पोस्ट्स

वर्षाची अखेर भारतीय बुद्धिबळप्रेमींसाठी सुखद होणार ?

इमेज
   या २०२२ वर्षाची अखेर भारतीय बुद्धिबळप्रेमींसाठी सुखद होण्याची दाट शक्यता आहे . कारण २६ डिसेंबरपासून काझकिस्तानच्या आलमाटी या शहरात रंगणाऱ्या बुद्धिबळाच्या जलद (रॅपिड ) या  प्रकारच्या खेळातील  बुद्धिबळाचा  विश्वविजेता ठरवण्यासाठी होणारी स्पर्धा तसेच २९ आणि ३० डिसेंबरपासून अति जलद ( ब्लिट्झ ) या  प्रकारच्या खेळातील  बुद्धिबळाचा  विश्वविजेता ठरवण्यासाठी होणारी स्पर्धा . बुद्धिबळ क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते महिला आणि पुरुष या वर्गात होणाऱ्या या स्पार्धांमध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना विजयश्री मिळण्याची खूप मोठी संधी आहे जर हि शाक्यता वास्तवात उतरली तर भारतीय बुद्धिबळप्रेमींची वर्षअखेर गोड होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे या आधी ग्रँडमास्टर विश्वनाथन आंनद यांनी २०१७ या वर्षी खुल्या गटात जलद बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद आपल्या खिश्यात घातले होते तर ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांनी२०१९  या वर्षी महिला गटात या वर्षी जलद बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान जलद प्रकारात विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती.     स्प...

पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता नाट्यमय स्थितीत !

इमेज
     नुकत्याच कतार देशात झालेल्या फ़ुटबाँल विश्वचषकाच्या अंतिम साम्यानात आपण अत्यंत चुरस अनुभवली . शेवटच्या क्षणपर्यंत विश्वचषकाचा मानकरी कोण होणार ?याबाबत प्रचंड उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागलेली होती हा  जसा  अखेरीस नाट्यमय स्थितीत पोहोचला होता अगदी तशीच नाट्यमयता  पाकिस्तानात सध्या नागरिक अनुभवीत आहेत फरक एव्हढाच कि हि नाट्यमयता कोणत्या खेळातील नाही तर तर राजकारणाची आहे आता पाकिस्तानी राजकारणी लोकांनी त्यांच्या राजकारणापायी पाकिस्तानी पंजाबच्या सत्ताकारणाचा खेळच करून ठेवला असल्याने पाकिस्तानी नागरिकांना दोनदा खेळाचा आनंद लुटता येत आहे  आपल्या भारतात जसे संसदेच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो ज्यास उत्तर प्रदेशात बहुमत मिळते त्याच पक्षाचा  संसदेत पंतप्रधान होतो ( देवेगोडा सारखे सम्मानिय अपवाद वगळून ) हा आतापर्यंतचा आपला इतिहास आहे पाकिस्तानच्या राजकारणात हा मान त्यांच्या पंजाबला आहे पाकिस्तानी राजकारणात ज्याच्या हाती पंजाबची सत्ता तो पक्ष अत्यंत प्रबळ मानला जातो .सध्या याचा पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत मोठे नाट्य बघायला मिळत आहे १७ डिसें...

भारत बांगलादेश मैत्री अतूट !

इमेज
बांगलादेश एकेकाळी संपूर्ण पाकिस्तानची अर्थव्यवस्था चालवणारा भूभाग . १९६५ साली प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार संपूर्ण पाकिस्तानच्या जीडीपीत ६५ % हुन थोडेसे अधिकचे योगदान हे त्यावेळच्या   पूर्व पाकिस्तानचे ( पूर्व पाकिस्तानला आज आपण बांगलादेश म्हणून ओळखतो )    होते त्यावेळी पाकिस्तानला मिळणाऱ्या परकीय चलनाचा विचार करता त्यातील खूप मोठा मोठा म्हणजे ६५ ते ७० % वाटा हा त्यावेळचा पूर्व पाकिस्तानमधून    करण्यात येणाऱ्या निर्यातीचा असे पाकिस्तानची सध्याची राजधानी इस्लमबाद ची उभारणी करण्यासाठी केलेल्या खर्चातील खूप मोठा वाटा हा त्यावेळच्या पूर्व पाकिस्तान ( आताच बांगलादेश ) मधून मिळालेल्या करांतुन मिळालेल्या उत्तापाचा होता    मात्र सत्तेतील वाटा जवळपास नगण्यच . देशातील आर्थिक विकासात मोठा वाटा उचलून देखील पश्चिम पाकिस्तान ( आताच पाकिस्तान ) ची वसाहत असल्या सारखी वागणूक मिळत असल्याने देशाची निर्मिती झाल्यावर २४ वर्षातच पाकिस्तानपासून स्वतंत्र होत जगाच...

स्वागत उत्तरायणचे

इमेज
      आपल्या भारतात काही कालावधी अत्यंत महत्वाचे समजले जातात . उत्तरायण हा अशाच महत्वाचा कालावधी म्हणजे उत्तरायण . . जो२२ डिसेंबर पासून २१ जून पर्यंत असतो मित्रानो हा कालावधी सूर्याचा भासमान भ्रमणामुळे निर्माण होणारा एक भौगोलिक चमत्कार आहे   पृथ्वी सूर्याभोवती फिरते , हे आता सर्वमान्य झाले आहे . याचा आपल्याला दृष्यपरिणाम म्हणजे सूर्याचे रोज बदलणारे स्थान . सामान्यतः आपण सूर्य पूर्वेला उगवतो असे मानतो . मात्र संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस असतात ज्या दिवशी सूर्य वास्तविक पूर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो पूर्व दिशेपासून काही अंश उजव्या अथवा डाव्या बाजूला म्हणतात . यास सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग म्हणतात . आपण शेजारील चित्रात तो बघू शकतात .  या भासमान भ्रमणात सूर्य   जेव्हा त्याच्या डाव्या   हाताच्या सगळ्यात कडेच्या बिंदूपर्यत पोहोचतो . ज्या बिंदूपासून तो परत     उजवीकडे भासमान भ्रमण सुरु करतो तो दिवस म्हणजे उत्तरायण सुर...

देवदूतांची काळी बाजू दाखवणारे पुस्तक, अशीही एक झुंज .........

इमेज
                 सर्वसाधारपणे वैद्यकीय  व्यवसायाला एका  परोपकारी नजरेतून बघितले जाते . लोकांची आयुष्ये वाचवणारा व्यवसाय म्हणून, यास  अन्य व्यवसायाच्या तुलनेत  एक प्रतिष्ठा आहे. औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना जगभरात अनेक ठिकाणी देवदूतासमान मानण्यात येते .  मात्र अमेरिका आणि पश्चिमी युरोपीय देशातील औषध निर्मिती कंपन्याचा नफाखोरीने या  लोककल्याणकारी  व्यवसायाला एका बाजूने काळवंडले आहे .  या काळ्या बाजूची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक  समाज या संस्थेच्या नाशिक येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांत प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ मृदुला बेळे यांनी ;लिहलेले आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक म्हणजे अशीही एक झुंज.  जे मी . महाराष्ट्रातील जुन्या वाचनालयांची यादी केल्यास क्रमांक दोनचे जुने वाचनालय असणाऱ्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या वाचनालयात नुकतेच वाचले . आपल्या मराठीत याविषयावरची पुस्तके फारच कमी आहेत...

श्रीलंकेची आर्थिक स्थैर्यतेची नवी पहाट उजाडली ?

इमेज
                    आर्थिक विपन्नेतेमुळे सध्या सुरु असलेल्या २०२२ वर्षाच्या सुरवातीला अत्यंत प्रकाशझोतात आलेल्या श्रीलंकेमध्ये आर्थिक स्थैर्यतेची नवी पहाट उजडण्याचा मार्ग वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दृष्टीस येत आहे . श्रीलंकेचे   परराष्ट्र मंत्री अली साबरी   यांनी आंतराष्ट्रीय नाणेनिधी आणि भारताकडून देण्यात येत असलेल्या आर्थिक मदतीमुळे येत्या ४ ते ५ वर्षात श्रीलंका पुन्हा पूर्वपदावर येईल अशा विश्वास एका खासगी भारतीय वृत्तवाहिनीतर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्याने ही   आशादायक शक्यता निर्माण झाली आहे जर भारताने त्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कक्षेत अधिक व्यापार केल्यास श्रीलंका याही पेक्षा लवकर पूर्वपदावर येईल अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली . आंतराष्ट्रीय नाणेनिधीची बंधने असल्याने आम्हला रशियाकडून नैसर्गिक इंधनाची आयात करण्यावर प्रचंड बंधने आहेत जर त्यात काही प्रमाणत सवलत मिळाल्यास श्...