पोस्ट्स

पाकिस्तान ,अंतर्गत लाथाळ्यांमुळे पोखरत जाणारा देश

इमेज
    पाकिस्तानी संसद  पाकिस्तानामधून येणाऱ्या बातम्या बघीतल्यास पाकिस्तान हा देश अंतर्गत लाथाळ्यांमुळे पोखरत जाणारा देश आहे, हे स्पष्ट होत आहे.          10एप्रिल रोजी पाकिस्तानात शेहबाज  शरीफ यांचा शपथविधी होवून आठवडा होत आला, तरी 18एप्रिलपर्यत त्यांचे मंत्रीमंडळ स्थापन होणे सोडाच, अजून पाकिस्तान डेमोक्रॅटिक अलायन्स मधील सहभागी पक्षांनी कोणकोणते खाती सांभाळायची ?याचाच निर्णय अजून झालेला नाही. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि पाकिस्तानात मिस्टर टेन पर्सेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असिफ अली झरदारी  यांच्या मुलगा तथा माजी पंतप्रधान झुलफिखार अली भुट्टो यांचा नातू बिलावल भुट्टो यास परराष्ट्र मंत्रालयाचा मंत्री होण्याची इच्छा आहे.  ज्या पक्षाच्या पंतप्रधान आहे. त्या पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गट यास अर्थ, माहिती, रेल्वे , गृह यासारखी खाती हवी आहेत.त्या बदल्यात तो आपल्या दुसऱ्या सहकाऱ्यास अर्थात पाकिस्तान  पिपल्स पार्टीस पंजाबचे गव्हनरपद, आपल्या राज्यसभा समकक्ष असणाऱ्या सिनेट या सभागृहाचे अध्यक्षपद अन्य काही खात्याचे मंत्रीपद देवू ...

भारताशिवाय चालेचिना !

इमेज
            भारत स्वातंत्र्यापासूनच जगाच्या विविध घटकांचे नेतृत्व करत आहे स्वातंत्र्याच्या वेळी स्वतःसारख्या वसाहतवादाचे शिकार असणाऱ्या देशांचे नेर्तृत्व भारताने केले वसाहतवादी राष्ट्रांकडून शोषण झाल्याने सर्वस्व गमावलेलया राष्ट्रांचे अजून नुकसान न होता त्यांना उपलब्द असणाऱ्या साधनसंपदेत त्यांच्या झपाट्याने विकास व्हावा यासाठी भारताने नमाच्या झेंड्याखाली या नवस्वातंत्र्य मिळविलेल्या देशांची संघटन उभारून जागतिक राजकारणात त्यांच्या अजून फुटबॉल होणार नाही याबबाबत काळजी घेतली जगात सर्वात जास्त शांतीसेना पाठवण्याचा विक्रम सुद्धा भारताच्या नावावर आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत (UNGA ) अनेक आफ्रिकी देशांचे लक्ष भारत एखाद्या विषयावर काय भूमिका घेतो याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष असण्याच्या काळ फारसा जुना नाही त्याकाळी भारताच्या प्रतिनिधीने एखाद्या मतदानाच्या वेळी हात वॉर केल्यावर अनेक आफ्रिकी देशाच्या प्रतिनिधींचे हात वरती येत असत भारताचे मत म्हणजे निवळ स्व हित नव्हे तर स्वहिता बरोबर जगाचे देखील कल्याण  असणार अशी खात्री असायची याच...

भारताचा जगात डंका

इमेज
   पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी प्रशांसनीय उदगार काढल्याचे आपणास स्मरत असेलच भारत त्याला अनुकूल होतील अश्या पद्धतीने जगात परराष्ट्र धोरण राबवतो भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्याही महासता ठरवत आंही असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते हे उद्गार किती सार्थ आहेत याची झलक पुन्हा एकदा पाहण्यात आली     आग्नेय आशियातील महत्त्वाचा देश,  ज्याचे राष्ट्रपती सुकीमो हे भारताच्या पहिल्या १९५० च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे विशेष निमंत्रीत होते.  ज्या देशाच्या सांस्कृतिक वारश्यावर भारताचा प्रचंड प्रभाव आहे,  जो त्यांनी देखील मान्य केला आहे . ज्या देशांनी त्यांचा अधिकृत धर्म हा इस्लाम आहे असे जाहीर केले आहे अश्या देशांच्या यादीत सर्वाधिक मुस्लिम बांधव ज्या देशात राहतात भारतसारखाच वसाहतवादाचा शिकार झालेला देश अर्थात इंडोनेशिया या देशाबरोबर १४ एप्रिल रोजी झालेली वार्ता त्याचीच झलक दाखवून देते  भारत-इंडोनेशिया फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन्स (FOC) ची 7वी फेरी 14 एप्रिल 2022 रोजी जकार्ता, इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आली हो...

दोस्त दोस्त ना राहा

इमेज
       सन १९६४ साली संगम नावाचा एक चित्रपट येऊन गेला त्यामध्ये मुकेश यांनी एक गायलेलं एक आहे "दोस्त दोस्त ना रहा " असे . सध्याची अमेरिकेची अवस्था अशीच झाली आहे दोस्त दोस्त ना रहा . अमेरिकेच्या मैत्री यादीतील कमी झालेला देश म्हणजे ,आखाती देशातील महत्त्वाचा देश जो इस्लामी देशांचे नेतृत्व करतो जो जगातील पहिल्या क्रमांकाचे तेल उप्तादन करतो जो देश तेथील कडक शिक्षेमुळे ओळखला जातो जो आतापर्यन्त महिलांना अत्यंत कमी स्वातंत्र्य देणारा देश म्हणून ओळखला जात असे  तो देश म्हणजे सौदी अरेबिया .        जगभरात मानवी हक्काच्या बाबतीत इतर देशांना कायम आरोपीच्या पिजऱ्यात उभा करणारा देश म्हणजे अमेरिका . मानवी हक्क रक्षणाचा जगातील मक्ता केवळ आपणस मिळालेला आहे जगभरात जिथे कुठे मानवी हक्काची पायमल्ली होते तिथे न्यायनिवाड्याचा हक्क केवळ आपणास आहे अश्या तोऱ्यात विविध देशांवर विनाकारण हल्ला करून त्या देशांची राख रांगोळी करणारा देश म्हणजे अमेरिका . जगभरात कायम लोकशाहीच्या बाबतीत गळा काढणारा देश म्हणजे अमेरिका स्वतःला धर्मनिरपेक्ष...

लोकसंख्येच्या साडे अकरापट

इमेज
न्युर्याकच्या सबवे मध्ये एका 62 वर्षीय इसमाने केलेल्या बेछूट गोळीबाराने सध्या अमेरीकेत शस्त्रात्रांचा प्रश्न.पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका जागतिक अहवालानूसार जगाच्या एकुण लोकसंख्येपैकी 4 %लोकसंख्या अमेरीका देशात रहाते. मात्र वैयक्तिक शस्त्रात्राचा विचार केला जगाच्या एकुण वैयक्तिक शस्त्राच्या पैकी 46% शस्त्रास्त्रे अमेरीकन नागरीकांनकडे आहेत.हे प्रमाण लोकसंख्येच्या साडेअकरापट आहे. अमेरीकन गृहयुध्दाच्या वेळी अठराव्या शतकात, अमेरीकन केंद्रीय संविधानाच्या दूसऱ्या घटनादुरुस्तीने स्वसंरक्षणार्थ शस्त्रास्त्रे बाळगण्याचा मुलभुत अधिकार अमेरीकन नागरीकांना देण्यात आला. ज्यावेळी शस्त्रास्त्रे बाळगणे, हा अमेरीकन नागरीकांचा मुलभुत अधिकार म्हणून मान्य करण्यात आला, तेव्हा अमेरीकेत रस्त्यावर दिवसाढवळ्या गुन्हेगार लोकांना लूटत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस बळ कमी पडत होते. देशातील यादवीमुळे देशात प्रचंड अस्थिरता होती.देशाचे विभाजन होते का?असा प्रश्न निर्माण झाला होता.आजमितीस त्यावेळची स्थिती पुर्णतः बदलली आहे. मात्र त्यावेळच्या परीस्थितीमुळे देण्यात येणाऱ्या मुलभुत अधिकराला अजूनही सोडचिठ्ठी देण्यात न आल...

राष्ट्रीय स्तरावर नाशिक चमकणार !

इमेज
     नाशिकमध्ये विविध खेळाचे अनेक गुणवान खेळाडू आहेत. जे आपल्या खेळाद्वारा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडत असतात.नाशिकमध्ये खेळाडूंची मोठी परंपरा असून देखील, नाशिकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा होत नसल्याने, नाशिक मधील क्रीडाविश्व काहीसे निराश झालेले दिसते. मात्र आता हे निराश्याचे दिवस संपले कारण....   नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून 27 ते 30 एप्रिल दरम्यान राष्ट्रीय स्तरावरच्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. नाशिकमध्ये अनेक वर्षांनी राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.  .     महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर अर्जुन पुरस्कार प्राप्त व भारतीय टीमचे प्रशिक्षक प्रविण ठिपसे , पदमश्री व महिला इंटरनॅशनल मास्टर भाग्यश्री ठिपसे , ग्रँडमास्टर दिव्या देशमुख , या मराठमोळ्या बुद्धिबळपटूंसह ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण , अरविंद चिदंबरम , निलोपतल दास , गोपाल नारायण , मित्रभ गुहा तसेच इंटरनॅशनल मास्टर प्रणव आनंद , फिडे मास्टर आराध्य गर्ग , निरंजन नवलगुडे आदींचा ...

यांच्या अनुभवातून आपण शहाणे होणार का ?

इमेज
           सध्या आपल्याकडे विविध राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु असताना जगभरातील अनेक देश एका वेगळ्याच संकटाला तोंड देत आहेत ते संकट म्हणजे प्रचंड  अश्या पावसाचे.  १३ एप्रिल पर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार त्यांच्या आधी  तीन ते चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे १३ एप्रिल पर्यंत दक्षिण आफ्रिकेत ६० लोक तर फिलिपाइन्स या देशात ४५ लोक मृत्युमुखी पडले आहेत . फिलिपाइन्स मध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक म्हणजे २५ लोक पावसामुळे दरड कोसळून प्राणास मुकले आहेत . दक्षिण आफ्रिका हा देश भारताच्या तुलनेत विकसित समजला जातो मात्र त्या ठिकाणी देखील कोसळलेल्या पावसामुळे डर्बन या शहराच्या उत्तरेकडच्या भागात मोठं मोठे चिखलाचे पूर येऊन प्रचंड  प्रमाणात वितहानी झालीआहे . दक्षिण आफ्रिका आणि फिलिपाइन्स या देशात अनेक महामार्ग पावसामुळे वापरण्याजोगे राहिलेले नाही तेथिल लोक मूलभूत जीवनावश्यक गोष्टींपासून देखील दूर आहेत दक्षिण आफ्रिकेत या पावसामुळे ६० लोक जीवास मुकले आहेत फिलिपाइन्स देशाच्या हवामान खात्यावर या ...