पोस्ट्स

नमन आधुनिक भारताच्या निर्मात्याला

इमेज
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आधुनिक भारताची उभारणी करण्याचे शिवधनुष्य ज्यांनी आपल्या खांद्यावर लीलया पेलले , अश्या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वांपैकी एक असणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरु यांची 14नोव्हेंबर ही जयंती, त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना विनम्र आदरांजली. 1947च्या सुमारास एखाद दोन वर्षे मागे पुढे  जगभरातील 90 हुन अधिक देश पारतंत्रातून स्वतंत्र झाले, त्या देशातील आजची स्थिती आणि भारताची सद्यस्थिती याचा मागोवा घेतल्यास आपणास पंडीत नेहरु यांचे योगदान लक्षात येते. भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी अनेक ब्रिटीश आणि पाश्चात्य विचारवंतांनी भारताच्या भवितव्याबाबत अत्यंत प्रतीकुल मते व्यक्त केली होती. ती मते खोटी ठरवली गेली, ती पंडीत नेहरुंमुळेच. एखाद्या वर्गात जर 60 विद्यार्थी असतील, तर वर्गातील सर्वच विद्यार्थी  पहिल्या क्रमांकावर उतीर्ण होत नाही, एखाद दुसराच पहिलाच क्रमांकाने उतीर्ण होतो, मात्र यामुळे पंधरा अथवा विसाव्या क्रमांकाने उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला कमी लेखणे चूकीचे असते. तसेच भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांचे आहे. भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांपैकी काही देश प्रगतीबाबत भ...

धनत्रयोदशी विशेष

इमेज
बाल गोपाळ अबाल वृद्ध ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात , ज्याच्या बाबतीत दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा ,असे म्हटले जाते , त्या दिवाळीचा आज पहिला दिवस अर्थात धनत्रयोदशी . त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवशी वैद्यकशास्त्राची देवता असलेल्या धन्वंतरीची पुजा करुन आपल्या चांगल्या आरोग्याची मनोकामना केली जाते. धन्वंतरीकडे ,दिर्घायूसाठी प्रार्थना केली जाते .काही समाज घटकात आज धनाची देवता असणाऱ्या कुबेराचे पुजन केले जाते.  दिवसामागे काही दंतकथा सांगितल्या जातात त्यौेकी एक म्हणजे  या दिवशी कथित भविष्यवाणीनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मुत्यूमुखी पडणार होता. आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुख उपभोगावे म्हणून राजा, राणी त्यांचे लग्न करून देतात. लग्नानंतर चौथा दिवस त्यांचा मुत्यूमुखी पडण्याचा दिवस असतो. या दिवशी रात्रभर त्यांची पत्नी त्याला झोपू देत नाही. तसेच त्यांच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवते. सर्व महालात लखलखीत प्रकाश केला जातो. त्यावेळी यमराज त्याच्या खोलीत सर्प रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सोने-चांदी, मोहरांनी त्यांचे ड...

भारतीय रेल्वे झपाट्याने कात टाकणारी रेल्वे

इमेज
आपल्या अजस्त्र असणाऱ्या भारतीय रेल्वेत सध्या अनेक बदल होत आहेत. हे आपण जाणतातच त्यातील काही बदल सकारात्मक  स्वरुपाचे आहेत . तर काहींना काहीसी नकारात्मक छटा आहे. हेही आपणास ज्ञात असेलच . याच सकारात्मक आणि नकारात्मक बदलाच्या खेळात दोन महत्तपुर्ण बदल भारतीय रेल्वेत नुकतेच झाले. अन्य बातम्यांमध्ये मुख्य धारेतील माध्यमे गुंतून गेली असल्यामुळे त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. मात्र हे बदल सगळ्यांना माहिती असणे आवश्यक असल्याने ते सांगण्यासाठी आजचे लेखन सर्व प्रथम नकारात्मक छटा असणारे लेखन बघूया . तर मित्रांनो, भारतीय रेल्वेच्या 16 उपकंपन्या आहेत. (या उप कंपन्याची माहिती या आधी 2ब्लाँग पोस्टद्वारे शेअर केली आहेच. ज्यांना ती परत वाचायची त्यांचासाठी या लेखाच्या खाली त्याचा लिंक परत देत आहे.) त्यातील एक महत्त्वाची उपकंपनी म्हणजे रेल्वे विकास निगम लिमिटेड होय. RVNL  ही  उपकंपनी रेल्वे संरचनेची क्षमता तयार करणे आणि वाढविणे. बहुपक्षीय / द्विपक्षीय निधी संस्थांच्या माध्यमातून आणि प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी घरगुती मार्केटद्वारे संसाधने एकत्रित करणे, यासाठी 2003 साली स्थापन करण्यात ...

भारताचा इतर देशात डंका

इमेज
                         सध्या आपल्या भारतातील मुख्य धारेतील माध्यमे अनेक काहिस्या निरुपद्रवी, मुद्यांवर चर्चेची गुऱ्हाळे चालवत असताना,समस्त भारतीयांची मान गर्वाने ताठ व्हावी , अस्या दोन घटना घडल्या. त्याविषयी पारंपारीक माध्यमांमध्ये फारसी चर्चा न झाल्याने त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.                  तर जागतिक व्यापाराच्या दृष्टीने मोक्याचा ठिकाणी वसलेल्या आणि सन 2008 पासून चीन ज्या क्षेत्रात विविध गोष्टींमार्फत आपले अस्तिव दाखवून देत आहे, अस्या लाल समुद्र आणि एडनच्या आखात तसेच अरबी समुद्र  यांच्या मध्ये नकाश्यामध्ये  गेड्यांचा शिंगाप्रमाणे भासणाऱ्या  भुप्रदेशातील अर्थात हाँन आँफ आफ्रिका या भागातील नागरीकांना  भारताच्या नौदलामार्फत मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली.भारतीय नौदलाच्या आय एन एस ऐरावत या जहाजामार्फत हाँन आँफ आफ्रिका भागातील नागरीकांना 155 मेट्रीक टन गव्हाचे पीठ, 65 मेट्रीक टन तांदूळ आणि 50 मेट्रीक टन साखर असा एकदंरीत 270 मेट्रीक टन अन्नसाठा नु...

चीनच्या अप्रकाशीत 2 बातम्या

इमेज
भारताने संयुक्त राष्टसंघात मागणी केल्यामुळे ज्या देशाला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाले. मात्र त्या देशाने या उपकाराची परतफेड भारताचा पाठीत खंजीर केली. अर्थात चीन (अधिकृत नाव पिपल्स रिपब्लिक आँफ चायना )च्या संदर्भात दोन बातम्या नुकत्याच मी  बिबिसी या वृत्तवाहिनीवर बघीतल्या. आपल्या भारतातील मुख्य धारेच्या प्रसार माध्यमांनी याकडे दुर्लक्ष केल्याने समर्थांच्या "जे जे आपणासी ठाव, ते सकलांंसी सागावे, शहाणे करुन सोडावे सकल जना", या उक्तीनूसार याबाबत माहिती देण्यासाठी आजचे लेखन . तर मित्रांनो, आपल्या झिनझीयांग आणि तिबेट या राज्यातील जनतेवर प्रचंड अत्याचार करणाऱ्या, ज्या देशाचा लोकशाही विचाराचे आंदोलने अत्यंत क्रुरपणे दडपण्याचा इतिहास आहे, अस्या चीन आणि ज्या देशातील सध्या अस्तिवात असणाऱ्या 4 पैकी 2 प्रांतात  उघडपणे केंद्र सरकारविरोधी भुमिका आहे. ज्या देशातील एका प्रांताने केंद्र सरकारमार्फत केलेल्या अत्याचाराला कंटाळून स्वतःचा वेगळा देश तयार केला, अस्या पाकिस्तानाला नुकतेच  सयुंक्त राष्ट्र संघाच्या जगभरातील  व्यक्तींचे मानवी हक्क कायम राहवेत, यासाठी कार्यरत असणाऱ्या का...

खगोलशास्त्र प्रेमींना मोठी पर्वणी

इमेज
                            आपल्या भारतात पर्वण्यांना धार्मिकदृष्ट्या अन्यन्य साधरण महत्व आहे. खुप वर्षांनी अथवा दिवसांनी या पर्वण्या येतात, त्यामुळे या दिवशी केलेल्या धार्मिक विधी विधींना विशेष महत्त्व आहे .पुढच्या मंगळवारी अर्थात 17नोव्हेंबरला अशीच एक पर्वणी येणार आहे. मात्र ही पर्वणी धार्मिकदृष्ट्या नाही तर खगोलशास्त्र प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे . आकाशात पुर्व दिशेला या  पर्वणीचा योग असणार आहे                                      या दिवशी सुर्याभोवती 33 वर्षात एक फेरी पुर्ण करणाऱ्या टेंम्पल टटेल या धूमकेतूमुळे पृथ्वीवर  उल्कावर्षाव होणार आहे . दरवर्षी  नोव्हेंबर महिन्यात 14 नोव्हेंबर ते 21नोव्हेंबर या दिवशी  या धूमकेतूमुळे उल्का वर्षाव होत असतो. जो दर 33 वर्षांनी सगळ्यात जास्त होत असतो. या आधी सन 1998 साली तो सगळ्यात जास्त दिसला होता.  दर वर्षीप्रमाणे याही वर्षी  देखील तो  ह...

चीनचा विस्तारवाद सुरुच

इमेज
                        आपल्या भारताइतकीच प्राचीन संस्कृती असलेल्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला असता  जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश असणाऱ्या चीनचा विस्तारवाद अजूनही सुरु असून  त्यांनी नेपाळच्या 5 जिल्ह्यातील एकत्रीत 150 हेक्टर जमिन स्वतःच्या नियंत्रणात घेतल्याचे नुकतेच स्पष्टपणे निर्दशनास आले आहे.या मुळच्या नेपाळच्या मात्र चीनने अनधिकृतरीत्या घेतलेल्या भुभागावर चीनने काही इमारती आणि लष्करी ठाणी उभारली असल्याची माहिती युनाटेड किंग्डमच्या काही माध्यम़ानी दिली आहे                  नेपाळ आणि चीनची सिमा हिमालयाच्या डोंगराळ भागातून जात असल्याने नदीच्या तिर किंवा एखादा खांब उभारुन ही सीमा निश्चित केली आहे. चीनच्या लष्कराने (ज्याला पिपल्स लिबरेशन आर्मी अथवा संक्षिप्त स्वरुपात पि एल ए म्हणतात) हे खांब उखडून अथवा नदीच्या प्रवाहात बदल करुन ही घुसखोरी केली आहे. नेपाळच्या ज्या भागात चीनने घुसखोरी केली आहे, त्या भागातील नेपाळी नागरीकांचे विविध उत्पादने चीनकडून खरेदी करण्यात ...