पोस्ट्स

अस्थिरतेचा मोठा इतिहास असणारा देश पाकिस्तान

इमेज
      मंगळवार ९ मे रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लमबाद येथे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नॅशनल अकाउंटशी ब्युरो (नॅब )ने  अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकाच आगडोंब उसळला आहे . एका ट्रस्टच्या जमिनीचा अपहार केल्याप्रकरणी हि अटक करण्यात आली आहे इम्रान यांच्यावर पाकिस्तानात सुमारे १४० खटले दाखल करण्यात आले असून त्यातील एका खटल्यात अटकपूर्व जमीन मिळवण्यासाठी ते इस्लामाबाद  उच्च न्यायालयात गेले असता एका नाट्यमय घटनेनंतर त्यांना अटक करून अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे हे समजल्यानंतर पाकिस्तानातील जनतेत खदखदत असलेला असांतोष बाहेर येऊन त्याने उग्र हिसंक रूप धारण केले त्यामुळे पाकिस्तनात सर्व देशात  जमाबंदी जाहीर करण्यात येऊन समाजमाध्यमाने बंद करण्यात आली आहे      तसे बघायला गेल्यास विरोधकांवर सुडाचे राजकारण करण्याची पाकिस्तानात मोठी पंरपरा आहे १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान स्वातंत्र्य झाल्यावर आठवड्याभरात म्हणजेच २१ ऑगस्ट १९४७रोजी पाकिस्तानचे तत्कालीन गव्हनर जनरल मोहंमद अली जिना यांनी पाकिस्तानच्या वायव्य सरहद प्रांताचे सरकार राजकीय आकसेपोटी ब...

मानवाच्या मूलभूत गरजेवर सविस्तर माहिती देणारे पुस्तक "संवाद "

इमेज
        हिंदू मान्यतेनुसार या पृथ्वीवर मानवाखेरीज विविध प्रकारचे ८४ लाख  वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जीवन जगत आहेत या ८४ लाख प्राण्यमध्ये मानवाचे ते वेगळे वैशिष्ट म्हणजे अन्य प्राण्यांपेक्षा अत्यंत विकसित झालेले स्वरयंत्र . या स्वरयंत्राच्या मदतीने मानवप्राणी विविध भाषा बोलू शकतो दुसऱ्या व्यक्तीशी अन्य प्राणी दुसऱ्या प्राणाशी ज्या प्रमाणे संवाद साधतात त्या पेक्षा प्रगव असा  संवाद साधू शकतो भाषेपासून सुरु झालेली संवादाची हि प्रक्रिया आता फेसबुक सारख्या  समाज माध्यमांपर्यंत पोहोचली आहे या  प्रक्रियेच्या आतापर्यंतच्या टप्यात मनुष्याच्या संवाद साधण्याच्या प्रकियेत मोठ्या प्रमाणात बदल झाले जसे अश्यामुगीन मनुष्याने काढलेली चित्रे  कबुतरे निरोप्या ,  पोस्ट  टेलिग्राफ , टेलिफोन वर्तमानपत्रे ,मोबाईल ,इंटरनेट आदी मात्र या वाटचालीला मोठा कालखंड  जाऊ द्यावा  लागला हे बदलपरिकथेप्रमाणे चुटकीसरशी झालेले नाहीत तसेच हे बदल एखाद्या एका व्यक्तीने किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसमूहाने केले नाहीत या विकासासाठी अनेक व्यक्तीचे योगदान आह...

भारत बांगलादेश मैत्रीच्या नव्या अध्ययास प्रारंभ 

इमेज
           भारत बांगलादेश मैत्रीच्या नव्या अध्ययास २ मेला  प्रारंभ झाला आणि याला कारणीभूत ठरला तो बांगलादेशच्या नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हन्यू  ने जाहीर केलेला एक निर्णय . या निर्णयानुसार बांगलादेशची सुमारे ९० % आयात निर्यात होत असलेल्या चितगाव (बंगाली उच्चार चितोग्राम )  बंदराचा आणि बांगलादेश मधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे बंदर असलेल्या मोंगला बंदराचा भारताने कयमस्वरूपी वापर करण्याची   परवानगी बांगलादेशकडून देण्यात आली आहे यामुळे ईशान्य भारतात भारताच्या अन्य भागातून काही सामान पाठवणे तसेच ईशान्य भारतातून भारताच्या अन्य प्रदेशात सामानांची पाठवणी करणे सोईस्कर झाले आहे           बांगलादेशचा वापर न केल्यास पश्चिम बंगाल मधून त्रिपुरा मिझोराम आदी  राज्यात काही सामान पाठवायचे असल्यास सुमारे दीड हजार किलोमीटरचा वळसा मारून जावे लागते हा मार्ग भारतीय सुरक्षेतीचा विचार करता संवेदनशील असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉर मधून जातो याउलट बांगलादेशचा वापर केल्यास हे अंतर काही शे किलोमीटर इतके कमी ...

सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे अर्थव्यवस्था कोमात

इमेज
      सध्या पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्या बघितल्यास    सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे अर्थव्यवस्था कोमात  असेच चित्र आपल्याला दिसते . पाकिस्तानच्या सरकारने आकडेवारीनुसार पाकिस्तानात महागाईचा दर ४८ % आहे तर एका खासगी संस्थेनुसार पाकिस्तानातील महागाईचा दर ६२ % पोहोचला आहे मात्र पाकिस्तानातील समस्त राजकारणी त्यांच्या पंजाबमध्ये आणि खैबर ए पख्तुन्वा प्रांतीय विधसनसभेच्या निवडणुका घेण्यात याव्यात का ? यावर आपली मत मतांतरे मांडण्यात आणि विरोधी पक्षच्या नेत्याची मते कशी लोकशाहीच्या तत्वाला मूठमाती देणारी आहेत याचे आरोप करण्यात मग्न आहेत        पाकिस्तनाच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानमधील केंद्रीय सत्तेला निवडणूक आयोगास पाकिस्तानी पंजाबमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी निधी द्याव्या असे स्पष्ट निर्देश दिले असताना केंद्रीय सत्तेने निधी न  पुरवल्याने न्यायालय आणि केंद्रीय विधिमंडळ या लोकशाहीच्या दोन स्तंभामध्ये  मोठा वाद उत्पन्न झाला आहे केंद्रीय विधिमंडळाकडून न्यायालयाचा हा आदेश विधिमंडळाच्या सार्वभौत्मवावर ठप...

माहितीपट एका धडपडीचा .. शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट

इमेज
               मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे  सांगत समर्थ रामदास स्वामी १७व्या शतकातच एखादे कार्य यशस्वी होण्यासाठी निरोगी प्रसन्न मनाचे किती महत्व आहे हे सांगितले समर्थ रामदास स्वामी यांच्याच मनाचे श्लोकात देखील मन किती महत्वाचे आहे  "हे मना सांगा मना रावणा काय झाले अकस्मात राज्य ते राज्यही सर्वही बुडाले या सारख्या श्लोकातून मन खंबीर असणे किती आवश्यक आहे हे पुन्हा पुन्हा सडांगितले आहे . समर्थ रामदास स्वामी यांच्यानंतर २० व्या शतकात जळगावच्या कवियत्री बहिणाबाई यांनी त्यांच्या "मन वढाय  वढाय" सारख्या कवितेतून मनाच्या चंचलतेबाबत  सांगितले आहे आपल्या दुर्दैवाने या सारख्या  मोजक्या व्यक्तींचा अपवाद वगळता  आपल्या आयुष्यातील महत्वाच्या मात्र दुर्लक्षित अश्या मन या गोष्टीकडेआपण दुर्लक्षच केलेलं दिसते . मानवी वर्तनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवणाऱ्या मन या गोष्टीबाबत सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगत फक्त रुग्णासाठीच नव्हे तर सर्वसामन्य व्यक्तींच्या उत्कर्षासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती,  संस्था त्यामुळे ...

31वर्षे अभिमानाची*

इमेज
आकाशातील उपग्रह ग्रह, तारे, तेजोमेघ, दिर्घीका यांच्या अभ्यासासाठी असणाऱ्या दुर्बिणी आपण आजकाल अनेकांकडे बघतो. .दुरवरुन येणाऱ्या प्रकाशाचे दृश्य स्वरूप त्या आपणास दाखवतात. मात्र एकुण प्रकाश लहरींपैकी फारच कमी प्रकाशलहरी आपणास दिसतात.  आपणास ज्या दुर्बिणी दिसतात त्या या दिसणाऱ्या प्रकाशलहीरीचे दृश्य स्वरूप असते .मानवी डोळ्यास न दिसणाऱ्या रेडिओ लहरीमध्ये गँमा किरण, एक्स रे, अल्टा साउंड किरण, आदींचा समावेश होतो. आपणास दिसणाऱ्या प्रकाशलहरींपेक्षा यांचे विश्व खुपच मोठे आहे. या लहरीच्या अभ्यासातून अनेक रंजक बाबी मानवास ज्ञात झाल्या आहेत. जसे कृष्णविवरांचे अस्तिव, लाल महाराक्षसी तारा ,श्वेतबटू तारा, न्युट्राँन स्टार वगैरै. या प्रकाशलहरींचा अभ्यासासाठी ज्या दुर्बिणी उभारल्या जातात. त्यांना रेडीओ दुर्बिणी उभाराव्या लागतात. या रेडीओ दुर्बिणी उभारणे त्यातून निरीक्षण करणे हे वैयक्तिक एकाचे कार्य नाही. त्यासाठी प्रचंड पैसा, जागा, मनुष्यबळ लागत असल्याने हे कार्य सरकारी पातळीवरच करण्यात येते .जगातील अनेक भागात अस्या सरकारी पाठबळ्यावर रेडिओ दुर्बिणी आहेत. आपल्या भारतातच नव्हे महाराष्ट्रात सुद्धा आह...

भारताचा दक्षिण अमेरिका खंडात वाढता डंका

इमेज
आपल्या भारताच्या जगभरात डंका सातत्याने वाढत आहे . जगभरातील कोणतेही क्षेत्र भारताच्या प्रभावापासून दूर राहिलेले नाहीये . पृथ्वीगोलाचा विचार करता भारताच्या पूर्णतः विरुद्ध असलेला दक्षिण अमेरिका खंड देखील त्यापासून सुटलेला नाहीये याच भागातील   गयाना ,   पनामा , कोलंबिया आणि डॉमिनिकन रिपब्लिक   या देशांना   आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर   परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून एप्रिलच्या शेवटच्या आटवड्यात   अधिकृत भेट देणार आहेत. या देशांना त्यांची ही पहिलीच भेट असेल.   गयानामध्ये,   21 ते 23   एप्रिल   या दरम्यान    परराष्ट्र व्यवहार मंत्री   अनेक मंत्र्यांशी संवाद साधणार आहे. ते त्यांचे समकक्ष यांच्यासमवेत संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्ष असतील. श्री ह्यू हिल्टन टॉड हे दोन्ही देशांमधील सर्व मुद्द्यांवर चर्चा करतील.    हा    गयाना दौरा भारतासाठी   कौन्सिल ऑन फॉरेन अँड कम्युनिटी रिलेशन्स (COFCOR);या   15 सदस्यीय कॅरिबियन   देशातील (CARICOM))   परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच...