पोस्ट्स

मानवाची उलटी गणना सुरु

इमेज
        मानवाची उलटी गणना तर  सुरु झाली नाहीना ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घटना सध्या पृथ्वीवर घडत आहेत .युरोप खंडाच्या सुमारे ६३% भूभागावर येत्या नजीकच्या काळात मोठा दुष्काळ पडण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे . आज हा मजकूर लिहीत असताना (ऑगस्ट २०२२) सुमारे ६० % भूभागावर आताच कमी पाऊस झाला आहे . ड्रोन आणि विमानांनी टिपलेल्या छायाचित्रात युरोपातील अनेक महत्त्वाच्या नद्या मोठ्या प्रमाणत आटलेल्या दिसत आहे . युरोप खंडातील अनेक देशात गेल्या कित्येक दशकातील  सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे युरोप खंड तसा थंड तापमानाचा प्रदेश ओळखला जातो जिथले उन्हाळ्यातील सर्वसाधारण कमाल तापमान २२ ते २८ अंश सेल्सियस दरम्यान असते मात्र या वर्षी स्पेन युनाटेड किंग्डम फ्रांस स्पेन  या देशात ४० अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहेत . या वाढत्या तापमानमुळे फ्रांस या देशात मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहे ज्यामुळे वातवरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्सिएड हा वायू सोडला जात आहे ज्यामुळे तापमान वाढण्यास हातभरातच लागत आहे   युरोपातील ...

पाकिस्तानातील राजकारणाचे बदलते रंग

इमेज
         सध्या पाकिस्तानात राजकारण एका वेगळ्याच स्थितीवर पोहोचले आहे पाकिस्तानच्या स्वतंत्रदिनाच्या एक दिवस आधी अर्थात १३ ऑगस्ट रोजी पाकिस्तनचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या प्रमुख विरोधी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांनी एका दिवसाच्या आंदोलनांची हाक गेल्या आठवड्यात दिली  त्यावरून पाकिस्तानच्या सत्ताधिकाऱ्यांकडून विविध आरोप केले जात असताना ९ ऑगस्टरोजी  इम्रान खान यांचे सचिव आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे महत्त्वाचे नेते शाहबाझ गिल यांना  इस्लामाबाद पोलिसांनी मोठ्या नाट्यानंतर अटक केली . पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या एका नेत्याच्या ट्विटरमुळे जगाला ही बातमी समजली या  अटकेनंतर ते कुठे आहेत ? या बाबत विविध दावे करण्यात येत आहे .  शहाबाझ गिल यांची अटक करताना  नंबर प्लेट नसलेली गाडी त्यांच्या गाडीला आडवी आली . या गाडीतील लोकांनी तुम्ही आमच्या गाडीचा आरसा का फोडला ? अशी विचारणा करत त्यांना आणि त्यांच्या डायव्हरला मारण्यास सुरवात केली आणि त्यांना फरपटत नेत त्यांना स्वत...

भारतीय बुद्धिबळपटूची कौतुकास्पद कामगिरी

इमेज
        सध्या भारतीय क्रीडापटू शारीरिक असो किंवा  बौद्धिक दोन्ही ठिकाणी   आपले कसब दाखवत आहेत . इं ग्लंडच्या बर्निंगहॅम येथे सुरु असणाऱ्या राष्टकुल स्पर्धेत भारतीय खेलाडू चमकदार कामगिरी करत पदकाची लयलूट करत आहेच मात्र त्या बरोबरच तामिळनाडू राज्यातील मच्छलीपट्टणम येथे सुरु असलेल्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाड दम्यान भारताच्या सर्व सहाही संघाकडून अत्यंत चमकदार कामगिरी कऱण्यात येत आहे ज्यामुळे ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत ९ व्या फेरी अखेरीसच भारताच्या खुल्या गटातील तीन संघापैकीब  संघ आणि महिलांच्या तीन संघांपैकी ब   संघ सुवर्णपदक मिळवण्याच्या स्पर्धेत अत्यंत पुढे आहे          या स्पर्धेत नाशिकचे आयकॉन ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांच्यासह सर्वच खेळाडू चमकदार कामगिरी करत असल्याने  शनिवारअखेरपर्यंत झालेल्या  सहाही संघाचे प्रत्येकी ८  या प्रमाणे एकूण ४८  सामन्यांपैकी ६ सामन्यात हार स्वीकारत आणि   ६  बरोबरी मान्य करण्याचा अपवाद वगळता...

पाकिस्तानमधील राजकारण कोणत्या वळणावर

इमेज
     सध्या   पाकिस्तानमधील राजकारण एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे . केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असंणाऱ्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान  तेहरीके इन्साफ विरुद्ध सत्ताधिकारी पक्ष सर्व शक्ती एकवटून उभा राहिला आहे . या लढाईत पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाने स्वतःसाठी निधी गोळा करताना देशहिताला तिलांजली देत निधी गोळा करण्याप्रकरणी सुरु असलेल्या आठ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका याचिकेचा निकाल देताना  पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पाकिस्तानी तेहरीके इन्साफ या पक्षविरोधात दिलेल्या निर्णयामुळे त्यांना अधिकच बळ मिळाले आहे पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पक्षसासाठी निधी गोळा करताना देशहिताला तिलांजली दिली नाही मात्र पक्षासाठी निधी गोळा करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता राखली गेली पक्षाच्या बँक खात्याचे व्यवहारात संशय घेण्यास वाव आहे तरी या बाबत पक्षाने खुलासा करावा असे निर्देश पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला  दिले आहेत . सत्ताधिकारी पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मुव्हमेंट या १७ पक्ष्याच्या आघाडीमार्फत इम्रान खान यांनी आणि त्यांच...

वंदन त्यांच्या हौतात्म्यला !

इमेज
आपल्या भारतात स्वातंत्र्यपुर्व काळातच नव्हे स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा अनेकांनी आपल्या   प्राणाचे मोल देऊन हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला , भारताचे माजी    लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य हे अश्याच काही आदरणीय व्यक्तीपैकी . एक . आपल्या भारतातून पंजाब हे राज्य स्वतंत्र देश होण्यापासून त्यांनी वाचवले . माझी जमतारीख १० ऑगस्टही त्यांची हौताम्यची तारीख . अश्या महत्त्वाच्या दिवशीमाझा जन्म झाल्याबद्दलमी देवाचे कायमच कृतज्ञ राहील .            जनरल अरुणकुमारवैद्य यांचे योगदान प्रामुख्याने ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहमीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे करण्यात येत असले तरी त्यांचे भारतासाठीचे योगदान या पेक्षा फार मोठे होते त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी दोलताबाद आणि परभणी क्षेत्रात निझामाच्या जुलमी रझाकराना गुढघे टेकायला भागपडले . अरुणकुमार वैद्यांच्या लष्करी कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९६५   ...

भारताचे बदलते परराष्ट्र धोरण

इमेज
मालदीव , आपल्या भारताच्या नैऋत्य दिशेला असणारे शेजारचे राष्ट्र . जागतिक राजकारणाचा विचार करता , अत्यंत महत्त्वाचा ठिकाणी वसलेले विविध बेटांच्या स्वरुपातील राष्ट्र असणारे मालदिव आपल्या न्यूजमध्ये फारसे नसतेच . भारताचा महत्तवाचा सहभाग असलेल्या सार्क आणि बिमस्टेक मधील भारताचा अत्यंत विश्वासू साथीदार ज्याने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील काश्मीरविषय रडारडीला स्वतः इस्लामाधारीत राष्ट्र असून देखील नेहमीच विरोध केला आहे . तो देश म्हणजे मालदिव . तर अस्या मालदिवचे राष्टपती इब्राहिम मोहम्मद सोलिह आँगस्टच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत .      या दौऱ्यावर दरम्यान मालदिव आणि भारताचे दळणवळाच्या पायाभुत सोईसुविधांची निर्मिती , सायबर सिक्युरिटी , पारंपरिक शस्त्रसज्जता , व्यापार आणि सांस्कृतिक सबंध   विविध सहा बाबींवर करार करण्यात आले . या अंतर्गत भारत मालदिवची राजधानी माले , राजधानी शेजारच्या बेटांशी जोडण्यासाठी एकुण साडेसहा किलोमीटरचा पुल बांध...