पोस्ट्स

अशांत भुकवच !

इमेज
  मागील 2020 हे वर्ष कोरानाबरोबरच भयावह वाटणाऱ्या वादळांनी न विसरण्यासारखे झाले.आपल्या भारतात कमी वादळे आली, मात्र आशिया खंडातील पँसेफिक किनाऱ्यावर तसेच अमेरीकेच्या अटलांटिक किनाऱ्यावर अत्यंत कमी कालावधीत संख्येने आणि तीव्रतेने आधीचे विक्रम मोडणारी वादळे आली.हे कमी काय म्हणून निसर्ग आता भुकंप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे आपली परीक्षा घेतोय का ? असे वाटावे , इतक्या मोठ्या प्रमाणात भुकंप आणि ज्वालामुखी उद्रेक सध्या सुरु आहेत. गेल्या आठ दिवसात आइसलँड या युरोपातील बेटावर किती भुकंप आले असतील? लहानातील लहान भुकंपाचा विचार करता तब्बल 20 हजार (हो वीस हजार भुकंप झाले आहेत. ज्यांना हे खोट वाटतंय त्यांनी द हिंदू, इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्रावर या संदर्भात बातम्या बघाव्यात) झाले आहेत. या आधी याच परीसरात 2010 साली असीच भुकंपाची लाट आली होती. ज्यामुळे तेथील एक निदीस्त ज्वालामुखी जागृत झाल. या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे आकाशात एक मोठा ढग तयार झाला . ज्याची परीणीती युरोपात विमान वाहतूक तब्बल चार महिने विस्कळीत होण्यात झाली . अजून आइसलँड मधून ज्वालामुखीच्या उद्रेक...

या धोक्याकडे बघणार कोण ?

इमेज
कालचीच गोष्ट आहे. सहजच टिव्ही बघत असताना wion या वृत्तवाहिनीवर एक रिपोर्ट दिसला. रिपोर्ट जगभरातील वाढत्या मानसिक अनारोग्यावर होता. त्यात सांगितल्याप्रमाणे रशियाचा एकुण लोकसंख्येचा दुप्पट लोक जगभरात विविध मानसिक आजारांनी गस्त आहेत, आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.  काही दिवसापूर्वी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देशात मानसोपचार तज्ज्ञांची एकुण संख्या किती ? याविषयीची माहिती केंद्र सरकार ठेवत नसल्याचे उत्तर दिले होते. डिसेंबर2019 मध्ये इंडियन मेडीकल असोसेशियने दिलेल्या माहितीनुसार देशात मानसिक रोग्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर wion वरील या रिपोर्टचे महत्त्व लक्षात येते.     Wion या वृत्तवाहिनीवरील रिपोर्टनूसार समाजातील प्रतिष्ठीत असणाऱ्या लोकांनी त्यांना भेदसवणाऱ्या मानसिक समस्येबाबत जाहिरपणे स्पष्टपणे बोलल्यास त्यामुळे सर्वसामान्य देखील मानसिक समस्येबाबत बोलून त्यावर उपचार करुन घेण्यास तयार होतील. यासाठी काही उदाहरणे देखील यासाठी  देण्यात आली. सध्या मानसिक आजारांकडे एक कलंक म्हणून बघण्याचा दृष्टिकोन  समाजातील प्रतिष्ठित लोकांनी ब...

वंदन महान शास्त्रज्ञाला!

इमेज
     मार्च महिन्याचा 14 वा दिवस अर्थात 14मार्च हा दिन भौतिकशास्त्रज्ञांसाठी आणि खगोशास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्तवाचा आहे . याच दिवशी 2019 साली खगोल भौतिकीचा महान शास्त्रज्ञ स्टीफन हाँकिग्न आपल्यातून कायमस्वरूपासाठी निघून गेले.          स्टिफन हाँकिग्न यांनी  खगोल भौतिकाच्या मंदिराचा कळस रचला , खगोल भौतिकाच्या मंदिराचा पाया आयझाँक न्युटन यांनी रचला , त्याचा भिंती आल्बट आइन्साटाईन यांनी रचल्या आणि यावरचा कळस रचला तो स्टिटिन हाँकिग्न यांनी असे म्हटल्यास वावगे ठरु नये. आयझँक न्युटन यांच्यानंतर 400वर्षांनी आलेल्या स्टिफन हाँकिग्न यांनी खगोल भौतिकीला वेगळ्या उंचीवर पोहोचवले. त्यांच्यामुळे खगोल भौतिकी शास्त्रात अनेक महत्तवाचे शोध लागले.       विश्वाची निर्मिती कशी झाली? त्याचा मृत्यू कसा होवू शकतो? कृष्णविवरांची निर्मिती कशी झाली? तसेच आइन्सटाइन यांच्या सापेक्षतावादावरील आधारीत संशोधन त्यांनी पुढे नेले. स्टींग थिअरीच्या संशोधनात त्यांचा मोठा वाटा होता.  हेग्स बोसाँन कण(देव कण /god partials) च्या संशोधनात देखील त्यांचा सिहांचा वाट...

मुंबई आताची ,आणि त्यावेळची !

इमेज
 मी जिथे चहा पितो, त्या चहाच्या टपरीवर सातत्याने जूनी गाणी वाजत असतात.  दोन तीन दिवसापुर्वीचीच गोष्ट आहे.नेहमीप्रमाणे तिथे मी चहा पिण्यासाठी गेलो असता, एक अत्यंत उत्तम गाणे तिथे वाजत होते. "ए दिल मुस्किल है जिना यहा ,...... ये बाँम्बे हे मेरी जान!"        गुरुदत्त प्राडक्शनची निर्मिती असलेल्या सि. आय. डी. या चित्रपटातील हे गाणे त्या वेळच्या मुंबईतील  स्थिती कसी होती? यावर छान भाष्य करते . हा चित्रपट सन1956 रोजी प्रदर्शित झाला. त्यामुळे आपणास तेथील मुंबईची स्थिती समजते. आताची स्थिती कसी आहे? हे आपण जाणतातच.नायक मुंबई किती वाइट आहे, यावर भाष्य करत असतो, तर नयिका मुंबई शहर किती उत्तम आहे, यावर भाष्य करुन त्यास नामोहरण करते. असी गाण्याची मध्यवर्ती कल्पना आहे. जाँनी वाकर आणि वहीदा रेहमान यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे गीतकार आहे गीता दत्त आणि मोहमद्द रफी . गाण्याचे संगीतकार आहेत ओ पी नय्यर . सुमारे 4 मिनीटाच्या या गाण्यात आपणास मुंबईचे महत्त्व अधोरेखीत होते. गाण्यामध्ये सध्याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बाहेर ट्राम जाताना दिसतात . गाण्यामध...

भारताचे अशांत शेजार (भाग 4)

इमेज
पाकिस्तान , आपल्या भारताच्या 3 राज्य आणि दोन केद्रशासित प्रदेशांबरोबर सीमा शेअर करणारे, भारतातील सर्वाधिक चर्चेत असणारे राष्ट्र.कधी दहशतवादी कारवाईमुळे तर कधी राजकारणी लोकांच्या आरोप प्रत्यारोपामुळे पाकिस्तानचे नाव भारतात सातत्याने घेतले जाते.तर या पाकिस्तान बरोबर तीन मोठ्या घडामोडी गेल्या पंधरवाड्यात घडल्या. पहिली म्हणजे भारताने कोरोना लस पाकिस्तानला मोफत दिली, ज्याविषयी या आधीच बरेच काही बोलून झाले आहे. त्यामुळे मी त्या विषयी बोलणार नाही. मी बोलणार आहे.पाकिस्तानच्या दुसऱ्या दोन घडामोडीविषयी .        तर मित्रांनो, पाकिस्तानच्या काश्मीरविषयक दाव्याविषयी कायम पाकिस्तानची पाठराखण करणारा, नाटो या अमेरीकाप्रणीत सैनीकी कराराचा भाग असणाऱ्या , तसेच युरोपीय युनियनचा भाग होवू इच्छिणारा देश, ज्या देशातील बहुसंख्य भाग हा आशिया खंडात असून काही भाग युरोपात आहे, असा मुस्लिम बांधव बहुल देश,ज्या देशाचे सविंधान आतापर्यत धर्मनिरपेक्ष होते, मात्र सध्याचे सरकार ते धर्माधिदिष्ठ करण्याचा प्रयत्न करत आहे असा देश  अर्थात तूर्कस्थान या देशाबरोबर पाकिस्तानचा होणाऱ्या संरक्षणविषरक करारात ...

अवसान घातकी निर्णय !

इमेज
शुक्रवार दिनांक 12 मार्च रोजी देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचे नियंत्रण करणाऱ्या AICTC ने  अभियांत्रीकी बाबत एक निर्णय जाहिर केला. तो म्हणजे अभियांत्रीकीसाठी आधीच्या शिक्षणात भौतिकशास्त्र, रसायनशात्र  अणि गणित नसले तरी अभियांत्रिकीला प्रवेश घेता येण्याचा निर्णण. होय . आतापर्यंत सक्तीचे असणाऱ्या या विषयांना  आता ऐच्छिक विषयांचा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे  या ऐच्छिक विषयाचा सूचित 14 विषयांचा  समावेश करण्यात आला आहे . या ऐच्छिक विषयांचा सूचीतील कोणतेही तीन विषयात सर्वसाधारण गटात 45% आणि राखीव गटात 40% गन मिळवूंन उत्तीर्ण झाल्यास आता अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार असल्याचे नव्या धोरणात सांगण्यात आले आहे . आंतरशाखीय शिक्षणाचा पाय म्हणून वाणिज्य शाखेतील व्यक्तींना अभियांत्रिकी शिक्षण घेता यावे म्हणून हा बदल करण्यात येत असल्याचे याबाबत बोलले जात आहे .  अ_व_सा_न_घा_त_की निर्णय म्हणूनच या निर्णयाकडे बघावे लागेल  अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया म्हणून ज्या विषयांकडे  बघण्यात येते .तेच विषय जर ऐच्छिक केल्यामुळे जर हे विषय ना घेता अभियांत्रिकी शिक्ष...

एमपीएसीच्या नावाने

इमेज
आज मी तुमच्याशी बोलत असताना राज्यांभरात एमपीएससी च्या परीक्षा राडा झाल्याने परीक्षार्थींच्या अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे . कदाचित तुम्ही हा मजकूर वाचत असताना त्यांच्यावर राज्य प्रशासनाने तोडगा काढला असेलही . मित्रानो प्रशासनातील अधिकरी कर्मचारीवृंद निवडण्यासाठी  आपल्या राज्यघटनेच्या  कलम 316आणि 317 नुसार महाराष्ट्रासाठी तयार केलेला हा घटनादत्त अयोग म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा अयोग .  या आयोगामार्फत राज्यसेवेतील पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील अधिकारी निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला तब्ब्ल पाचव्यांदा पुढे ढकलल्यामुळे परीक्षेचे उमेदवार जे पुढे प्रशासनातील महत्त्वाच्या पदावर आरूढ होणार आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत . मी दोन कालावधीत मिळून  एकूण  पाच वर्षे पुण्यातील सदाशिव पेठे ,नवी पेठ , नारायण पेठ या भागात वास्तव्यास होतो . या भागात विविध स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अक्षरशः पोटाला चिमटा काढत पडेल तसे कामे करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात . अभ्यासिकेत जागा मिळवण्यासाठी अभ्यासिका चालकांची मुजोरी सांभाळत घरून येणाऱ्या पैशावर किंवा स्वतःच्या अन्य स्रो...