पोस्ट्स

घटती प्रशासनातील अधिकाऱ्याची संख्या

इमेज
 4 मार्च 2021 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याची अधिसूचना जाहिर करण्यात आली. 24 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उत्सुक या परीक्षेसाठी आयोगाच्या संकेस्थळावर  अर्ज करु शकतील. जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण  परीक्षा असणाऱ्या या परीक्षेतून ( पहिल्या क्रमांकावर फ्रान्सची नागरी सेवा परीक्षा )  भारतीय प्रशासनाच्या पोलादी चौकटीसाठी अधिकारी निवडले जातील. या वर्षी 712 पदांसाठी अधिकारी निवडले जाणार असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे जाहिर करण्यात आले आहे.       गेल्या काही वर्षाचा विचार करता दरवर्षी मागील वर्षापेक्षा कमी अधिकारी निवडण्याचा प्रघात याही वर्षी कायम आहे. मागील 2020 वर्षी 796 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती. या वर्षी 712 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा होत आहे. सन 2015साली .1129,   ,2016 साली  1079, 2017साली 980  , 2018  साली 792 , 2019 साली 896 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.  पुर्वी दरवर्षी जितके अधिकारी सेवानिवृत्त होत तितकेच आता होत आहेत, मात्र सातत्याने नविन अधिकाऱ्यां...

कोल्हापूर,सोलापूर दोन टोके

इमेज
          काही महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. मी सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये  गेलो होतो. सोलापूर आणि कोल्हापूर हे महाराष्ट्रातील कर्नाटकला लागून असणारे जिल्हे आहेत. कर्नाटकमधील मुंबई कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर हे जिल्हे सिमा शेअर करतात. सोलापूर जिल्हा कर्नाटकच्या मुंबई कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर हैद्राबाद कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर सीमा शेअर करतो. मी दोही शहरांमध्ये प्रत्येकी तीन चार दिवस मुक्काम केला. या दरम्यान मला जाणवलेले घटक आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन                 कोल्हापूरपासून कागलच्या दिशेने25 किमी गेल्यावर कर्नाटक राज्य सुरु होते. मात्र कोल्हापूरमध्ये सर्वत्र मराठीचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. नाशिक किंवा पुण्यात फिरतोय असा भास व्हावा इतके मराठीमय वातावरण या ठिकाणी जाणवते.मी भूगोलाच्या मानवी भूगोल या शाखेचा विद्यार्थी आहे.  त्यावेळी अभ्यासताना मिळालेल्या ज्ञानानुसार सांगतोय. कोणत्याही प्रकारचा मानवी समुह हा बटण दाबल्यावर ज्याप्रकारे लाइट लागतो, अथवा बंद होतो, त्याप्रकारे एखादा विभाग...

खुप काही शिकवून जाणारे गाणे !

इमेज
 कालचीच गोष्ट आहे. एका ठिकाणी चह घेत असताना एका गाण्याचे बोल ऐकू आले. "झूट बोले कंवा काटे, काले कवेंसे बचीयो!...... में मायके चली जाउंगी! तूम देखते रहिंयो!" नवऱ्या बायकोच्या लटक्या भांडणांवर आधारीत  सन 1973 साली आलेल्या बाँबी या चित्रपटातील हे गाणे आपल्याला खुप काही शिकवून जाते असे मला वाटते.या गाण्यासाठी संगीतसाथ दिली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि गायले आहे शैलेंद्र सिंग आणि लता मंगेशकर यांनी.     खोटे बोलल्यामुळे काय होते? यावरुन नवऱ्या बायकोत सुरू झालेल्या संवादात  बायको नवऱ्याला ती विविध गोष्टी करेल ,अश्या धमक्या देते .प्रत्येक वेळेस नवरा तीला प्रत्युतर देते. नंतर ती पत्नी आपले अखेरचे शस्त्र , माहेरी जाण्याची धमकी देते. यावेळी नवरा तू जात असेल तर जा, मी तूझी सवत घरी आणतो, असे तीला बजावतो.आपली सवत येणार, या प्रत्युतरामुळे बायको आपला हट्ट मागे घेत नवरा सांगेल तसे वागायचे मान्य करुन आपला हट्ट मागे घेते, अशी गाण्याची मध्यवर्ती कल्पना आहे.     माझ्यामते या गाण्यातून कोणत्याही गोष्टीला  उत्तर असतेच. या जगात उत्तर नाही, असी गोष्ट अस्त...

अवकाश क्षेत्रातील उभरती महासत्ता भारत !

इमेज
            सन 2021 चा राष्ट्रीय विज्ञान दिन भारताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहला जाईल . कारण या दिवशी भारताने  आपण अवकाश क्षेत्रातील ऊभारती महासत्ता असल्याचे जगाला दाखवूंन दिले आहे . या दिवशी जागतिक प्रमाणवेळेनुसार सकाळी पाच वाजण्याचा सुमारास(भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता ) स्वतःच्या 4 कृत्रिम उपग्रहांबरोबर अन्य दोन राष्टांचे प्रत्येकी एक आणि एका खाजगी अवकाश संस्थेचे  13 असे तब्बल 19 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत . हे सर्व कृत्रिम उपग्रह पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या उपग्रह प्रक्षेपण वाहनातून सोडण्यात आले.  पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाच्या DW प्रकारच्या वाहनातून हे उपग्रह अवकाशात झेपावले . पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाचे हे 53वे उड्डाण होते . यासाठी केंद्र सरकारने 2019 जुलै 5  रोजी स्थापन केलेल्या  New Space India Limted { NSIL } या इसरो च्या व्यावसायिक हेतूसाठी स्थापन केलेल्या विभागाची मदत घेण्यात आली .   ब्राझील येथेही संशोधकांनी भारतीय संशोधकांच्या मदतीने स्वतः...

अत्यावश्यक महत्त्वाचा मुद्यांंना बगल

इमेज
व्यवस्थापनशास्त्रात कामाचे 4 प्रकारे विभाजन करण्यात येते. पहिल्या प्रकारात   महत्तवाची  आणि तातडीने करायला हवी असी कामे येतात.सध्याचा करोनाचा काळ वगळता इतर वेळचा विचार करता विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरायचा शेवटचा दिवस असताना परीक्षेचा अर्ज भरणे , हे या प्रकारचे काम म्हणता येईल. दुसऱ्या प्रकारात काहीसी  कमी महत्त असणारी  जी कामे केली नाही तरी चालेल मात्र जर करायची असल्यास आताच  करावी लागतील असी कामे येतात. उदाहरणार्थ हाउसफुल होणाऱ्या चित्रपटाला येतोस का? असे मित्रांनी विचारल्यावर येणारा प्रतिसाद तर   तिसऱ्या प्रकारात जी कामे करणे अत्यावश्यक आहेत. मात्र ती कामे आताच तातडीने केली पाहिजे असे नसते अशी कामे येतात. उदाहरणार्थ एखादे नविन कौशल्य शिकणे. तर चौथ्या प्रकारात जी कामे आताच तातडीने करायची गरज नसते. किंबहूना जी कामे केली नाही तरी चालू शकते, असी कामे येतात. उदाहरणार्थ व्यसन करत कट्यावर बसणे.  हे सविस्तर सांगायचे कारण म्हणजे 2021 फ्रेबुवारी 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी मन की बात या कार्यक्रमात केलेले भाष्य .    माझ्...

बदलती शेजारची गणिते (भाग3)

इमेज
आपल्या भारताच्या 27 पैकी संवेदनशील राज्य म्हणून ओळख असणाऱ्या अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणीपूर या राज्यांबरोबर एकंदरीत 1600 किमीची सीमा शेअर करणाऱ्या म्यानमारमध्ये 2021 फ्रेबुवारी1 रोजी लष्करी उठाव करुन जेमतेम बाळसे धरणाऱ्या लोकशाहीला गुंडाळल्यानंतर हा लेख लिहण्यापर्यत त्याविरुद्ध म्यानमारच्या नागरीकांनी जोरदारपणे आंदोलन सुरु केले आहे. म्यानमारला ब्रिटीश सत्तेपासून 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 1962 पर्यत लोकशाही नांदल्यावर 1962 मध्ये उठाव करुन लष्कराने तेथील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून 2011 ते2021 चा कालखंड वगळता तिथे लष्कराचीच सत्ता राहिली.या 50 हुन अधिक वर्षाच्या लष्करी राजवटीत लोकशाहीसाठी1988आँगस्ट 8 रोजी झालेले आंदोलन आणि 2007 ला आंदोलन झाले .1988आँगस्ट 8 ला झालेले आंदोलन.हे 888 आंदोलन म्हणून ओळखले जाते. या आंदोलनामुळे तेथील लष्करी प्रशासन नमले नाही. मात्र 2007 साली काही महिने चाललेल्या आंदोलनामुळे लष्करी प्रशासन नमले.त्यांनी लोकशाहीचा देखावा तयार करण्यासाठी एक संविधान तयार केले. ज्यानुसार 2020 नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणूकीत गैरप्रकार झाले असे सांगून तेथील लष...

राष्ट्रीय विज्ञानदिन विशेष !

इमेज
आजपासून 91वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सन 1930 मधील . त्यावेळी पारतंत्र्यात, वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत  असणाऱ्या भारत या देशातील चंद्रशेखर वेंकटरामन् या शास्त्रज्ञाने लावलेल्या अदभूत शोधाची. मुक्तपणे विहार करणाऱ्या प्रकाशलहरीतील उर्जा आणि विशिष्ट ठिकाणी आदळून येणाऱ्या प्रकाशलहरींची उर्जा यात फरक असतो. मुक्तपणे विहार करणाऱ्या प्रकाशलहरी पेंक्षा विशिष्ट ठिकाणी आदळून येणाऱ्या प्रकाशलहरींची उर्जा कमी किंवा अधिक असू शकते, हाच तो शोध. ज्याला आज रामन् इफेक्ट म्हणून ओळखले जाते. या शोधामुळे चंद्रशेखर यांना भारतरत्नासह, ब्रिटीश सरकारकडून मानाचा सर या पुरस्कारसह जगभरात प्रख्यात असलेला भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार  आणि अन्य प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले. . हा शोध जाहिर झाला तो 1930 फेब्रुवारी 28 ला . आज भारतात आपण हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो.त्यानिमित्ताने सर्व विज्ञानप्रेमींना खुप खुप शुभेच्छा.              आज रामन इफेक्टचा वापर वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र यासारख्या अनेक ठिकाणी करण्यात येतो. आजच्या अद्यावत प्रकाशलहरींच्या अभ्...