पोस्ट्स

ब....... बुद्धिबळाचा

इमेज
                     आज भारतातील बहुतांशी   माध्यमे  इंग्लंड बरोबरची क्रिकेटची टेस्ट मॅच,  एका क्रिकेटरचा घटस्फोट आणि पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल च्या वार्तांकनात मग्न असताना भारताची जगाला देणगी असलेल्या एका पूर्णतः स्वदेशी असणाऱ्या खेळाची  अर्थात बुद्धिबळाची अत्यंत प्रतिष्ठेची  स्पर्धा अर्थात बुद्धिबळाचे ऑलम्पियाड सुरु आहे .25ऑगस्ट रोजी रशियात त्याचे दिमाखदार उदघाटन झाले  25 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे ..  कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टाळला नसल्याने ही  स्पर्धा ऑनलाईन पध्द्तीने खेळवण्यात येणार आहे   www.chess.com  या संकेतस्थळावर आपणास हि विनामूल्य बघता येईल . तसेच chess डॉट कॉम च्या युट्युब चॅनेलवर आणि flowचेस या ऍपवर   देखील आपण या स्पर्धेच्या आस्वाद घेऊ शकता आजमितीस  या विषयी  लिहिताना (8 सप्टेंबर ) लिहताना भारताची स्थिती खूपच उत्तम आहे मात्र असे असे असून देखील दुर्दैवाने  भारतीय माध्यमात या विषयी हवे तितके बोलले जा...

वन्यसंपदा धोक्यात !

इमेज
               आपल्याकडे विविध राजकीय लाथाळ्यांच्या बातम्या देण्यात  माध्यमे रंगून गेलेली असताना, जागतिक स्तराच्या विचार करता वन्यसंपदा धोक्यत असल्याचा दोन बातम्या मला बीबीसी बघतांना आढळल्या . बीबीसीच्या बातम्यांचा सूर  काहीसा भारतविरोधी आणि पाकिस्तानला साह्य करणारा असला तरी   (याचमुळे अनेकजण बीबीसीचे पूर्ण स्वरूप ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कंपनी च्या ऐवजी बुलशीट ब्रॉडकॉस्टिंग कंपनी असा अपरोधिक करतात ) तरी विज्ञान विषयक त्यांचे वार्तांकन खूपच सोप्या मात्र माहितीपूर्ण भाषेत असल्याने मी बीबीसी नेहमीच बघतो असो               तर सांगायचं मुद्दा असा की, जर आताच काही कार्यवाही ना केल्यास   ऑस्ट्रोलीय या देशातील 26 प्रकारच्या बेडकाच्या जाती 2040 पर्यंत पूर्णतः नष्ट  होऊ शकतात अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली  ऑस्ट्रोलीय या देशात एकूण 240 प्रकारच्या बेडकाच्या जाती अढळतात असत त्यातील चार प्रकारच्या बेडकाच्या जाती या आधीच नष्ट झालेल्या आहेत तर  26 प्रकारच्य...

वंदन भारताची नवी ओळख जगाला करणाऱ्या संन्यास्याला

इमेज
      आजपासून 128 वर्षापुर्वीची गोष्ट आहे,स्थळ अमेरीका या देशातील शिकागो हे शहर . या शहरात ते शहर ज्या देशात आहे, त्या भुभागाचा जगाला शोध लागल्याच्या घटनेला 400 वर्षे पुर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ जगातील सर्व धर्मातील बाबींवर चर्चा करण्यासाठी एक परीषद आयोजीत करण्यात आली होती.  आज परीषदेचा पहिला  दिवस आहे, या दिवशी ज्या वक्त्यांनी बोलण्याचे नियोजन केले आहे, त्यातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता , सर्व वक्त्यांची भाषणे झाली आहेत,अश्यावेळी तेथील आयोजक एका 30 वर्षीय वक्त्याला बोलण्यास आमंत्रीत करतात, वक्ता त्यांचा गुरूचे स्मरण करुन भाषणास सुरवात करण्यासाठी शद्ब उचारतो, आणि त्याचे पहिले चार शद्ब उचारुन होत असतानाच जमलेले हजारो लोक त्या वक्त्याचा सम्माणार्थ सलग साडेतीन  मिनीटे टाळ्या वाजवते, त्या व्यक्तीचे नाव असते, स्वामी विवेकानंद , आणि ज्या परीषदेत त्यांनी भाषण केले असते, ती असते शिकागो येथील सर्वधर्म परीषद .येत्या शनिवारी जगाला भारताच्या महान वारस्याची जगाला ओळख करुन देणाऱ्या त्या भाषणास 128 वर्षे पुर्ण होणार आहेत.          अनेक चूकीच्या ...

केल्याने दुर्गपर्यटन

इमेज
      निसर्गाच्या सानिध्यात राहलो तर आपण अधिक काळ जिवंत राहू शकतो, असे वैद्यकशास्त्रातील मान्यवरांचे म्हणणे असते.यामुळे रोजच्या धक्काधकीचा जीवनातून वेळात वेळ काढून लोक निसर्गाचा सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते विविध किल्यांवर थंड हवेच्या ठिकाणी,वनांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात.सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडत खऱ्या विविध वनस्पतीच्या जंगलात जातात. मी सुद्धा त्यास अपवाद नाही. आणि त्यासाठीच मी विविध समाजोपयोगी कामे करणाऱ्या गरुडझेपच्या दुर्गवीरांच्या साथीने  5सप्टेंबर रोजी नाशिकपासून जवळच असणाऱ्या कावनाई या किल्ल्याला भेट दिली.     कावनाई हा किल्ला नाशिकपासून हाकेच्या म्हणजेच सुमारे 55 किमी आहे. नाशिकहून इगतपूरी कडे जाताना घोटीच्या आधी उजव्या हाताला एक फाटा फुटतो, त्या फाट्यातून सुमारे सात आठ किमी प्रवास केला की आपण किल्ल्याचा पायथ्यासी पोहोचतो. किल्ला हा टेहळणीसाठी वापरण्यात येत होता.किल्ल्याची चढाई सोपी या प्रकारातील आहे. सुमारे अर्धा ते पाउण तासात आपण सहजतेने किल्ला चढू शकतो.या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही गडावर एक देवी मंदिर ,...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग 11)

इमेज
                                    सध्या जगाचा श्वास दोनच  गोष्टी भोवती कोंद्दला  गेला  एक म्हणजे हवामान बदल आणि दुसरा म्हणजे अफगाणिस्तान . त्यातील हवामान बदलाविषयी मी या आधीच लिहले आहे ,माझे आजचे लेखन अफगाणिस्तानविषयक आहे  दररोज काहींना काही घडामोडी अफगाणिस्तानमध्ये  घडत आहेत . ज्यातील काही घडामोडी या भारतावर प्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या आहेत तर काही अप्रत्यक्षपणे परिणाम करणाऱ्या आहेत चला तर जाणून घेउया तालिबानविषयक सध्या वेगवेग गतीने घडणाऱ्या  घडामोडी                                 मित्रांनो तालिबानच्या प्रवक्त्याने आम्ही काश्मीरसह जगभरातील मुस्लिम बांधवांच्या प्रशांवर आवाज उठवू असे बीबीसी वरील एका लेखाद्वारे जाहीर केले आहे कतार या देशातील भारताच्या राजदूतांबरोबर होणारी चर्चा विशेष पुढे सरकत नसल्याने आणि भारताने अधिकृतरीत्या तालिबानला अफगाणिस्तानमधील राजवट म्हणून मान्यता न दि...

कोरोनामुळे शेतीचे झालेले नुकसान

इमेज
सध्या आजमितीस सर्वच जग कोरोनामुळे धास्तावले आहे, हे सर्वश्रूत आहे. जगाचे व्यवहार प्रचंड प्रमाणात मंदावले आहेत. कोणीच यातून सुटलेला नाही.  जगाचा पोशिंदा, अन्नदाता म्हणून ओळख असलेला शेतकरी वर्ग देखील यातून सुटलेला नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामुळे झालेले आहे. आपल्या भारताचा विचार करता कृषी क्षेत्राचा जिडीपी अन्य क्षेत्राचा विचार करता काहीस्या सकारात्मक असला तरी या कोरोनाच्या विळख्यातून कृषी क्षेत्र देखील सुटलेले नाही  . कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लाँकडाऊनच्या काळात शहरी नागरीकांना घराजवळ भाजीपाल्याची सोय केलेली असली तरी , शेतकऱ्यांना  मोठ्या प्रमाणात फायदा देणाऱ्या पिकांची निर्यात बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना विविध नामांकित हाँटेलला  विविध रंगातील सिमला मिरच्यांचा विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा होत असतो. लाँकडाउनच्या काळात हाँटेल व्यवसाय पुर्णतः बंद असल्याने  शेतकऱ्यांना याचा फारच मोठा फटका बसला आहे.    शेतकरी जो नफा मिळवतो, त्यामध्ये हाँटेलला माल पुरवणे आणि आंतरराष्ट्रीय निर्यातीचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो....

रम्य ही स्वर्गाहुन लंका ?

इमेज
     आपल्या मराठीत एक अत्यंत मस्त गाणे आहे." रम्य ही स्वर्गाहुन लंका, " 1960 साली आलेल्या 'स्वयंवर झाले सितेचे' या मराठी चित्रपटातील पंडीत भीमसेन जोशी यांनी गायलेले आणि गदिमांनी रचलेले हे गाणे. लंकेची रावणाचे राज्य असताना असलेली  श्रीमंती सांगणारे हे गाणे.  आपल्या मराठीत सुद्धा सोन्याचा वीटांसाठी लंकेचीच निवड केली आहे. एकंदरीत लंका ही समृद्ध देशांमध्ये मोडणारी असावी असे यावरुन  समजते.    आजमितीस मात्र ही लंका सध्या नरकाहुन वाईट अस्या स्थितीत आली आहे. तेथील जनता शद्बशः लंकेची पार्वती सारखे झाली आहे. मी हा मजकुर लिहीत असताना ( गुरुवार 2 सप्टेंबर रोजी)20 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात परकीय चलन फक्त 28 कोटी अमेरिकी डाँलर इतकेच शिल्लक आहे. ज्यातील 15 कोटी अमेरीकी डाँलर त्यांना 2021 च्या अखेरीपर्यंत चूकवायचा कर्जासाठी खर्च करणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच उरलेल्या 13 कोटी अमेरिकी डाँलरमधूनच त्यांना आपल्या जनतेची पोट भरावयाचे आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था मुख्यतः पर्यटनावर अवलूंबून आहे. सध्याचा कोरोना साथीमुळे पर्यटन बंद आहे. परीणामी अर्थाजनाचा मुख्य स्त्र...