पोस्ट्स

भारतीय बुद्धिबळ विश्वाचा शेवट गोड

इमेज
एकेकाळी अमेरिकन आणि रशियन खेळाडूंचा दबदबा असलेल्या बुद्धिबळ  या मुळातील भारतीय खेळात अनेक भारतीय अत्यंत चमकदार कामगिरी करत आहेत . गेल्या २०२२ वर्षाच्या अखेरचा आठवडा देखील त्यास अपवाद ठरला नाहीये बिल्ट्झ आणि रॅपिड प्रकारातील बुद्धिबळ विश्वविजेत्या स्पर्धेदरम्यान भारतीय बुद्धिबळ  . केलेल्या कामगिरीमुळे हीच गोष्ट सिद्ध होत आहे काझकिस्तान या मध्य आशियातील देशातील अलमट्टी शहारत या स्पर्धा झाल्या  स्प र्धात्मक पातळीवर बुद्धिबळ खेळाडूंना दोन्ही खेळाडूंना एक घड्याळ देण्यात येत  खेळाडूने खेळी केल्यावर आपल्या घडाळ्याचे बटन दाबायचे असते खेळाडूने बटन दाबल्यावर त्या खेळाडूंचे घड्याळ बंद पडते आणि प्रतिस्पर्ध्याचे सुरु असते .जर एखाद्या खेळाडूने चाली करण्यास जास्त वेळ लावला तर त्याची जास्त वेळ संत एखाद्या खेळाडूने कमी वेळ लावल्यास त्याची बरीच वेळ शिल्लकराहते जर एखाद्या खेळाडूची वेळ शिल्लक राहिली आणि एखाद्या खेळाडूची वेळ संपल्यास वेळ संपणाऱ्या खेळाडूची स्थिती कितीही उत्तम असली तरी तो खेळाडू हरतो बुद्धिबळाच्या पारंपरिक प्रकारात (क्लासिकल )प्रत्येक खेळाडूला दिंड तास दे...

2023वर्ष भारतीय उपखंडासाठी अत्यंत महत्तवाचे.

इमेज
   भारताबरोबर सीमा शेअर करणाऱ्या नेपाळ या देशात त्यांच्या संसदेसाठी नुकतेच मतदान झाले.या निवडणूकीत चीन समर्थक कम्युनिस्ट पार्टीचे सरकार नेपाळमध्ये आले. ज्यांनी सत्तेत येवून चार दिवस पुर्ण होत नाहीत तोच ,चीनबरोबर सबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणे सुरु केले,ज्यासाठी चीनबरोबर रेल्वेमार्गाने संपर्क साधणे सुलभ होण्यासाठी करावयाचा प्रयत्नांना गती देणे सुरु केले. त्या पार्श्वभूमीवर 2023साल भारतीय उपखंडासाठी अत्यंत महत्वाचे आहे.2023 या वर्षी जर पुर्वनियोजीत कार्यक्रमात बदल न झाल्यास सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात आणि आँक्टोबर महिन्यात बांगलादेशात तेथील संसदेच्या निवडणूका आहेत.             भारताबरोबर सगळ्यात जास्त भुसीमा बांगलादेश शेअर करतो . बांगलादेशमधून येणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा इशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगाल यांच्या विधानसभेच्या निवडणूकीत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत कळीचा ठरत असतो. सध्या इशान्य भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक विकास प्रकल्प राबवण्यात येत आहेत. उर्वरीत भारताबरोबर इशान्य भारताचा संपर्क वाढवण्यासाठी बांगलादेशातून रेल्व...

ऋषभ पंत यांच्या अपघातामुळे निर्माण झालेले अनुत्तरित प्रश्न

इमेज
    भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू   ऋषभ पंत यांच्या कारला राष्ट्रीय महामार्ग ५८वर शुक्रवरी  पहाटे गंभीर अपघात झाला . स्वतः गाडी चालवताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला या अपघाताच्या निमित्याने या आधी अनेकदा चर्चिले गेलेल्या मात्र तरीही अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला . तो म्हणजे आपले रस्ते वेगवान वाहने चालवण्यासाठी सक्षम असले तरी चालकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती अश्या प्रकारे वेगवान वाहन चालवण्यास सक्षम आहे का ?           आपल्याकडे रस्ते मोकळे दिसले की  अनेक भल्या भल्या लोकांना एक्सलेटरवर पाय देण्याचा मोह आवरत नाही . रस्ता मोकळा दिसला की , तो आपणास गाडीची वेगमर्यादा ओलांडयाचा परवानाच दिलेला आहे या प्रकारचे वर्तन चालकांकडून अनेकदा घडते . अपघाताच्या वेळी अशी वेगवान गाडी नियंत्रणात आणणे अशक्यप्राय होते आणि अपघाताची तीव्रता मोठ्या प्रमाणत वाढते .  आपणास महामार्गावर प्रवास करताना वेग आवरा स्वतःला सावरा या सारख्या ज्या पाट्या दिसतात त्या मनोरंजासाठी नसतात तर आपणास सावध करण्यासाठी अ...

देशासमोरील प्रशांचा वेध घेणारे पुस्तक द फ्री व्हाईस

इमेज
         गेल्या काही वर्षात कोणत्या विषयाची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत /याचा आढावा घेतल्यास सध्या रोजच्या जगण्यात भेडसावणाऱ्या समस्येबाबत उहापोह करणारी , सध्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या पुस्तकांची संख्या गेल्या काही वर्षात वाढलेली दिसत आहे इंग्रजी, हिंदी या भाषांमध्ये  या प्रकारची पुस्तके मोठ्या प्रमाणत प्रसिद्ध होत असली तरी त्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कमी म्हणजे जेमतेम सहा महिने ते वर्षभरात प्रसिद्ध होतअसल्याने मराठी भाषिक वाचकांना देखील जगाशी नाळ जोडणे सहजशक्य होते त्या बद्दल या प्रकारची पुस्तके प्रसिद्ध करण्याबाबत भाषांतरणं प्रसिद्ध करण्यासारखी कायदेशीर आणि अन्य तांत्रिक मदत करणाऱ्या सर्वांचे आणि पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन            तर याच मालिकेतील एक प्रसिद्ध पुस्तक म्हणजे न्यू  दिल्ली टेव्हीव्हीजन असे पूर्ण नाव असलेल्या मात्र एन डी टी व्ही या संक्षिप्त नावानेच प्रसिद्ध असलेल्या वृत्तवाहिनी समूहाच्या  एन डी  टीव्ही इंड...

सिंहावलोकन २०२२ खगोलशास्त्र

इमेज
ग्रेनीयन कालगणनेनुसार सध्या सुरु असणारे वर्ष शनिवारी संपेल .  खगोलशास्त्राचा विचार करता येत्या शनिवारी संपणारे वर्ष अनेक नव्या संसोधनला जन्म देणारे ठरले . यावर्षी मानवाने विश्वाची बाल्यावस्था बघितली , भारताच्या अवकाश संसंधोधनचा  मोहिमेतील दोन  महत्वाचे टप्पे टप्पा यावर्षी गाठले गेले एका दुर्मिळ खगोलीय अविष्काराचा भाग होण्याची संधी खगोल अभ्यासकांना आणि खगोलप्रेमींना मिळाली या वर्षाचा विचार करता १२ मे २०२२ हा दिवस खगोल शास्त्राच्या इतिहासात सुवर्णक्षणांनीं लिहला जाईल गेल्या कित्येक  वर्षांपासून खगोल शास्त्रज्ञांना खुणावत असणाऱ्या आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या कृष्णविवराच्या फोटो शास्त्रज्ञांना मिळाला असल्याचे यावेळी जगभरात विविध पत्रकार परिषदेमार्फत एकाचवेळी जाहीर करण्यात आलेगुरुवारी  जाहीर करण्यात आलेल्या कृष्णविवराच्या फोटो घेण्यासाठी  इव्हेंट होरायझन टेलिस्कोपमार्फत ३०० खगोल शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते.  इव्हेंट होरायझन टेलिस्कोप  हा जगभरात विविध ठिकाणी  विखरून असलेल्या रेडिओ  टेलिस्कोपचा समूह आहे . जग...

सिंहावलोकन २०२२ सार्वजनिक वाहतूकव्यवस्था

इमेज
            इंग्रजी नववर्ष सुरु होण्यसासाठी आता मोजकेच दिवस बाकी आहेत . या सरत्या २०२२ वर्षाचा विचार करता सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा विचार करता , अनेक बदलांचे वर्ष ठरले , कोणत्याहीउ देशाच्या प्रगतीत त्या देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे आपल्या भारताचा विकासाचा अभ्यास करताना हे बदल अत्यंत महत्त्वाचे ठरतात . चला तर मग जाणून घेउया हे बदल     आपल्या भारतात दोन प्रकारची सार्वजनिक   वाहतूक आहे त्यातील पहिली म्हणजे   सर्व भारतभर पसरली आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणारी आपली भारतीय रेल्वे तर दुसरी आहे वेगवेगळ्या राज्य सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारी त्या त्या राज्याची स्वतंत्र अशी सार्वजनिक परिवहन सेवा ज्यास सर्वसाधारणपणे एसटी असे संबोधनात येते . सरत्या २०२२ वर्षात दोन्ही प्रकारच्या वाहतूक व्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणत बदल झाले पहिल्यांदा आपण रेल्वे या सर्व भारतभर पसरलेल्या वाह...