पोस्ट्स

भारतीय रेल्वेची गगग भरारी

इमेज
    भारतातील दुर्गम, अविक प्रदेश रेल्वेच्या नकाश्यावर आणण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत.ज्यामध्ये इशान्य भारत आणि जम्मू काश्मीरचा अधिकाधीक भाग रेल्वेने देशातील इतर भागाशी जोडणाऱ्या विकाम कामांचा उल्लेख करावाच लागेल. इशान्य भारतातील राज्यांची किमान राजधानी तरी रेल्वेच्या नकाश्यावर यावी, यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. तसेच जम्मू काश्मीरमध्ये जास्तीत जास्त आतपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे रेल्वेचे प्रयत्न आहेत.   जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक  या नावाने रेल्वेचे जाळे विस्तारण्याचा प्रकल्प सुरु आहे. हा प्रकल्प यु .एस बि. आर.एल. या नावाने प्रसिद्ध आहे.रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प परीचित आहे.हा  रेल्वेप्रकल्प 2003च्या आधीपासूनच सुरु आहे. नुकतीच या रेल्वे मार्गातील मोठा माईल स्टोन गाठण्यात आला. या प्रकल्पातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा तयार करण्यास रेल्वे अभियंत्रांना यश मिळाले. तब्बल 12 हजार 700 मीटर लांबीचा हा बोगदा संबल ते अरीहनचरा या दरम्यान आहे. या बोगद्याची ए...

श्रीलंकेचा पाय खोलात

इमेज
        आजमितीस  काही मोजक्या वृत्तवाहिन्यांच्या अपवाद वगळता सर्व भारतीय वृत्तवाहिन्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाबाबत बॉलिवूडचा चित्रपट वाटावा अश्या पद्धतीने वार्तांकन करत असताना,  आपल्या भारतापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या  निसर्गाचे अभूतपूर्व देणे लाभलेल्या आणि ज्याच्या सरकारच्या रेडिओवरून वाजवण्यात येणाऱ्या हिंदी चित्रपट गीतांनी एकेकाळी समस्त भारताला वेड लावले होते अशा श्रीलंका आर्थिकदृष्टया प्रचंड अडचणीत आला आहे .  बुधवार २३ फेब्रुवारी रोजी  देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला अजून घसरण्यास हातभार लागावी  अशी घडामोड  घडली.  कोलोंबो शेअर बाजार पहिल्यांदा  ५  टक्कयांनी आणि  नंतर साडे सात टक्क्यांनी  असे दोनदा घसरल्याने  दोन्ही वेळेस कोलोंबो शेअर मार्केटमध्ये लोवर सर्किट लावावे लागावे होते जेव्हा शेअर बाजार खूप मोठ्या प्रमाणात घसरतो,  तेव्हा गुंतवूणूकदारांचे अजून नुकसान होऊ नये , यासाठी काही काळ शेअर बाजरातील व्यवहार बंद ठेवले जातात त्यास लोवर सर्किट म्हणतात...

ज्ञानभाषा मराठी!

इमेज
    फेब्रुवारी महिन्याचा शेवटून दुसरा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हे जगजाहीर आहे. मराठीतील थोर कवी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत साजरा होणाऱ्या, या दिवशी समाजमाध्यमांमध्ये मराठीची थोरवी गाणाऱ्या, तीला अभिजात भाषेचा दर्जा का आवश्यक आहे ? तसेच मराठी कशी जगातील एक प्रमुख भाषा आहे, मराठी माध्यमातील शाळा टिकवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?   मराठी वाढण्यासाठी काय काय केले पाहिजे. हे सांगणाऱ्याविविध पोस्ट आपण दरवर्षी  बघतो .आता मी मराठीतच बोलणार, लिहणार असा संकल्प देखील आपल्यापैकी अनेक जण या निमित्ताने करतात. मात्र दरवर्षी मराठीबाबत ठराविक गोष्टींचीच उजळणी होते,मात्र घोडे काही पुढे जात नाही, असो     ब्रिटीश लोक तंत्रज्ञानात पुढे होते. ज्यामुळे त्यांनी भारतासह जगभरातील विविध सत्ताधिशांचा पराभव केला, आणि संख्येने कमी असून देखील ते तेथील सत्ताधीश झाले. सत्ताधिशांची भाषा म्हणून इंग्रजी जगभर पसरली, परीणामी आज ती जगातील एक सर्वत्र बोलली जाणारी भाषा म्हणून उदयास आली आहे. आपली मराठी नेमकी मार खाते ती इथेच. सर्वसामन्यांना समजेल अस्या...

वंदन समाजसुधारक स्वातंत्र्यवीरांना

इमेज
                महान व्यक्तींमध्ये आपणास व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आढळतात.त्यातील सर्वच जगासमोर येतात असे नाही,महान व्यक्तींचे अनेक पैलु दुर्देवाने अचर्चीतच राहतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे  अंदमानातील जीवन ,तेथून सुटका आणि 1947नंतरच्या त्यांचा जीवनाविषयी अनेकदा बोलले जाते.मात्र या सर्व प्रकारात त्यांचा एक पैलू दुर्दैवाने अप्रकाशीतच राहतो, तो म्हणजे आपल्या रत्नागिरीच्या मुक्कामात त्यांनी केलेले समाजप्रबोधनाचे कार्य. आपल्या भारतीय स्वतंत्रलढ्याकडे नजर टाकल्यास लोकमान्य टिळकांसारखे स्वातंत्र्यासाठी पेटलेले नेते दिसतात मात्र समज सुधांरणेबाबत लोकमान्य टिळकांची मते काहीशी प्रतिकूल होती सर्वप्रथम हे परकीय राज्य इथून निघून गेले पाहिजे  परकीय राज्य जाऊन स्वकीयांचे राज्य आल्यावर सामाजिक सुधारणा सहजतेने करता येईल आपले ध्येय परकीय सत्ता उलथून टाकणे हेच असले पाहिजे हे असे लोकमान्य टिळकांना वाटत असे . तर ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर याच्या मते भारतीय समजणे ब्रिटिशांच्या राजवटीचा फायद...

खेळ होतो मोठ्यांच्या, जीव जातो लहानग्यांचा

इमेज
          रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर घडलेल्या विविध घडामोडी विविध वृत्तवाहिन्या .वृत्तपत्र यांच्या मार्फत आपणापर्यंत एव्हाना पोहोचल्या असतील .  त्यामुळे कोसळल्या शेअर मार्केटमुळे होणारे गुंतवणुकीदारांचे अब्जावधींअमेरिकी डॉलरचे  नुकसानीचे आकडे, तसेच रशियाच्या हल्ल्यात प्राणास मुकलेल्या व्यक्तीचे फोटो व्हिडीओ आपणापर्यंत  समाज माध्यमांद्वारे  पोएका होचले देखील असू शकतात . युक्रेनच्या राजदूतांनी भारताकडे मागितलेल्या मदतीमुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कसं जागतिक स्तरावर प्रभाव आहे या बाबतचे विविध मेसेज तुम्ही समाज माध्यमांमध्ये वाचलेले असू शकतात पुतीन यांचे व्यक्तिमत्व कसे हुकूमशाही स्वरूपाचे आहे त्यांच्या रशियन गुप्तचर संस्थेतील कामकाजविषयी तसेच त्यांच्या स्वच्हन्दी स्वरूपाचे आहे याविषयी देखील तुम्ही वाचलेले असू शकते मात्र  एका मुद्यांबाबत तुम्ही फारसे ऐकलेले नसू शकते ,तो विषय म्हणजे विविध महासत्तांच्या वर्चस्वाच्या लढाईत भरडला जाणाऱ्या छोट्या राष्ट्रांचा जीव          आताची ...

युक्रेनच्या धर्तीवर याही देशाचा मृत्यू होणार?

इमेज
                                     र शिया युक्रेनचा घास  कश्या प्रकारे घेत आहे ? हे आपण टीव्हीवर बघत आहोतच रशियाने युक्रेनवर आक्रमक केल्यावर अमेरिका देशाची  प्रतिक्रिया   जगाने बघितलीये ,जी अमेरिका नाटोच्या  मदतीने युक्रेनच्या मदतीसाठी आम्ही येऊ असे म्हणत होती त्याच अमेरिकेने युक्रेनमधील आपला दूतावास जगात सर्वात पहिले बंद केला. आम्ही रशियाविरुद्ध तिसरे महायुद्ध होऊ इच्छित नाही, असे कारण देत युक्रेनला स्वतःच्या ताकदीवर रशियाविरुद्ध लढण्यासाठी सोडून दिले. आज हे लेखन करताना अमेरिका सोडा नाटोचा कोणताही सदस्य देश रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनबरोबर येत नहिये .त्यामुळे एका मोठा प्रश्न उद्भवू शकण्याची शक्यता आंतराष्ट्रीय माध्यमातून व्यक्त होत आहे, ती म्हणजे उद्या जर चीनने,  रशियाने युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी जे कारण दिले, तसेच कारण देत तैवानवर आक्रमण केले तर तैवानचे काय होणार?  ज्या प्रमाणे युक्रेन हा देश जगाच्या नकाश्यावरून गा...

युक्रेनपेक्षा मोठे संकट भारताच्या शेजारी

इमेज
                 आजमितीस सर्व  वृत्तवाहिन्यांकडे वर्तमानपत्राकडे  नजर टाकल्यास सर्वत्र युक्रेनचीच चर्चा होताना दिसत आहेत .युक्रेनचे संकट मोठे आहे यात वादच नाही .मात्र   युक्रेनपेक्षा मोठे संकट भारताच्या शेजारी घोगावते आहे ते म्हणजे श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीचे संकट . माझ्यामते भारतावर युक्रेनपेक्षा आधीक वाईट  परिणाम या श्रीलंकेच्या संकटाचे होणार आहेत . रशिया आणि युक्रेन यातील कोणीही भारताबरोबर सीमा शेअर करत नाहीये मात्र श्रीलंका भारतापासून हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे तेथील घडामोडींचा परिणाम आपल्यावर मोठ्या प्रमाणात होईल , गरजवंताला अक्कल नसते अशी आपल्याकडे म्हण आहे त्या म्हणीनुसार श्रीलंकेच्या वाईट आर्थिक स्थितीचा फायदा घेत जर चीनने श्रीलंकेमध्ये आपला तळ मजबूत केला तर भारतापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिल्याशिवाय दुसरे होणे अशक्यच , श्रीलंका कितीही भारताच्या बाजूने असला तरी,  जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण होईल तेव्हा श्रीलंका भारताच्या मैत्रीला वाटाण्याच्या अक्षता लावत भारताच्या शत्रू...