पोस्ट्स

हा खेळ सावल्यांचा

इमेज
आपल्या मराठीतील एक उत्तम चित्रपटगीत म्हणजे "हा खेळ सावल्यांचा  या सुप्रसिद्ध गीतातील एक त्याहून सुप्रसिद्ध गीत म्हणजे  "रात्रीस खेळ चाले हा खेळ सावल्यांचा, संपलेंना काडीही हा खेळ सावल्यांचा . या गीतातील एकसुपारीचा ओळ म्हणजे " ग्रहणात सावल्यांचा अधीशप भोगतो हा " हे सांगण्याचे कारण म्हणजे येत्या शुक्रवारी होणारेचंद्र ग्रहण या प्रकारचे दीर्घ चालणारे ग्रहण -हे ८ फेब्रुवारी २६६९ रोजी होण्याची शक्यता आहे या आधी या प्रकारचे ग्रहण १८ फेब्रुवारी १४८० झाले होते . हे ग्रहण याच्या आधी२६ मे  २०२१ रोजी झालेल्या ग्रहणासारखेच आहे  हे चंद्रग्रहण तब्बल ३ तीन तास  . २८ मिनिटे आणि १४ सेकंड दिसणार आहे त्यामुळे हे चंद्रग्रहण या शतकातलेच नव्हे तर गेल्या ५८० वर्षातील सर्वात दीर्घ असणारे हे चंद्रग्रहण आहे .आपल्या भारतातून हे ग्रहण दिसणार नाहीये संपूर्ण युरोप आफ्रिका अमेरिका आणि ऑस्ट्रलिया खंडातील लोकांना याचा आंनद घेता येऊ शकतो , भारतीय प्रमाणनवेळे नुसार दुपारी १२ वाजून ४८ हे ग्रहण सुरु होईल आणि दुपारीदोन वाजून ३४ मिनिटांनी हे ग्रहण सुटेल यावेळी भारतात दिवस असले आणि चंद्रग्रहण असण्...

गृहाळ सुरूच

इमेज
          युनाटेड किंग्डम   ( युनाटेड किंग्डम या देशाला आपल्या कडे सर्वसाधारणपणे इंग्लंड म्हणतात ) या देशातील स्कॉटलंड या भागाची राजधानी असणाऱ्या ग्लासको या शहरात सुरु असलेली कॉन्फरन्स ऑफ पार्टीजचे  २६ वे  अधिवेशन १२ नोव्हेंबर २०२१ रोजी कोणत्याही ठोस कार्यक्रम आणि उद्धिष्टांशिवाय पार पडली . कोळशाच्या वापर बंद कारण्यावरून भारत चीन या गटाचे पश्चिम युरोपीय राष्ट आणि अमेरिकेच्या गटाबरोबर तीव्र स्वरूपाचे मतभेद  झाल्याने तसेच अविकसित किंवा अल्पविकसित देशांना पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी निधी पुरवण्यावरून सदस्य राष्ट्रांत मतैक्य न झाल्याने ही परिषद एक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी केलेला कार्यक्रम म्हणून त्याचे स्वरूप राहिले . ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान  अधिवेशन इटली आणि युनाटेड किंग्डम या देशांद्वारे संयुक्तरित्या आयोजित करण्यात आले होते या पुढील अधिवेशन २०२२ साली इजिप्तमध्ये  होणार आहे              एकूण वापर बघितला तर भारत आणि चीन जगात सर्वाधिक कोळसा वापरतात . मात्र दरव्यक्ती क...

पंडीत नेहरु एक देशाच्या प्रगतीसाठी झपाटलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व

इमेज
                150 वर्षाच्या गुलामगिरीतून नुकताच स्वतंत्र झालेला ,  गुलामगिरीच्या कालखंडात प्रचंड आर्थिक शोषण झालेले ,  हातात   फारशी आर्थिक संसाधने नाहीत , प्रचंड गरिबी असलेल्या या   देशात दंगलीच्या अगंडोबा उसळलेला ,  शेजारच्या देशाने केलेले आक्रमण , देशात असणारे   विविध संस्थाने , प्रत्येक देश स्वतंत्र देश   भासावा अशी स्थिती   त्यांचे देशात एकत्रीकरण करणे , हा देशा समोरचा सगळ्यात मोठ्या प्रश्नपैकी एक ,   जगातील सर्व भाषिक धार्मिक विविधता या एकाच ठिकाणी एकवटली आहे का ? असे वाटावे अशी स्थिती असणारा , प्रचंड लोकसंख्येचा देश . लोकशाहीचा गंध देखील बहुसंख्य लोकांना न झालेल्या देशात लोकशाहीचे बीज रोवण्याचे प्रचंड आव्हान ,  पेलत त्यांनी देशाचे सुकाणू घेतलेले . देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी . आपण बोलत आहोत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान   असलेल्या   पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी .14 नोव्...

धोका अद्याप टळलेला नाही

इमेज
                आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही बाजारपेठेत फेरफटका मारल्यास कोव्हीड १९ नावाचा कोणता रोग कधीकाळी तरी अस्तित्वात होता का ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा असे चित्र सहजतेने दिसते.  आपण कोव्हीड १९च्या प्रसार रोखण्यासाठी दिड वर्षांपूर्वी अंमलात आणणारे सुरक्षेचे उपाय पूर्णतः गुंडाळलेले दिसतआहे .करोना चा धोका पूर्णतः टळलेला आहे असेच बाजरपेठेतील बहुसंख्येने वर्तन असते . मात्र कोव्हीड १९चा धोका अद्याप टळलेला नसल्याचे,  जर्मन सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेली DW , फ्रांस सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेली  FRANCE 24,आणि भारतीय मालकीची परदेशी बातम्या सहज सोप्या भारतीय उच्चाराच्या इंगजीत देणाऱ्या WION आदींच्या बातम्या बघितल्या तर सहजतेने लक्षात येत आहे     युरोपीय युनियनच्या हेल्थ केअर युनिटने दिलेल्या एका इशाऱ्यानुसार युरोपातील १० देशात कोव्हिडचा धोका पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण करत आहे . जर्मनीत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यच्या पहिल्या पाच दिवसात दररोज केलेल्या एक हजार चाचणीत २६७ रुग्ण आजाराने गस्त असल्याचे समजत आहे ,...

मागण्या योग्य सादर करायची पद्धत अयोग्य

इमेज
               सध्या आपल्या महाराष्ट्रात एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन दिवाळीत दळणवळण  थंडावले आहे . एसटीच्या स्वतःच्या विचारानुसार ऑक्टोबर ते मार्च हा हंगाम गर्दीचा असतो त्यामुळे या काळात एसटीच्या आवडेल तिथे फिरा या पासच्या किमतीत वाढ होत असते . आणि याचा काळात एसटीच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे .एसटी कर्मचाऱ्यांचा संघर्ष समितीने संप संपल्याचे जाहीर केल्यावर सुद्धा कर्मचाऱ्यांचे समाधान न झाल्याने कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने संप सुरूच ठेवल्याने राज्यात दळणवळण बऱ्याच मोठ्या प्रमाणात थंडावले आहे सरकारने सुद्धा तुम्ही कामे सुरु करा आपल्या मागण्याबाबाबत विचार करण्यात येईल असे आवाहन केले आहे मात्र त्यास कर्मचाऱ्यांकडून  थंड प्रतिसाद मिळत आहे परिणामी  एसटी कर्मचाऱ्यांचा मागण्या कितीही रास्तवाजवी असल्या तरी त्यांच्या विरोधात संतापाची भावना प्रवाश्यांमधून उमटत आहे . हे कर्मचारी आधीच आमच्याशी उध्द्त वागतात . जर यांना राज्य सरकारमध्ये पूर्णतः सामावून घेतले तर , त्यांच्या अरेरावी मध्ये भरच प...

पुनश्च सिंहासन

इमेज
          ऐंशीच्या दशकातील एक उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून, ज्येष्ठ सिने निर्माते जब्बार पटेल यांनी दिग्ददर्शित केलेला सिंहासन ओळखला जातो. अनैतिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा राजकरण्यासी असणारा सबंध तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांपासून कैक दुर अस्या मुद्यांवर राजकारण कसे खेळले जाते? ते त्यात सांगण्यात आले आहे.  मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कांदबरीच्या संयोगातून तयार झालेल्या आणि अनेक  मातब्बर सिने कलावंत असणाऱ्या या चित्रपटाचा दुसरा अंक सध्या सुरु झाला आहे का ? असे वाटावे असे वातावरण सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. चित्रपटात स्मगर्लस चा राजकारण्यासी असणारा सबंध दाखवण्यात आला आहे. तर सध्या अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींचा राजकरण्यासी असणारा सबंधावरून राजकारण तापत आहे. चित्रपटात सामन्य जनतेच्या प्रश्नाला बगल देत सरकार पाडण्याचा विरोधकांचा, आणि त्यांची बाजू त्यांच्यावरच उलटवण्याचा मुख्यमंत्र्यांचा यशस्वी प्रयोग दाखवण्यात आला आहे. आता देखील जनतेच्या प्रश्नांवरुन सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी सरकारमधील मंत्र्यांचा वर्तनावरुन सरकारला पाडण्याचे विरोधक...