पोस्ट्स

स्मरण ऐतिहासिक समुद्र उडीचे

इमेज
                  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे   ऐकताच मन आदराने अणि आनंदाने   भरून न येणारा खचितच एखादा मराठी माणूस असावा .   सावरकरांचे संपूर्ण आयुष्यच धगधगते अग्निकुंड होते असे   म्हंटल्यास ठरू नये . त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी त्यांना युनाटेड किंग्डम या देशातून भारतात आणताना फ्रांसच्या किनाऱ्यावर मारलेली उडी . २०२२   या वर्षी या ऐतिहासिक उडीला ११२   पूर्ण होत आहेत . याच उडीमुळे त्यांच्यावर हेगच्या आंतराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला . एका भारतीय व्यक्तीचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी दोन युरोपीय राष्ट्र्रानी आंतराष्ट्रीय न्ययालयात दाद मागण्याचा जगातील हा बहुतेक एकमेव उदाहरण असावे .  मुक्ततेसाठी त्यांनी केलेला हा प्रयोग जरी दुर्दैवाने फसला असला तरी त्याचे मोल विसरता येण्यासारखे नाही   . जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर भारताला स्वातंत्र्य बऱ्याच आधी मिळाले अ...

अस्वस्थ भूकवच आणि आपण

इमेज
          सध्या आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना   आपल्या समस्त भारतीयांना काळजी वाटावी अशी घडामोड अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात घडत आहे . सध्या या घडामोडीचे स्वरूप काहीसे छोटे आहे मात्र या घडमोडणीने सुरवातीचे छोटे  स्वरूप सोडून मोठे स्वरूप धारण केल्यास आपल्या भारतासह बांगलादेश म्यानमार या क्षेत्रात मोठ्या प्रमणात प्राणहानी करण्याची याची ताकद आहे हे संकट आहे भूकंपाचे ६ जुलै या एकाच दिवसात २४ तासात या भागाला तब्बल २२ हो २२ भूकंपाचे धक्के बसले रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ८ शतांश ते ५ या दरम्यान होती या रिक्टर स्केलचे भूकंप छोटे आणि मध्यम स्वरूपाच्या दरम्यानचे समजले जातात भूकंपाची तीव्रता कमी आहे म्हणून या भूकंपाकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणारे नाही २४ तासात २२ म्हणजे जवळपास प्रत्येक तासाला एक भूकंप इतके हे स्वरूप भयानक आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणत हालचाली सुरु झाल्याचे ते निर्दशक आहे . या खेरीज आसाम राज्यात ७ जुलै रोजी अत्यंत छोटा म्हणजे २ पूर्णांक ५ शतांश रिक्टर स्केलचा भूकंप नो...

एसटीचे स्वागतार्ह्य निर्णय

इमेज
आपल्या महाराष्ट्रात राजकीय आखाडा रंगलेला असताना आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या आपल्या एसटीबाबत दोन सुखद घडामोडी घडल्या . एका गोष्टीची प्रत्यक्ष अंमलबाजवणी सुरु झाली तर दुसऱ्या गोष्टीबाबत निर्णय घेण्यात आला . या दोन्ही गोष्टींमुळे आपली महाराष्ट्राची एसटी भूतकाळातील कटू आठवणी विसरून नव्या काळाचे आव्हान स्वीकारण्यास सक्षम झल्याचे दिसून येत आहे एक गोष्ट समस्त महाराष्ट्रासाठी आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्राच्या एका विशिष्ट भागासाठी मर्यदित अशी योजना आहे पहिल्यांदा समस्त महाराष्ट्रासाठी असणारी योजना बघूया  तर  १ जूनपासून इलेट्रीक बसेसचे यशस्वी संचालन करत असलेल्या आपल्या एस्टीनेने अधिकच आधुनिक होण्यास सुरवात केली आहे सध्याच्या काळातील इ मनीचा वाढता वापर बघता आता एसटीचे तिकीट काढण्यासाठी फोन पे गूगल पेचा वापर आता करता येणार आहे त्यामुळे एसटी प्रवाश्यात रोख रक्कम बाळगण्याच्या त्रासातून प्रवाशाची सुटका होणार आहे . आपल्या एसटीचे ३५० हुन अधिक आगरे आहेत तसेच सुमारे १००० बसस्थानके आहेत छोटोमोठे थांब्याचा तर विचारच करायला नको . तसेच एसटीमध्ये हजारो कंडक्टर आहेत ज्यांचा मार्फत आपण ...

राजकीय साठेमारीत हरवलेले बुद्धिबळातील यश

इमेज
        गेल्या महिनाभरातील  भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक स्तरावर फार मोठे यश मिळवले मात्र त्याची यथोचित दखल राजकीय बातम्या देण्यात मग्न असलेल्या माध्यमांनी घेतली नाही . मराठीतील एक उकृष्ट चित्रपट झेंडा या चित्रपटात  ज्या प्रमाणे चित्रपटाच्या सुरवातीला कार्यालयाच्या प्रसंगात आर्थिक बातम्यांना राजकीय बातम्यांच्या तुलनेत कमी महत्व देण्यात येते याबाबत खंत व्यक्त करण्यात आली होती तोच काहीसा प्रकार या बुद्धिबळपटूनबाबत घडला मात्र "देर आये मगर दुरुस्त आये " , या म्हणीनुसार उशिरा का होईना त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन   बुद्धिबळ स्पर्धा या तीन प्रकारात खेळवण्यात येतात .पारंपरिक प्रकार म्हणजे क्लासिकल ,या प्रकारच्या खेळ हा तीन तास किंवा अधिक चालू शकतो जरी हा खेळ खूप वेळ सुरु असला किती वेळात किती चाली झाल्याचं पाहिजे याचे बंधन आहे जर हे बंधन पाळले न गेल्यास पटावरील स्थिती कितीही विजयासारखी असो खेळाडू डाव हरतो  हा प्रकार काहीसा संथ असल्याने खेळात रंगत आणण्यासाठी या पेक्षा जलद प्रकार खेवण्यात येतो या प्रकारात खेळ संपवण्यासाठी खेळाडूंवर २० ते २५ मिनिटाचे बं...

अमेरिकन स्वातंत्र्यदिन विशेष

इमेज
      अमेरिका जगातल्या बहुतेक सर्व समस्यांचे मूळ असणारा देश.  अफगाणिस्तानमधील अशांतता असो , दक्षिण अमेरिका खंडातील राजकीय अस्थिरता असो, इराकमधील दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटला वाढण्यासाठी पूरक होईल अश्या  वातावरणाची निर्मिती असो सध्याचे रशिया युक्रेनमधील युद्ध असो  या  आणि अश्या सारख्या घटनांचे मूळ शोधायला गेल्यास त्या सर्व घटना या अमेरिका या एकाच देशापाशी येऊन थांबतात , जगात बदलत्या हवामानाला साह्यभूत होणाऱ्या हरितवायूंचे उत्सर्जन कोणता देश अधिक करतो याचा आढावा   घेतल्यास आपणस एका देशाचे कार्बन उत्सर्जन उर्वरित जगातील कित्येक देशांच्या उत्सर्जनपेक्षा अधिक आढळते तो देश म्हणजे अमेरिका जगात त्या देशातील एकूण लोकसंख्येच्या पेक्षा अधिक शस्त्रात्रे असणारा देश म्हणजे अमेरिका . जगात एखाद्या  त्या देशावर आणि त्या देशाच्या नागरिकांवर असणाऱ्या कर्जाचा विचार करता देशाच्या जीडीपीच्या कितीतरी अधिक पट कर्ज असून देखील जो देश तेथील नागरिक अजून  कर्ज घेत आहे तो देश म्हणजे अमेरिका . ज्या देशात अधिकृतपणे नाही तर किमान चोरट्या मार्गाने प्रवेश मि...

वंदन भारताची नवी ओळख जगाला करणाऱ्या संन्यास्याला

इमेज
  समस्त भारतीयांचे ज्यांचे नाव जरी ऐकले अंग स्फुरले जाते , असे व्यक्तीमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद येत्या 4 जूलै रोजी त्यांची 120   वी पुण्यतिथी . त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली  स्वामी विवेकानंद यांचे   भारतीयांसाठी खुप मोठे योगदान आहे .    मित्रांनो , स्वामी विवेकानंद यांचा कार्यकाळात ब्रिटिशांचे शासन होते . त्यामुळे खेत्रीच्या संस्थानिकांंसारख्या अनेकांचा भारतीय तत्वज्ञानावरील विश्वास उडाला होता . भारतीय तत्वज्ञान हे पुर्णतः टाकाउ आहे . जर तूम्हाला जगात चांगले जगायचे असेल तर आपणास पाश्चात्य तत्वज्ञान अंगिकारणे , आवश्यक आहे असा अनेकांचा समज होता . त्यांना भारतीय तत्वज्ञानाचा मोठेपणा स्वामी विवेकानंद यांनी सोदारक्षण पटवून दिला . पाश्चात्य कार्यसंस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान यांंचा सेतू स्वामी विवेकानंद यांना अपेक्षीत होता , त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले .       स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्वज्ञानाचा पुरस्कार केला असला , तरी त...