पोस्ट्स

हे पण घडतयं जगामंदी!

इमेज
    आपल्या भारतात कोरोनाने उच्छाद मांडला असताना अमेरीकेत एका वेगळ्याच कारणाने लोक यमसदनास जात आहे. ते कारण म्हणजे बंदूकीतून होणारा बेछूट गोळीबार. गेल्या आठवड्यात अमेरीकेत विविध ठिकाणी झालेल्या गोळीबारात दोन दिवसात 15 जणांनी पृथ्वीवरून  निरोप घेतला . एका जागतिक अहवालानूसार जगात वर्षभरात जेव्हढ्या बेछूट गोळीबाराचा घटना घडतात, त्यापैकी 50% एकट्या अमेरीकेत घडत असतात .सन.2019 मध्ये 465 आणि सन 2020 मध्ये 628 घटना घडल्याची अमेरीकन पोलीसांकडे नोंद आहे.     अमेरिकन केंद्रीय संविधानाच्या दुसऱ्या घटना दुरुस्तीनूसार तेथील नागरीकांना शस्त्रात्रे बाळगणे हा मुलभूत अधिकार आहे. अमेरीकेच्या काही राज्यात वाँलमाँट सारख्या सुपर स्टोअरमध्ये शस्त्रात्रे मिळतात. यामध्ये बदल होण्याची नितांत आवश्यकता असल्याचे तेथील पोलीसांचे म्हणणे आहे. पुर्वी अमेरीकेत गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असताना स्वसंरक्षणार्थ अमेरीकन नागरीकांना शस्त्रास्त्रे बाळगण्याचा अधिकार देण्यात आला. आजमितीस ही परीस्थिती पुर्णतः बदलली असून त्यावेळी स्वरक्षणार्थ दिलेली सवलतीने आज अमेरीकेतील सगळ्यात मोठ्या समस्येचे...

नव्या राष्ट्राचा प्रसवकळा !

इमेज
सध्या आपल्या भारतात कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येने अत्यंत तणावाची स्थिती असताना, आपल्या भारतापासून साता समुद्रपार असणाऱ्या युनाटेड किंग्डम या देशात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. (युनाटेड किंग्डम या देशाला आपल्याकडे बोली भाषेत इंग्लड म्हणतात) त्या देशातील एक भाग स्काँटलंड याला स्वतंत्र सार्वोभौम देश म्हणून मान्यता देण्यासाठी सार्वमत घ्यावे का ? या चर्चेने तेथील जनमत पुर्णतः ढवळून निघत आहे. स्काँटलंड या भागासाठी झालेल्या संसदीय निवडणूकीत ( विधानसभेच्या नव्हे संसदेच्या) स्काँटलंडच्या संसदेत   स्काँटलंड नँशनालिस्ट पार्टी (SNP)ने बहुमतापेक्षा 6 जागा कमी मिळवल्या आहेत. मात्र सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत {युनाटेड किंग्डम मध्ये बहुपक्षीय लोकशाही आहे. मात्र काँझरेटिव्ह पार्टी (मराठीत हुजूर पक्ष) आणि लेबर पार्टी (मराठीत मजूर पक्ष ) हे दोन पक्ष   एकुण संसदेत 97% पेक्षा थोडी जास्त मते मिळवत असल्याने आपला तिथे हे दोनच पक्ष असल्याचा समज होतो. मात्र तिथे लिबरल डेमोक्रेटीक (LD),ग्रीन पार्टी (GNP) असे पक्ष देखील आहेत} स्काँटलंड नँशनलिस्ट पार्टीचे निवडणूकीतील आश्वासनच आम्ही आमच्या पाच...

मानवतेला काळीमा !

इमेज
  शनिवार, 8 मे 2021 अफगाणिस्तानातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी काळरात्र ठरली. अफगाणिस्तानची राजधानी काबूल पासून जवळच असणाऱ्या पश्चिम काबूल जिल्ह्यातील दशत् इबारची  या ठिकाणी  असणाऱ्या syed Al Shahda   या शाळेजवळ तीन बाँम्बस्फोट झाले. या स्फोटात 150 जण जखमी झाले .तर 58 जण मृत्युमुखी पडले.मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 11ते15 वर्षाच्या विद्यार्थींनीचा सर्वाधिक समावेश आहे. या स्फोटात पुरुषांचा तूलनेत महिलांचे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये प्रमाण अधिक आहे.  शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दहा मिनिटाच्या अंतरात  झालेल्या या बाँम्बस्फोटाने मानवतेलाच काळीमा फासली आहे.   स्फोट झाला, त्याचा आसपास अफगाणिस्तानात अल्पसंख्यांक असणाऱ्या शिया हजारा या लोकांची वस्ती आहे.  तीन सत्रात भरत असणाऱ्या  syed Al Shahda    या शाळेत दुसऱ्या सत्राची फक्त मुलींसाठी असणारी शाळा सुटताना हा स्फोट झाला. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. अफगाणिस्तानातील प्रशासनामार्फत हा स्फोट तालीबानने केल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मात्...

जगात अशांतता निर्माण करणाऱ्या घटनेविषयी!

इमेज
सध्या आपल्या भारतात कोरोना रुग्ण वाढीने भयावह परीस्थिती निर्माण केली असताना पश्चिमी आशिया (ज्याला मध्यपुर्व किंवा आखाती देश सुद्धा म्हणतात) प्रदेशात अत्यंत तणावाची, स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. आणि ही स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे इस्राइल या देशाने केलेल्या एका आक्रमक कृतीमुळे.        तर मुस्लिम बांधवांसाठी मक्का आणि मदिना नंतर तिसऱ्या क्रमांकाचे पवित्र स्थळ असलेल्या अल अस्का मशिदीवर इस्राइलने  शुक्रवारी नमाजपठाण चालू असताना आपले शस्त्रधारी सैन्य घूसवले. आणि काही लोकांची धरपकड केली . ज्यामध्ये 200जण जखमी झाले , त्यातील 90जण अतिशय गंभीर असल्याचे वृत्त CNN ने दिले आहे. मुस्लिम समाजबांधवांमध्ये मक्का आणि मदिनानंतर तिसरी पवित्र जागा म्हणून अल अस्का मशिद ओळखली जाते. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहमद्द पैंगबर  यांनी या जागेवरून स्वर्गारोहण केले असी श्रद्धा आहे. हे ठिकाणी जेलूसरेमच्या ओल्ड सिटी भागात येते.याच ओल्ड सिटी भागात ज्यू धर्मियांसाठी पवित्र असणाऱ्या मंदिराचे अवशेष असणारी भिंत आहे. तर ख्रिस्ती धर्मसंस्थापक येशू खिस्त यांचा जन्म देखील याच शहरात झाला...

स्किझोफेनिया जागृती सप्ताहाच्या निमित्याने

इमेज
येत्या गुरूवारपासून अर्थात 13 मे पासून आपण एका महत्तवाच्या आजाराचा जागृती  विषयक सप्ताह साजरा करणर आहोत . . त्या आजाराचे नाव आहे छिन्नमानसिकता अर्थात स्किझोफेनिया.  अत्यंत गंभीर अश्या या मानसिक आजाराबाबत आपल्या भारतात पुरेसी जनजागृती नाही.  मराठीतील देवराई या चित्रपटाचा अपवाद सोडता मराठीमध्ये या विषयावर फारसे चित्रपट झालेले नाहीत . हिंदीतही हेच ‍चित्र आहे .  आपल्या शरिरात मेंदूच्या डाव्या बाजूला डेपोमलिन नावाचा एक अंतस्त्राव होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास सदर आजार होता.  (आणि कमी झाल्यास पार्किसन हा आजार होतो )  आजारात पुर्णत: बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे          सदर आजार व्यक्तिचे संपूर्ण आयूष्य बदलून टाकतो .हा आजार ज्या व्यक्तिला होतो त्याचा काम करण्याचा जाणिवा नाहिस्या होतात ती पुर्णत: परावलंबी बनते  भारतात हा आजार असल्यांचे प्रमाण सूमारे 1% आहे. हा आजार काही प्रमानात अनूवंशिक असतो.  हा आजार बहूतांश वेळेला अधिक बूध्दिमान असलेल्या लोकांत आढळतो.  नोबेल विजेते गणिततज्ञ  ज्यांचा जीवन संघर्षावर चित्रपट आलेला आ...

आत्महत्या!

इमेज
नाशिकच्या दिंडोरी तालूक्यात 4 मे 2020 रोजी एक ह्रूद्य हेलावून सोडणारी घटना घडली. आइच्या मृत्यूचा धक्का बसल्याने एका वीसवर्षीय तरुणीने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली. ही घटना निव्वळ एका तरुणीची आत्महत्या म्हणून बघता येणारी नाही. आपल्या मानसिक आरोग्याची अवस्था किती भीषण आहे.याची साक्ष देणारी घटना आहे ही! आँक्सिजन बेड, व्हेंटीलिटरची सोय आज नाही तर उद्या होईलही मात्र ढासळलेल्या मानसिक आरोग्याचे काय ? त्याकडे आपण कधी लक्ष देणार? कोरोनामुळे आधीच उल्हास असणाऱ्या आपल्या मानसिक स्वाथाविषयी फाल्गून मास आला आहे. मात्र त्याविषयी कोणीच काही बोलताना दिसत नाही. पुछता है भारत, India wants to know सारख्या कार्यक्रमात कोणीच अत्यंत तालस्वरात  हातवारे करत प्रश्न उपस्थित करत नाही. जीने आत्महत्या केली ती वीस वर्षाची होती.म्हणजे तीचे पदवीपर्यतचे शिक्षण जवळपास झाले होते. ती उद्याची भारताची आशा होती. प्रश्न फक्त तीचा एकटीचा नाहीये  आपल्या भारतात सर्वेक्षण केले तर तीच्या वयाचे कित्येक तरुण तरुणी मिळतील ज्यांचे मानसिक आरोग्य खुपच वाइट स्थितीत असेल.डिसेंबर 2019 मध्ये IMAचा एक अहवाल आला होता, ज्यामध्ये ...

पाणी प्रश्नावरुन दोन एकाच कुटुंबातील देश समोरासमोर!

इमेज
        आपल्या भारतात वाढत्या कोरोना रुग्णांचा संख्येने ,आणि पाच राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणूकीने समस्त देश ढवळून निघत असताना , भुतपूर्व युनाटेड सोशालिस्ट सेव्हियत रशियातील दोन देश , किरगीस्तान आणि तजाकिस्तान या दोन देशात इस्कारा  नावाच्या नदीच्या पाण्याचा वाटपावरुन छोटेसे युद्ध पेटले आहे. ज्यामध्ये 31 सैनिक मृत्युमुखी पडल्याचे किरगीस्तान या देशाकडून हा लेख लिहण्यापर्यत जाहिर केले आहे. तर विरूद्ध पक्षाकडून याबाबत चूपी साधण्यात आली आहे . इस्कारा या नदीवरील पाणी चोरले जावू नये, म्हणून 28एप्रिलला तजाकिस्तान देशाकडुन सिसिटिव्ही उभारला जात असताना कझाकिस्तान देशाकडून लष्करामार्फत गोळीबार सुरु करण्यात आला. ज्यामुळे हे छोटेखानी युद्ध झाल्याचे  द हिंदूच्या बातमीत सांगितले आहे . तसेच 30 एप्रिल रोजी या दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्याचेही या बातमीत सांगितले आहे.   भारतात मुघल सत्तेचा पाया घालणारा बाबर ज्या फरगाणा  खोऱ्यातील सरदार होता. त्याच  फरगाणा  खोऱ्यात हे  युद्ध  लढले गेले आहे. तसे बघायला गेल्यास   फर...