पोस्ट्स

मराठी दिन विशेष

इमेज
                 आपल्या भारतात,  महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देणारे पहिले राज्य , समस्त भारतातला रोजगार हमी योजनेची ओळख करून देणारे राज्य , भारताला सहकाराची ओळख करून देणारे राज्य , महिलांना  शिक्षण देण्याची सुरवात करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे . आणि अश्या प्रतगशील विचाराच्या राज्याची राज्यभाषा म्हणून मराठीची ओळख आहे .. जगातील 15 कोटी लोकसंख्येची मातृभाषा असणाऱ्या या मराठी भाषेत नवनवीन विषयावरचे , आधुनिक ज्ञान यावे , मराठीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी , यावर काय करावे?  या बाबत गाठायचा आहे विचारमंथन करणे सोपे व्हावे या उद्देश्याने योजलेला दिन म्हणजे जागतिक मराठी दिन जो 27 फेब्रुवारी रोजी असतो . या दिनानिमित्य समस्त मराठी जनतेला खूप खूप शुभेच्छा .                   हा लेख लिहीत असताना म्हणजेच 26 फेब्रुवारी2020 रोजी मराठीची सद्यस्थिती काय आहे ? आतापर्यंत मराठीच्या उन्नतीसाठी कोणकोणती पाऊले उचलण्यात आली ? आणि याची फलनिश्चिती काय ? याचा मागोवा घेत...

वंदन क्रांतीकारी विज्ञानप्रेमीला

इमेज
                    आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची  जर आपण यादी केली  तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या  गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम  निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?  याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .                     सावरकरांनी आपल्या प्राचीन वारसा लाभलेल्या हिंदू धर्मातील कालसुसंगत नसणाऱ्या  चालीरीतींना  तिलांजली देत त्यास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवले . त्यासाठी त्यांन...

नावात काय आहे ?

इमेज
       नावात काय आहे ,असे सुप्ररसिद्ध इंग्ररजी साहित्ययीक शेक्सपियर यांचे विधान आहे. मात्र सदर विधान करतांना शेक्सपियर यांनी सन 2020मध्ये भारतात येणाऱ्या शिक्षणतज्ञांचा विचार बहुधा केला नसावा,कारण त्यांनी जर असा विचार केला असता , तर खचितच त्यांनी असे विधान केले असते. कारण सन 2020 मधील भारतातील शिक्षणतज्ञांनी शेक्सपियरला खोटे पाडणारे संशोधन केले आहे .नापास या शद्बामुळे विद्यार्थ्यांचा मनात भिती बसते , सब   नावात काय आहे? असे इंग्रजीतील सुप्रसिद्ध साहित्यीकब त्यांना नापास न म्हणता कँपिसिटिबल म्हणावे, असा आदेश.सिबिएससी च्या शिक्षणतज्ञांनी काढला आहे . मात्र मुळात अभ्यासात कमकुवत असणारे विद्यार्थी अभ्यासात भक्कम बनतील याबाबत कोणती कार्यवाही करण्यात यावी, याबाबत त्यांनी सोईस्कर मौन धारण केले आहे . अभ्यासात एखादा विषय कमकुवत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे न शिकवता अन्य कोणती पद्धत वापरता येवू शकते ?याबाबत त्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे .त्यांना काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास मनाई करुन एक प्रकारे त्यांना विषमतेचीच वागणूक दिली आहे .त्यामुळे सर्वस...

असा राजा न होणे !

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच गर्वाने छाती फुलून न येणारा एखादाच कोणी महाराष्ट्रीयन असेल.तेराव्या शतकात यादवी साम्राज्य लयास गेल्यावर सुमारे साडेतीनशे वर्ष स्वतःचे सत्व विसरलेल्या समाजास गतवैभवाची आठवण त्यांनी करुन दिली .त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत , मध्ययुगीन भारतीय ईतीहासातील आरमार उभारणारा एकमेव राज्यकर्ता हा बहुमान देखील मिळवला . राजेंखेरीज समुद्रापर्यत आपले राज्य नेणारे काही राज्यकर्ते आपणास मध्ययुगात सापडतात. मात्र आरमार उभारले ते छत्रपती शिवाजी  महाराजांनी . राजांचे कार्य  येव्हढ्यावरच थांबत नाही, त्यांनी स्थानिक जनतेची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असावी . यासाठी देखील प्रयत्न केले . त्यासाठी स्वतंत्र्य राज्यकारभार कोष देखील त्यांनी तयार केला . आजदेखील आपण स्थानिक न्यायालयांचा कारभार बहुतांश वेळा इंग्रजी भाषेतून करतो, तो जेव्हा स्थानिकांना समजेल अस्या मराठी भाषेत येईल ,तेव्हाच महाराजांंचे  रयतेच्या राज्याचे स्वप्न  प्रत्यक्षात साकार होईल, असे मला वाटते.महाराज्यांचा काळात सध्या ज्या प्रमाणे इंग्रजी भाषेतील शद्ब मराठीत रुढ होत आहे , त्याप्रमाणे अनेक ...

वंदन बाँलीवूडच्या पित्याला

इमेज
                                       16फेब्रुवारी 1946 ही फक्त एक तारीख नाहीये . आज कोट्यावधीचा व्यवसाय बनलेल्या बाँलीवूडचा जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या निधनाची तारीख आहे ही . मी हा लेख लिहीत असताना 2020या वर्षी  गोष्टीला 74 वर्षे पुर्ण होउन 75वे वर्ष  सुरु झाले आहे . या 75वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . मला त्यात पडायचे नाही , त्यात पडण्याची माझी बौद्धीक क्षमता देखील नाही . मला तूमचे लक्ष वेधायचे आहे . आपण महाराष्ट्रीयन हा वारसा कोणत्या प्रकारे जतन करतोय या कडे .  मराठीतील एक अजरामर लेखक श्री . पु. ल देशपांडे यांच्या अपुर्वाई या प्रवासवर्णनात  400 वर्ष जून्या असणाऱ्या शेक्सप्रिययरच्या घराचे जतन केल्याचा उल्लेख आहे . त्या तूलनेत आपला कालावधी फारसा नाही . मात्र आपण दादासाहेब फाळके यांचा कोणता वारसा जतन केला आहे ?असा विचार करता समोर येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही .                     ...

वर्षपुर्ती वंदे भारतची

इमेज
                 दिनांक 15फेब्रुवारी 2015रोजी भारतीय रेल्वेत एक नवा अध्याय लिहला गेला . पुर्णतः स्वदेशी बनावटीची, अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आणि तब्बल 160किमी प्रती तास या वेगाने धावू शकणारी वंदे भारत एक्सप्रेस याच दिवशी भारतीय रेल्वेत दाखल झाली .आज हा लेख लिहीत असताना त्यास एक वर्ष पुर्ण झाले आहे . या एका वर्षात भारतीय रेल्वे फक्त वंदे भारत एक्सप्रेसवरच थांबली नाही , प्रवाश्यांना पाश्चात्य देशातील रेल्वेसेवीची अनुभती यावी या हेतूने अनेक पावले या कालावधीत उचलली गेली .ज्यामध्ये डिझेल आणि इलेक्टीसिटी या दोन्हीवर चालू शकणाऱ्या इंजिनाची स्वदेशीचा पद्धतीने निर्मिती, रेल्वेच्या महसुलात सर्वाधिक वाटा उचलणाऱ्या मालवाहतूकीसाठी मुंबई सुरत दिल्ली आणि कोलकात्ता दिल्ली या मार्गावर स्वतंत्र्य मार्गिकेच्या कामाला देण्यात आलेली गती, त्याचप्रमाणे, जर अपघात झाल्यास एकमेकांवर न चढणाऱ्या, प्रवासा दरम्यान प्रवाश्यांना धक्के विरहीत अनुभव देणाऱ्या , पारंपारीक डब्यांचा तूलनेत कमी आवाज करणाऱ्या LHB  डब्यांच्या निर्मितीला दिलेला वेग या प्रमुख गोष्टी...

अन्य राज्य परिवहन महामंडळ आणि आपली MSRTC

इमेज
                    नुकताच काही अपरिहार्य कारणास्तव महाराष्ट्राची एसटी बस सोडून प्रत्येकी एकदा  कर्नाटक आणि गुजरात राज्यच्या एसटी बसने प्रवास करावा लागला . या प्रवाश्यादरम्यान मला वाढलेली गोष्ट म्हणजे संबंधित राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची रचना . .आपल्या महाराष्ट्राच्या बसेसपेक्षा कर्नाटकाच्या बसेस लांबीने थोड्या मोठ्या होत्या . तसेच त्या बसेसमध्ये एका रांगेत 5आसने होती . गुजरातची एसटी आपल्या महाराष्ट्र्राच्या बसेसपेक्षा लांब नव्हती याही बसमध्येएका रांगेत 5आसने होती . आपल्या महाराष्ट्राच्या बसेसमध्ये पूर्र्वी 5आसने होती . मात्र कालांतराने आरामदायी प्रवाश्यांचा प्रवास आरामदायी करण्याच्या हेतून आपल्या बसेस मध्ये एका रांगेत फक्त 4असणे ठेवण्यात येऊ लागली . मात्र या बसेसमध्ये अजून एका रांगेत पाच आसने आहेत . आपली आसने कमी का करण्यात आली ? पूर्वीप्रमाणे एका रांगेत पाच आसने असावीत . यासाठी मी एसटीच्या एका अधिकाऱ्याशी  नंतर संवाद साधला असता त्याने आपली भौगोलिक परिस्थिती कर्नाटक आणि गुजरात पेक्षा भिन्न असल्याने ते ...