पोस्ट्स

पुन्हा पुणे अहमदनगर

इमेज
       १ जून १९४८ ही निव्वळ एक तारीख नाहीये . स्वतंत्र भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बस  वाहतूक सूर झाल्याची ती तारीख आहे या वर्षी या घटनेला ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५ वे वर्ष सुरु होईल आपल्या स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बस वाहतूक सूर करण्याचा मान  त्यावेळच्या बॉम्बे स्टेट सरकारला जातो आज आपण बॉम्बे स्टेट सरकारला महाराष्ट्र सरकार म्हणून ओळखतो आणि त्यावेळी बॉम्बे स्टेटने सुरु केलेल्या  उपक्रमाला आपण आज महाराष्ट्र राज्य रोड ट्रान्सपोर्ट कॉरर्पोरेशन अर्थात महाराष्ट्राची एसटी म्हणून ओळखतो त्या वेळेस भारतातील सार्वजनिक उपक्रमांची पहिली  बस  पुणे ते अहमदनगर या दोन शहरादरम्यान धावली होती             आपली एसटी स्थापन झाल्यावर पुढे ८ वर्षांनी केंद्र सरकारकडून सार्वजनिक वाहतूक कायदा स्थापन करण्यात आला .या कायद्यानुसार पुढे विविध राज्यात त्या त्या राज्याच्या एसटी स्थापन झाल्या . आपल्या एसटीकडून देशासाठी  अनेक मापदंड निश्चित करण्यात आले .१९६२ साली चीनविरुद्धच्या युद्धात आणि १९६५ च्या पाकिस्तान विरुद्धच्या...

मानावा सावध हो पुढल्या हाका

इमेज
             शाहरुख खान आणि आणि काजोल यांच्या अभिनयाने सजलेला एक उत्कृष्ट चित्रपट म्हणजे माय नेम इज खान . या चित्रपटात दोन्ही अभिनेत्यावर चित्रित एक गाणे आहे . तेरे नैना तेरे नैना रे . या गाण्यात एक दृश्यात शाहरुख खानने  काजोलला  मधमाश्यांचे  निसर्गातील महत्व  सांगितले आहे ज्यात अल्बर्ट आईंस्टानच्या  हवाल्याने जर जगातील सर्व मधमाश्या नष्ट झाल्यावर चार वर्षांनी जगातील सर्व माणसे मरतील अशी भविष्यवाणी शाहरुखने केली आहे . आता असे  काही  अल्बर्ट आईंस्टान खरंच म्हंटले की शाहरुख खानाने चित्रपट पुढे नेण्यासाठी त्याच्या तोंडी स्वतःहून घातलेले वाक्य आहे हे तो शाहरुख खानच जाणे .मात्र जगातील पक्षी जगत धोक्यात आहे हे नुकतेच एका संशोधांतून स्पष्ट झाले आहे                स्टेट ऑफ द वर्ल्ड्स बर्ड्स या पक्ष्यांच्या संरक्षणविषयक कार्य करणाऱ्या संस्थेनुसार  जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यच्या 10,994  जातींपैकी  13.5%  जातींवर  सध्या नामशेष होण्याचा धोका आहे गुवाहाटी येथील जंगलात ...

स्किझोफेनिया जागृती सप्ताहाच्या निमित्याने

इमेज
                येत्या शुक्रवारपासून   अर्थात 13 मे पासून आपण एका महत्तवाच्या आजाराचा जागृती  विषयक सप्ताह साजरा करणर आहोत . . त्या आजाराचे नाव आहे छिन्नमानसिकता अर्थात स्किझोफेनिया.  अत्यंत गंभीर अश्या या मानसिक आजाराबाबत आपल्या भारतात पुरेसी जनजागृती नाही.  मराठीतील देवराई या चित्रपटाचा अपवाद सोडता मराठीमध्ये या विषयावर फारसे चित्रपट झालेले नाहीत . हिंदीतही हेच ‍चित्र आहे . आपल्या शरिरात मेंदूच्या डाव्या बाजूला डेपोमलिन नावाचा एक अंतस्त्राव होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास सदर आजार होता.  (आणि कमी झाल्यास पार्किसन हा आजार होतो )  आजारात पुर्णत: बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे   सदर आजार व्यक्तिचे संपूर्ण आयूष्य बदलून टाकतो .हा आजार ज्या व्यक्तिला होतो त्याचा काम करण्याचा जाणिवा नाहिस्या होतात ती पुर्णत: परावलंबी बनते भारतात हा आजार असल्यांचे प्रमाण सूमारे 1% आहे. हा आजार काही प्रमानात अनूवंशिक असतो.  हा आजार बहूतांश वेळेला अधिक बूध्दिमान असलेल्या लोकांत आढळतो.  नोबेल विजेते गणिततज्ञ  ज्यांचा...

साहेबाचा सूर्य अस्ताला गेला !

इमेज
        आपल्या भारतावर ब्रिटिशांचे १५० वर्षे राज्य होते बंगाल मधील   प्लासी आणि बक्सरच्या  युद्धाचा  विचार केला असता हा कालावधी अजून ४० ते ५० वर्षे मागे जातो जगाच्या  सर्वात जास्त भूभागावर राज्य करणारे  युरोपातील सर्वात प्रबळ राष्ट म्हणून ब्रिटिश ओळखले जात असतं.  त्यांचे साम्राज जगभरात असल्याने ज्यांच्या समाजावरील सूर्य कधीच मावळत नाही ते साम्राज म्हणजे ब्रिटिश साम्राज असे म्हंटले जायचे.  मात्र दिवस कधीच सारखे नसतात . ब्रिटिशाना त्यांच्या वसाहतींना स्वतंत्र देणे भाग पडले,परिणामी . त्यांचे  साम्राज  कमी झाले या सर्व घडामोडीत दुष्काळात तेरावा महिना अशी घडामोड ८ आणि ९ मे या दिवशी घडली  ज्यामुळे युनाटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आर्यंलंड असे पूर्ण नाव असलेल्या देशातील   नॉर्दन आर्यंलंड हा भूभाग देशाचा भाग राहतो का असा प्रश्न उपस्थित झाला आहे       तर मित्रानो   ज्याला आपण महाराष्ट्रातील लोक सर्वसाधारपणे इंगलंड म्हणून ओळखतो त्या देशाला जगभरात...

श्रीलंका अंतर्गत यादवीच्या दिशेने ?

इमेज
आपल्या शेजारील श्रीलंकेची स्थिती दिवसनोंदिवस अधिक बिकट  होत आहे आर्थिक संकट कमी की काय ? म्हणून आता श्रीलंकेत आता राजकीय संकट निर्माण होताना दिसत आहे तेथील राष्ट्रपती   गोटाभाई राजपक्षे यांनी पंतप्रधानपदी असणाऱ्या आपल्या संख्या मोठ्या भावाचा महिंद्रा राजपक्षे  राजीनामा घेतला आहे .राष्ट्रपती गोटाभाई राजपक्षे  आणि पंत प्रप्रधानचे  सर्वात छोटया भाउ  जे  तिथे आरोग्यमंत्री म्हणून काम बघत होते  त्यानी अर्थात   नमल राजपक्षे  या आधीच राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती  गोटाभाई राजपक्षे यांनी   मात्र  जनाधार आपण राजीनामा द्यावा असा असला तरी कोणत्याही स्थितीत राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले आहे राजपक्षे घराण्यातील दोन सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे   श्रीलंकेवर लोकशिच्या मार्गाने निवडून येण्याचा दिखावा करत अप्रत्यक्षपणे एकाधिकारशाहीने राज्य करणाऱ्या राजपक्षे घराण्याला काहीसा लगाम लागला आहे . तास श्रीलंकन लोकशाहीला घराणेशाहीचा मोठा इतिहास आहे आतापर्यत श्रीलंकेवर बंदरनायके , राजपक्षे आण...

मुद्दे आपले मुद्दे त्यांचे

इमेज
           येत्या २१ मे रोजी ऑस्ट्रेलिया या देशात तेथील  आपल्या लोकसभा समकक्ष सदनाच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी  ऑस्ट्रेलिया  या देशातील वातावरण सध्या चांगलेच ढवळून निघत आहे . २१ मे ही प्रत्यक्ष मतदानाची तारीख असली तरी ज्या नागरिकांचे कोणाला मत देयचे हे ठरलेले आहे ते नागरिक ९ मे १८ मे दरम्यान आगाऊ मतदान देखील करू शकतात . नागरिकांनी पोस्टाद्वारे केलेले मत ऑस्ट्रेलिया निवडणूक आयोगापर्यंत ३ जुनपर्यंत फोहोचण्याची दक्षता नागरिकांना घ्यावी लागणार आहे . ऑस्ट्रेलिया देशातील लोकसभेची मुदत ३ वर्षे आहे मागील निवडणुका १८ मे २०१९ रोजी झाल्या होत्या  ऑस्ट्रेलियन संसद सुद्धा आपल्या सारखीच द्वि सदनी आहे आपल्या राज्यसभा समकक्ष ऑस्ट्रेलियन सदनाची सर्वसाधारणपणे मुदत ६ वर्षे आहे याला अपवाद आहे ऑस्ट्रेलिया  या देशाच्या केंद्रशासित प्रदेशातील सदस्यांच्या त्यांची मुदत मात्र ३ वर्षे आहे . जी त्यांच्या लोकसभेबरोबर संपते . मात्र ऑस्ट्रेलिया या देशातील राज्याच्या कडून निवडण्यात आलेले सदस्य मात्र ६ वर्षे पदावर राहतात . त्यांच्या लोकसभेत बहुमत असणारा ...

हवामान बदलाच्या अभ्यासाची दिशा बदलणार ?

इमेज
         हवामान बदलाच्या अभ्यासाची दिशा बदलणार का  ? , असा प्रश्न उपस्थित व्हावा असे निष्कर्ष  नुकतेच अमेरिका आणि युकेच्या संशोधकांनी केलेल्या संशोधकांतून समोर आलेले आहेत अमेरिकेतील सॅन दिएगो येथील स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफीच्या डॉ क्लो गुस्टाफसन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे शोध लावले. या संशोधनासाठी या गटाने वापरलेल्या  तंत्राला मॅग्नेटोटेल्युरिक्स म्हणतात . हे खडक , गाळ , बर्फ किंवा पाणी असो , खोलवर दफन केलेल्या पदार्थांचे गुणधर्म निर्धारित करण्यासाठी पृथ्वीच्या नैसर्गिक विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांमधील फरकांची नोंद करते .               या संशोधकांना  अंटार्क्टिका खंडाच्या पश्चिमेला असणाऱ्या एका हिमनदीवर  संशोधन करत असताना  व्हिलन्स आइस स्ट्रीमच्या खाली  काही शेकडो मीटर अंतरावर द्रव तरल स्वरूपातील  पाणी आढळले आहे    अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या प्रवाहाखाली भूजल सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. अंटार्क्टिका हवामान बदलावर कशी प्रतिक्रिया द...