पोस्ट्स

पाकिस्तानमधील राजकारण कोणत्या वळणावर

इमेज
     सध्या   पाकिस्तानमधील राजकारण एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे . केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असंणाऱ्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान  तेहरीके इन्साफ विरुद्ध सत्ताधिकारी पक्ष सर्व शक्ती एकवटून उभा राहिला आहे . या लढाईत पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाने स्वतःसाठी निधी गोळा करताना देशहिताला तिलांजली देत निधी गोळा करण्याप्रकरणी सुरु असलेल्या आठ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका याचिकेचा निकाल देताना  पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पाकिस्तानी तेहरीके इन्साफ या पक्षविरोधात दिलेल्या निर्णयामुळे त्यांना अधिकच बळ मिळाले आहे पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पक्षसासाठी निधी गोळा करताना देशहिताला तिलांजली दिली नाही मात्र पक्षासाठी निधी गोळा करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता राखली गेली पक्षाच्या बँक खात्याचे व्यवहारात संशय घेण्यास वाव आहे तरी या बाबत पक्षाने खुलासा करावा असे निर्देश पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला  दिले आहेत . सत्ताधिकारी पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मुव्हमेंट या १७ पक्ष्याच्या आघाडीमार्फत इम्रान खान यांनी आणि त्यांच...

वंदन त्यांच्या हौतात्म्यला !

इमेज
आपल्या भारतात स्वातंत्र्यपुर्व काळातच नव्हे स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा अनेकांनी आपल्या   प्राणाचे मोल देऊन हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला , भारताचे माजी    लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य हे अश्याच काही आदरणीय व्यक्तीपैकी . एक . आपल्या भारतातून पंजाब हे राज्य स्वतंत्र देश होण्यापासून त्यांनी वाचवले . माझी जमतारीख १० ऑगस्टही त्यांची हौताम्यची तारीख . अश्या महत्त्वाच्या दिवशीमाझा जन्म झाल्याबद्दलमी देवाचे कायमच कृतज्ञ राहील .            जनरल अरुणकुमारवैद्य यांचे योगदान प्रामुख्याने ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहमीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे करण्यात येत असले तरी त्यांचे भारतासाठीचे योगदान या पेक्षा फार मोठे होते त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी दोलताबाद आणि परभणी क्षेत्रात निझामाच्या जुलमी रझाकराना गुढघे टेकायला भागपडले . अरुणकुमार वैद्यांच्या लष्करी कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९६५   ...

भारताचे बदलते परराष्ट्र धोरण

इमेज
मालदीव , आपल्या भारताच्या नैऋत्य दिशेला असणारे शेजारचे राष्ट्र . जागतिक राजकारणाचा विचार करता , अत्यंत महत्त्वाचा ठिकाणी वसलेले विविध बेटांच्या स्वरुपातील राष्ट्र असणारे मालदिव आपल्या न्यूजमध्ये फारसे नसतेच . भारताचा महत्तवाचा सहभाग असलेल्या सार्क आणि बिमस्टेक मधील भारताचा अत्यंत विश्वासू साथीदार ज्याने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील काश्मीरविषय रडारडीला स्वतः इस्लामाधारीत राष्ट्र असून देखील नेहमीच विरोध केला आहे . तो देश म्हणजे मालदिव . तर अस्या मालदिवचे राष्टपती इब्राहिम मोहम्मद सोलिह आँगस्टच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत .      या दौऱ्यावर दरम्यान मालदिव आणि भारताचे दळणवळाच्या पायाभुत सोईसुविधांची निर्मिती , सायबर सिक्युरिटी , पारंपरिक शस्त्रसज्जता , व्यापार आणि सांस्कृतिक सबंध   विविध सहा बाबींवर करार करण्यात आले . या अंतर्गत भारत मालदिवची राजधानी माले , राजधानी शेजारच्या बेटांशी जोडण्यासाठी एकुण साडेसहा किलोमीटरचा पुल बांध...

भारताच्या आसपासचे आर्थिक अरिष्टय

इमेज
         आपल्या भारताभोवती असणाऱ्या  नउ देशांपैकी पाच देशांची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. सभोवतालच्या देशांची गंभीर आर्थिक स्थिती भारतासाठी सुद्धा फारसी सुखावणारी नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका हे ते देश. यातील श्रीलंकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अत्यंत अवघड जवळपास अशक्यप्राय स्थितीत पोहोचल्याचे आपणास माहिती आहेच. तेथील माजी पंतप्रधान आणि विद्यमान राष्टपती रणिला विक्रमसिघे यांनी पंतप्रधान पदावर कार्यरत असताना तेथील संसदेत श्रीलंका दिवाळखोर झाल्याचे जाहिर सुद्धा केले होते.त्यामुळे श्रीलंका आणि अफगाणिस्तान मधील आर्थिक स्थिती चिंताजनक असली तरी पाकिस्तानने अनधिकृत ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमुळे त्यांचा आर्थिक विपन्नतेचा भारतावर काहीसा कमी परीणाम होइल म्हणून अफगाणिस्तानचा देखील अपवाद केला तरी पाकिस्तान नेपाळ बांगलादेश मधील आर्थिक आरीष्ठ भारतापुढे मोठी डोकेदुखी ठरु शकते.         पाकिस्तान नेपाळ, बांगलादेश हे देश परकीय चलनाचा कमी साठ्याचा समस्येशी झूंजत आहेत. देशातील परकीय चलनाचा साठा कमी होवू नये, म्हणून नेपाळने आ...

6वर्षापुर्वीची ती काळरात्र

इमेज
             पावसाचे दिवस होते ते .  पावसाची अगदी मुसळधार बॅटिंग चालू होती . त्यामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आले होते . कोकणांत तर पाऊस आपले सर्वस्व ओतल्यासारखा पाऊस कोसळत होता . मात्र चाकरमाने याही पावसात आपले नित्य व्यवहार करतच होते . रहाटगाडगी कोणाला चुकलीये . या नित्यव्यवहाराच्या रहाटगाड्यासाठी तळकोकणातून म्हणजेच  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून माणसे मुबईच्या दिशेने निघाले होते . काही कारणाने रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने ती माणसे आपल्या एसटी बसच्या माध्यमातून प्रवास करत होती मुंबई गोवा या म्हणायला राष्ट्रीय महामार्ग  मात्र ज्याची अवस्था एखाद्या ग्रामपंचायतीच्या रस्त्यासारखीच आहे अश्या रस्त्यावरून प्रवास करत होती . पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु असल्याने  समोरचे काही फारसे दिसत नव्हते जे थोडेफार दिसत होते त्यामध्ये सर्वत्र नुसते पाणी आणि पाणीच . गाडीने तळकोकण आणि उत्तर कोकण यांच्या सीमेपर्यंत प्रवास केला ही सीमा सावित्री नावाची नदी ठरवते समुद्राच्या दिशेने तोंड उभे करून राहिले तर उजव्या हाताला रायगड जिल्हा अर्थात...

पंडीत नेहरुंचे हे थोरपणच !

इमेज
    आपल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मु यांनी नुकतीच शपथ घेतली. त्या आदिवासी (वनवासी) समाजाच्या आहेत. या समाजातून देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत. आतापर्यत आपल्या भारतात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजबांधवातून ,तसेच शीख धर्मियातून ,दलित समाजबांधवातून आणि अत्यल्प असणाऱ्या ख्रिचन समाजबांधवातून आलेल्या व्यक्तींनी राष्ट्रपती पद भुषवले आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही किती खोलवर रुजली आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. लोकशाही इतक्या खोलवर रूजवण्याचे काम करणाऱ्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहारलाल नेहरु आणि अन्य तत्कालीक नेत्यांचे आपण कायमच कृतज्ञ असू. दुसऱ्या महायुद्धानंतर पुढच्या तीन ते चार वर्षांत जगभरात सुमारे 90 देश वसाहतवादाच्या रोखडातून मुक्त झाले.या स्वातंत्र्य झालेल्या देशांनी लोकशाहीची विविध रूपे स्विकारली. आज सुमारे 75 वर्षानंतर या देशातील लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे? आणि भारतातील लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे? याचा विचार करता आपणास स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्या पंडीत नेहरु यांच्या...