पोस्ट्स

जगाचे उद्याचे आशास्थान भारत

इमेज
   सध्या आपल्या भारतात लष्करात अल्पमुदतीची सेवा   देण्यासाठी,   केंद्र सरकारने आणलेल्या योजनेमुळे देशात वादंग उमटले असता, ना नवी दिल्लीत भारताच्या परराष्ट्र धोरणाला नव्याने आकार देण्याच्या घडामोडीना   प्रचंड वेग आला आहे . या वर्षाच्या आरंभापासून सुरु असलेली आपल्या भारताला भेट देण्याची परदेशातील   विविध नेत्यांची मालिका वर्षाचा सहावा महिना सुरु झाला तरी चालूच आहे .          भारताने दक्षिण पूर्व आशियाई देशाची संघटना असलेल्या आसियान आणि भारत यांच्यात परस्पर संबंध प्रस्थापित होण्याचा घटनेला    30 वर्ष पूर्ण झाल्याच्या   स्मरणार्थ १६ आणि १७ जून रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते    ब्रुनेई , इंडोनेशिया मानयमार सिंगापूर कंबोडिया मलेशिया लाओस , थायलंड   व्हिएतनाम , फिलिपाइन्स या देशांची प्रादेशिक संघटना म्हणजे आसियान   या बैठकीसाठी या देशाचे परराष्ट्र मंत्री आणि महासचिव १६ आणि १७ जून रोजी नवी...

या खऱ्या प्रश्नांना कधी कोणत्या तयारीने सामोरे जणार ?

इमेज
सध्या आपल्या भारतात ज्याचा रोजच्या जगण्यात फारच कमी संबंध असणाऱ्या  किंबहुना रोज जगताना काहीच संबंध येत नसलेल्या मुद्यांना काहीसे अधिक महत्व देण्यात येत असल्याचे  सर्वसाधारण समाजात काय बोलले जाते याचा कानोसा घेतल्यास सहजतेने लक्षत येते या गौण महत्त्वाच्या मुद्यांमध्ये एका महत्तवाच्या मुद्याकडे आपले मोठ्या प्रमाणत दुर्लक्ष होत असल्याचे आपणस सहजतेने दिसते तो मुद्दा म्हणजे हवामान बदल होय  आज  जून महिन्यात जगातील एक फार मोठा भूभाग हवामान बदलामुळे चिंतेत आहे ज्यामध्ये चीनपासून मध्यपूर्व आखाती देश . पश्चिम युरोपीय राष्ट्रे आणि बलाढ्य अश्या अमेरिका देशाचा पश्चिमेकडील पॅसिफिक किनाऱ्याचा भाग तसेच दक्षिण पूर्वेकडील भाग अशा जगभरातील सर्व ठिकाणच्या समावेश होत आहे आपल्याकडे कोणते मुद्दे चर्चेत आहेत आपल्या प्राधान्यक्रमात हवामानबद्दल हा मुद्दा किती खालच्या क्रमांकावर आहे हे काही नव्याने सांगायला नकोच असो     चीनमार्फत हवामानबदलाचे संकट ओळखून करावयाच्या उपायांची माहिती देण्यासाठी तेथील सरकारतर्फे हवामान बदल कृती पहिले पंधरा दिवस आरखडा २०३५ प्...

तरुणाईचे भविष्य नासवणारा निर्णय

इमेज
      राज्यातील तरुणाईचे भविष्य नासवणारा निर्णय बुधवार १५ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला . महाराष्ट्र लोकसेवा अयोगकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची संख्या वयोमर्यादा संपेपर्यंत  अमर्याद करावयाचा निर्ययाचे या शिवाय अन्य दुसऱ्या शब्दात वर्णन करता येणे अशक्यच . मुळात आधीच अवास्तव असलेली वयोमर्यादा (खुल्या गटासाठी ३८ वर्षे तर विविध प्रकारची आरक्षण असल्यास त्या पेक्षा अधिक )  कमी करण्याची गरज असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात या निर्णयामुळे भविष्यात आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्यास आश्चर्य वाटायला नको आतापर्यंत एकाच स्वप्नील लोणकर महारष्ट्राने बघितला आहे मात्र या निर्णयाने भविष्यात असे कितीतरी स्वप्नील निर्माण होण्याचा धोका या निर्ययाने उत्पन्न केला आहे  .  मुळात अत्यंत कमी जागेसाठी निघणारी भरती, मात्र  परीक्षेसाठी प्रविष्ठ होणारी अमर्याद संख्या यांचा एकत्रित परिपाक म्हणजे अत्यंत मरणाची गळेकापू स्पर्धा असे राज्यसेवेच्या परीक्षेचे स्वरूप आहे त...

देवाने दिलेल्या संधीचा किती फायदा उचलणार आपण ?

इमेज
         आपल्या जगात अधिकृतपणे २१० देश आहे त्यापैकी एक म्हणजे आपला भारत हा देश आहे जगातील सर्व धर्मियांच्या देवांचा विचार करता सर्व देवांचा या २१० देशांमध्ये अत्यंत आवडता देश आपला भारत देश असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आपण मात्र या सुसंधीचा वापर करत स्वरक्षणार्थ काही करण्याऐवजी, सर्वकाही  देवाच्या भरोवश्यावर  सोडले असल्याचे चित्र आपल्या भारताच्या हवामान बदलाच्या संकटाच्या बाबतीत  कृती कार्यक्रम बघून वाटते आहे        आजमितीस जून२०२२ मध्ये चिली या देशात दुष्काळ पडून जवळपास १३ वर्षे झाली आहेत . सलग १३ वर्षे दुष्काळ पडल्याने येथील जंगलातील पाणवठे पूर्णतः सुकल्यात जमा आहे तेथील जंगलात फिरल्यास जागोजागी विविध मृत जनावरांचे अस्थिपंजर पडल्याचे दिसून येत आहे पाणवठे सुकल्यामुळे त्यावर अवलुबुन असणारे बोटिंग स्विमिंग या सारखे व्यवसाय पूर्णतः ठप्प पडले आहेत त्यावर पोट भरणारी जनता पूर्णतः बेरोजगार झाली आहे दक्षिण आणि उत्तर अमेरिकेचा एकत्रित विचार करता या खंडाच्या नैऋत्य दिशेला (दक्षिण पश्चिम ) पाऊस नसल्याने जनता त्रासलेली असताना याच ...

आपण शहाणे कधी होणार ?

इमेज
      आपण शहाणे कधी   होणार ? असा प्रश्न उपस्थित व्हावा असे आपल्या भारतीयांचे वागणे असल्याचे भारतीयांच्या हवामानबदलाविषयीच्या वर्तणुकीतून वारंवार दिसून येत आहे जगभरात सध्या बदलत्या हवामानने लोक खूप त्रस्त आहेत पूर्वी बगदाद शहराला फारच कमी धुळीची होती ज्यामध्ये आज पूर्णतः १८० अंशाचा बदल झाला आहे    इराकची राजधानी असेलल्या बगदादमध्ये धुळीची वादळे हि सध्याची नित्याची बाब झाली आहे एखाद्या दिवशी जर कमी धुळीची वादळे झाली तर काहीतरी गंभीर अपराध आपल्याकडून झाल्याने आज शहरात धुळीची कमी तर झाली ना ? असा प्रश्न नागररिकांना पडावा अशी तेथील परिस्थिती आहे ?बदलते जगातील हवामान आणि परिसरात वृक्षतोड मोठ्या प्रमाणत झाल्याने अशी स्थिती उदभवल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे या धुळीच्या वादळांमुळे तिथे श्वसनचे विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत       युरोपमध्ये उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गेल्या कित्येक वर्षातील तापमानाचे उच्चांक मोडीत निघत आहेत उन्हाळ्याच्या सुरवातीलाच भयावह वाटणारे तापमान असल्याने पुढे काय होणार या चिंते...

भारत पुन्हा एकदा जगाची आशा

इमेज
         भारताने स्वतंत्र झाल्यावर काही काळ जगाचे नेतृत्व केल्याचे दिसून येते  ज्यामध्ये भारतासारख्याच वसाहतवादाचा शिकार झालेल्या देशाचे महासत्तांच्या राजकारणात अजून नुकसान होऊ नये म्हणून उभारण्यात आलेल्या नामाची स्थापना करण्यात मोलाची भूमिका पार पडणे असो किंवा खेळाच्या माध्यमातून देशांसह एकमेकांशी संपर्क होऊन त्यांच्यातील वैरभावना कमी होऊ शकते या विचारातून आशिया खंडातील देशांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजनाची सुरवात करणे . जगभरात सुरु असलेल्या विविध हिंसक आंदोलनात शांतात प्रस्थापित व्हावी यासाठी संयुक्त राष्टसंघातर्फे पाठवण्यत येणाऱ्या शांतिसेनेत मोठे योगदान देणे या त्यातील काही ठळक बाबी म्हणता येतील कालांतराने हे योगदान कमी होत गेले मात्र मोदी सरकारच्या काळात पुन्हा एकदा जागतिक राजकारणात भारताचे स्थान बळकट करण्याविषयी कार्यक्रम सुरु करण्यात आला परराष्ट्र मंत्रालयाविषयी माध्यमात येणाऱ्या बातम्या बघितल्यास आपणस ही बाब सहजतेने लक्षात येते        तुर्की या देशाची राजधानी अंकारा येथे 10 जून 2022 रोजी भारत-तुर्की यान दोन देशाच्या परराष्ट्...

एका कप्यात बंद करण्यात आलेले साहित्यिक पु.ल.

इमेज
           जून महिन्याचे समान १० / १० दिवसाचे तीन भाग केले  तर जो दुसरा भाग होईल त्याचे पहिले  तीन दिवस अर्थात ११ जून , १२ जून आणि १३  जून मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे. ११ जून ही मोठ्या प्रमाणात  बालसाहित्य  तयार करणारे साहित्यिक साने गुरुजी  यांची पुण्यतिथी , १२ जून म्हणजे मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे यांची पुण्यतिथी तर १३ जून ही श्रेष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे यांची पुण्यतिथी .या तिन्ही साहित्यिकांची लेखनाची काही गुणवैशिष्टये होती साने गुरुजींच्या विषयी मी कालच लिहले होते आज मी बोलणार आहे पु . ल देशपांडे यांच्याविषयी .          सर्वप्रथम त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली पु.ल. म्हंटले की प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे साहित्यीक म्हणूनच ओळखले जातात. मात्र त्यांनी फक्त मराठीमध्ये विनोदी साहित्य निर्मितीच केली नाही, तर तीन व्याख्याने, गांधीजी आदी गंभीर लेखन सुद्धा केले आहे. ज्यात त्यांनी अनेक...