणाऱ्या या महत्वाच्या मात्र काहिस्या न चर्चिल्या जाणाऱ्या बाबींविषयी        तर मित्रानो , मी अनेकदा नाशिकला राजस्थान राज्य परिवहन मंडळाची शिर्डी ते उदयपूर अशी बस बघितली आहे  या बाबत मी नाशिकला अधिक चौकशी केल्यावर समजले की ही बस रोज धावते .  हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण झाले . नाशिकहून कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या   3 बसेस बेळगावला जातात तर एक बस रायबागला जाते . मात्र नाशिकहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एकही बस कर्नाटकमध्ये जात नाही . गोवा राज्याच्या परिवहन मंडळाची  एक बस पं...

राष्ट्रीय भुगोल दिनाच्या निमित्याने

इमेज
                भूगोल आपल्यापैकी अनेकांचा शालेय स्तरावरील नावडता विषय . . मात्र हा विषय आपल्या जीवनात अत्यंत उपयुक्त असणारा विषय आहे  . आपण भूगोल विषयाशी पूर्णपणे बांधली गेलो आहे . मराठवाडा हा मागास का आहे ? जागतिक राजकारणात काश्मीरचे महत्व मोठ्या प्रमाणवर का आहे ?  सिंगापूर या देशाने अल्पावधीत प्रचंड प्रगती कशी काय केली ? अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणस भूगोलाच्या विविध उपशाखांच्या अभ्यासाने समजतात ,     भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल( political geography  ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography )वगैरे . मात्र शालेय  अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो . आणि भूगोलाशी असणारा असणारा संपर्क तुटतो .     तो परत स्थापित व्हावा या साठी साजरा करण्यात येतो तो राष्ट्रीय हवामान दिवस . जो मकर...

भारताला ऑस्करची बाहुली कधी मिळणार ?

इमेज
                  दिनांक 13जानेवारी 2020ला सायंकाळी 92व्या ऑस्करच्या विविध गटातील नामांकन जाहीर झाले . जगातील सर्वाधिक चित्रपट निर्माण करणाऱ्या भारताच्या एकाही चित्रपटाचा यात समावेश नाहीये . नाही म्हणायला माहितीपट या वर्गवारीत एक नामांकन मिळाले आहे ., हाच तो काय दिलासा . जागतिक स्तरावर मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्करबाबत भारताची पाटी काही अपवाद वगळता कायमच कोरी राहिली आहे . मात्र या विषयी फारसे बोलले जात नाही . त्याबाबत असणारे मौन सोडण्यासाठी आजचे लेखन .                                       जागतिक स्तरावरील चित्रपटांचा विचार करता , भारतीय चित्रपट तंत्रज्ञानाचा विचार करता कोठेही मागे नाही . मात्र तरीही ऑस्करची बाहुली भारतीयांच्या हातात काही येत नाही , माझ्या मते यासाठी एक महत्तवाचे कारण म्हणजे व्यावसायिक स्तरावरील चित्रपटांचे विषय .  व्यावसायिक स्तरावरील  भारतीय चित्रपट हा खूपच मर्यादित विषयांवर असतात . त्याची चौकट रुंदावणे ...

स्वामी विवेकानंदांना अपेक्षित तरुणाई आणि वस्तुस्थिती

इमेज
         आज 12 जानेवारी अर्थात स्वामी विवेकानंदांची जयंती,  अर्थात  राष्ट्रीय युवा दिन . आज दिवसभरात स्वामीजींच्या आयुष्यावर आधारित विविध कार्यक्रम होतील . त्यांच्या कार्याचे गोडवे गायले जातील . मात्र स्वामी विवेकानंद ज्या तरुणाईच्या बळावर आपल्या भारताला गतवैभव प्राप्त करून देणार होते , तिची आजची स्थिती स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असणारी आहे का ? याचा विचार करता समोर येणारे चित्र फारसे आशादायक नाही असेच खेदाने म्हणावे लागेल . माझे आजचे लेखन त्यासाठी . स्वामी विवेकानंदानी आपले सर्वस्व त्यागून भारताच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या तरुणाईचे स्वप्न बघितले होते . त्यासाठी त्यांनी प्रसंगी आपल्या देवदेवतेचा त्याग करून भारतमाता हीच आपली देवता मानून तिची सेवा करण्याचा विचार देखील मांडला होता .                         दोन दिवसपूर्वीच एका मराठी वृत्तवाहिनीवर एक बातमी दाखवली होती , ज्यात सांगितले होते की , गेल्या वर्षभरात सुमारे दीड हजार तरुणांनी ( मला येथे  भाषेमुळे लिंगभेद करावा लागत आहे . मी जरी पु...

93व्या साहित्य संमेलनामुळे मनात उमटलेले भावतरंग

इमेज
                  दिनांक 10 जानेवारी 2020ला उस्मानाबाद येथे  93व्या साहित्य संमेलनाचे उदघाटन झाले . मला कळायला लागल्यापासूनचे हे 15/16संमेलन . मी नाशिकला वनप्रेमी असणारे ज्येष्ठ साहित्यिक  मारुती चितमपल्ली हे  संमेलाध्यक्ष असणारे साहित्य संमेलन आणि पुण्यात सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेले साहित्य संमेलन  ही दोन संमेलने अगदी जवळून त्यातील कार्यक्रमांच्या आस्वाद घेत अनुभवली . बाकीच्या साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांच्या प्रसार माध्यमांनी केलेल्या  बातम्यांच्या स्वरूपात अनुभवली . माझ्या मते या सर्व साहित्य संमेलनांमध्ये  होणारे वाद , (ज्यामध्ये साहित्य क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध असणारे आणि साहित्य क्षेत्राशी अप्रत्यक्षरित्या संबंधित असणारे दोन्ही वाद मला अपेक्षित आहेत ) त्यावर विविध लोकांची मते , या संमेलनाच्या आयोजनावरून  ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे सारख्या व्यक्तीची मते,  . यासाठी सरकारतर्फे देण्यात येणारे अनुदान , त्यावरून उठणारे वादंग , या सर्व स...