पोस्ट्स

जागतिक राजकारणाला नवे वळण देणाऱ्या घटनेनंतरची 42 वर्षे!

इमेज
   आज 2021 फेब्रुवारी 11 अर्थात .जागतिक राजकारणाला नवे वळण देणाऱ्या इराणच्या सुप्रसिद्ध क्रांतीला 42 वर्षे पुर्ण होण्याचा दिवस .आजच्याच दिवशी 42वर्षापुर्वी अर्थात 1979 फेब्रुवारी 11 रोजी इराणमध्ये सुप्रसिद्ध खोमोनी क्रांती झाली. याच वर्षी सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले, ज्याची किंमत आज देखील अफगाणिस्तान भोगतोय.असो.       आधुनिक मुल्यांवरील इराणची पायाभरणीचे स्वप्न घेवून त्याप्रमाणे सन 1961 पासून वाटचाल करणाऱ्या तत्कालीन इराणचे राजे शाह मोहमद्द  यांची सत्ता उलथवून टाकत , रुढिवादी धार्मिक विचारांचा प्रभाव असणारी राजवट ज्या दिवश्यापासून इराणमध्ये सुरु झाली, तो म्हणजे 1979 फेब्रुवारी 11. ज्याला आज 42 वर्षे पुर्ण होत आहे.त्यावेळच्या सरकारच्या काही धोरणांमुळे समाजात बेरोजगारी , आर्थिक विषमता वाढणे, या दोषांबरोबरच  इराणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा फायदा अमेरीका देश घेत आहे. इराणला त्याचा काही फायदा होत नाही  तसेच आपण अमेरीकेचे गुलाम आहोत अशी भावना निर्माण झाली.ज्याचा फायदा तत्कालीन सरकारच्या विरोधात असणाऱ्या कट्टर मानसिकतेच्या लोकांन...

भारतीय रेल्वे विक्रमाचा वाटेवर

इमेज
  1फेब्रुवारी रोजी जाहिर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली .ती म्हणजे डिसेंबर 2023 पर्यत भारतीय रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण करण्याचे. आतापर्यत अत्यंत प्रगत समजल्या गेलेल्या अमेरीका आदी देशात देखील रेल्वेचे पुर्णतः विद्यूतीकरण करण्यात आलेले नाही. त्या पार्श्वभुमीवर या घोषणेचे महत्व अन्यन्यसाधरण आहे. मात्र या घोषणेमुळे एक प्रश्न उपस्थित झाला आहे, तो म्हणजे सध्या वापरात असलेल्या डिझेल इंजिनांचे काय होणार ? रेल्वेविषयक तज्ज्ञांच्या मते रेल्वे या डिझेल इंजिनाबाबत पुढील कार्यवाही होवू शकते. पहिल्या पर्यायानूसार  भारतीय रेल्वे बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ किंवा आफ्रिकन देशातील रेल्वेंना डिझेल इंजिन विकू शकते. आपण काही महिन्यापूर्वीच बांगलादेश रेल्वेला दहा डिझेल इंजिने पाठवली होतीच. दुसऱ्या पर्यायानूसार जवाहारलाल नेहरु पोर्ट टस्ट सारख्या एखाद्या संस्थेला ही इंजीने विकू.शकते. जवाहरलाल नेहरु पोर्ट टस्ट सारख्या संस्थेला कमी अंतरासाठी वजनाने जास्त असणाऱ्या मालाची सातत्याने वाहतूक करावी लागते.त्यासाठी ही रेल्वे इंजिन वापरता येवू शकतील. तिसऱ्या पर्यायानुसार ...

भारतीय रेल्वे प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर

इमेज
            भारतीय रेल्वे वेगाने प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत असल्याचे आपणास ज्ञात असेलच .याच श्रुंखलेत अजून दोन कड्या गुंफल्या गेल्या आहेत. त्याची माहिती करुन देण्यासाठी आजचे लेखन                 तर मित्रांनो, भारतीय रेल्वेतील आरामदायी सेवेसाठी ओळखण्यात येणाऱ्या राजधानी आणि शताब्दी रेल्वेसाठी यापुढे तेजस रेल्वेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोचेस वापरण्यात येणार आहे. ज्यामुळे राजधानी रेल्वे आणि शताब्दी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना तेजसच्या प्रवाश्यांना देत असलेल्या आधुनिक सेवा पुरवणे शक्य होईल.  या रेल्वेसाठी गेल्या पंधरा वर्षापासून एल एच बी कोचेस वापरले जातात. जे आता सर्व सामान्य रेल्वेत वापरले जात असल्याने राजधानी आणि शताब्दी रेल्वेच्या प्रवाश्यांना अधिक आरामदायी सेवा पुरवण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या 100 व्या जयंतीप्रित्यर्थ भारतीय रेल्वेकडून 1969 आँक्टोबर 2पासून आरामदायी  प्रवाश्यासाठी शताब्दी सेवा पुरवण्यात येत आहे. आजमितीस 24 शताब्दी सेवांंच्या माध्यमातून 48 रेल्वे वापरण...

चीनचा विळखा

इमेज
       आपल्या भारताच्या पुर्वेकडे असणारा जगातील क्षेत्रफळाने तिसरा मोठा देश, आपला प्रमुख शत्रू ,आपल्या भारताइतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश म्हणजे चीन. हा चीन आँक्टोपस ज्याप्रमाणे आपल्या सभोवतालचा प्रदेशात आपले पाय पसरवून आपले भक्ष्य भक्षण करतो. त्याचप्रमाणे आपल्या भारताच्या सभोवताली आपले जाळे पसरत आहे, हे आपणास ज्ञात आहेच. नुकतेच या चीनरुपी आँक्टोपसने रम्य ही स्वर्गाहुन लंका या भावगीतात वर्णन केलेल्या लंकेला अर्थात श्रीलंकेला आपला विळखा घातला आहे.            तर मित्रांनो, द हिंदू या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनूसार श्रीलंकेने त्यांचा अति उत्तरेकडे असणाऱ्या जाफना या प्रातांतील तीन बेटांवर चीनला विद्युत प्रकल्प उभारण्यास 18जानेवारी रोजी मंजूरी दिली आहे. या तीन बेटापैकी आकाराने सर्वात मोठे असणारे बेट तामिळनाडूपासून फक्त 26.997 नाँटिकल मैल किंवा 50 किमी अंतरावर आहे.(नाँटिकल मैल हे समुद्रातील अंतर मोजण्याचे अंतर आहे. एक नाँटिकल मैल म्हणजे 1.85 किमी)आणि हे कोणत्या स्थितीत घडतेय? तर  कर्ज न फेडता आल्यामुळे श्रीलंकेच...

खगोलशास्त्रातील नव्या पर्वाला प्रारंभ

इमेज
       आपल्या भारताला अभिमान वाटावा असी खगोलशास्त्रातील घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली. ज्याविषयी आपणाला सांगण्यासाठी आजचे लेखन.           तर मित्रांनो अमेरीका आणि रशिया या देशांचा अपवाद वगळता देशातील इतर 10 मोठ्या अवकाश संशोधन संस्थांनी एकत्र येत जगातील आतापर्यतची सर्वात मोठी रेडीओ दुर्बिण उभारण्याचे ठरवले आहे. ज्यामध्ये भारतासह  आँस्टोलिया , चीन, कँनडा , इटली, न्युझीलंड , दक्षीण आफ्रिका, स्वीडन, नेदरलँडस् आणि युनाटेड किंग्डम (युनाटेड किंग्डमला मराठीत इंग्लड म्हणून ओळखतात. प्रत्यक्षात युनाटेड किंग्डमच्या 4 प्रमुख भागापैकी एक भाग म्हणजे इंग्लड आहे) या देशाचा समावेश आहे. या देशांनी Square Kilometer Arreay Observatory council या नावाची एक संस्था स्थापन केली, असून, या संस्थेमार्फत Square kilometer Arrest Telescope नावाची  रेडीओ दुर्बिणीची उभारणी करण्यात येणार आहे. या संस्थेचे प्रमुखपद सध्या फ्रान्स देशात जन्मलेल्या मात्र सध्या ब्रिटीश.नागरीकत्व असणाऱ्या डाँक्टर Catheine Cesasrky या करणार आहेत. 4 फेब्रुवारी रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात ...

उत्तराखंड येथील दुर्घटनेच्या निमित्याने उपस्थित झालेले काही प्रश्न

इमेज
          आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजो सकाळी आठ ते नऊ दरम्यान उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील रेणी  हिमस्लखलन झाल्याने धोली  नदीला मोठा पूर आला आहे . या हिमस्लखयामुळे धोली नदीवरील ऋषी गंगा या विद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे . या पुराचा परिणाम चामोलीपासून ऋषिकेश पर्यंत जाणवणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे . त्यामुळे जोशीमठ श्रीनगरपर्यंत परिणाम जाणवणार आहे .  जोशीमठच्या एसडीएम कुमकुम जोशी यांनी माध्यमांशी बोलताना  सांगितले की, “तपोवनमध्ये एनटीपीसी आणि ऋषी गंगाचा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. संपूर्ण नदीच चिखलात परिवर्तीत झाली आहे. हा चिखल हळूहळू वाहत आहे या दुर्घटनेत किती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत याचा निश्चित आकडा हा लेख लिहीपर्यंत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही टीव्हीवरील बातम्यांनुसार 8 मृतदेह हाती लागले असून अजून 125 ते 150 जणांचा शोध सुरु आहे ईश्वर या दुर्घटनेत आप्तेष्ट गमावणाऱ्या जीवना हे दुःख शान करण्याची ताकद देवो आणि मृतात्म्यांना सगद्गति देवो हि ईश्वरचरणी प्रार्थना .         ...

खगोलशास्त्रातील अदभूत शोधाची कहाणी !

इमेज
           सध्या आपल्या भारतात कृषी कायद्यामुळे, तसेच पेट्रोल दरवाढीमुळे देश ढवळला जात असताना, खगोलशास्त्रज्ञांना एक महत्त्वाचा शोध लागला आहे. मराठी माध्यमांतून याविषयी फारच कमी माहिती दिली जात असल्याने त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन .       तर मित्रांनो खगोलशास्त्रांना आपल्या पृथ्वीपासून 13 अब्ज प्रकाशवर्षे दूर क्वार्ससचा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांनी याचे नामकरण क्येसार JO313_1806 असे केले आहे. सन 1950 मध्ये मानवास क्येसार ही संकल्पना माहिती झाल्यापासून  आतापर्यत शोधलेल्या क्येसारमध्ये हा क्येसार सर्वात लांबचा क्येसार आहे. हा क्येसार इतका तेजस्वी आहे की याला 13अब्जाच्या ऐवजी 100 प्रकाशवर्षे दूर ठेवले तर हा क्वार्स सुर्याइतका प्रकाशीत दिसेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. खगोलशास्त्रज्ञांनी या क्येसारची प्रकाशमानता +7.7 इतकी निर्धारीत केली आहे. शास्त्रज्ञांनी या क्येसारची निर्मिती विश्वनिर्मितीनंतर 6लाख 70 हजार  वर्षापुर्वी निर्मिती झाली असावी, असा कयास बांधला आहे. Cerro Telolo Inter American वेधशाळेच्या Bianco 4 या दुर्बिणीमार्फ...