पोस्ट्स

भोवतालचे आर्थिक अरिष्टय आणि भारत

इमेज
          आपल्या भारतात विविध राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना भारताच्या आसपास असणाऱ्या देशांच्या आर्थिक स्थितीबाबत नजर टाकल्यास छातीत धस्य व्हावे अशी स्थिती आहे .आपल्या शेजारच्या श्रीलंका आणि पाकिस्तान या  देशाची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे . हे दोन्ही देश आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या धोकादायक निधीच्या दृष्टीने अति संवेदनशील असणाऱ्या यादीत अर्थात ग्रेलिस्ट मध्ये आहे .दोन्ही देशांमध्ये त्यांच्या स्वातंत्र्यापाससुनचा सर्वात वाईट आर्थिक कालखंड सध्या सुरु आहे  अर्थात या दोन्ही मागची करणे भिन्न भिन्न आहेत पाकिस्तानच्या आर्थिक विप्पनतेसाठी तेथील सरकारने आर्थिक प्रगतीसाठी पूरक अशी धोरणे न राबवणे तसेच भरमसाठ घेतलेली परदेशी कर्जे कारणीभूत आहेत तर श्रीलंकेसाठी पर्यटन या एकाच साधनावर अवलूंबून असणारी अर्थव्यवस्था तसेच बहुतांश जीवनावश्यक गोष्टींची आयात करणे देशांर्गत त्याची निर्मिती न करणे यामुळे परदेशी चलन साठा कमी होणेमात्र आवश्यक तेव्हडा परदेशी चलनाचा साठा ना होणे  (कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय रोडवणे मात्र आयात सुरूच ठेवणे ) यामुळे गंभ...

COP २६च्या नावाने

इमेज
            सध्या जनसामान्य आपसात काय बोलत आहेत याचा कानोसा घेतल्यास आमच्या लहानपणी असे हवामान नाव्हते ? हे वाक्य आजच्या पस्तिशीच्या आतबाहेर असणाऱ्या आणि पस्तीशीपेक्षा अधिक वयाच्या व्यक्त्तींकडून हमखास बोलले जात असल्याचे आपणस दिसून येते  आमच्यावेळी इतके कडक ऊन नसायचे .दिवाळीच्यावेळी कडक थंडी असायची अशी वाक्य ते सांगतात . या बदलणाऱ्या हवामानवर काय उपाययोजना करायची यासाठी दरवषी वर्षाच्या काखेरीस जगातील सर्व देश एकत्र येऊन चर्चा करतात ज्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीझ असे म्हणतात कॉन्फरन्स ऑफ पार्टीझ  या इंग्रजी शब्दांच्या अद्याक्षराने बनलेल्या शब्दाने अर्थात   COP  या नावाने हि परिषद ओळखली जाते या  COP  परिषदेला प्रत्येक वर्षी  ती कितवी परिषद आहे हे समजण्यासाठी  क्रमांक देण्यात येतो जसे  COP  २१ , COP  २२ , COP २३ या प्रमाणे या वर्षी होणारी परिषद २६वी  असल्याने यास COP २६ संबोधले जात आहे  सन १९९५ ला पहिल्यांदा जर्मनी देशाच्या बर्लिन शहरात भरवण्यात आली त्या नंतर मागील २०२० वर्षाचा अपवा...

मैत्रीत मिठाचा खडा

इमेज
               चीन आणि पाकिस्तान भारताचे दोन शत्रू जे एकमेकांचे घनिष्ट मित्र आहेत , भारताने  पाकिस्तान विरोधात संयुक्त  राष्ट्र संघात काहीही प्रस्ताव आणला तर चीन आपल्या सुरक्षा परिषदेतील नकाराधिकाराचा करत नेहमी  पाठीशी घालतो . पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी देखील चीनचा उल्लेख अनेकदा ऑल वेदर फ्रेंड  केला आहे .चीनच्या  मदतीने पाकिस्तानात अनेक विकासकामे चालू आहेत चीनच्या वायव्य दिशेला असणाऱ्या सिकियांग प्रातांतील  मुस्लिम बांधवावर चीन अत्याचार करत नसून त्यांना शिक्षित करत आहे असे म्हणून चीनची पाठराखण पाकिस्तानकडून स्वतः एक मुस्लिम राष्ट्र असून देखील अनेकदा होते  भारतावर हे दोघे एकत्रितपणे आक्रमण तर करणार नाहीना ? अशी भीती देखील अनेकदा होते .मात्र या मैत्रीत मिठाचा खडा तर पडला नाही ना ? असे वाटावे अश्या घडामोडी नुकत्याच घडल्या माझे लेखन त्याविषयी सांगण्यासाठी .       तर मित्रानो,  नुकतीच चीनने पाकिस्तानात सुरु असणाऱ्या  प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या,   चिनी लोकांवर होणा...

रेन रेन गो अवे !

इमेज
            इंग्रजीत एक बालगीत आहे "रेन रेन गो अवे , लिटिल मीना वाँटस् टु प्ले"  या बालगीतातील बालिका तीला खेळायला मिळावे,  म्हणून पावसला जाण्यास सांगते अशी कवी कल्पना आहे . मात्र खेळण्यासाठी नव्हे तर  रोजच्या जीवनाची रहाटगाडी चालण्यासाठी  रेन रेन गो  अवे ! म्हणण्याची  केरळच्या जनतेवर आली आहे . केरळमध्ये पावसाने  उच्छाद मांडला  असून  मजकूर लिहण्यापर्यंत पावसाने ३१ जणांना पावसामुळे प्राणास मुकावे लागले आहे . केरळच्या बहुतांश भागात पावसाचा अति धोकादायक समजला जाणारा रेड  अलर्ट जाहीर करण्यात आला असून अन्य भागात तुलनेने काहीशा सौम्य असणारा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे . पंतप्रधान नरेंद्र  यांनी देखील ट्विटरवर  केरळच्या नैसर्गिक संकटाबाबत संवेदना स्पष्ट केली आहे . नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स (NDRF ) आणि लष्कराच्या तुकड्यांमार्फत केरळमध्ये बचावाचे कार्य जोरात सुरु आहे .मान्सुमच्या पावसाच्या अखेरच्या टप्यातील पावसाने केरळची ही दैनावस्था केली आहे . (नेहमीच्या वेळापत्रकानुसार 1सप्टेंबररोजी...

या आत्महत्यांकडे बघणार कोण ?

इमेज
             मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटी मध्ये कार्यरत नसलो,  तरी एसटीचा चाहता आहे एसटीच्या विविध योजनांचा फायदा घेत मी महाराष्ट्र पालथा घातला आहे . माझ्या या छंदामुळे मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटी प्रेमींच्या समाज माध्यमांवरील विविध गृपचा सदस्य आहे गेल्या काही दिवसांच्या या गृपवरील पोस्ट बघितल्या तर आपणास एक गोष्ट सहजतेने लक्षात येते ती म्हणजे या गृपवर  दोन ते तीन दिवसाच्या अंतरावर किमान एका एसटीच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या करून जीवन संपवले असल्याची पोस्ट येत असते .           आतापर्यंत सुमारे दहा ते पंधरा एसटी कर्मचाऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे . ज्यांनी जीवन संपवले त्या पैकी बहुसंख्य हे एसटीचा कणा  म्हणता येतील अश्या वाहक आणि चालक या क्षेणीतील कर्मचारी होते .उच्चपदस्थ अथवा एसटीच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी फारच तुरळक प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत  या सर्व कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या आणिउशिराने मिळणाऱ्या पगारामुळे आत्महत्या केली आहे . या आत्महत्या झाल्यावर संबंधित आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास त्य...

५९ वर्षाची भळभळती जखम

इमेज
            आजपासून ५९ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही , ऑक्टोबर महिन्याचे दिवस होते ते . भारताच्या उत्तर सीमेवर तणावपूर्ण शांतता होती.  चीनने भारताच्या जमू काश्मीर राज्यातील लडाख भागात चीनने एक रस्ता बांधल्याचे समोर आले होते, त्या घटनेवरून दोन्ही देशांच्या संबंधात काहीशी कटुता आली होती  अश्यातच चीनच्या लष्कराकडून उत्तराखंड राज्यात भारत चीन सीमेवर गस्त घालणाऱ्या इंडो तिबेटियन फोर्सच्या काही  पोलिसांवर १७ ऑक्टोबर रोजी अचानक हल्ला करून त्यांची हत्या केली जाते, आणि भारत चीन यांच्यातील सुप्त तणाव  उघड होतो आणि दोन्ही देशात युद्धाची ठिणगी पडते   आज २०२१ साली या युद्धाला ५९ वर्षे पूर्ण झाली आहे सरकारी नियमानुसार व्यक्ती ६०वर्षाचा झाल्यावर त्यास सेवेतून निवृत्त केले जाते या हिशोबाने या  हल्ल्याचा एक वर्ष आधी जन्मलेली व्यक्ती आता सेवानिवृत्त होईल ,इतकी वर्षे होऊन सुद्धा हि जखम अजून भळभळतीच आहे  . त्या निमित्याने या युद्धात आप्तेष्ट गमावलेल्या लोकांच्या दुःखात सहभागी राहूया.  १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या या हल्ल्याचा स्...

सोने विचाराचे ...

इमेज
          विजयादशमी अर्थात दसरा भारतीय पंरंपरेतील शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त . या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने सोनेरूपी देऊन एकमेकांचे सुयश चिंतण्याची प्रथा आहे उत्तर भारतात  निमित्याने गेली ९ दिवस सुरु असणाऱ्या रामकथेचा शेवट रावणदहनाने करण्याची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राचा विचार करता या दिवशी होणाऱ्या दोन विशेष कार्यक्रमाला अनन्य साधारण महत्व आहे . एक म्हणजे मुंबईतील दादर भागातील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणारे हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जनतेला असणारे संबोधन आणि दुसरे म्हणजे नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालकांचे संघाच्या स्वयंसेवकाला संबोधित करून होणारे  होणारे संबोधन . बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांचे पुत्र आणि विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हहे त्यांच्या वतीने जनतेला संबोधित करतात . या दोन्ही भाषणांना आपल्या महाराष्ट्रात विचारांचे सोने म्हणण्याची परंपरा आहे . स्वयंसेवकांना उद्देशून असणारे संबोधन हे सकाळी असते तर शिवसेना प्रमुखांचे संबोधन साय...