पोस्ट्स

बिगुल 46व्या अमेरीकेच्या अध्यक्षाचे (भाग5)

इमेज
                          सध्या आपल्या भारतात करोना साथीच्या काळात बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात निवडणूकीचे पडघम वाजत असताना जगातील एक क्रमांकाची महासत्ता असणाऱ्या अमेरीकेच्या 46व्या अध्यक्षासाठी 2020 नोव्हेंबर 3 रोजी होणाऱ्या निवडणूकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत एक मुद्दा भलताच गाजत आहे, तो म्हणजे पोस्टामार्फत होणारे मतदान.(माझी ही अमेरीकेच्या 46व्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणूकीसंदर्भात 5वी पोस्ट आहे . ज्यांना या आधीच्या पोस्ट वाचायचा आहेत, ते या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लिक करु शकतात )                    हा मुद्दा समजण्यासाठी आपणास काही बाबी माहिती असणे आवश्यक आहे, त्यापुढीलप्रमाणे . अमेरीकेत आपल्या भारताप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोग नाहीये , त्याठिकाणी प्रत्येक राज्य स्वतंत्र्यपणे राज्यपातळीवर आणि केंद्रीय पातळीवर निवडणूका घेते .परीणामी प्रत्येक राज्याची निवडणूक घेण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी आहे. अमेरीकेत कोणत्याही निवडणूकीत सुमारे 50% मतदान होते.  हा मज...

वंदन योद्धा संन्याश्याला

इमेज
                                       आजपासून 127 वर्षापुर्वीची गोष्ट आहे,स्थळ अमेरीका या देशातील शिकागो हे शहर . या शहरात ते शहर ज्या देशात आहे, त्या भुभागाचा जगाला शोध लागल्याच्या घटनेला 400 वर्षे पुर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ जगातील सर्व धर्मातील बाबींवर चर्चा करण्यासाठी एक परीषद आयोजीत करण्यात आली  .होती  आज परीषदेचा पहिला  दिवस आहे, या दिवशी ज्या वक्त्यांनी बोलण्याचे नियोजन केले आहे, त्यातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता , सर्व वक्त्यांची भाषणे झाली आहेत,अश्यावेळी तेथील आयोजक एका 30 वर्षीय वक्त्याला बोलण्यास आमंत्रीत करतात, वक्ता त्यांचा गुरूचे स्मरण करुन भाषणास सुरवात करण्यासाठी शद्ब उचारतो, आणि त्याचे पहिले चार शद्ब उचारुन होत असतानाच जमलेले हजारो लोक त्या वक्त्याचा सम्माणार्थ सलग साडेतीन  मिनीटे टाळ्या वाजवते, त्या व्यक्तीचे नाव असते, स्वामी विवेकानंद , आणि ज्या परीषदेत त्यांनी भाषण केले असते, ती असते शिकागो येथील सर्वधर्म परीषद .सन 2020 सप्टेंबर 11 रोजी भारताच्या ...

ईशान्य भारत आणि इतर भारताचा भाग यातील सेतू बांगलादेश

इमेज
मित्रानो, सध्या आपल्या भारतीय वृत्तवाहिन्या एका अभिनेत्याच्या अकाली मृत्यूमुळे उठलेल्या वावटळाच्या बातम्यांत मग्न असताना भारताचा विचार केला असता काहीश्या बाजूला असणाऱ्या ईशान्य भारताचा भारताचा इतर भागाशी अधिक प्रमाणात संपर्क यावा , ज्यामुळे भारताची एकत्मकता अधिक प्रमाणत वाढीस लागेल या हेतूने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत . ज्याचामध्ये भारताचा महत्तवाचा साथीदार म्हणून बांगलादेश महत्तवाची भुमिका बजावत आहे. माझे आजचे लेखन या बांगलादेशाच्या सहभागाविषयी माहिती करुन देण्यासाठी                       तर मित्रांनो,  गेल्या महिन्याभरात ईशान्य भारताशी जलद संपर्क व्हावा या हेतून बांगलादेशाबरोबर 2  कामांचा शुभारंभ करण्यात आला, आणि एका कामासंदर्भात  काही महत्व्वाचे करार करण्यात आले . ज्या कामाच्या शुभारंभ करण्यात आला ती कामे बांगलादेशाबरोबर जलवाहतुकीद्वारे संपर्क साधून त्याद्वारे ईशान्य भारतात विविध सामानाची नेआण करण्या संदर्भात आहे . ज्यामध्ये समुद्री मार्गाबरोबर बांगलादेशातील नद्यांचा वापर करत ईशान्य भारतापर्यंत पोहोच...

ब्रेक्सिट चा गुंता सुटता सुटेना (ब्रेक्सिट भाग 7)

इमेज
   सध्या आपल्या भारतातील  वृत्तवाहिन्या एका हिंदी अभिनेत्याच्या मृत्याबाबत रोज दळण दळत असताना, चॅनेल न्यूज एशिया, दि डब्लू , या सारख्या आंतराष्ट्रीय वाहिन्यांवर नजर टाकली असता, या[ आपणास जग एका वेगळ्या चिंतेत  असल्याचे समजते . जगाचा काळजीचा विषय आहे, ब्रेक्सिट . त्याविषयी माहिती करून देण्यासाठी आजचे लेखन . माझी  ही  ब्रेक्सिटविषयीची सातवी पोस्ट आहे . (माझ्या सहाव्या पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या निवडणुकीत कॉन्झररेटिव्ह पक्षाचे  बोरिस जॉन्सन निवडून आलेले आहेत )  ज्यांना या आधीच्या पोस्ट वाचायच्या असतील त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंक बघाव्यात    तर मित्रानो , सध्या युनाटेड किंग्डम हा देश युरोपीन युनियम मधून अशंतः बाहेर पडला असून सध्या दोन्हीच्या बाबतीत ट्रान्झिशन पिरियड सूरु आहे . ज्याची मुदत 31 डिसेंबर 2020 मध्ये संपुष्टात येत आहे . त्या आधी काही बाबीची पूर्तता होणे आवश्यक आहे . मात्र त्या बाबीबाबत युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियन या मध्ये होणाऱ्या चर्चेत एकमत होत नाहीये . युनाटेड किंग्डमचे सध्याचे पंतप्रधान...

विश्व निर्मितीचे कोडे उलगडले की झाले अजून गहन ?

इमेज
आपल्या भोवताली असणाऱ्या अथांग अश्या विश्व निर्मितीचे कोडे उलगडले की अजून गहन झाले ? असा प्रश्न पडावा अस्या घडामोडी नुकत्याच खगोलशास्त्रात घडल्या . त्याविषयी आपल्याकडे इंडियन एक्सप्रेस सारख्या काही इंग्रजी वृत्तपत्रे सोडून अन्य माध्यमांनी फारशी दखल घेतलेली नाही . आपल्याकडे इंग्रजी भाषेतील माध्यमांपेक्षा  प्रादेशिक भाषेत माहिती देणाऱ्या माध्यमांना  काहीसे अधिक महत्व असल्याने मराठी या प्रादेशिक भाषेत तो शोध सांगण्यासाठी आजचे लेखन . या लेखाच्या शेवटी मूळ इंडियन एक्सप्रेस या  वृत्रपत्रातील लेखाची लिंक दिली आहे . ज्यांना या शोधाची मुळातून माहिती हवी आहे, अश्या व्यक्ती त्या  लिंकवर क्लिक करून मुळातून लेख वाचू शकतात     तर .मित्रानो , आपल्या पृथ्वीपासून  17 अब्ज प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या  एका ठिकाणहून दोन कृष्णविवर एकत्र आल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे . शास्त्रज्ञांनी या जागेला  GW190521  असे नाव दिले आहे  आपण जी घटना आता बघतो आहोत ती घटना 17 अब्जवर्षांपूर्वी घडून गेली आहे . त्या वेळी निर्माण झालेल्या  गुरुत्त्व...

विश्वविक्रम करणारी आपली भारतीय रेल्वे

इमेज
                        आपली भारतीय रेल्वे गेल्या काही दिवसापासून सातत्त्याने विश्वविक्रम करत आहे . हे सर्व विश्वविक्रम नवीन मार्ग उभारताना झाले आहेत . ज्यामध्ये नवीन मार्ग उभारताना उभारण्यात येणाऱ्या पुलांचा समावेश करावाच लागेल . गेल्या वर्षभरतील रेल्वेचा नवीन मार्ग उभारणीचा आढावा घेतल्यास जम्मू काश्मीर आणि आणि ईशान्य भारतात रेल्वेने अनेंकअर्थात  विश्वविक्रम करणारे पुलांची निर्मिती केल्याचे दिसते . अत्यंत प्रतिकूल भौगोलिक स्थितीवर मात करत रेल्वेने हे पूल बांधलेले आहेत . या प्रत्येक पुलाचे स्वतंत्र असे वैशिष्ट आहे . काही वेळेस ज्या  पूल ज्या समुद्रसपाटीवर उभारण्यात येत आहे त्यामुळे विश्वविक्रम होत आहे , कधी त्या  पुलासाठी वापरण्यात यणाऱ्या पद्दतीमुळे तर कधी , पुलाची उंचीमुळे हे पूल विश्वविक्रम करत आहे .  माझे आजचे लेखन त्या साठीच                 मित्रानो , सध्या ईशान्य भारतातील राज्याच्या राजधान्या रेल्वेच्या नकाश्यावर आणण्याबरोबर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्...

भारतीय रेल्वेची घोडदौड सुरूच

इमेज
 जगात चौथ्या क्रमांकाची मालवाहतूक करणारी, ऑस्ट्रोलिया या देशाच्या एकूण लोकसंख्येएव्हढ्या व्यक्तींची दररोज वाहतूक करणारी भारतीय रेल्वे सध्या वायुवेगाने बदलत आहे . रोज नवनवीन कीर्तिमान रेल्वेकडून केले जात आहेत , हे आपण जाणतातच . मग तो कधी जगातील विश्वविक्रम करणारे पूल बांधणे असो, अथवा मालवाहतूक वेगवान व्हावी यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना असो किंवा प्रवाश्याना अधिक दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी केलेली उपाययोजना असो . भारतीय रेल्वे कायमच प्रगतीच्या वाटेवर प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत आहे . माझे आजचे लेखन यातील काही बाबींची दखल घेण्यासाठी .  तर मित्रानो , नुकतेच देशातील मालवाहतुकीची अधिक वेगाने विनाअडथळा वाहतूक व्हावी या हेतूने उभारण्यात येणाऱ्या डेडिक्रेडीटेड फ्रेड कॉरिडार च्या नव्या मार्गासाठी करावयाची कार्ये रेल्वेकडून सुरु करण्यात आली आहेत . त्या अंतर्गत विजयवाडा ते इटारशी(975किमी ), विजयवाडा ते खडकपूर (1115किमी  ) आणि भुसावळ ते कोलकत्ता (1673 किमी )रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहेत . हे तिन्ही रेल्वेमार्ग मिळून 4000 किमी असणार आहे ज्यामुळे खनिज संपत्तीने समृद्ध मात्र औद...