पोस्ट्स

ब्रेक्सिट चा गुंता सुटता सुटेना (ब्रेक्सिट भाग 7)

इमेज
   सध्या आपल्या भारतातील  वृत्तवाहिन्या एका हिंदी अभिनेत्याच्या मृत्याबाबत रोज दळण दळत असताना, चॅनेल न्यूज एशिया, दि डब्लू , या सारख्या आंतराष्ट्रीय वाहिन्यांवर नजर टाकली असता, या[ आपणास जग एका वेगळ्या चिंतेत  असल्याचे समजते . जगाचा काळजीचा विषय आहे, ब्रेक्सिट . त्याविषयी माहिती करून देण्यासाठी आजचे लेखन . माझी  ही  ब्रेक्सिटविषयीची सातवी पोस्ट आहे . (माझ्या सहाव्या पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या निवडणुकीत कॉन्झररेटिव्ह पक्षाचे  बोरिस जॉन्सन निवडून आलेले आहेत )  ज्यांना या आधीच्या पोस्ट वाचायच्या असतील त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंक बघाव्यात    तर मित्रानो , सध्या युनाटेड किंग्डम हा देश युरोपीन युनियम मधून अशंतः बाहेर पडला असून सध्या दोन्हीच्या बाबतीत ट्रान्झिशन पिरियड सूरु आहे . ज्याची मुदत 31 डिसेंबर 2020 मध्ये संपुष्टात येत आहे . त्या आधी काही बाबीची पूर्तता होणे आवश्यक आहे . मात्र त्या बाबीबाबत युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियन या मध्ये होणाऱ्या चर्चेत एकमत होत नाहीये . युनाटेड किंग्डमचे सध्याचे पंतप्रधान...

विश्व निर्मितीचे कोडे उलगडले की झाले अजून गहन ?

इमेज
आपल्या भोवताली असणाऱ्या अथांग अश्या विश्व निर्मितीचे कोडे उलगडले की अजून गहन झाले ? असा प्रश्न पडावा अस्या घडामोडी नुकत्याच खगोलशास्त्रात घडल्या . त्याविषयी आपल्याकडे इंडियन एक्सप्रेस सारख्या काही इंग्रजी वृत्तपत्रे सोडून अन्य माध्यमांनी फारशी दखल घेतलेली नाही . आपल्याकडे इंग्रजी भाषेतील माध्यमांपेक्षा  प्रादेशिक भाषेत माहिती देणाऱ्या माध्यमांना  काहीसे अधिक महत्व असल्याने मराठी या प्रादेशिक भाषेत तो शोध सांगण्यासाठी आजचे लेखन . या लेखाच्या शेवटी मूळ इंडियन एक्सप्रेस या  वृत्रपत्रातील लेखाची लिंक दिली आहे . ज्यांना या शोधाची मुळातून माहिती हवी आहे, अश्या व्यक्ती त्या  लिंकवर क्लिक करून मुळातून लेख वाचू शकतात     तर .मित्रानो , आपल्या पृथ्वीपासून  17 अब्ज प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या  एका ठिकाणहून दोन कृष्णविवर एकत्र आल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे . शास्त्रज्ञांनी या जागेला  GW190521  असे नाव दिले आहे  आपण जी घटना आता बघतो आहोत ती घटना 17 अब्जवर्षांपूर्वी घडून गेली आहे . त्या वेळी निर्माण झालेल्या  गुरुत्त्व...

विश्वविक्रम करणारी आपली भारतीय रेल्वे

इमेज
                        आपली भारतीय रेल्वे गेल्या काही दिवसापासून सातत्त्याने विश्वविक्रम करत आहे . हे सर्व विश्वविक्रम नवीन मार्ग उभारताना झाले आहेत . ज्यामध्ये नवीन मार्ग उभारताना उभारण्यात येणाऱ्या पुलांचा समावेश करावाच लागेल . गेल्या वर्षभरतील रेल्वेचा नवीन मार्ग उभारणीचा आढावा घेतल्यास जम्मू काश्मीर आणि आणि ईशान्य भारतात रेल्वेने अनेंकअर्थात  विश्वविक्रम करणारे पुलांची निर्मिती केल्याचे दिसते . अत्यंत प्रतिकूल भौगोलिक स्थितीवर मात करत रेल्वेने हे पूल बांधलेले आहेत . या प्रत्येक पुलाचे स्वतंत्र असे वैशिष्ट आहे . काही वेळेस ज्या  पूल ज्या समुद्रसपाटीवर उभारण्यात येत आहे त्यामुळे विश्वविक्रम होत आहे , कधी त्या  पुलासाठी वापरण्यात यणाऱ्या पद्दतीमुळे तर कधी , पुलाची उंचीमुळे हे पूल विश्वविक्रम करत आहे .  माझे आजचे लेखन त्या साठीच                 मित्रानो , सध्या ईशान्य भारतातील राज्याच्या राजधान्या रेल्वेच्या नकाश्यावर आणण्याबरोबर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्...

भारतीय रेल्वेची घोडदौड सुरूच

इमेज
 जगात चौथ्या क्रमांकाची मालवाहतूक करणारी, ऑस्ट्रोलिया या देशाच्या एकूण लोकसंख्येएव्हढ्या व्यक्तींची दररोज वाहतूक करणारी भारतीय रेल्वे सध्या वायुवेगाने बदलत आहे . रोज नवनवीन कीर्तिमान रेल्वेकडून केले जात आहेत , हे आपण जाणतातच . मग तो कधी जगातील विश्वविक्रम करणारे पूल बांधणे असो, अथवा मालवाहतूक वेगवान व्हावी यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना असो किंवा प्रवाश्याना अधिक दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी केलेली उपाययोजना असो . भारतीय रेल्वे कायमच प्रगतीच्या वाटेवर प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत आहे . माझे आजचे लेखन यातील काही बाबींची दखल घेण्यासाठी .  तर मित्रानो , नुकतेच देशातील मालवाहतुकीची अधिक वेगाने विनाअडथळा वाहतूक व्हावी या हेतूने उभारण्यात येणाऱ्या डेडिक्रेडीटेड फ्रेड कॉरिडार च्या नव्या मार्गासाठी करावयाची कार्ये रेल्वेकडून सुरु करण्यात आली आहेत . त्या अंतर्गत विजयवाडा ते इटारशी(975किमी ), विजयवाडा ते खडकपूर (1115किमी  ) आणि भुसावळ ते कोलकत्ता (1673 किमी )रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहेत . हे तिन्ही रेल्वेमार्ग मिळून 4000 किमी असणार आहे ज्यामुळे खनिज संपत्तीने समृद्ध मात्र औद...

27 वर्षापूर्वीची ती काळरात्र

इमेज
                   दिनांक 1सप्टेंबर 2020 रोजी अनंत चतूर्दशी आहे, हे आपण जाणतातच. या दिवशी भगवान गणराय आपली पृथ्वीवरील यात्रा संपवून परत  कैलाशावर जातात, अशी मान्यता आहे . याच अनंत चतूर्दशीचा दिवशी आजपासून 27 वर्षापूर्वी म्हणजेच सन 1993 साली सप्टेंबर महिन्यात 30 या दिवशी गणपतीने कैलासला जाताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या बरोबर नेले , लातूरचा भुकंप म्हणून ही घटना सगळ्यांना माहिती आहे .             मित्रांनो 25 वर्षाची एक पिढी मानण्यात येते, या हिशोबाने लातूर किल्लारीचा भुकंप होवून एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे .यामध्ये सदर परीसर पुर्णपणे बदलला गेला आहे , यात शंकाच नाही . मात्र या भुकंपात अनेक कुटुंबातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता सर्वचा सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या . 20व्या शतकातील सर्वात मोठ्या दुर्घटनेत या भुकंपाचा विचार होतो. तिथीने 27वर्षे पुर्ण झाल्याबद्दल यात मृत्युमुखी पडलेल्या ,आत्पेष्ठ गमवलेल्या सर्वांना आदरांजली.          लातूर किल्लारी परीसराला ला...

भारत ऐतिहासिक विजयाचा उंबरठ्यावर

इमेज
  29 ऑगस्ट  2020 रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात येत असताना समस्त भारतीय क्रीडाविश्व आनंदाने न्हाऊन जावे अशी बातमी भारतात  येवून धडकली. ती होती , बुद्धीबळाच्या आँल्मपियाडमध्ये  भारतीय संघ पहिल्यांदाच आंतीम फेरीत पोहचण्याची , आणि या संघाचे  नेर्तुत्व करत आहे, एक महाराष्ट्रीयन खेळाडू,  नाशिकचा युवा गँंडमास्टर विदीत गुजराथी .  मित्रांनो, सध्याच्या करोनाचा काहीस्या नैराश्याचा वातावरणात चैतन्य आणण्याचा या स्पर्धेची सुरवात झाली .ती 24जूलै रोजी .40 संघाच्या समावेश असणारी ही स्पर्धा करोनाच्या भितीमुळे पहिल्यांदाच आँनलाईन पद्धतीने खेळवण्यात आली . ज्यामध्ये भारताने सुरवातीच्या खेळ्यांमध्ये धडाकेबाज खेळ करत 27आँगस्ट पासून सुरू झालेल्या बाद फोटो य त   (नाँक आउट )मध्ये प्रवेश केला. उप उपांत्य फेरीत (क्याटर फायनल) भारताच्या संघाने अर्मेनियाचा पराभव केला आणि  उपांत्य फेरीत (सेमी फायनल )मध्ये  पोलंडचा  पराभव करत आंतिम फेरीत प्रवेश केला आहे . आंंतीम फेरी जागतिक प्रमाण वेळेनुसार 30आँगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता (भारतीय प्रमाणव...

मानवा तूझे काउंटडाऊन सुरु झाले आहे .

इमेज
               सध्या समस्त भारतीय वृत्तवाहिन्या एका हिंदी अभिनेत्याचा मृत्यबाबत पोलिसांच्यापेक्षा अधिक गतीने तपास करत असताना मानवजातीचे पृथ्वीवरचे दिवस भरले असल्याचे सुचित करणाऱ्या अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र भारतीय  वृत्तवाहिन्या याबाबत काहीच बातम्या दाखवताना दिसत नाहीये . तर मित्रांनो मी सदर लेखन करत असताना भारताच्या बिहार , आसाम, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांसह पाकिस्तानातील सिंध प्रांत(त्यातही कराची शहर) आणि उत्तर कोरीया , दक्षीण कोरीया, चीन, युनाटेड स्टेटस् आँफ अमेरीका आदी देशात बदलत्या हवामानाने तेथील प्रशासनाला अक्षरशः.रडकुंडीला आणले आहे. बिहार ,आसाम, हिमाचल प्रदेश , गुजरात ,सिंध आदी भागात अत्यंत कमी वेळात पडलेल्या अतिमुसळधार पावसाने प्रचंड प्रमाणात पुर आलेले आहेत . तर उत्तर कोरीया , दक्षीण कोरीया, चीन, अमेरीका आदी देशात नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेच्या आलेल्या वादळाने तेथील जनजीवन विस्कळीत केले आहे, आणि हे सर्व घडत आहे , जगात तिव्रतेने बदलत जाणाऱ्या हवामानामुळे .                     ...