पोस्ट्स

आयुष्य समृद्ध करणारी बुद्धिबळ स्पर्धा

इमेज
              मागील महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात नाशिक महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जलद आणि अति जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या शिवधनुष्यासमान असणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनात खारीचा वाटा माझ्या देखील होता.  मला या स्पर्धेच्या आयोजनतेतील सहभागाने खूप काही शिकवले . लोकांचे वेगवेगळे अनुभव . एखादा मोठा सोहळा आयोजित करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात . त्यावर डोकयावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून यशस्वीपणे मात कशी करायची याचे प्रात्यक्षिकासह शिक्षण मला या स्पर्धेच्या आयोजनातील सहभागामुळे कोणताही खर्च न करता मोफत मिळाले   नाशिकरोड येथील महाराष्ट इव्हायर्मेंट इंजिनीरिंग ट्रेनीं ग आणि रिसर्च अकेडमीच्या (मित्रा) प्रांगणात झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे एका शब्दात वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास  आयुष्य समृद्ध करणारी बुद्धिबळ स्पर्धा अ सेच करावे लागेल  .        व्यवस्थापनाच्या अनेक बाबींचे...

भिकारी, ते मोठा निर्यातदार भारताचा गव्हाचा प्रवास

इमेज
  सध्या जगातील मोठ्या 7 अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा समुह अर्थात जी 7 या संघटनेतील देश भारतावर काहीसे नाराज आहेत, आणि याला कारणीभूत आहे, भारताच गहु निर्यात थांबवण्याचा निर्णय. आज भारत जगातील प्रमुख गहु उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. त्याने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळे जगभरात गव्हाचे दर वाढू शकतात.ज्यामुळे आधीच  जगभरात चढे असणारे खाद्यपदार्थाचे दर अजूनच वाढतील, असी भिती हे देश व्यक्त करत आहेत.     भारत एकेकाळी स्वतःच्या देशातील नागरीकांची भुक भागवण्यासाठी अमेरीकेपुढे कटोरा पुढे करत गव्हाची भिक मागणारा देश आज जगातील अनेक देशांना गहु निर्यात करतोय. त्याकाळी अमेरीकेत नित्कृष्ट समजल्या जाणाऱ्या आणि प्राण्यांना खाउ घातला जाणारा गहु अर्थात मिलो गहु अमेरीका अत्यंत तोऱ्यात आपणास अपमानास्पद अस्या अटी  घालून अमेरीका  देयची. आज तोच भारत जगात ताठ मानेने गहु निर्यात करतोय. भिकारी ते मोठा निर्यातदार हा भारताच्या गव्हाबाबतचा प्रवास खरोखरीच थक्क करणारा आहे. यासाठी भारताचे सर्व पंतप्रधान आणि सर्व खासदार,शासकीय यंत्रणेतील लोक, कृषी शास्त्रज...

अस्मितांच्या प्रश्नाऐवजी या जीवघेण्या प्रश्नाकडे कधी बघणार आपण ?

इमेज
 सध्या समाजजीवनाकडे नजर टाकल्यास अनेक अस्मितांचे प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे . काही शतके पूर्वी घडलेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी साध्य मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या जात आहे विविध अस्मिता  मानवास जगताना आनंद देत असल्यातरी निव्वळ अस्मितांवर जगता येणे अशक्य आहे . मानवास रोजच्या जगण्यात अस्मितांबरोबर अनेक भौतिक घटकांची देखील गरज असते यातील अनेक घटक निसर्गावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या अवलूंबून असतात . निसार्गातील चांगल्या वाईट घटनांचा या भोतिक घटकांचे प्रमाण कमी जास्त होण्यात होतो . सध्याच्या निसर्गाच्या लहरीपणा वाढला असताना याचा खूपच मोठ्या प्रमाणात मानवी आयुष्यावर परिणाम होत आहे या प्रश्नाबाबत मात्र हवी तेव्हढी चर्चा भारतात होताना दिसत नाही . जर्मनी सारख्या देशात केंद्रीय सत्तेच्या राजकारणात हवामान बदल  चर्चेत येऊन खूप काळ लोटला आता तेथील राज्याच्या निवडणुकीत हवामान बदलाच्या मुद्यावरून या मुद्यावरून सत्तांतरण होत आहे . आपल्याकडे राज्याच्या राजकारणात सोडा केंद्रीय राजकारणात देख...

मराठवाड्यातील एक दिवस

इमेज
   मी पुण्यात असताना, दर शनिवारी सायंकाळी एसटी बसने फिरायला जात असे .शनिवारी आँफिस सुटले की मी घरी न जाता बसस्टँडवर जात असे. तेथून बस पकडून दुसऱ्या गावात जावून रविवारी सायंकाळी चार पाचपर्यत त्या गावात फिरुन पुन्हा पुण्यात येत असे, आणि सोमवारी पुन्हा आँफिसमध्ये रुजु होत असे.त्यावेळी मी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे  या जिल्ह्यात भरपूर भटकलो.मात्र पुणे सुटले, आणि यात बराच खंड पडला ,मात्र सध्या कोव्हिड 19संपल्याने आणि माझ्या प्रवाश्याचे प्रमुख साधन असलेली एसटी पुन्हा जोमाने सुरु झाल्याने  मी आता या फिरण्याचा पुन्हा प्रारंभ करत आहे.ज्याची सुरवात मी 15 मे रोजी जालना जिल्ह्याला भेट देवून केली.     मी जालना या ठिकाणची  फिरण्याचे ठिकाण  म्हणून निवड    नविन जाणून घेण्याची उत्सुकता तसेच जाण्यायेण्याचा वेळ ,आणि एकुण वेळेची उपलब्धता या निकषांवर केली.माझ्या  होम टाउन असलेल्या नाशिकचा.विचार करता मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या औरंगाबाद या जिल्ह्यातील भद्रा मारुती, पैठण, अजिंठा वेरुळ, घुष्णेश्वर ,बिबिका मकबरा आदी स्थाने या आधी बघीतल्य...

येणारा काळ कसोटीचा

इमेज
            आपला येणार काळ कसोटीचा आहे याची साक्ष देणाऱ्या घटना सध्या जागतिक पटलावर सध्या घडत आहे , रशियाला १६ देशांची सीमा लागून आहे त्यातील १२ देश १९९० पर्यंत रशियाचा भाग होते १९९० साली युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे विघटन झाल्यावर १५ देश स्वतंत्र झाले त्यातील १२ देश रशियारोबर सीमा शेअर करतात  त्यातील एक म्हणजे युक्रेन ज्याने गरज नसताना अमेरिकेशी जवळीक साधण्याच्या  केलेल्या  प्रयत्नामुळे त्याची कशी राख रांगोळी झाली?  हे आपण बघतच आहोत जे देश पूर्वी कधीही सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग नव्हते मात्र रशियाबरोबर सीमा शेखर करतात असे देश ४ देश म्हणजे  म्हणजे फिनलंड . उत्तर कोरिया   चीन आणि मंगोलिया यातील स्वीडन आणि  स्वीडन बरोबर सीमा शेअर करणारा (जी रशिया स्वीडन सीमेपासून किलोमीटरच्या भाषेत फारशी लांब नाही ) असा देश फिनलंड  फिनलंड हे देश नाटो बरोबर जाण्यास इच्छुक असल्याने येणारा काळ  कसोटीचा असणार असल्याचे स्पष्ट होत  आहे             जगात दोन मोठे गुंड आहेत रश...

श्रीलंकेमागचे शुक्लकाष्ट संपेचिचेना

इमेज
घर  फिरले की घराचे वासे देखील फिरतात अशी आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे एकदा संकटाची मालिका सुरु झाल्यावर रोज नवनवीन संकटे येतच राहतात हा त्या म्हणीचा अर्थ  आपल्या शेजारील श्रीलंका हा त्याच्या अनुभव घेतोय आर्थिक संकटातून आलेल्या नैराश्यातू सुरु झालेले राजनैतिक संकट दिवसोंदिवस  अधिक गंभीर होत चालले आहे या राजनॆतिक संकटामुळे ज्या कारणामुळे ही आर्थिक विपन्नतेमुळे ही संकटाची मालिका सुरु झाली त्याकडे सर्वांचेच काहीसे दुर्लक्ष होत आहे  आंतराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेत सुरु असलेल्या आर्थिक अडचणीवर तोडगा काढण्यासाठी श्रीलंकेत राजनीतिक शांतता असणे आवश्यक असल्याचे नमूद करून सुद्धा श्रीलंकेतील राजनैतिक संकट दिवसोंदिवस अधिक गहिरे होत आहे   मे महिन्याच्या पहिल्या  आठवड्यात आर्थिक संकटामुळे निरास झालेल्या जनतेने मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन केल्यावर तेथील राष्ट्रपतीने आपल्या मोठ्या भावाचा पंतप्रधान असलेल्या महिंद्रा राजपक्षे यांच्या राजीनामा घेतला त्यानंतर झालेल्या राजकीय पोकळीस भरून काढण्यासाठी राजपक्षे यांचे राजकीय विरोधक समजल्या जाणाऱ्या ७३ वर्षीय रनीला...

खगोलशास्त्राची संशोधनाची दिशा बदलणारा शोध

इमेज
            १२ मे २०२२ हा दिवस खगोल शास्त्राच्या इतिहासात सुवर्णक्षणांनीं लिहला जाईल गेल्या कित्येक  वर्षांपासून खगोल शास्त्रज्ञांना खुणावत असणाऱ्या आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या कृष्णविवराच्या फोटो शास्त्रज्ञांना मिळाला असल्याचे यावेळी जगभरात विविध पत्रकार परिषदेमार्फत एकाचवेळी जाहीर करण्यात आले आणि समस्त खगोलप्रेमींमध्ये एक नवचैत्यन संचारले .आतापर्यंतच्या विज्ञानाचा इतिहासात कृष्ण विवराच्या फोटो घेण्याची ही दुसरीच वेळ होती या आधी एम ८७ या दीर्घिकेत असणाऱ्या कृष्णविवराचे छायाचित्र टिपण्यात मानवाला यश मिळाले होते . १८ व्या शतकात धूमकेतू शोधण्याची जगभरात मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु होती . अनेक  खगोलप्रेमी या काळात  आपापली दुर्बीण घेऊन आकाशाचा वेध घेत होती . त्यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे चार्ल्स मेसिंजर होय त्यांनी आणि त्यांच्या शिष्याने मिळून आकाश्यात एकूण ११० खगोलीय घटक शोधले ज्यात अनेक तारकासमूह , उपग्रह , आणि अन्य खगोलीय वस्तूंचा समावेश होतो चार्ल्स  मेसिंजर  यांच्या समांमनार्थ या खगोलीय घटकांना एम १ . एम २५ , एम ४९ अशी न...