पोस्ट्स

भारतीय रेल्वेचे पाऊल पडते पुढे

इमेज
            विविध 16 उपकंपन्यामार्फत  वेगवेगळ्या  प्रकारची देशसेवा करणाऱ्या,  तसेच विविध अश्या  17 प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवणाऱ्या आपल्या भारतीय रेल्वेत सध्या अत्यंत जलद गतीने खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे ज्यामध्ये रेल्वेमार्गातील गेजचे विविध प्रकार नाहीसे करून भारतातील सर्व रेल्वे या ब्रॉडगेज या एकाच स्वरूपात आणणे, सर्व रेल्वेचे विद्युतीकरण करणे . उत्पनाचे विविध मार्ग शोधणे  आदी गोष्टींचा समावेश करावा लागेल याच बदलाच्या मालिकेत गेल्या पंधरवड्यात  देशाच्या प्रगतीला वेगाने चालना देणाऱ्या 2 गोष्टी महाराष्ट्रात तर एक गोष्ट केरळ या राज्यात घडली . माझे लेखन  आजचे या बदलाची माहिती देण्यासाठी              तर मित्रानो,  गेल्या पंधरवड्यात आपल्या महाराष्ट्रातील नाग विदर्भ ( विदर्भातील नागपूर विभागीय आयुक्ता  लयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला नाग विदर्भ म्हणतात . तर अमरावती आयुक्तालयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला वऱ्हाड म्हणतात ) प्रदेशातील गोंदिया -छिनवाडा आणि नागपू...

मानवा आता तरी जागा हो !

इमेज
                          मी अनेकदा चँनेल न्युज एशिया , एन एच के वर्ल्ड , सि एन एन आदि वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळाला भेट देत असतो . अनेक नविन माहिती त्यामुळे होत असते. मी तीन चार दिवसापुर्वी अशीच भेट दिली असता बिबिसी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील  विज्ञान विषयक विभागामध्ये दोन    नविन माहिती मिळाल्या  .त्यानंतर मी मराठी वृत्तवाहिन्यांवर सबंधित बातम्या  शोधण्याचा प्रयत्न केला असता , ती न मिळाल्याने आजचे लेखन त्या बातमीविषयी . या  बातमीच्या  लिंक मी या लेखाच्या खाली दिलेल्या आहेत  दोन्ही बातम्या हवामान बदल या विषयाशी संबधित आहेत . तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे बेट म्हणून सर्वाना परिचित असणाऱ्या ग्रीनलँड या बेटावरील बर्फ वितळण्याचा वेगाचा नवा उच्चांक झाल्यासंबंधी ती बातमी होती . बातमीत सन 2017 आणि 2018 या दोन वर्षात  बर्फ वितळण्याचा वेग कमी झालेला असताना सन 2019 या वर्षी हा बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढल्याचे एका बातमीत सांगण्यात आले आहे . तर दुसऱ्या बातमीनुसार वाढत...

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

इमेज
  इंडोनेशिया देशातील मंदिरातील गणपती                         सर्वप्रथम सर्वांना  गणेशॊच्छवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.  सध्या आपण सर्व मराठी भाषिक गणेशॊच्छवच्या रंगात रंगून गेलो आहोत. मित्रानो बुद्धीची देवता असणारी , कोणत्याही पूजेच्या वेळी अग्रपूजेचा मान असणारी, गणाचा अधिपती असणाऱ्या गणपती ही देवता फक्त आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातच पुजली जाते, असे आपणास वाटतं असेल तर आपण चुकलात  ,भारताबरोबर भारत आणि चीन या प्राचीन संस्कृतीचा एकत्रित प्रभाव आढळणाऱ्या आग्नेय आशियातील अनेक देशात गणपती पुजला जातो . आपल्या महाराष्ट्रातील गणपतीच्या साडेतीन पिठाची आणि  वैदर्भीय अष्टगणेशाची माहिती आपण माझ्या या आधीच्या लेखातून घेतली आहेच . ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करावे . माझे  आजचे लेखन आग्येय आशियातील गणपतीची माहिती देण्यासाठी   .    व्हिएतनाम मध्ये शिवलिंग , विष्णू , दुर्गा , कार्तिकेय , गणपती त्याचप्रमाणे बुद्ध , बोधिसत्व यांच...

गोष्ट पृथ्वीबाहेरच्या समुद्राची

इमेज
                       सध्या  खगोलविश्वात अनेक  क्रांतिकारी म्हणता येतील असे शोध लागत आहे . मात्र आपल्या भारताच्या वृत्तवाहिन्या एका हिंदी सिने अभिनेत्याच्या मृत्यूबाबत पोलीसांबरोबर  तपासात मग्न असल्याने त्या याविषयी माहिती देऊ शकत नाही . त्यांची ही कमतरता भरून काढण्यासाठी सदरचे लेखन                                     तर मित्रानो युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका या देशाची अंतराळ संस्था असणाऱ्या नासा या संस्थेमार्फत नुकतेच त्यांनी लावलेले शोध जाहीर करण्यात आले . जे मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या मध्ये असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्यातील (ASTEROID BELT ) सेरेस या बटुग्रहावर  (DRAFT PLANT  ) प्रकाश टाकणारे आहेत . (सेरेस या बटूग्रहाचे इंग्रजी स्पेलिंग CERES असून त्याचे दोन ते तीन वेगवेगळे उच्चार करण्यात येतात . मात्र सेरेस हा उच्चार अधिक करण्यात येत असल्याने मी तो वापरत आहे )  नासाने सेरेस या बटुग्रहाची माहिती काढण्...

आकडेवारी भोवळ आणणारी

इमेज
           आपल्या भारतात लोकसंख्येचा विचार करुन सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या दहा शहरांची यादी केली असता त्यामध्ये पुणे  शहराचा (कँम्प आणि पिंपरी चिंचवड  परिसर वगळून )क्रमांक सन 2011 च्या अहवालानुसार आठवा आहे . त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार पुणे शहराची संख्या  (कँम्प आणि पिंपरी चिंचवड  परिसर वगळून ) ही 31 लाख आहे . हे सांगायचे कारण की ,दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी केंद्र सरकारची एक संस्था असलेल्या CMIE मार्फत जुलै महिन्यात बेरोजगार झालेल्या व्यक्तींची प्रसिद्ध झालेली संख्या . CMIE मार्फत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशभरात जुलै महिन्यात  व्हाईट कॉलर रोजगार काम करणाऱ्या  50 लाख व्यक्तीच्या नोकऱ्या गेल्या आहेत . समस्त लोकडाऊनचा विचार करता हा आकडा संपूर्ण मुंबई महानगर रिजनल डेव्हलमेंट  ऑथॉरिटी (MMRDA) क्षेत्रातील एकूण लोकसंख्येएव्हढा अर्थात  पावणे दोन कोटी आहे . (मुंबई देशातील 3 ऱ्या क्रमांकाचे शहर आहे . हे आपण लक्षात घेतले पाहिजे ) . CEMIS मार्फत प्रसिद्ध प्रसिद्ध झालेली ...

सात वर्षे शरमेची

इमेज
                 सन 2020, आँगस्ट20 ही निव्वळ एक तारीख नाहीये . महाराष्ट्रातील विवेकाचा आवाज आपल्यातून निघून जाण्याला तब्बल 7वर्ष पुर्ण करणारा दिवस . आजच्याच दिवशी 7वर्षापुर्वी अर्थात सन2013 आँगस्ट 20रोजी पुण्यातील ओकांरेश्वर पुलाजवर सकाळी सव्वासातच्या सुमारास डाँ. नरेद्र दाभोळकर यांचा खुन करण्यात आला , आणि महाराष्ट्रातील विवेकाचा आवाज आपल्यातून कायमस्वरुपी निघून गेला   या सात वर्षात डॉक्टर नरेंद दाभोळकर यांच्या खून करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळणे दूरच त्यांच्या खून करणाऱ्या व्यक्ती नक्की कोण आहेत ? याचा पण उलगडा सरकारला करण्यात आलेला नाही . काही जणांना संशयित म्हणून अटक करून चौकशी करण्यात आली . मात्र त्यांच्याविरुद्ध पुण्याचा प्राथमिक न्यायालयात सुद्धा खटला दाखल होऊ शकला नाही . आपली भारतीय न्यायव्यवस्था ज्यांना माहिती आहे , त्यांना हेही माहिती असेल की , प्राथमिक न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालय दाद मागता येते . उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते .  सर्वोच न्यायालयाच्या निकालावर...

हा विक्रम अभिमानास्पद नाही !

इमेज
                सध्या भारतीय करोनाच्या धास्तीत जगत असताना त्याही पेक्षा धक्कादायक बातमी नुकतीच भारतीय हवामान खात्यामार्फत जाहिर करण्यात आली . जेव्हापासून हवामानाच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली, त्यापासूनच्या आतापर्यतचा विचार केला असता जमू काश्मीर  या केंद्रशासित प्रदेशमधील कुपवारा  येथे आँगस्ट महिन्यातील सर्वाधिक 17 आँगस्ट रोजी  तापमान नोंदवले गेले , तसेच प्रमाणे श्रीनगर येथे देखील गेल्या 39 वर्षातील सर्वाधिक तापमान  नोंदवले गेले आहे.अशी ती बातमी होती .सध्याच्या हवामान बदलाच्या काळात या बातमीला विशेष महत्त्व आहे .                 गेल्या चार ते पाच वर्षापासून आपण हवामानात होणारे बदल तिव्रतेने अनुभवत आहोत . नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात पडणारा पाउस , हिवाळ्यात पडणारी असाह्य थंडी, उन्हाळ्यात नोंदवलेले जाणारे प्रचंड तापमान, पावसाची येण्याची तारीख उशीरा होणे , कमी वेळात जास्त पाउस पडण्याचा प्रसंगामध्ये वाढ होणे यासारखे बदल आपण अनुभवत आहोत . मात्र या बदलांना सामोरे जाताना ज्या गतीन...