पोस्ट्स

जगात हेबी घडतंय

इमेज
                     सध्या कोणतेही प्रसारमाध्यम बघीतले तर आपणास सर्वत्र कोरोनामुळे समाजातील विविध घटकांचे होणारे हाल, त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण अश्या प्रकारच्या बातम्याच दिसतात . कोरोना भयंकर आहेच.याबाबत शंकाच नाही, मात्र काळ्याकुट्ट अंधारात एखादी मिणमीणती पणतीसुद्धा आशेचा किरण मनात तेवत ठेवते, त्याप्रमाणे एक सकारात्मक बाब सध्या जगाच्या क्रिडा विश्वात घडत आहे,माझे आजचे लेखन त्या बाबीवर आपले लक्ष वेधण्यासाठी . जगात सकारात्मक तरंग निर्माण करणारा तो खेळ आहे , बुद्धीबळ .आपल्या भारतीय भुमीवर निर्माण झालेला हा खेळ .                               तर मित्रांनो या बुद्धीबळाच्या विश्वातील मानाची समजली जाणारी नेशन कप ही स्पर्धा 5मे ते 10मे या कालावधीत पार पाडली .  फिडे अर्थात फेडरेशन इंटरनँशनल डिईचेस या बुद्धीबळ या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत आणि चेस डाँट काँम या संकेतस्थळाच्या सहकार्याने ही स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच आँनलाईन पद्धतीने प...

ओळख एका वन कथा संग्रहाची

इमेज
              मारुती चितमपल्ली....... पेशाने वनखात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे मराठीतील नामवंत साहित्यिक . अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्याक्ष . जंगले आणि त्यातील समाजजवीन तसेच  प्राणीजीवनावर आधारित साहित्य जगविख्यात आहेत . त्यांच्या \प्रसिद्ध असणाऱ्या साहित्यामध्ये "केशराचा पाऊस " या कथासंग्रहाचा बराच वरचा क्रमांक लागतो . सध्याच्या लोकडाऊनच्या काळात मी ते पुस्तक   नुकतेच वाचले .                           पुस्तकात त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळाळतील आठवणी कथारूपाने सांगण्यात आलेल्या आहेत . पुस्तकात 16कथा असून पहिल्या दोन कथांमध्ये अनेक प्रकरणे आहेत .  पुस्तकाची भाषा संवादी असल्याने पुस्तक जरी माहितीविषयी असले तरी पुस्तक वाचणे कंटाळवाणे न होता ज्याला  ज्ञानवर्धक (  INFOTAINMENT ) म्हणता येईल असे झाले आहे .सदर पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख माधव असा केला असून . या कथासंग्रहातील कथांमध्ये सुरवातीच्या 9 कथांमध्ये नायका बरोबर त्याची नायिक...

ओळख एका रत्नाची

इमेज
                                आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयामुळे नावारूपास  आलेल्या आहेत ,  वहिदा   रेहमान त्यापैकीच एक  मूळच्या  तेलगू भाषिक  असणाऱ्या या मुस्लिम  धर्मीय अभिनेत्रीने आपल्या सहज सध्या अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीत एक काळ गाजवून टाकला . गाईड , प्यासा सारखे  अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले . सुरवातीच्या काळात तेलगू भाषेतील चित्रपट केलेल्या या अभिनेत्रीने अनेक पत्रकारांना प्रदीर्घ मुलाखती दिल्या आहेत .त्यापैकीच एक म्हणजे नसरीन मुन्नी कबीर  यांना. वहिदा रेहमान यांनी दिलेली मुलाखत ..नसरीन मुन्नी कबीर  यांना दिलेली प्रदीर्घ मुलाखत पुस्तक रुपाने प्रसिद्ध करण्यात आली आहे . मुळची इंग्रजीत असलेल्या या प्रदीर्घ मुलाखतीचे मराठीतील ज्येष्ठ सिने पत्रकार, आणि आघाडीचे अनुवादक मिलींद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक रोहन प्रकाशनामार्फत प्रकाशीत करण्यात आले आहे.        ...

भारतीय रेल्वेची गगनभरारी

इमेज
सध्या सर्वत्र करोनाची दहशत असताना काही मनाला प्रसन्न करणाऱ्या घटना देखील घडत आहेत . ज्यामध्ये भारतीय रेल्वेने घेतलेली  गगनभरारी  ही एक प्रमुख घटना आहे.  भारतीय रेल्वेने दिनांक 25 एप्रिल 2020 रोजी आपल्या आधीच्या WAG 9H या इंजिनात अनेक बदल करत तयार केलेल्या WAG 9HH या नव्या इंजिनाची यशस्वी छाननी करून एक मैलाचा दगड सैर केला . आता काही प्रशासकीय पातळीवरच्या पूर्तता केल्यावर हे इंजिन भारतीय रेल्वेत दाखल करण्यात येईल . ज्यामुळे भारतातील रेल्वेमार्फत करण्यात येणारी मालवाहतूक अधिक जलद गतीने म्हणजाईच 100किलोमीटर प्रति तास या वेगाने करणे सहजशक्य होईल . सध्या भारतीय रेल्वेमार्फ़त ज्या वेगाने मालवाहतुक केली जाते तो वेग आहे फक्त 20 ते 25 किमी प्रति तास . म्हणजेच या मुळे भारतीय रेल्वे यामुळे किती पुढे जाईल हे सहज लक्षात येते . भारतीय मालवाहतुकीसाठी क्रांती म्हणून ज्या DEDICATED FRIDGE CORRIDGE  (DFC)कडे बघितले जाते . त्यासाठी या प्रकारची इंजिन येणे अत्यावश्यक होते . यामुळे भारतीय रेल्वेची गगनभरारी म्हणूनच याकडे बघणे अत्यावश्यक आहे .         ...

"उत्तमांची ते घ्यावे

इमेज
       काही दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे . काही अपरिहार्य कारणास्तव मी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास केला . या बस प्रवासादरम्यान मला आढळलेली एक प्रमुख गोष्ट म्हणजे त्यांच्या तिकिटावर देण्यात येणारी माहिती . मित्रानो त्या तिकिटावर मला मी प्रवास करत असणाऱ्या ठिकणादरम्यान किती किलोमीटर अंतर आहे , याची माहिती देण्यात आली होती . आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तिकिटांवर अशी माहिती देण्यात येत नाही . आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन बसेसच्या तिकिटांवर बसेसचे टप्पे देण्यात आलेले असतात . एका टप्यासाठी अमुक इतकें भाडे त्यामुळे त्यामुळे एकूण टप्पे गुणिले एका टप्याचे भाडे बरोबर इतके भाडे अशी रचना असते . माझ्या मते आर्थिक सोयीसाठी आपली पद्धत अधिक सयुक्तिक असली तरी प्रवाश्यांच्या एकूण सोयीसाठी प्रवाश्याना आपण एकूण किती अंतर जाणार आहोत हे कळणे चांगले नाही का ? गाडयांची सरासरी गती लक्षात घेऊन आपणास किती वेळ लागणार आहे ? याची माहिती त्यामुळे सहजतेने लक्षात येते .            समर्थ रामदास स्वामी  यांचे "उत...

वाचावीच अशी कांदबरी : महाश्वेता

इमेज
          कोड........  मिलॅलीन   नामक एका अंतस्रावाच्या कमतरतेमुळे होणारी व्याधी . शरीराच्या त्वचेच्या रंग या मध्ये बदलतो . या खेरीज माणसामध्ये कोणतेही बदल या मध्ये होत नाही . मात्र हे झाले व्यक्तीच्या शारीरिक बदलांविषयी . मात्र आपल्या भारतासारख्या रुढीप्रिय देशामध्ये संबंधित देशामध्ये त्या व्यक्तीचे मनोविश्व या मध्ये अक्षरशः ढवळून निघते . सध्या सन 2020 मध्ये या मध्ये काहीसा बदल झालेला असला तरी सन 1960 च्या सुमारास हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होते . आणि   जर व्यक्ती जर महिला असेल तर विचारयलाच नको ,   लग्न झालेल्या महिलांना तर याचीच झळ मोठ्या प्रमाणत बसते  .     कोडंच निमित्त करून संबंधित महिलेचा काहीही अपराध नसताना तिला कायमस्वरूपी माहेरी पाठवणारी मंडळी अश्या  महिलेचे जीवन अक्षरश नकोसे करतात . अश्याच एका अभागी स्त्रीची कथा म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सुमती क्षेत्रमाडे यांनी पन्नासच्या दशकात लिहलेली मात्र आजच्या सन 2020मध्ये सुद्ध...

ओळख एका डॉनच्या जडणघडणीची

इमेज
                       दाऊद इब्राहिम कासकर ....... . मुंबईच्या पोलिस दलातील आचरणाने धार्मिक वृत्तीचा असलेल्या  कॉन्स्टेबल  इब्राहिम कासकर याचा मुलगा  अर्थात भारताला हवा असणारा डॉन दाऊद इब्राहिम . या दाऊदविषयी इंग्रजी भाषेत बरेच काही लिहून आलेले आहे . मात्र मराठी मुलखात जन्मलेल्या या डॉन विषयी मराठीत तसे कमीच लिहून आलेले आपणास दिसते .त्यातही मुळातील इंग्रजी भाषेतील  मजकुराचा मराठीत केलेला अनुवादाचं अधिक . याच अनुवादित मजकुराच्या मालिकेतील एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे ज्यावर आधारित बॉलीवूडमध्ये शूट आऊट लोखंडवाला हा चित्रपट तयार आला ते पुस्तक अर्थात डोंगरी ते दुबई . मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले . ओघवती सहज सोप्या मराठीत अनुवादित झालेले हे पुस्तक  त्याच्या भाषाशैलीमुळे पाहिल्या बरोबरच मनाचा ठाव घेते               अनुवादकाचे मनोगत , अनुवादित पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाचे हितगुज अशी इतर अनुवादित पुस्तकात दिस...