पोस्ट्स

बातमीतील चीन (भाग (9)

इमेज
    सध्या घडणाऱ्या आंतराष्ट्रीय घडामोडीचा विचार केला असता एका देशाचे नाव  सातत्याने चर्चेत आलेले दिसते , तो देश म्हणजे चीन  दोनच दिवसापूर्वी मी त्या देशातील चार घडामोडी आपणास सांगितल्या होत्या , त्या सांगून जेमतेम 48 तास होत नाहीत चीनविषयी नव्याने तीन मोठ्या घडामोडी घडल्याने त्याची माहिती करून देण्यासाठी आजचे लेखन       तर मित्रांनो, चीनचा गिलगिट बाल्टीस्तानला लागून असणारा प्रांत म्हणजे झिंकियाग (याचा उच्चार काही ठिकाणी सिंकीयांग असाही आढळतो) अर्थात पुर्व तूर्कस्थान. या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांंच्यावर चीनचे सरकार अत्याचार करत असल्याचा मुद्दा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खुपच गाजतो आहे. या मुस्लिम बांधवांना  विगूर मुस्लमान  म्हणतात. गेल्या 48 तासात घडलेल्या घडामोंडींमध्ये या मुद्द्याचा संदर्भात 2 घटना घडल्या आहेत. चीनचा आश्रीत म्हणता येईल, असा इस्लाम हा प्रमुख धर्म असलेला पाकिस्तान हा देश यावर जरी काही बोलत नसला तरी अन्य इस्लामी जगतात याचे पडसाद उमटत आहेत. या अन्य इस्लामी जगतातील एक देश असलेल्या...

असा राजा न होणे !

इमेज
 छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच गर्वाने छाती फुलून न येणारा एखादाच कोणी महाराष्ट्रीयन असेल.तेराव्या शतकात यादवी साम्राज्य लयास गेल्यावर सुमारे साडेतीनशे वर्ष स्वतःचे सत्व विसरलेल्या समाजास गतवैभवाची आठवण त्यांनी करुन दिली .त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत , मध्ययुगीन भारतीय ईतीहासातील आरमार उभारणारा एकमेव राज्यकर्ता हा बहुमान देखील मिळवला . राजेंखेरीज समुद्रापर्यत आपले राज्य नेणारे काही राज्यकर्ते आपणास मध्ययुगात सापडतात. मात्र आरमार उभारले ते छत्रपती शिवाजी  महाराजांनी . राजांचे कार्य  येव्हढ्यावरच थांबत नाही, त्यांनी स्थानिक जनतेची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असावी . यासाठी देखील प्रयत्न केले . त्यासाठी स्वतंत्र्य राज्यकारभार कोष देखील त्यांनी तयार केला . आजदेखील आपण स्थानिक न्यायालयांचा कारभार बहुतांश वेळा इंग्रजी भाषेतून करतो, तो जेव्हा स्थानिकांना समजेल अस्या मराठी भाषेत येईल ,तेव्हाच महाराजांंचे  रयतेच्या राज्याचे स्वप्न  प्रत्यक्षात साकार होईल, असे मला वाटते.महाराज्यांचा काळात सध्या ज्या प्रमाणे इंग्रजी भाषेतील शद्ब मराठीत रुढ होत आहे , त्याप्रमाणे अनेक ...

बातमीतील चीन ( भाग8)

इमेज
          चीन आपल्या आपल्या भारताच्या 27 राज्यांपैकी 4 आणि 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी एका केंद्रशासित प्रदेशाबरोबर बॉर्डर शेअर करणाऱ्या चीनबाबत नुकत्याच 4 घडामोडी घडल्या . चीनची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात घटल्याने चीनने त्याचा लोकसंख्या धोरणात अमुलाग्र ठरेल असा  बदल करणे, तसेच सुर्याबरोबर  बरोबरी करू शकेल असे तापमान 121 सेकंड तापमान तयार करणे , तसेच नव्या प्रकारच्या इंफुलंझा चा रुग्ण सापडणे या बरोबरच अरुणाचल प्रदेशाजवळच्या सीमावर्ती प्रदेशात महामार्ग बांधणे यांचा समावेश करावाच लागेल . आपल्या मित्राबरोबर आपला शत्रू काय करत आहे? याची माहिती असणे अत्यावश्यक आहे, असे परराष्ट्र संबधात प्रसिद्ध तत्व आहे. त्यानुसार चीनविषयक या घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे.  तर बघूया या घडामोडी.              तर चीनने 1979 या वर्षी  एक मुल धोरण अमंलात आणण्यास सुरवात केली.ज्यामुळे  चीनची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली. परीणामी चीनची कार्यप्रवण लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली. तर वयोवृद्ध लोकांची संख्या प्रचंड प्रमाण...

डेअरी दूध पिता आहात आपण ?

इमेज
         डेअरी दूध पिता आहात आपण ? अशा प्रश्न यापुढे जर तुम्हाला कोणी विचारला तर आश्चर्य वाटायला नको . याला कारणीभूत आहे. प्राण्याचा हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या अमेरिकास्थित गैर सरकारी समाजसेवी संस्था 'पिपल फाँर इथिकल ट्रिटमेंट फाँर अँनिमल' अर्थात  "पेटा" या संस्थेने  भारतातील आघाडीची दुग्ध उत्पादक संस्था अमूल या संस्थेला टीट्वीर वर पाठवलेल्या पत्रावरुन सुरु झालेला विवाद..       तर मित्रांनो, जगभरात आता प्राणीजन्य दूध (डेअरी मिल्क ) कमी वापरले जाते. दूधासाठी आता वनस्पतीजन्य दूधाचा (व्हेगन मिल्क)चा वापर करण्याकडे कल वाढला आहे. अमूलने सुद्धा प्राणीजन्य दूधाचा ऐवजी वनस्पतीजन्य दूध (व्हेगन मिल्क )चा निर्मितीवर लक्ष केंद्रीत करायला हवे असे ट्टीट आणि त्यासोबत एक पत्र अमुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर एस सोधी यांना पाठवले.ज्यात प्राणीजन्य दुध वापरताना प्राण्यांवर अन्वयीत अत्याचार केला जातो.  तसेच हे दूध हिंदु धर्माचा तत्वाचा विरोधात आहे. तसेच हे दुध जीवनसत्वाच्या विचार करता वनस्पतीजन्य दूधापेक्षा कमी प्रतीचे असल्याचे सांगितले आहेत. या...

बातमीतील श्रीलंका

इमेज
      श्रीलंका आपल्या भारताच्या दक्षीणेला असणारे एक बेट स्वरुप राष्ट्र , जे भारत स्वतंत्र झाल्यावर एका वर्षाने स्वतंत्र्य झाले. आपल्या रामायण या महाकाव्यात उल्लेख असणारे राष्ट्र , नैसर्गिस सृष्टीसौंदर्याने भरभरून राहिलेले राष्ट्र म्हणजे श्रीलंका . तर हा श्रीलंका हा देश गेल्या पंधरवाड्यात तीनदा विविध कारणांमुळे चर्चेत आला. पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशाने श्रीलंका या देशाला दिलेले साँफ्ट लोन  , दिसरी घडामोडी म्हणजे श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर एका मालवाहू जहाजाला झालेला अपघात आणि त्यामुळे श्रीलंकेच्या पर्यावरणावर झालेला अनिष्ट परीणाम . तर तिसरी घटना म्हणजे श्रीलंकेने स्पेशल इकाँनाँमिकल झोन उभारताना चीनला दिलेल्या अवास्तव परवानग्या .          आता बघूया या सर्व घडामोडी क्रमाक्रमाने प्रथम बांगलादेशाने श्रीलंकेला दिलेले साँफ्ट लोन. श्रीलंकेकडे आजमितीस फक्त 4 दशलक्ष इतकेच परकीय चलन आहे. मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापार करण्यासाठी अधिक परकीय गंजाजळीची आवश्यकता आहे. ती पुर्ण करण्यासाठी बांगलादेश श्रीलंकेला 200 दशलक्ष डाँलरची मदत करणार आ...

क्रीडा स्पर्धांची तिहेरी पर्वणी !

इमेज
      आपल्या भारतात विविध परीक्षा कश्या  प्रकारे घेण्यात याव्यात ? मुळात परीक्षा घ्याव्यात का ?  की त्यास दुसरा काही अपवाद करता येईल येईल याबाबत  तज्द्न्य व्यक्तीमध्ये मतमतांतरे सुरु असताना जगभरातील क्रीडारसिक मात्र जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्याची आतुरतेने वाट बघत आहेत आहे आणि याला कारणीभूत आहे , एकाच वेळी तीन तीन वेगवेगळ्या क्रीडाप्रकारच्या तीन जगातील पातळीवरच्या स्पर्धा या कालावधीत होणार आहे  26  जुन ते 18 जुलै या दरम्यान सायकलस्वारांची परीक्षा बघणारी मात्र तरीही प्रत्येक सायकलस्वाराची किमान एकदा तरी सहभागी होण्याची इछा असणारी टूर दी फ्रांस ही स्पर्धा होणार आहे . तर 28   जुन ते 18 जुलै या दरम्यान तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात विम्बल्डन स्पर्धा खेळवली जाणार आहे . हे कमी की काय म्हणून म्हणून इतिहासात पहिल्यांदा क्रिक्रेटमधील टेस्ट या प्रकाराची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आपला भारत आणि न्यझीलँड या देशात खेळवली जाणार आहे ती  18 ते 22 जून दरम्यान . सध्या फ्रेंच ओपन ही स्पर्धा सुरु आहेच . 13 जूनपर्यंत सुरु असणारी ही स्पर्धा गेल्य...

37 वर्षानंतर....

इमेज
           काही घडामोडी घडून गेल्यावर कित्येक वर्ष उलटून गेली तरी त्या घडामोडींचा परिणाम शिल्लक राहतो , जून महिन्यात दक्षिण आशियाचा विचार करता  या घडामोडी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे . 25 जून 1975 रोजी भारतात लादण्यात  लादण्यात आलेली आणीबाणी , जून 1975 मध्ये सिक्कीमचे भारतात झालेले एकत्रीकरण,  3 जून 1947 रोजी ब्रिटिश संसदेत  पारित करण्यात आलेला भारताचा स्वातंत्र्याचा कायदा किंवा  3 जून 1984 रोजी अमृतसर येथील शीख बांधवांच्या पाच पवित्र गुरुद्वारांपैकी एक असंणाऱ्या सुवर्ण मंदिरात झालेली लक्षरी कारवाई त्यापैकीच एक            या घटनेचे वस्तूनिष्ठ अध्ययन केल्यास असे लक्षात येते की पंजाबच्या स्थानिक राजकारणात एका पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्या वेळच्या कॉग्रेसने खेळलेल्या पण फसलेल्या चालीचे अपत्य म्हणजे म्हणजे खलीस्तान चळवळ ज्यामुळे भारताच्या एकात्मतेला मोठा धोका निर्माण झाला.  परिणामी एका शुर लढवय्या समाजाच्या प्रार्थना समाजात लष्कर घुसवावे लागले ज्याची परिणीती महात्मा गांधीच्या हत्येनंतर ज...