पोस्ट्स

कँनडाची सुत्रे भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे?

इमेज
                   आज हे लिहीत असताना (14 सप्टेंबर सायंकाळ) रोजी कँनडातील केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूकीच्या प्रचार आंतीम टप्यात आला आहे. येत्या सोमवारी अर्थात 20 सप्टेंबर रोजी कँनडातील नागरीक तेथील खासदार निवडण्यासाठी मतदान करतील. आपले अल्पमतातील सरकारला पुर्ण बहुमत मिळण्यासाठी, कोरोनाचा चौथ्या लाटेचा धोका कायम असताना तसेच विद्यमान सरकारचे 17महिने बाकी असताना कँनडाच्या पंतप्रधानांनी तेथील संसद भंग करत मुदतपुर्व निवडणूका जाहिर केल्या. ज्यासाठी येत्या 20 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.कोरोना साथीच्या काळात तेथील विरोधक सरकारला पुर्ण समर्थन देत असताना, या निवडणूका जाहिर करण्यात आल्या आहेत, हे विशेष. या निवडणूकीत ज्या पक्षाला अधिक मते मिळतील , त्या पक्षाचा कँनडाचा पंतप्रधान होईल. ग्लोबल न्युज , आणि सि एन एन या वृत्तवाहिनीच्या   (आपल्या प्रकारे अजेंडा सेटर वृत्तवाहिन्या या आहेत का ?, ते माहिती नाही) बातम्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे जे एक्सिट पोल समोर येत आहे ,त्यानुसार  न्यु डेमोक्रेटीक पक्षाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार...

पर्यावरण रक्षणासाठीचा एक वेडा.... ब्रिजेश शर्मा

इमेज
अनेकदा ध्येयवेड्या लोकांना लोकांना आपाल्याकडे वेडे समजले जाते.  कुठून या व्यक्तीच्या मनात हे खूळ शिरले कोणास ठाऊक ? असा सर्वसाधारण नजरेतून त्यांच्याकडे बघितले जाते . मात्र यावेळी इतिहास्यात अश्याच काहीश्या वेडगळ  वाटणाऱ्या व्यक्तीमुळे फार मोठी सर्वसाधारण स्थितीत अशक्यप्राय वाटणारी कामे  झाल्याचा सोईस्करपणे विसर पडतो . रस्त्यावरून जाताना एका मुरलीधर आमटे  यांनी कुष्ठरोग्याला पहिले,  त्याच्या स्थितीची त्यांना  दया आली, त्यांची स्थिती  सुधारावी, या वेडाने ध्येयाने त्यांना झपाटले आणि त्यातून बाबा आमटे या महान समाजसुधारकांचा आणि हेमलकसा या एका स्वप्नवत वाटणाऱ्या प्रकल्पाचा जन्म झाला अन्यवेळी समाजाचा तिरस्काराचा धनी झालेल्या कुष्ठारोग्यांचा अंगभूत असणाऱ्या कलागुणांना वाव मिळून त्यांना अर्थजनासाठी साधन मिळाले       गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये असा एक ध्येयवेडा आला आहे, ब्रजेश शर्मा हे त्यांचे नाव. MBA,सारखे उच्च शिक्षण घेतल्यावर युरोपातील अर्मेनिया आणि जार्जिया आदी पाश्चात्य देशातील सुखवस्त नोकरी सोडुन,  सेंद्रिय  ...

ब....... बुद्धिबळाचा (भाग 5)

इमेज
             बुद्धिबळ ओलम्पियाडमधील भारताची घोडदौड वेगाने अंतिम ध्येयाकडे अर्थात सुवर्णपदाकडे सुरु आहे याचेच प्रत्यंतर सोमवारी 13 सप्टेंबर रोजी झालेल्या  उपांत्यपूर्व  सामना दरम्यान दिसले . उपांत्यपूर्व  फेरीत ब्लीट्स या प्रकारात ट्रायब्रेकमध्ये 5 विरुद्ध 1 असे सरळ यश  मिळवत दिमाखदारपणे  उपांत्य फेरीत प्रवेश केला .;        भारताचे  कप्तान  विशवनाथ आनंद यांच्या अनुपस्थित पहिल्या क्रमांकावर खेळताना नाशिकचे आयकॉन  गुजराथी आणि कोनेरू हंपी यांनी प्रतिस्पर्ध्यांविरोधात  बरोबरी साधली त्यांनी अनुक्रमे  veteran Vasyl Ivanchuk.  आणि    Iulija Osmak यांच्या विरोधात लढत दिली ब्लीट्स या प्रकारात ट्रायब्रेकमध्ये खेळताना अधिबान  यांनी प्रतिस्पर्ध्याला  Larsen Indian variation  या सापळ्यात अडकवून 36 चालीत नमवले .त्यांनी  Kirill Shevchenko  ला गुडघे टेकायला भाग पाडले . ब्लिटीझ खेळाच्या आधी झालेल्या दोन डावांमध्ये मात्र आपल्याला युक्रेनच्या खेळाडूंनी कडवी झुंज द...

मुद्दे त्यांचे .... मुद्दे आपले

इमेज
          मी आपणाशी बोलत असताना (13 सप्टेंबर ) युरोप खंडातील जर्मनी आणि उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा या देशात सार्वत्रिक निवडणुकीमुळे समाजजीवन अक्षरशः ढवळून निघत आहे .जर्मनीमध्ये 26  सप्टेंबर आणि कॅनडामध्ये 20 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत या निमित्याने तेथील राजकीय प्रचारात दंग आहेत . विरोधकांवर विविध मुद्यांवर टीका करत आहे मात्र हे करताना वैयक्तिक हेवे दाव्यांवर ते बोलताना दिसत नाहीये. विविध प्रसंगी त्यांनी त्यांनी घेतलेल्या भुमिकांवर ते टिका करत आहेत. ज्यामध्ये स्त्रीवाद, दहशतवाद, हवामान बदल या मुद्यांचा समावेश आहे. तेथील राजकीय पक्षांनी आपापले जाहिरनामे देखील प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये हवामान बदलाचा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात अग्रभागी आहे.हवामान बदलाचा  जगात सर्वाधिक फटका आपणास बसलेला आहे, मात्र आपल्या येथील निवडणूकांमध्ये या मुद्द्याचा दुर दूरपर्यत समावेश नसतो,  हे आपण जाणतातच.               मी गेला आठवडाभर  DW , France24 आदी वृत्त वाहिन्यांचा या संदर्भातील बातम्या बघत आहे. य...

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

इमेज
    सर्वप्रथम सर्वांना गणेशॊच्छवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा . सध्या आपण सर्व मराठी भाषिक गणेशॊच्छवच्या रंगात रंगून गेलो आहोत . मित्रानो बुद्धीची देवता असणारी , कोणत्याही पूजेच्या वेळी अग्रपूजेचा मान असणारी , गणाचा अधिपती असणाऱ्या गणपती ही देवता फक्त आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातच पुजली जाते , असे आपणास वाटतं असेल तर आपण चुकलात   , भारताबरोबर भारत आणि चीन या प्राचीन संस्कृतीचा एकत्रित प्रभाव आढळणाऱ्या आग्नेय आशियातील अनेक देशात गणपती पुजला जातो . . माझे   आजचे लेखन आग्येय आशियातील गणपतीची माहिती देण्यासाठी  .    व्हिएतनाम मध्ये शिवलिंग , विष्णू , दुर्गा , कार्तिकेय , गणपती त्याचप्रमाणे बुद्ध , बोधिसत्व यांच्या प्रतिमा आढळल्या आहेत . व्हिएतनाममधील ‘ मी सोन ’ ( स्थानिक भाषेतील याचा अर्थ सुंदर पर्वत असा होतो ) या ठिकाणी सातव्या शतकातील शिवालयाचे अवशेष सापडले होते . या शिवालयाच्या आवारातील एका मंदिरात एका उंच पीठावर एक उभी गणेशमूर्ती आढळून आली होती . ...

ब....... बुद्धिबळाचा (भाग 4)

इमेज
          भारताची बुद्धिबळ ऑलम्पियाडमधील  यशस्वी घोडदौड सुरूच आहे . ऑलम्पियाडमधील  रॉबिन राउंड (  जिंकला अथवा हरला तरी ठरलेले सामने खेळायला मिळणे ) पध्द्तीच्या अखेरच्या दिवशी भारताने  स्लोव्हानिया या देशाबरोबर तीन तीन अशी बरोबरी तर हंगेरी या पूलमधील बलाढ्य संघाला 4 विरुद्ध 2तर   मोल्डवोवा विरुद्ध 5  विरुद्ध 1  असा  सफाईदार विजय मिळवत आपल्या पूलमध्ये पहिले स्थान मिळवले , आणि मोठ्या दिमाखदारपणे नॉक आउट ( हरलं की बाहेर ) या फेरीत प्रवेश केला . या यशामुळे आपल्या डिव्हिजनमध्ये  पहिल्या सोळापैकी दहाव्या क्रमांकापर्यंत धडक मारली . भारत असलेल्या पुलमधून भारतासह हंगेरी ( क्रमांक 15)  या देशाने प्रवेश केला आहे .यापुढे  13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या युक्रेन आणि जर्मनी या देशातील विजेत्याबरोबर भारताची गाठ पडेल           भारताच्या शुक्रवारच्या डावाची सुरवात हंगेरी या देशाबरोबर झालेल्या डावाने झाली यामध्ये भारताने 4 विरुद्ध 2असे यश मिळवले भारताचे कप्तान विश्वनाथन आंनद या...

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक

इमेज
  सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र गणपती बाप्पाची धूम चालू आहे . या गणेशोत्सवात गणपती दर्शनाचे विशेष महत्व आहे . आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे परिसरातील गणपतीची ठिकाणे प्रसिद्ध आहेत . मात्र आपल्या महाराष्ट्रात फक्त हीच गणपतीची ठिकाणे नाहीत . तर विदर्भात सुद्धा गणपतीची आठ ठिकाणे प्रसिद्ध आहेत . ज्याला वैदर्भीय अष्ट गणेश म्हणतात या खेरीस देवीप्रमाणेच गणपतीची साडेतीन ठिकाणे देखील आहेत . पहिल्यादा आपण विदर्भातील अष्टविनायकांची माहिती घेउया . वरदविनायक- टेकडी गणपती   विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती. ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरचíचत प्रतिमा पाहायला मिळते. नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव. प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक भोसले-इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे. स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषांमध्ये मिळाली असे सांगितले जाते.मंदिर...