पोस्ट्स

८ नोव्हेंबर आहे खास !

इमेज
        मंगळवार ८ नोव्हेंबर विज्ञानप्रेमींसाठी अत्यंत खास असणार आहे . कारण या दिवशी दोन खगोलीय घटनांची  पर्वणी विज्ञान प्रेमींना मिळवणार आहे त्यातील चंदग्रहणाविषयी आपणास माहिती असेलच . दुसऱ्या एका घटनेविषयी फारच कमी बोलले जात आहे मात्र दुसरी घटना अत्यंत दुर्मिळ आहे . सुमारे ४० ते ४२ वर्षातून ही घटना एकदाच घडते .  मानवी आयुष्य १०० वर्षांचे मानल्यास हि घटना आयुष्यात दोनदाच दिसू शकते  या उलट ग्रहणाचा विचार करता सूर्य आणि चंद्र  ग्रहणाचा विचार करता वर्षभभरात एकत्रितपणे पाच  ते सहा  ग्रहणे जगभरात अनुभवायास येतात म्हणजेच आपण समजू शकतो ग्रहण सोडून होणारी दुसरी घटना किती दुर्मिळ आहे             तर ही दुर्मिळ घटना आहे युरेनस आणि चंद्र या ग्रहांची युती . यावेळी आपणास चंद्रबिंब युरेनस ग्रहावरून जात्ताना दिसेल ८ नोव्हेंबरला मध्यरात्री ११ वाजता ते ९ नोव्हेंबरला पहाटे २ पर्यंत हा चमत्कार बघण्याच्या सर्वोत्तम कालावधी आहे या तीन तासात जे  आपण जे अनुभववू ते खरोखरीच अदभूत असेल हे नक्की .  मात्र युरेनस ग्रह हा ...

जी २० म्हणजे काय रे भाऊ ?

इमेज
       १६ नोव्हेंबर नंतरचे पुढील एक वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी इंडोनेशिया येथील बाली शहरात जी २० या समूहाचे १७ वे अधिवेशन झाल्यावर जी २० चे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे .   जगतातील प्रमुख १९ देशांचा आणि युरोपीय युनियन समूह असणारा जी २० हा समूह जगातील एक प्रमुख आर्थिक गट आहे   या अश्या समूहाचे अध्यक्षपद भारताला मिळत असल्याने या समूहाविषयी एक जागरूक नागरिक म्हणून आपणस माहिती असणे आवश्यक आहे चला तर जाणून घेऊया जी २० या समुहा विषयी .        जी २० मध्ये सहभागी असणाऱ्या देशांच्या जीडीपीच्या विचार करता या सर्व देशांचा जीडीपी एकत्रितरित्या जगाच्या एकत्रित जीडीपीच्या ८८ % आहे जगाच्या एकूण व्यापाराच्या ७७ % व्यापार या समूहाच्या देशातील आहे   जगातील एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्या या देशात राहते तर जगाच्या एकूण जमिनीच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी जवळपास ...

६ नोव्हेंबरपासून इजिप्त मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?

इमेज
येत्या ६ नोव्हंबरपासून इजिप्तमधील शर्म अल-शेख, या शहरात हवामानबदलाविषयीची अत्यंत महत्त्वाच्या अश्या कॉप  परिषदेच्या २७ व्या  अधिवेशनाला सुरवात होईल .जे १८ नोव्हेंबर पर्यंत चालेल . हवामान बदलाविषयी जगात जे कार्यक्रम चालतात त्यामध्ये कॉप अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे जवळपास पहिल्या क्रमांकाचे महत्त्वाचे आहेत .संयुक्त राष्टसंघाने मागील वर्षी अर्थात २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार  येत्या भविष्यात हवामान बदलामुळे जगात सर्वात प्रभावित होणार देश आपला भारत आहे त्यामुळे या हवामान बदलाविषयी घडणाऱ्या या जागतिक परिषेदेची माहिती असणे आपल्या भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचे आहे  तर जगाला हवामानबदल हे जागतिक संकट असल्याची जाणीव होऊन या बाबत काहीतरी करायला हवे ही जाणीव सर्वप्रथम १९७२ साली झाली त्यावर्षी स्टॉकहोम या शहरात पहिली अर्थ समिट झाली . त्यानंतर पुढील २० वर्ष हवामानबदलाविषयी फारश्या घडामोडी घडल्या नाहीत पुढे १९९२ साली जगाला मानवी हस्तक्षेपामुळे पृथीच्या हवामानाची हानी होत असून ती सुधारणे हे मानवाचे कर्तव्य असल्याचे प्रकर्षाने जाणवले आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढ...

परंपरा विनाखंडीत चालू

इमेज
         पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानांच्या ते पदावरून मुक्त झाल्यावर काय झाले ? याचा आढावा घेतल्यास एकतर त्यांची हत्या झालेली दिसते किंवा त्यांना पाकिस्तान सोडून युनाटेड किंगडम अथवा आखाती देशात शरण घ्यावी लागल्याचा इतिहास आहे पाकिस्तानमधील कोणताच पंतप्रधान या चक्रातून सुटून पंतप्रधानाच्या पदावरून कार्यमुक्त झाल्यावर शांततेत निजधामाला गेलेला नाही . याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात  अविश्वासाच्या प्रस्तावाद्वारे पदावरून दूर करण्यात आलेले इम्रान खान सुद्धा या चक्रातून सुटलेले नाहीत  गुरुवारी त्यांच्या हकिकी आझादी या आंदोलादरम्यान इम्रान खान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने हि गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे  पाकिस्तानी पंजाबची राजधानी लाहोर पासून सुमारे दीड तासाच्या अंतरावर असेलेल्या पाकिस्तानी पंजाबच्या पूर्वेला असणाऱ्या वझीराबाद या शहरात अल्लावाला चौकातील पक्षाच्या तात्पुरत्या स्वरूपात स्थापन केलेल्या स्वागत कक्षाच्या जवळ इम्रान खान यांच्यावर हल्ला करण्यात आलेला असून त्यांना पायाला दुखापत झाली आहे . त्यानां उपचारासाठी लाहोर येथे हलवण्...

बुद्धिबळातील महासत्ता भारत

इमेज
               बुद्धिबळातील महासत्ता भारत आहे ,हे सिद्ध करणाऱ्या घटना सध्या  वारंवार प्रत्ययास येत आहे . नाशिकचे आयकॉन  ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या युरोपीय क्लबमध्ये चमकदार कामगिरी करत जागतिक क्रमवारीत १० क्रमकांची झेप घेत पुन्हा एकदा जगातील पहिल्या २५ खेळाडूंच्या क्रमवारीत स्थान मिळाल्यामुळे समस्त बुद्धिबळपटू आनंदात असताना , बुद्धिबळाची आंतराष्ट्रीय संघटना फेडरेशनइंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडे कडून जाहीर करण्यात आलेल्या जागतिक क्रमवारीमुळे दुग्धशर्करा योगाचीच प्रचितीच येत आहे .आजमितीस पुरुष खेळाडूंचा विचार करता जगातील पहिल्या ३५ खेळाडूंमध्ये ५ खेळाडू आहेत तर महिला खेळाडूंचा विचार करता पहिल्या ३५ खेळाडूंमध्ये ३ खेळाडूंचा समावेश आहे जर सांघिक कामगिरीचा विचार केला तर भारत पुरुषांचा आणि महिलांचा गटात  तिसऱ्या स्थानी आहे तर या वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांच्या एकत्रित सांघिक कामगिरीचा विचार करता सुद्धा भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे .अनेक भारतीय बुद्धिबळपटूंनी गेल्या काही महिन्य...

मोठ्या दूरगामी बदलाच्या दिशेने पाकिस्तान

इमेज
     मोठ्या दूरगामी बदलाच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल सुरु असल्याचे त्या देशातून येणाऱ्या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे .पाकिस्तानमधील स्थैर्याचा राजकीय घडामोडींचा दोन्ही देशातील संबंधावर मोठा परिणाम होत असल्याने आणि आपल्या भारताबरोबर पाकिस्तान मोठी सीमा शेअर करत असल्याने आपल्यासाठीही  त्या अत्यंत महत्वाच्या ठरतात      तर  अमेरिकेने फूस लावून पाकिस्तनात या वर्षी  (२०२२ ) एप्रिलमध्ये सत्तानंतरण केले  आहे त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही  तरी पाकिस्तानात नव्याने निवडणूका घेण्यात याव्यात अशी इम्रान खान यांची प्रमुख मागणी आहे  त्यासाठी  या वर्षाच्या (२०२२) एप्रिल महिन्यात झालेल्या सत्ततरणातरानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला मोठे यश मिळत आहे .याचा दाखल दिला आहे आपली मागणी पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे इम्रान खान त्यांचे आंदोलन कधी सुरु करतात ?  या विषयी पाकिस्तानात मोठ्या प्रमाणत उत्सुकता होती   त्यास सकारात्मक प्रतिसाद देत...