पोस्ट्स

नको देवराया, अंत आता पाहू!

इमेज
"नको देवराया, अंत आता पाहू! प्राण हा  जावू पाहे" असा मराठीतील सुप्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल भक्तीत भान हरवलेल्या माझा अंत तू आता बघू नकोस, लवकरच माझ्यासाठी धाव घे , अशी आर्त विनवणी या अभंगातून संत कान्होपात्रांनी विठ्ठलास केली आहे. सध्या हाच अभंग वेगळ्या संदर्भात म्हटला जावू शकतो. कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत नको देवराया, अंत आता पाहु,प्राण हा तळमळला जाहू पाहे, असे म्हंटले जावू शकते.      कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात बेड मिळत नाही.जर बेड  मिळाला तर  आँक्सिजन किंवा व्हेंटीलिटर मिळत नाही. जर दोन्ही गोष्टी मिळाल्या तर, नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या अपघातासारखा दुर्देवी प्रसंग ओढवून प्राण जाण्याचे भय आहेच. मी नाशिकच्या रुग्णालय दुर्घटनेत  प्राणास मुकलेल्या जीवांप्रती संवेदना प्रगट करतो. इश्वर मृत्यम्यांच्या आतेष्ठांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना     माझ्या ओळखीमध्ये एक व्यक्ती डोळ्यावरील उपचारासाठी दवाखन्यात दाखल झाली होती. ती व्यक्ती दवाखान्यात दाखल झाल्यावर त्यास कोरोना झाला. अर्थात ती व्यक्ती तरु...

अस्थिरतेच्या वळणावर पाकिस्तान!

इमेज
सध्या आपल्या भारतात कोरोनामुळे थैमान घातले गेलेले असताना, आपल्या शेजारच्या पाकिस्तानात एका विषारी वृक्षाला विषारी फळे आली आहेत. पाकिस्तानात कट्टर धार्मिक लोकांनी तिथे प्रचंड दंगली घडवल्या आहेत. पोलीस प्रशासनातील लोकांना बंदीस्त करण्यापर्यत या दंगलखोरांची त्यांची मजल गेली आहे.       मुळात धार्मिक बहुसंख्यतेचे कारण देत निर्माण झालेल्या या देशात कायमच राजकीय अशांतता राहिली, ज्याचा परीपाक धार्मिक कट्टरता   होण्यास वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होण्यात झाली.  त्यातही 25 जूलै 1977 ते 11 आँगस्ट 1988 पर्यत पाकिस्तानात असणाऱ्या जनरल झीया उल झक् सारख्या कट्टर धार्मिक प्रवृत्तीच्या हुकुमशाहाच्या कार्यकाळात तीला खतपाणीच मिळाले.          पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरतेचा अभ्यास करताना जिया उल झक यांच्या कार्यकाळापूर्वीची पुर्वीची कट्टरता, जिया उल झक् यांच्या कार्यकाळातील कट्टरता , आणि त्यांचा अनपेक्षीत झालेल्या मृत्यूनंतरच्या (त्याचा मृत्यू, हा अपघात की खून याबाबत विविध दावे केली जातात असो) काळातील कट्टरता असे टप्पे निर्माण करावेच लागतील. जि...

29 वर्षे अभिमानाची !

इमेज
आकाशातील उपग्रह ग्रह, तारे, तेजोमेघ, दिर्घीका यांच्या अभ्यासासाठी असणाऱ्या दुर्बिणी आपण आजकाल अनेकांकडे बघतो. .दुरवरुन येणाऱ्या प्रकाशाचे दृश्य स्वरूप त्या आपणास दाखवतात. मात्र एकुण प्रकाश लहरींपैकी फारच कमी प्रकाशलहरी आपणास दिसतात.  आपणास ज्या दुर्बिणी दिसतात त्या या दिसणाऱ्या प्रकाशलहीरीचे दृश्य स्वरूप असते .मानवी डोळ्यास न दिसणाऱ्या रेडिओ लहरीमध्ये गँमा किरण, एक्स रे, अल्टा साउंड किरण, आदींचा समावेश होतो. आपणास दिसणाऱ्या प्रकाशलहरींपेक्षा यांचे विश्व खुपच मोठे आहे. या लहरीच्या अभ्यासातून अनेक रंजक बाबी मानवास ज्ञात झाल्या आहेत. जसे कृष्णविवरांचे अस्तिव, लाल महाराक्षसी तारा ,श्वेतबटू तारा, न्युट्राँन स्टार वगैरै. या प्रकाशलहरींचा अभ्यासासाठी ज्या दुर्बिणी उभारल्या जातात. त्यांना रेडीओ दुर्बिणी उभाराव्या लागतात. या रेडीओ दुर्बिणी उभारणे त्यातून निरीक्षण करणे हे वैयक्तिक एकाचे कार्य नाही. त्यासाठी प्रचंड पैसा, जागा, मनुष्यबळ लागत असल्याने हे कार्य सरकारी पातळीवरच करण्यात येते .जगातील अनेक भागात अस्या सरकारी पाठबळ्यावर रेडिओ दुर्बिणी आहेत. आपल्या भारतातच नव्हे महाराष्ट्रात सुद्धा आह...

स्मरण एका जग बदलवणाऱ्या घटनेचे

इमेज
     आज सोमवार 19 एप्रिल 2021, आजच्याच दिवशी 46 वर्षापूर्वी म्हणजे 1976 एप्रिल 19 रोजी एक चमत्कार घडला होता. एक विकसनशील देशाने युनाटेड सेव्हीयत सोशालिस्ट रशिया या देशाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह आकाशात यशस्वी प्रक्षेपित केला होता. तो विकसनशील देश होता भारत. आणि त्या उपग्रहाचे नाव.होते आर्यभट्ट . आज भारत जगभरातील अनेकांचे उपग्रह स्वतःच्या प्रक्षेपण यानातून प्रक्षेपीत करतो, भारताचे सुद्धा कित्येक उपग्रह आज अंतराळात भ्रमण करत आहेत. या सर्वाची मुहुर्तमेढ या गोष्टीने रोवली गेली होती. या ऐताहासिक घटनेच्या 46 व्या वर्धापनदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा . मित्रांनो, त्यावेळी भारतात प्रचंड प्रमाणात भुकबळी जात होते. गरीबांची संख्या देखील प्रचंड होती. देशातील दूधाचे उत्पादन नगण्य होते. मासेमारीत देश जगाचा विचार करता प्रचंड मागे होता. अस्यावेळी काळाची पाउले ओळखून उचललेल्या पाउल किती गरजेचे आहे. हे आपण जाणतातच.       आज आपण टिव्हीवर विविध वाहिन्या बघतो, तसेच हवामानाचा अंदाज व्यक्त करतो.  इग्नू वाय.सी.एम. ओ.यू. सारख्या विद्यापीठांतून खेडोपाडी शिक...

बातमीतील पाकिस्तान भाग 3

इमेज
सध्या आपल्या भारतात जरी कोरोनाचा उद्रेक हा विषय सर्व माध्यमांमध्ये दिसत असला तरी चँनेल न्युज एशिया, बिबिसी, आणि यासारख्या अन्य माध्यमांमध्ये कोणत्या विषयावर वार्तांकन केले जात आहे. याचा मागोवा घेतल्यास आपणास उत्तर मिळते पाकिस्तान . गेल्या तीन ते चार दिवसात घडलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे बघीतल्यास 3गोष्टींमुळे पाकिस्तान चर्चेत आला आहे. पहिली गोष्ट म्हणजे युनाटेड अरब अमिरात या देशाच्या अमेरिका देशातील राजदूताने भारत पाकिस्तान विषयी केलेले विधान, दुसरी गोष्ट म्हणजे अमेरीकेने रशियाला अमेरिकेच्या अंतर्गत बाबीमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोपावरुन एक कंपनी,आणि सहा नागरीकांवर लादलेले निर्बंध आणि तिसरी गोष्ट म्हणजे फ्रान्स विरूद्ध होणारे दंगे. आता बघूया एक एक गोष्ट सविस्तरपणे. तर अनेक आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये ज्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, त्या बाबीवर अर्थात भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा गोष्टीला युनाटेड अरब अमीरात या देशाच्या अमेरिकेतील राजदूताने पुष्टी दिली आहे. युनाटेड अरब अमिरात जगभरात स्वतःची प्रतिमा साँफ्ट पाँवर करण्यासाठी गेल्या काह...

हे पण घडतयं आपल्या सभोवताली !

इमेज
        मित्रांनो, सध्या आपल्या सभोवताली कोरोना आणि लाँकडाउनविषयक चर्चा अधिक प्रमाणात घडत असल्या तरी जगात  आपल्यावर परीणाम अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडी प्रामुख्याने हवामान बदलाविषयी घडत आहेत. त्याविषयी आपणास माहिती देण्यासाठी आजचे लेखन. तर मित्रांनो, येत्या 22 एप्रिलला अमेरीकेच्या नेर्तृत्वाखाली जगातील 40 देशांची हवामान बदलाविषयी काय कृती कार्यक्रम असावा,हे ठरवण्यासाठी आँनलाईन पद्धतीने एक परीषद होणार आहे. पँरीस करारानूसार  हवामानाची स्थिती 18 व्या शतकात जसी होती, त्या स्थितीत आणण्यासाठी करावयाचा कामांमध्ये यशस्वीतेसाठी गुणांकन करायचे झाल्यास ज्या देशाचा क्रम 7 वा लागेल,(सगळ्यात उत्तमास पहिला क्रमाक नंतर दुसरा या क्रमाने) तो भारत यात सहभागी होणार आहे. या यादीत भारताच्या पुढे स्विडन, नार्वे फिनलंड, डेन्मार्क, चिली, युनाटेड किग्डम आँफ ग्रेट ब्रिटन अँड नाँदर्न आयलंड (आपल्या बोली भाषेत इंग्लड) हे देश आहेत.{ मी ही यादी ते ज्या नंबरवर आहेत, त्यानुसार बनवलेली नाही.फक्त पुढे असणाऱ्या देशांची यादी बनवलेली आहे} भारताने या करारानूसार 2030पर्यत आपल्या एकूण उर्जैपैं...

तंत्रज्ञानाचे बळी !

इमेज
शूक्रवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी नाशिकजवळील वालदेवी धरणात एक मुलगा आणि 5 मुली बुडाल्या . फोटो काढण्यासाठी पाण्याचा जवळ जात असताना पाय घसरुन एक जण पडल्यावर त्यास वाचवायला गेलेले अन्य लोक सुद्धा बुडाले. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गृपमध्ये त्यामुळे शोककळा पसरली.(मुळात शहरात संचारबंदी लागू असताना ते नउ जावूच कसे शकले? त्यांची बुडण्याची जी वेळ सांगितली जात आहे, ती बघता ते सायंकाळी सातपर्यत नाशिकला पोहचू शकतात का ? असे प्रश्न निर्माण होत आहेत, मात्र ते सोडून  देवूया ) मी या दुर्घटनेत आपले आप्तस्वकीय गमवलेल्या  व्यक्तींचा प्रती संवेदना व्यक्त करतो.इश्वर त्यांना हे दुःख पचवण्याची ताकद.देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना   स्व कर्तुत्व ,जगाला सांगण्याची मानवास फार पुर्वीपासून सवय आहे. कोणालाही आपली स्तुती हवी हवीच असते. त्यामुळे मनाला आनंद मिळतो. त्यामुळे त्यांनी फोटो काढाला घेतला , यात गैर काहीच नाही. मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर करत फोटो काढण्याचा प्रकार केल्यास अस्या प्रकारचा दुर्घटना घडतात. पुर्वीसारखे एकदा फोटो काढल्यावर आठवड्याभराने फोटो...