पोस्ट्स

दाटुन आले मळभ !

इमेज
      महाराष्ट्र भारताच्या 27 राज्यांपैकी क्षेत्रफळाने 3ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य . देशाला अनेक बाबतीत दिशाग्दर्शन करणारे, समाजसुधारणेचा मोठा वारसा असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष 2020-21चा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवार 5 मार्च रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळासमोर मांडण्यात आला. आपल्या संसदीय प्रणालीनूसार अर्थसंकल्पाचा आदल्या दिवशी तो मांडण्यात येतो. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 8 मार्च रोजी मांडण्यात येणार आहे. मात्र शनिवार आणि रविवार या दिवशी विधीमंडळाला विश्रांती असल्याने तो शुक्रवारी सादर करण्यात आला .     महिला आणि बालकांवरील अत्याचारात घट,  शेती क्षेत्रातील उत्पादनाच्या वाढीचा दर 11.7 % या जमेच्या बाजू वगळता, सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र , बांधकाम, निर्मिती,उपहारगृह,दळणवळण व्यापर या क्षेत्रातील मागच्या आर्थिक वर्षातील निराशात्मक कामगिरी या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आली आहे. वीजेचा वापराचा विचार करायचा झाल्यास कृषी पंपासाठी वीजेची मागणी वाढल्याचे तर औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रातील वीजेची मागणी कमी झाल्याचे या आर्थिक पाहणी अह...

भूतान मध्ये रंगणार नाट्य !

इमेज
          आपल्या भारताच्या शेजारच्या देशांमध्ये विविध घडामोडींनी वेग घेतला आहे. काही घडामोडी राजकीय स्वरुपाच्या आहेत.तर काही घडामोडी मोठ्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या आहेत .  भूतान सारखे जागतिक राजकारणापासून कोसो मैल दुर राहणारे, भारताच्या संमतीशिवाय अन्य कोणाशी परराष्ट्रीय सबंध न ठेवणारे राष्ट्र देखील याला अपवाद ठरलेले नाही.              तर मित्रांनो, भूतानच्या राजघराण्याचे संरक्षण करणाऱ्या दलातील सदस्य ब्रिगेडीयर थिनले  भूतान सर्वोच्च न्यायालयाचे  वरीष्ठ न्यायाधीश क्वीनले शेअरींग आणि एक साह्ययक न्यायाधीश येशव दोजी यांच्यावर राजघराण्याविरुद्ध आणि सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध षडयंत्र रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  त्यांनी भूतानच्या राजघराण्यातील धोका उत्पन होईल, असे वर्तन करणे, वशिलेबाजी, भूतानच्या राजघराण्याचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या दलासाठी असणाऱ्या पैसाचा दुरापयोग करणे, तसेच अयोग्य पद्धतीने कर्जप्रकरण मंजूर करणे हे आरोप  ठेवण्यात आले आहे. सध्या शांततामय  तसेच आनंदीमय जीवनाची जगाला देणगी देण...

पुन्हा अस्थिरतेच्या वळणावर पाकिस्तान

इमेज
    आपल्या भारताबरोबरच स्वतंत्र्य झालेल्या मात्र सुरवातीपासूनच लोकशाहीचा खेळखंडोबा झालेल्या पाकिस्तानात पुन्हा एकदा लोकशाही धोक्यात आली आहे. आपल्या भारताच्या  राज्यसभेच्या समकक्ष असणाऱ्या पाकिस्तानातील केंद्रीय विधीमंडळात अर्थात सिनेटमध्ये सदस्य निवडून आणण्यात सत्तारुढ पक्षाला अपयश आल्याने विरोधी पक्षांनी शनिवार दिनांक 5 मार्च 2021 रोजी अविश्वासाचा ठराव मांडण्याचे ठरवले आहे. जर हा ठराव समंत झाल्यास तेथील विधीमंडळ विसर्जीत होवून नव्या निवडणूका होतील. पाकिस्तानचा इतिहासात सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आधी नवाज शरीफ हे एकमेव पंतप्रधान आहेत. ज्यांनी त्यांचा 5 वर्षाचा कालावधी पुर्ण करुन दुसऱ्या लोकनियुक्त सरकरकडे सत्ता हस्तांतरीत केली. नवाज शरीफ आता पर्यत 4ते5 वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत. त्यातील एकदाच त्यांनी त्यांचा पुर्ण 5वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. तो अपवाद वगळता पाकिस्तानात एकतर लष्करी उठाव किंवा भष्ट्राचाऱ्याचा आरोप , हत्या , निधन यामुळेच पाकिस्तानातील पंतप्रधान बदलला जातो.       पाकिस्तानातील वरीष्ठ सभागृहातील(आपल्या राज्यसभा समकक्ष) ...

घटती प्रशासनातील अधिकाऱ्याची संख्या

इमेज
 4 मार्च 2021 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याची अधिसूचना जाहिर करण्यात आली. 24 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उत्सुक या परीक्षेसाठी आयोगाच्या संकेस्थळावर  अर्ज करु शकतील. जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण  परीक्षा असणाऱ्या या परीक्षेतून ( पहिल्या क्रमांकावर फ्रान्सची नागरी सेवा परीक्षा )  भारतीय प्रशासनाच्या पोलादी चौकटीसाठी अधिकारी निवडले जातील. या वर्षी 712 पदांसाठी अधिकारी निवडले जाणार असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे जाहिर करण्यात आले आहे.       गेल्या काही वर्षाचा विचार करता दरवर्षी मागील वर्षापेक्षा कमी अधिकारी निवडण्याचा प्रघात याही वर्षी कायम आहे. मागील 2020 वर्षी 796 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती. या वर्षी 712 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा होत आहे. सन 2015साली .1129,   ,2016 साली  1079, 2017साली 980  , 2018  साली 792 , 2019 साली 896 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.  पुर्वी दरवर्षी जितके अधिकारी सेवानिवृत्त होत तितकेच आता होत आहेत, मात्र सातत्याने नविन अधिकाऱ्यां...

कोल्हापूर,सोलापूर दोन टोके

इमेज
          काही महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. मी सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये  गेलो होतो. सोलापूर आणि कोल्हापूर हे महाराष्ट्रातील कर्नाटकला लागून असणारे जिल्हे आहेत. कर्नाटकमधील मुंबई कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर हे जिल्हे सिमा शेअर करतात. सोलापूर जिल्हा कर्नाटकच्या मुंबई कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर हैद्राबाद कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर सीमा शेअर करतो. मी दोही शहरांमध्ये प्रत्येकी तीन चार दिवस मुक्काम केला. या दरम्यान मला जाणवलेले घटक आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन                 कोल्हापूरपासून कागलच्या दिशेने25 किमी गेल्यावर कर्नाटक राज्य सुरु होते. मात्र कोल्हापूरमध्ये सर्वत्र मराठीचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. नाशिक किंवा पुण्यात फिरतोय असा भास व्हावा इतके मराठीमय वातावरण या ठिकाणी जाणवते.मी भूगोलाच्या मानवी भूगोल या शाखेचा विद्यार्थी आहे.  त्यावेळी अभ्यासताना मिळालेल्या ज्ञानानुसार सांगतोय. कोणत्याही प्रकारचा मानवी समुह हा बटण दाबल्यावर ज्याप्रकारे लाइट लागतो, अथवा बंद होतो, त्याप्रकारे एखादा विभाग...

खुप काही शिकवून जाणारे गाणे !

इमेज
 कालचीच गोष्ट आहे. एका ठिकाणी चह घेत असताना एका गाण्याचे बोल ऐकू आले. "झूट बोले कंवा काटे, काले कवेंसे बचीयो!...... में मायके चली जाउंगी! तूम देखते रहिंयो!" नवऱ्या बायकोच्या लटक्या भांडणांवर आधारीत  सन 1973 साली आलेल्या बाँबी या चित्रपटातील हे गाणे आपल्याला खुप काही शिकवून जाते असे मला वाटते.या गाण्यासाठी संगीतसाथ दिली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि गायले आहे शैलेंद्र सिंग आणि लता मंगेशकर यांनी.     खोटे बोलल्यामुळे काय होते? यावरुन नवऱ्या बायकोत सुरू झालेल्या संवादात  बायको नवऱ्याला ती विविध गोष्टी करेल ,अश्या धमक्या देते .प्रत्येक वेळेस नवरा तीला प्रत्युतर देते. नंतर ती पत्नी आपले अखेरचे शस्त्र , माहेरी जाण्याची धमकी देते. यावेळी नवरा तू जात असेल तर जा, मी तूझी सवत घरी आणतो, असे तीला बजावतो.आपली सवत येणार, या प्रत्युतरामुळे बायको आपला हट्ट मागे घेत नवरा सांगेल तसे वागायचे मान्य करुन आपला हट्ट मागे घेते, अशी गाण्याची मध्यवर्ती कल्पना आहे.     माझ्यामते या गाण्यातून कोणत्याही गोष्टीला  उत्तर असतेच. या जगात उत्तर नाही, असी गोष्ट अस्त...

अवकाश क्षेत्रातील उभरती महासत्ता भारत !

इमेज
            सन 2021 चा राष्ट्रीय विज्ञान दिन भारताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहला जाईल . कारण या दिवशी भारताने  आपण अवकाश क्षेत्रातील ऊभारती महासत्ता असल्याचे जगाला दाखवूंन दिले आहे . या दिवशी जागतिक प्रमाणवेळेनुसार सकाळी पाच वाजण्याचा सुमारास(भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता ) स्वतःच्या 4 कृत्रिम उपग्रहांबरोबर अन्य दोन राष्टांचे प्रत्येकी एक आणि एका खाजगी अवकाश संस्थेचे  13 असे तब्बल 19 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत . हे सर्व कृत्रिम उपग्रह पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या उपग्रह प्रक्षेपण वाहनातून सोडण्यात आले.  पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाच्या DW प्रकारच्या वाहनातून हे उपग्रह अवकाशात झेपावले . पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाचे हे 53वे उड्डाण होते . यासाठी केंद्र सरकारने 2019 जुलै 5  रोजी स्थापन केलेल्या  New Space India Limted { NSIL } या इसरो च्या व्यावसायिक हेतूसाठी स्थापन केलेल्या विभागाची मदत घेण्यात आली .   ब्राझील येथेही संशोधकांनी भारतीय संशोधकांच्या मदतीने स्वतः...