पोस्ट्स

केल्याने दुर्गपर्यटन

इमेज
      निसर्गाच्या सानिध्यात राहलो तर आपण अधिक काळ जिवंत राहू शकतो, असे वैद्यकशास्त्रातील मान्यवरांचे म्हणणे असते.यामुळे रोजच्या धक्काधकीचा जीवनातून वेळात वेळ काढून लोक निसर्गाचा सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते विविध किल्यांवर थंड हवेच्या ठिकाणी,वनांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात.सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडत खऱ्या विविध वनस्पतीच्या जंगलात जातात. मी सुद्धा त्यास अपवाद नाही. आणि त्यासाठीच मी विविध समाजोपयोगी कामे करणाऱ्या गरुडझेपच्या दुर्गवीरांच्या साथीने  5सप्टेंबर रोजी नाशिकपासून जवळच असणाऱ्या कावनाई या किल्ल्याला भेट दिली.     कावनाई हा किल्ला नाशिकपासून हाकेच्या म्हणजेच सुमारे 55 किमी आहे. नाशिकहून इगतपूरी कडे जाताना घोटीच्या आधी उजव्या हाताला एक फाटा फुटतो, त्या फाट्यातून सुमारे सात आठ किमी प्रवास केला की आपण किल्ल्याचा पायथ्यासी पोहोचतो. किल्ला हा टेहळणीसाठी वापरण्यात येत होता.किल्ल्याची चढाई सोपी या प्रकारातील आहे. सुमारे अर्धा ते पाउण तासात आपण सहजतेने किल्ला चढू शकतो.या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही गडावर एक देवी मंदिर ,...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग 11)

इमेज
                                    सध्या जगाचा श्वास दोनच  गोष्टी भोवती कोंद्दला  गेला  एक म्हणजे हवामान बदल आणि दुसरा म्हणजे अफगाणिस्तान . त्यातील हवामान बदलाविषयी मी या आधीच लिहले आहे ,माझे आजचे लेखन अफगाणिस्तानविषयक आहे  दररोज काहींना काही घडामोडी अफगाणिस्तानमध्ये  घडत आहेत . ज्यातील काही घडामोडी या भारतावर प्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या आहेत तर काही अप्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या आहेत चला तर जाणून घेउया तालिबानविषयक सध्या वेगवेग गतीने घडणाऱ्या  घडामोडी                                 मित्रांनो तालिबानच्या प्रवक्त्याने आम्ही काश्मीरसह जगभरातील मुस्लिम बांधवांच्या प्रशांवर आवाज उठवू असे बीबीसी वरील एका लेखाद्वारे जाहीर केले आहे कतार या देशातील भारताच्या राजदूतांबरोबर होणारी चर्चा विशेष पुढे सरकत नसल्याने आणि भारताने अधिकृतरीत्या तालिबानला अफगाणिस्तानमधील राजवट म्हणून मान्यता न दि...

कोरोनामुळे शेतीचे झालेले नुकसान

इमेज
सध्या आजमितीस सर्वच जग कोरोनामुळे धास्तावले आहे, हे सर्वश्रूत आहे. जगाचे व्यवहार प्रचंड प्रमाणात मंदावले आहेत. कोणीच यातून सुटलेला नाही.  जगाचा पोशिंदा, अन्नदाता म्हणून ओळख असलेला शेतकरी वर्ग देखील यातून सुटलेला नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामुळे झालेले आहे. आपल्या भारताचा विचार करता कृषी क्षेत्राचा जिडीपी अन्य क्षेत्राचा विचार करता काहीस्या सकारात्मक असला तरी या कोरोनाच्या विळख्यातून कृषी क्षेत्र देखील सुटलेले नाही  . कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लाँकडाऊनच्या काळात शहरी नागरीकांना घराजवळ भाजीपाल्याची सोय केलेली असली तरी , शेतकऱ्यांना  मोठ्या प्रमाणात फायदा देणाऱ्या पिकांची निर्यात बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना विविध नामांकित हाँटेलला  विविध रंगातील सिमला मिरच्यांचा विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा होत असतो. लाँकडाउनच्या काळात हाँटेल व्यवसाय पुर्णतः बंद असल्याने  शेतकऱ्यांना याचा फारच मोठा फटका बसला आहे.    शेतकरी जो नफा मिळवतो, त्यामध्ये हाँटेलला माल पुरवणे आणि आंतरराष्ट्रीय निर्यातीचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो....

रम्य ही स्वर्गाहुन लंका ?

इमेज
     आपल्या मराठीत एक अत्यंत मस्त गाणे आहे." रम्य ही स्वर्गाहुन लंका, " 1960 साली आलेल्या 'स्वयंवर झाले सितेचे' या मराठी चित्रपटातील पंडीत भीमसेन जोशी यांनी गायलेले आणि गदिमांनी रचलेले हे गाणे. लंकेची रावणाचे राज्य असताना असलेली  श्रीमंती सांगणारे हे गाणे.  आपल्या मराठीत सुद्धा सोन्याचा वीटांसाठी लंकेचीच निवड केली आहे. एकंदरीत लंका ही समृद्ध देशांमध्ये मोडणारी असावी असे यावरुन  समजते.    आजमितीस मात्र ही लंका सध्या नरकाहुन वाईट अस्या स्थितीत आली आहे. तेथील जनता शद्बशः लंकेची पार्वती सारखे झाली आहे. मी हा मजकुर लिहीत असताना ( गुरुवार 2 सप्टेंबर रोजी)20 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात परकीय चलन फक्त 28 कोटी अमेरिकी डाँलर इतकेच शिल्लक आहे. ज्यातील 15 कोटी अमेरीकी डाँलर त्यांना 2021 च्या अखेरीपर्यंत चूकवायचा कर्जासाठी खर्च करणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच उरलेल्या 13 कोटी अमेरिकी डाँलरमधूनच त्यांना आपल्या जनतेची पोट भरावयाचे आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था मुख्यतः पर्यटनावर अवलूंबून आहे. सध्याचा कोरोना साथीमुळे पर्यटन बंद आहे. परीणामी अर्थाजनाचा मुख्य स्त्र...

ही वादळांची शृंखला कधी थांबेल ?

इमेज
ही वादळांची शृंखला कधी थांबेल ?  असाच प्रश्न सध्या अमेरीकन प्रशासनास पडला आहे. त्याला कारण आहे, आँगस्टचा शेवटच्या आठवड्यात अमेरीकेच्या इशान्य भागात हेन्री या चक्रीवादळाने (स्थानिक संज्ञा हरीकेन) मोठा तडाखा दिल्यावर आता अमेरीकेच्या आग्रेय (south east) दिशेला एका चक्रीवादळाने तडाखा दिला आहे.हरीकेन Ida हे त्या चक्रीवादळाचे नाव. आजमितीस हा मजकूर लिहीत असताना या हरीकेनमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि 10 लाख लोक अंधारात असल्याचे वृत्त NBCया वृत्त वाहिनीच्या युट्युब. चँनेलवर.दिले आहे. याच वृत्त वाहिनीच्या आणखी एका वृत्तानुसार अटलांटिक महासागरात Lurry  नावाचे कमी दाबाचे क्षेत्र  तयार झाले असून ते मोठे हरीकेन बनून आदळण्याची शक्यता. आहे . सध्या जमिनीवर आदळलेल्या Ida या हरीकेन आणि संभाव्य Lurry या कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये समुद्रात पण जमिनीपासून जवळच kate  नावाचे हरीकेन तयार झाले आहे. मात्र ते फारसे ताकदवान नाही .त्यामुळे फारसे नुकसान होणार नाही, असा अंदाज अमेरिकेच्या हवामान खात्यातील हरीकेन विषयक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यात अनेक अमेरीकन नागरीकांचे मोठ्या प्रमाणात आर...

आता भारतभर एकच नंबर

इमेज
     काही दिवसांपुर्वी पर्यतची ही गोष्ट आहे. ज्यांचा भारतभर बदल्या होतात, अस्या व्यक्तींना त्यांचे वाहन प्रत्येक राज्यात नव्याने नोंदवावे लागत असे. वाहन नोंदवताना प्रत्येक राज्यात रोड टँक्स द्यावा लागत असे. वाहनाचे आयुष्य 15 वर्षाचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे एका राज्यात नोंदवलेले वाहन दुसऱ्या राज्यात नोंदवताना आधीच्या राज्यातून शिल्लक वर्षाचा रोडटँक्स परत मिळत असे.मात्र त्यासाठी विहीत केलेली प्रक्रिया इतकी किचकट होती, की सबंधित वाहनचालकाची अवस्था भिक नको पण कुत्र आवरं असी होत असे. परीणामी एकाच वाहनावर अनेकदा रोड टँक्स सबंधित मालक भरत असे. भारतीय वाहन कायदा 1986 नुसार आवश्यक असणाऱ्या या बाबींमुळे होणाऱ्या त्रासातून मोदी सरकारने वाहन मालकांची सुटका केली आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी होणार आहे. ती आहे.        ज्या खासगी कंपनीचे क्षेत्र किमान चार राज्य आहे. त्या कंपनीचे कर्मचारी आणि शासकीय उच्चपदस्थ यांना भारत या नामावलीखाली आपले वाहन नोंदवता येणार आहे. हा लाभ यापूढे नोंदणी होणाऱ्या वाहनांवर लागू असणार आहे. या पुर्वी नोंदणी झालेल्या वा...

वंदन बंडखोर कवियत्रीला

इमेज
  ती काळाचा पुढे बघणारी आधूनिक स्त्री होती, ती ज्ञानपीठविजेती कवियत्री आहे. ती हिंदी , पंजाबी भाषेतील ख्यातनाम कवियत्री आहे. फाळणीपुर्व पंजाबात सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पंजाबात तीचा जन्म झाला होता , तारुण्याचा अवखळपणात तीला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. सासरच्या मंडळींकडुन प्रचंड अत्याचार सहन करावे लागले, मात्र यातूनच तीची कविता समृद्ध होत गेली.ज्या काळात एखाद्या स्त्रीने विवाहाच्या बंधनात न अडकता परपुरुषाबरोबर राहण्याची कल्पना करणे कोणाच्या मनात येणार नाही, अस्या काळात आपल्यापेक्षा मोठ्या पुरुषाबरोबर लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहिली ती. मी बोलत आहे, हिंदीतील ख्यातनाम कवियत्री ज्ञानपीठ विजेत्या अमृता प्रीतम यांच्याविषयी. 31 आँगस्ट हा त्यांचा जन्मदिवस  निमित्याने त्यांना विनम्र आदरांजली     त्या हिंदी पंजाबी भाषेतील ज्ञानपीठ मिळवणाऱ्या पहिल्या कवीयत्री होत्या  हिंदी चित्रपटातील उत्तमोत्तम गाण्याचे गीतकार असणाऱ्या शाहिर लूधीयानवी यांच्या बरोबरचे त्यांचे जीवन विशेष गाजले. मात्र त्यांची स्वतंत्र्य असी काव्यप्रतिभा होती . हे विसरुन चालणार नाही.  अम...