पोस्ट्स

हा आकडा महाराष्ट्राला भुषणावह नाही!

इमेज
         आपले महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याचे अभिमानाने  वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यासाठी केंद्रीय स्तरावर  प्रसिद्ध  होणाऱ्या विविध अहवालाचा आधार घेण्यात येतो‌. मात्र 4 डिसेंबर रोजी नॅशनल क्राईम रजिस्टर ब्यूरो कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील पहिला क्रमांक मात्र नक्कीच अभिमानाचा नसणार. देशभरात 2022,साली झालेल्या आत्महत्येचा विचार करता सर्वाधिक आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रात झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. देशात आपल्या  समाजात सर्वाधिक आत्महत्या होणे कोणत्याही समाजासाठी लांच्छनास्पद वाटावे असी कामगिरी. दूर्देवाने ही लांच्छनास्पद कामगिरी , आपल्या महाराष्ट्रीयन समाजाने केली आहे.           मनुष्य अडचणीला घाबरुन आत्महत्या करतो असे म्हणणे चूकीचे आहे. मनुष्य आत्महत्या करतो ते त्या अडचणीतून कसे बाहेर पडता येईल,याबाबत योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्याने.जगात प्रत्येक समस्येला उत्तर असतेच, मात्र हे उत्तर मिळण्याचा मार्ग  कोणता ?,याबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व्यक्तींकडून सर्व उपाय सं...

भारतीय क्रिडा क्षेत्रासाठी सुवर्ण क्षण

इमेज
2डिसेंबर 2023हा दिवस भारतीय बुद्धीबळ क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहला जाईल. कारण या दिवशी महिला बुध्दीबळ खेळाडू  वैशाली रमेशबाबू  यांनी भारताला 84वा ग्रँडमास्टर मिळवून दिला .  वैशाली यांनी  स्पेनमधील एलोब्रेगॅट ओपनमध्ये सलग 2 विजयांसह दमदार सुरुवात करत ग्रँडमास्टर  होण्यासाठी आवश्यक अस्या 2500 रेटिंगचा टप्पा ओलांडला ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असे अन्य  तीन निकष या आधीच पुर्ण केल्याने त्यांनी ग्रँडमास्टर भारताचे 84वे ग्रँडमास्टर म्हणून आपले नाव कोरले वैशाली रमेशबाबू आता महिला बुद्धिबळात जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानी तर  भारतात  दुसऱ्या स्थानी आहेत.  ग्रँडमास्टर होण्यासाठी पुरुष आणि महिलांचे निकष थोडेसे वेगळे आहेत. पुरुषांमध्ये ग्रँडमास्टर होण्यासाठी किमान 2500फिडे गुणांकन आवश्यक आहे.मात्र महिलांना थोडे कमी फिडे गुणांकन आवश्यक आहे.महिलांना ग्रँडमास्टर  होण्यासाठी आवश्यक असे  फिडे गुणांकन प्राप्त केल्यानंतर संबंधित महिला बुद्धीबळपटुस वूमन ग्रँडमास्टर हा किताब देण्यात येतो.मात्र त्यानंतर संबंधित महिला बुद्धीबळपटुंचे फिडे गुणांकन 2500...

पाकिस्तान होईल का ब्रिक्स चा सदस्य ?

इमेज
चीन, भारताच्या जागतिक महासत्ता  होण्याच्या वाटेतील मोठा अडथळा  असणारा देश.  स्वतःला जागतिक महासत्ता होण्याचे असल्याने भारताला त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारा भारताचा शेजारी देश म्हणजे चीन.सीमेबाबत वाद असला तरी चीनने भारताची महासत्ता होण्याची ताकद ओळखली आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहु शकत नाहीत, त्याप्रमाणे चीन स्वतःच्या  महासत्ता होण्याचा वाटेतील अडथळा अर्थात आपल्या भारताला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो.त्याच मालिकेत चीनने एक नविन कार्ड नुकतेच खेळले आहे.ते म्हणजे जगात सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागणाऱ्या ,काही महिन्यांपूर्वी ज्या देशाचा पंतप्रधान जगात अक्षरशः कटोरा घेवून भगवान के नाम पर, अल्ला के नाम कुछ देदेरे बाबा भगवान अल्ला तूम्हारा भला करेगा असे म्हणत जगात फिरत होता.त्या पाकिस्तानला ज्या गटाचा एकत्रीत जिडीपी जगात जी 20, जी 7 या दोन गटानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आहे,त्या ब्रिक्स या गटाचे सदस्यत्व देण्याबाबतची आग्रही भुमिका मांडण्याचे .त्यासाठी तो रशियावर अप्रत्यक्ष दबाव देखील आणत आहे.एकेकाळी रशिया चीन राजनैति...

का आणि कसे लिहावे,हे सांगणारे पुस्तक "लिहते व्हा,"

इमेज
आपल्याकडे सतराव्या शतकात  समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या उद्धबोधनात, दिसामंजी काहीतरी लिहावे, असे सांगितले आहे. त्यानंतरही अनेकांनी लिहण्याचे फायदे सांगितले आहेच. लिहण्यामुळे स्मरणशक्ती कसी विकसित होते, यावर देखील अनेकांनी लिहिले आहे.मात्र लिखाण करायचे ठरवल्यावर नक्की लिहायचे तरी काय ? आणि ते कसे सुरू करायचे,? या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणारे लेखन आपल्याकडे तसे कमीच.आणि या विषयावर जे लेखन उपलब्ध आहे ते देखील एखाद दुसऱ्या लेखाच्या स्वरुपात.मात्र फक्त याच विषयावर लिहलेले पुस्तक जर आपणास मिळाले तर ? सोन्याहून पिवळे असीच आपली स्थिती होणार हे नक्की. हा दुग्धशर्करा योग आपल्यासाठी जूळवून आणला आहे,नाशिकमधील व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक , मात्र बाल साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणारे ज्येष्ठ साहित्यिक संतोष हुडलीकर यांनी.पुण्याचा पृथ्वीराज प्रकाशन या प्रकाशनातर्फे प्रकाशित  संतोष हुडलीकर यांच्या या पुस्तकात आपणास या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतातच तसेच लेखनाविषयी अन्य माहिती देखील मिळते‌.मी नुकतेच हे पुस्तक वाचले. सुमारे १७६ पानांच्या या पुस्तकात आपणास लेखन कोणत्या विषयावर कर...

पर्यटनाच्या निमित्ताने (भाग३)

इमेज
मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले. ते देखील मी वेळोवेळी पर्यटनाच्या निमित्ताने भाग एक आणि  भाग दोन यामध्ये सविस्तर सांगितले आहेच. ज्यांना ते वाचायचे असतील अस्या व्यक्तींना ते शोधणे सोईस्कर  व्हावे यासाठी त्यांचा लिंक मी खाली देईलच.    तर माझ्या या प्रवास करण्याची सुरुवात एका अपघाताने झाली.अपघाताने म्हणजे रस्ते, रेल्वेवरील अपघात नव्हे तर माझ्या आयुष्यात अकस्मात घडलेल्या एका घटनेने .जर ती घटना माझ्या आयुष्यात घडली नसती तर मी जास्त फिरलोच नसतो असे म्हणा हवतर  कारण त्या अपघात अकस्मात घडणाऱ्या घटनेच्या आगोदर मी स्वतः एकट्याने फिरायला गेल्याचे आपणास फारसे आढळणार नाही    तर मी माझे पत्रकारितेचे शिक्षण संपवून पुण्यात एके ठिकाणी रुजु झालो‌.मी जेव्हा नाशिकहून नोकरी निमित्ताने पुण्यास आलो तेव्हा नाशिक पुणे हा राष्ट्रीय महामार्ग असला आणि...

भारताचे शेजारी आणि हिंदू धर्म

इमेज
आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी भारतात हिंदू धर्मीय लोक बहुसंख्येने आहेत,‌हे आपण जाणताच. जगात इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असलेले 51 देश आहेत. त्यामुळे इस्लामधर्माबाबत कुठेही काही अनुचित घडले तर ते देश पुढे सरसवतात. ख्रिस्ती धर्माबाबत बोलायचे झाल्यास बहुसंख्य यूरोप,आणि उत्तर अमेरिका खंडातील देश त्यांची बाजू घेतात. या उलट  हिंदू धर्माबाबतची गोष्ट  आहे. हिंदू धर्मीय व्यक्तींना भारताशिवाय आधार दिसत नाही  तसेही कुठेही हिंदू व्यक्ती असला तरी त्याचे मुळ कुठेना कुठे आपल्या भारतातच सापडते.त्यामुळे हिंदू धर्मियाबाबत जगात कुठे काही झाले तर त्याचे पडसाद आपल्या भारतात उमटतात. आणि ते देश आपल्या सभोवतालचे असले तर त्यात अजूनच भर पडते.हे सांगायचे कारण म्हणजे हिंदू धर्मीयांबाबत नेपाळ आणि बांगलादेश यामध्ये घडणाऱ्या गोष्टी.      तर देशाचा राष्ट्रीय धर्म हिंदू करावा या मागणीसाठी सध्या नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे.सन 2008पासून नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.सन2008चा आधी नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. 2008मध्ये लागू करण्यात आलेल्या संविधानानुसार सत्तेत आलेल्या साम्यवादी...

भारताचे अशांत शेजार आणि लोकशाही

इमेज
            आपल्या भारतात पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सर्व वातावरण ढवळून निघाले असताना भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ आणि म्यानमार या दोन देशातील वातावरणसुद्धा लोकशाहीच्या दोन वेगवेगळ्या आंदोलनामुळे ढवळून निघत आहे . नेपाळमध्ये सध्याची वर्तमान गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था मोडीत काढत  संविधानिक राजेशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे तर म्यानमार या शेजारील देशामध्ये सध्याची वर्तमान असणारी लष्करशाही पद्यच्युत करून लोकशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी करण्यात आलेल्या चळवणीने  निर्णायक स्वरूप गाठले आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ख्याती असलेल्या आपल्या भारताच्या शेजारील या दोन देशामध्ये लोकशाहीविषयक या आंदोलनाने एक आश्चर्यकारक स्थिती जगात निर्माण केली आहे          नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो . मात्र हि व्यवस्था मोडीत काढत देशात इंग्लड सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था...