पोस्ट्स

४३ वर्षाचा चिरतरुण चित्रपट सिंहासन

इमेज
              १९७९ नोव्हेंबर १६ हि तारीख मराठी चित्रपटश्रुष्टीत सुवर्णक्षणांनीं नोंदवण्यात आली आहे कारण आज २०२२ साली सुद्धा राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य करणारा चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहासन या चित्रपटाचे प्रदर्शन झाल्याची ती तारीख आहे   या वर्षी या चित्रपटाला ४३ वर्ष पूर्ण होतील मात्र आजदेखील या चित्रपटाचे कथानक रटाळ कालबाह्य वाटत नाही . किंबहुना आज आपण बातम्यांमध्ये ज्या राजकारणाच्या बातम्या बघतो , त्याचे नाट्य रूपांतरण  वाटा वे इतका सजीवपणा या चित्रपटात जाणवतो ,           हा चित्रपट त्याच्या पहिल्या दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो   सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुबई ( त्यावेळचे   व्हिटोरीया टर्मिनस ) च्या परिसर त्याच्या पहिल्या दृश्यात दाखवला आहे जो सुरवातीला लॉंग   शॉर्ट   फोकस करतो नंतर चित्रटाच्या अनेक नायकांपैकी एका नायक असलेल्या दिगू चिट...

हत्तीने गाढवाला पूर्णतः लोळवले

इमेज
        ८ नोव्हेंबर २०२२ रोजी अमेरिकेत काँग्रेसच्या अर्थात तेथील संसदेच्या निवडणुका झाल्या . काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांसाठी झालेल्या या निवडणुकीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास हत्तीने  गाढवाला पूर्णतः लोळवले असेच करावे लागेल . आपल्या लोकसभासदृश्य असलेल्या  हाऊस ऑफ रिपेझँटिव्ह मध्ये  डेमोक्रेटिक पक्षाला बहुमत मिळणार नाही हे निवडणूकपूर्व मतदारकल चाचणीत यादीच स्पाष्ट झाले होते . मात्र आपल्या राज्यसभा समकक्ष असलेल्या सिनेटमध्ये डेमोक्रेटिक  पक्ष काही प्रमाणात बहुमत मिळवेल अशा अंदाज व्यक्त करण्यात येत आहोत मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात रिपब्लिकन पक्षाला दोन्ही सभागृहात बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले हा लेख लिहण्यापर्यंत ४३५ जागांसासाठी झालेल्या हाऊस ऑफ रिपेन्झटिव्हच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १९८ जागा मिळाल्या आहेत . तर  डेमोक्रेटिक पक्षाला १७६ जागा मिळाल्या असून रिपब्लिकन पक्षाला सभागृहात बहुमत मिळण्यसासाठी फक्त २० जागांची गरज आहे तर सिनेट या आपल्या राज्यसभागृह समकक्ष असलेल्या सभागृहात ४८ जागा रिपब्लिकन पक्...

भारत आणि आग्नेय आशियातील संबंधाची नवी पहाट

इमेज
               भारताच्या ईशान्य भारतातील राज्याकडून नकाश्यात  पूर्वेकडे नजर फिरवायला सुरवात केल्यावर आपणास ऑस्टेलियायापर्यंत १० वेगवेगळे देश दिसतात भारतीय संस्कृती आणि चिनी संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या या देशाच्या भूभागाला इंडोचायना असे एकत्रित रित्या संबोधले जाते . सध्या जगाचा राजकारणाचा बिंदू ज्या इंडो पॅसिफिक भागात स्थिर झाला आहे  त्या भूभागातील बराच मोठा भूभाग या देशांनी व्यापला आहे . त्या देशांनी विविध कारणांनी स्थापन केलेल्या अशियन संघटनेचा भारत हा प्रमुख निरीक्षक देश आहे  भारताचे परसदार म्हणून ओळखले जाणाऱ्या या देशांशी भारताचे पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहेत . तिथे अनेक हिंदू देवतांची मंदिरे आहेत भारत देखील हे संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी नेहमीच या देशांशी विविध प्रकारे राजनैतिक संबंध ठेवत आला आहे  .                   याच मालिकेचा भाग म्हणून ११ ते १३ नोव्हेंबर या तीन दिवसात भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनखरं  अशियन -भारत Commemorative परिषद आणि 17 व्या  पू...

पाकिस्तान पुन्हा एकदा अस्थिरतेचा गर्तेत

इमेज
          पाकिस्तान अस्थिरतेचा गर्तेत सापडल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांनी स्पष्ट होत आहे .  3 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानचा प्रमुख विरोधी पक्ष "पाकिस्तान तेहरीके इन्साफ " चे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर त्यांनी सुरु केलेल्या हकीकी आझादी या महामोर्च्यादरम्यान वझीराबाद या शहारत प्राणघातक हल्ला झाला . या हल्ल्यासासाठी इम्रान खान यांनी पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाबाझ शरीफ , गृहमंत्री राणा सलाउल्ला ,आणि पाकिस्तानची गुपचर संस्था आय एस आय चे प्रमुख जवाबदार आहेत अशा आरोप केला .या हल्ल्याच्या तपास पोलिसांनी करावा या हेतूने इम्रान खान यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांती एफ आर आय मध्ये पाकिस्तानी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची नवे समाविष्ट करण्यासाठी हरकत घेतली त्यामुळे हल्ला होऊन  ७२ तास उलटले तरी पोलिसांनी तकार दाखल करून घेतलेली नाही या दरम्यान हल्ल्यातून सावरत ८ नोव्हेंबरपासून त्यांचा महामोर्चा हल्ला झाला त्या ठिकाणावरून पुन्हा सुरु करत पुढील १० ते १२ दिवसात पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्...

८ नोव्हेंबर आहे खास !

इमेज
        मंगळवार ८ नोव्हेंबर विज्ञानप्रेमींसाठी अत्यंत खास असणार आहे . कारण या दिवशी दोन खगोलीय घटनांची  पर्वणी विज्ञान प्रेमींना मिळवणार आहे त्यातील चंदग्रहणाविषयी आपणास माहिती असेलच . दुसऱ्या एका घटनेविषयी फारच कमी बोलले जात आहे मात्र दुसरी घटना अत्यंत दुर्मिळ आहे . सुमारे ४० ते ४२ वर्षातून ही घटना एकदाच घडते .  मानवी आयुष्य १०० वर्षांचे मानल्यास हि घटना आयुष्यात दोनदाच दिसू शकते  या उलट ग्रहणाचा विचार करता सूर्य आणि चंद्र  ग्रहणाचा विचार करता वर्षभभरात एकत्रितपणे पाच  ते सहा  ग्रहणे जगभरात अनुभवायास येतात म्हणजेच आपण समजू शकतो ग्रहण सोडून होणारी दुसरी घटना किती दुर्मिळ आहे             तर ही दुर्मिळ घटना आहे युरेनस आणि चंद्र या ग्रहांची युती . यावेळी आपणास चंद्रबिंब युरेनस ग्रहावरून जात्ताना दिसेल ८ नोव्हेंबरला मध्यरात्री ११ वाजता ते ९ नोव्हेंबरला पहाटे २ पर्यंत हा चमत्कार बघण्याच्या सर्वोत्तम कालावधी आहे या तीन तासात जे  आपण जे अनुभववू ते खरोखरीच अदभूत असेल हे नक्की .  मात्र युरेनस ग्रह हा ...

जी २० म्हणजे काय रे भाऊ ?

इमेज
       १६ नोव्हेंबर नंतरचे पुढील एक वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी इंडोनेशिया येथील बाली शहरात जी २० या समूहाचे १७ वे अधिवेशन झाल्यावर जी २० चे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे .   जगतातील प्रमुख १९ देशांचा आणि युरोपीय युनियन समूह असणारा जी २० हा समूह जगातील एक प्रमुख आर्थिक गट आहे   या अश्या समूहाचे अध्यक्षपद भारताला मिळत असल्याने या समूहाविषयी एक जागरूक नागरिक म्हणून आपणस माहिती असणे आवश्यक आहे चला तर जाणून घेऊया जी २० या समुहा विषयी .        जी २० मध्ये सहभागी असणाऱ्या देशांच्या जीडीपीच्या विचार करता या सर्व देशांचा जीडीपी एकत्रितरित्या जगाच्या एकत्रित जीडीपीच्या ८८ % आहे जगाच्या एकूण व्यापाराच्या ७७ % व्यापार या समूहाच्या देशातील आहे   जगातील एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्या या देशात राहते तर जगाच्या एकूण जमिनीच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी जवळपास ...