पोस्ट्स

एसटीचे खरे शत्रू !

इमेज
        आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या साठी एसटीने  आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना   अनुक्रमे  जेमतेम अडीच आणि पाच हजाराचा बोनस दिला.  मी जेमतेम हा शब्द वापरतोय कारण पुरेसे करसंकलन न झाल्याने  आर्थिक स्थिती दोलायमान असणाऱ्या नाशिक महानगरपालिकेने आपल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १५ हजार बोनस दिला आहे . एसटीच्या सध्याच्या या आर्थिक स्थितीला अनेक घटक कारणीभूत आहेत ज्यामध्ये राज्य सरकारकडून विविध सवलतींचे अनुदान वेळेत न मिळण्याबरोबरच आपल्या महाराष्ट्राच्या एसटीला इतर राज्यातील एसटीकडून देण्यात येणारे आव्हान हे प्रमुख धोके आहेत             आपल्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तालुक्यात इतर राज्याचा एसटी आपली सेवा देतात . त्यासाठी ते आपल्या एसटीच्या जागांचा वापर करतात  आपण एकवेळ खासगी बसवाहतूकदारांना बसस्थानकापासून काही अंतरावरच व्यवसाय करावा असे बंधन घालू शकतो. मात्र या इतर राज्यातील परीवहन सेवांना असे बंधन घालणे निव्वळ अशक्य आहे नाशिकहून वायव्य कर्नाटक ...

चिंताजनक भविष्य सामोरी

इमेज
                 जगाचे तापमान वाढवणाऱ्या हरितवायूंचे प्रमाण मागच्या २०२० या वर्षी जग काहीसे बंदिस्त असताना जगाचे  व्यवहार मंदावले असताना देखील विक्रमी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे जागतिक हवामानशास्त्र  संघटनेमार्फत केल्लेल्या एका अभ्यासात ही बाब उघड झाली आहे             जागतिक हवामनशास्त्र संघटनेच्या अभ्यासानुसार कार्बनडाय ऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साईड या वायूंचे प्रमाण वाढण्याची गेल्या दहा वर्षातील जी सरासरी होती त्यापेक्षा गेल्या २०२० या वर्षी अधिक प्रमाणात या वायूंचे उत्सर्जन झाले ज्यामुळे पॅरिस करारात सांगितलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .  दुर्दैवाने हे पारंपरिक कोळस्या पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होत आहे . मानवाकडून करण्यात हरितवायूच्या उत्सर्जनपैकी सुमारे ५०% उत्सर्जन हे महासागरातील [आणि आणि वनांच्या मार्फत शोषले जाते मात्र या घटकांमुळे किती हरितवायू शोषले जाणार ? याचे प्रमाण तापमान पर्जन्य आणि इतर भौगोलिक घटकांमुळ...

नेपाळ आजचा उद्याचा

इमेज
      सिने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा  अंमली पदार्थाचा सेवन केल्याचा आरोपामुळे  कारागृहात बंदी असल्यामुळे त्याच्या विषयीचा बातम्या आणि सध्या  असलेल्या क्रिकेट विश्वचषकासंबंधी बातम्या देण्यात माध्यमे व्यस्त असताना आपल्या शेजारील देश असणाऱ्या नेपाळविषयी दोन घडामोडी घडल्या  घडामोडींपैकी एक घडामोड आपला शत्रू असणाऱ्या चीनविषयक आहे तर दुसरी आपल्या भारताविषयक आहे .      नेपाळ आपले मित्र राष्ट्र आहे .आपल्या भारतीय लष्करात नेपाळी सैन्याची एक पलटण आहे . भारतीय प्रशासन सेवेत भारताने भूतान बरोबर  देशाचे नागरिक येऊ शकतात तो देश म्हणजे नेपाळ तसेच नेपाळ आणि भारत यातील सीमा खुली असल्याने एकमेकांच्या देशातील नागरिक पासपोर्ट आणि व्हिसा शिवाय एकमेकांच्या हद्दीत जाऊ शकत असल्याने त्याचा विषयीच्या घडामोडी आपणास एक जागरूक नागरिक म्हणून माहिती असणे आवश्यक आहे माझे आजचे लेखन त्यासाठीच       तर मित्रानो , नेपाळच्या गृह मंत्रालयामार्फत केलेल्या एका सर्वेक्षणात नेपाळच्या हुमला जिल्ह्यात चीनने नेपाळच्या बऱ्याच भागात घुसखोरी केल्याचे...

अस्वस्थ शेजार !

इमेज
        आपल्या भारतात आगामी काळात होणाऱ्या विविध राज्यातील आणि महाराष्ट्रातील विविध स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांवरून राजकारण रंगत असताना भारताच्या पश्चिमेकडच्या शेजाऱ्याकडून चिंतेत वाढ करणाऱ्या दोन बातम्यांनी भारताच्या भविष्यात प्रचंड अडचणी वाढून ठेवल्याचे दिसून आले आहे . या दोन्ही बातम्या पाकिस्तानविषयी आहे . त्यातील एक गोष्ट पाकिस्तानच्या राजकीय स्थैर्याशी  निगडित आहे तर दुसरी पाकिस्तानच्या आर्थिक घडामोडीशी निगडित आहे पाकिस्तान आपला शत्रू आहे म्हणूनच नव्हे  तर पाकिस्तानमधील छोट्यात छोट्या घडामोडींच्या आपल्यावर परिणाम होत असल्याने त्या आपणाला माहिती असणे आवश्यक आहे . माझे आजचे लेखन त्याविषयी .         तर मित्रानो पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय एस आय च्या !!प्रमुख पदांवर कोणाची नियुक्ती करायची यावरून पाकिस्तानचे लोकनियुक्त इम्रान खान यांचे सरकार आणि लष्कर यांच्यात वाद निर्माण झाला आहे . ज्यामध्ये लोकनियुक्त सरकारने माघार घेतली असून लष्कराचा अधिकृत घोषणा नसली तरी विजय झाला आहे .ही घडामोड सुरु झाली ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्...

भोवतालचे आर्थिक अरिष्टय आणि भारत

इमेज
          आपल्या भारतात विविध राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना भारताच्या आसपास असणाऱ्या देशांच्या आर्थिक स्थितीबाबत नजर टाकल्यास छातीत धस्य व्हावे अशी स्थिती आहे .आपल्या शेजारच्या श्रीलंका आणि पाकिस्तान या  देशाची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे . हे दोन्ही देश आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या धोकादायक निधीच्या दृष्टीने अति संवेदनशील असणाऱ्या यादीत अर्थात ग्रेलिस्ट मध्ये आहे .दोन्ही देशांमध्ये त्यांच्या स्वातंत्र्यापाससुनचा सर्वात वाईट आर्थिक कालखंड सध्या सुरु आहे  अर्थात या दोन्ही मागची करणे भिन्न भिन्न आहेत पाकिस्तानच्या आर्थिक विप्पनतेसाठी तेथील सरकारने आर्थिक प्रगतीसाठी पूरक अशी धोरणे न राबवणे तसेच भरमसाठ घेतलेली परदेशी कर्जे कारणीभूत आहेत तर श्रीलंकेसाठी पर्यटन या एकाच साधनावर अवलूंबून असणारी अर्थव्यवस्था तसेच बहुतांश जीवनावश्यक गोष्टींची आयात करणे देशांर्गत त्याची निर्मिती न करणे यामुळे परदेशी चलन साठा कमी होणेमात्र आवश्यक तेव्हडा परदेशी चलनाचा साठा ना होणे  (कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय रोडवणे मात्र आयात सुरूच ठेवणे ) यामुळे गंभ...

COP २६च्या नावाने

इमेज
            सध्या जनसामान्य आपसात काय बोलत आहेत याचा कानोसा घेतल्यास आमच्या लहानपणी असे हवामान नाव्हते ? हे वाक्य आजच्या पस्तिशीच्या आतबाहेर असणाऱ्या आणि पस्तीशीपेक्षा अधिक वयाच्या व्यक्त्तींकडून हमखास बोलले जात असल्याचे आपणस दिसून येते  आमच्यावेळी इतके कडक ऊन नसायचे .दिवाळीच्यावेळी कडक थंडी असायची अशी वाक्य ते सांगतात . या बदलणाऱ्या हवामानवर काय उपाययोजना करायची यासाठी दरवषी वर्षाच्या काखेरीस जगातील सर्व देश एकत्र येऊन चर्चा करतात ज्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीझ असे म्हणतात कॉन्फरन्स ऑफ पार्टीझ  या इंग्रजी शब्दांच्या अद्याक्षराने बनलेल्या शब्दाने अर्थात   COP  या नावाने हि परिषद ओळखली जाते या  COP  परिषदेला प्रत्येक वर्षी  ती कितवी परिषद आहे हे समजण्यासाठी  क्रमांक देण्यात येतो जसे  COP  २१ , COP  २२ , COP २३ या प्रमाणे या वर्षी होणारी परिषद २६वी  असल्याने यास COP २६ संबोधले जात आहे  सन १९९५ ला पहिल्यांदा जर्मनी देशाच्या बर्लिन शहरात भरवण्यात आली त्या नंतर मागील २०२० वर्षाचा अपवा...

मैत्रीत मिठाचा खडा

इमेज
               चीन आणि पाकिस्तान भारताचे दोन शत्रू जे एकमेकांचे घनिष्ट मित्र आहेत , भारताने  पाकिस्तान विरोधात संयुक्त  राष्ट्र संघात काहीही प्रस्ताव आणला तर चीन आपल्या सुरक्षा परिषदेतील नकाराधिकाराचा करत नेहमी  पाठीशी घालतो . पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी देखील चीनचा उल्लेख अनेकदा ऑल वेदर फ्रेंड  केला आहे .चीनच्या  मदतीने पाकिस्तानात अनेक विकासकामे चालू आहेत चीनच्या वायव्य दिशेला असणाऱ्या सिकियांग प्रातांतील  मुस्लिम बांधवावर चीन अत्याचार करत नसून त्यांना शिक्षित करत आहे असे म्हणून चीनची पाठराखण पाकिस्तानकडून स्वतः एक मुस्लिम राष्ट्र असून देखील अनेकदा होते  भारतावर हे दोघे एकत्रितपणे आक्रमण तर करणार नाहीना ? अशी भीती देखील अनेकदा होते .मात्र या मैत्रीत मिठाचा खडा तर पडला नाही ना ? असे वाटावे अश्या घडामोडी नुकत्याच घडल्या माझे लेखन त्याविषयी सांगण्यासाठी .       तर मित्रानो,  नुकतीच चीनने पाकिस्तानात सुरु असणाऱ्या  प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या,   चिनी लोकांवर होणा...