पोस्ट्स

जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्यिकांची ओळख मराठी भाषिकांना करून देणारे पुस्तक "झपुर्झा भाग ३"

इमेज
   साहित्याला जगाचा आरसा समजण्यात येते. जगात जे काही चांगले वाईट घडते,ते सर्व साहित्यिक आपल्या लेखनाद्वारे समाजापुढे मांडतो. त्यामुळे साहित्याचे वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष अनुभव आला नाही,तरी समाजातील चांगल्या वाटायची आपणास योग्य प्रकारे जाण होते. त्यामुळे साहित्याची निर्मिती करणारा साहित्यिक अत्यंत महत्त्वाचा आहे,समाजाचे जमेच्या बाजू उणिवा त्याला कश्या दिसतात,यावर त्याचे साहित्य कसे असेल?ते खरंच समाजाचे प्रतिनिधित्व करेल का,?हे ठरते‌.विचारवंता सारखाच साहित्यिक हा त्या विशिष्ट काळाचे अपत्य असतो. त्यामुळे साहित्यिकांचा चरित्रांचा  अभ्यासावरून त्या काळाचा अंदाज बांधता येतो.तसेच त्या साहित्यिकांचे लेखन किती अस्सल समजायचे ते समजते. आपल्याकडे साहित्यिकांच्या चरित्रांचा अभ्यास करणारी पुस्तके कमीच आहेत.त्यातही जी आहेत ती मुख्यतः इंग्रजीतच.अस्सलिखित इंग्रजी समजू शकणारा बोलू शकणारा वर्ग आजही कमीच आहे. आजही बहुसंख्य भारतीय त्यांचा मातृभाषेतच संवाद करतो‌.त्यामुळे बहुसंख्य भारतीय या अभ्यासापासून दूरावतात.नेमकी हीच बाब हेरून मराठीला ज्ञानभाषा होण्यासाठी झटणारे अच्युत गोडबोले यांनी ज...

नाशिकची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, "तपोभूमी नाशिक"

इमेज
नाशिक, महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर.स्वातंत्र्यवीर सावरकर,दादासाहेब फाळके, श्रीपाद अमृत डांगे, यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तींची जन्मभूमी असणारे शहर.जगात ज्या ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यातील एक ठिकाण म्हणजे नाशिक.खाद्यपेयांचा विचार करता द्राक्ष वाइन निर्यातीद्वारे आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणारे शहर म्हणजे नाशिक ‌. तर अस्या नाशिकची इतिहास काळापासून जडण घडण कशी झाली.दक्षीण काशी असी ओळख असणाऱ्या या शहर आणि परिसरात कोणकोणती मंदिरे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? तसेच प्राचीन काळात नाशिकला  कोणकोणत्या परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे? नाशिकचे सांस्कृतिक जीवन कोणत्या पद्धतीने समृध्द आहे? नाशिकची प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोणती? नाशिकची जगभरात ओळख असणारा कुंभमेळा मुळात काय आहे? कुंभमेळा कस्या प्रकारे आयोजित करण्यात येतो?नाशिक परिसरात कोणकोणत्या लेण्या आहेत? नाशिक परिसरात नाशिक वगळता कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत? या सारख्या नाशिकविषयी आपणास पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची योग्य उत्तरे आपणास हवी असतील तर आपणास महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत ...

ग्रेनीयर वर्ष २०२३चा सविस्तर वृत्तांत "लोकसत्ता वर्षवेध २०२३"

इमेज
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना गेल्या काळातील चालू घडामोडींचा अभ्यास चटकन होण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारा घटक म्हणजे इयर बुक.वर्षभर वर्तमानपत्रांची टिपणे काढून सुद्धा अनावधानाने टिपणातून सुटलेला मुद्दा विषय यांची उजळणी करण्याचा कामात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही इयर बुक खुपचं उपयुक्त ठरतात. वर्षभरातील महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने, ती वाचून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाचतो‌.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीं खेरीज पत्रकारांना एखाद्या मुद्द्यावर लेखन करताना संदर्भ म्हणून ही इयर बुक महत्त्वाची ठरतात.इंग्रजीत या प्रकारची अनेक इयर बुक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध होत आहेत.मात्र त्यांचा वापर करण्यासाठी इंग्रजीवर हुकुमत असणे आवश्यक आहे. आज २०२४साली  देखील अनेक व्यक्ती अस्या आहेत की,,ज्यांची इंग्रजीवर फारशी हुकूमत नाही ‌एम‌.पी.एस.सी. ची तयारी करणारे विद्यार्थी, ग्रामीण भागातील पत्रकार अस्या प्रकारचा मोठा वर्ग यात समाविष्ट  होतो‌. हा वर्ग सदर माहिती इंग्रजीत...

आपली राजकीय समज प्रगल्भ करणारे पुस्तक,"हिंदूत्व,बंधूत्व आणि नरेंद्र मोदी"

इमेज
सध्या आपल्या भारतात लोकसभा निवडणूकीचे वातावरण दिवसेंदिवस अधिकाधिक गरम होत आहे.हा मजकुर लिहण्यापर्यत देशात आचारसंहिता लागू नसली तरी ती कधीही लागू शकते.कदाचित आपण हा मजकुर वाचेपर्यंत ती लागू झालेली असू शकते.आचारसंहिता लागू झाल्यानंतर तर राजकीय वातावरण अधिकच रंगेल.अस्या या  काळात २१०देशांच्या या जगात, जगातील सर्वात मोठी असलेल्या लोकशाहीतील जवाबदार नागरीक म्हणून आपणास राजकीय पक्षांची पुर्ण समज असणे अत्यावश्यक ठरते.सत्ताधिकारी पक्षातर्फे करण्यात आलेली विकासकामे आपणास प्रत्यक्ष दिसत असली तरी, त्या पक्षाची विचारधारा काय आहे?याची आपणास माहिती मिळाल्यास आपण अधिक जागरुकपणे मतदान करु शकतो‌.मात्र या काळात माध्यमे पेड न्युज अधिकाधिक दाखवत असल्याने त्यातून योग्य ती माहिती मिळेलच ,यांची काही श्वास्वती नाही, त्यामुळे या काळात या विषयी लिहलेल्या पुस्तकाचच आपणास आधार घ्यावा लागतो‌, आणि आपली ही गरज पुर्ण होते,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी लिहलेले आणि दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित "हिंदूत्व, बंधुत्व , नरेंद्र मोदी हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशि...

माझे वाचन (भाग २ )

इमेज
        आपल्या पाल्याने वाचन करावे यामध्ये पालकांची काय भूमिका असते ?  हे आपण मागच्या भागात बघितले   या भागात आपण एखाद्याला ठराविक विषयावरची पुस्तके वाचायला कसे काय आवडू शकते ? यावर बोलूया . एखाद्यास ठराविक विषयाची पुस्तके आवडण्यात  त्याच्या सभोवातालच्या व्यक्ती कोणत्या प्रकारचे पुस्तक वाचतात तसेच पुस्तक वाचनास सुरवात करताना त्यास कोणत्या प्रकराची पुस्तके वाचायला मिळाली ? याचा मोठा प्रभाव असतो या खेरीज व्यक्तीच्या शैक्षणिक आणि व्यावसाईक गरजेचा देखील मोठा प्रभाव असतो ? जर एखाद्यास आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर विशिष्ट विषयाची पुस्तके वाचणे क्रमप्राप्त झाले तर आयुष्याच्या पुढील टप्यावर त्या विषयाची पुस्तके वाचायची गरज नसली तरी एखादा व्यक्ती त्याच विषयाची पुस्तके वाचू शकतो   माझ्याबाबत बोलायचे झाल्यास मी शाळेत असताना माझ्या शाळेच्या ग्रंथपाल असणाऱ्या मॅडम आम्हाला सातत्याने सांगत असत , अरे तुम्ही विविध विषयाची माहिती देणारी पुस्तके वाचायला हवी विविध साहित्यकृती वाचायचे हे तुमचे वय नाही .तुम्ही साहित्यकृती नंतरच्या आयुष्यात वाचू शकता सध्या त...

माझे वाचन .... (भाग १ )

इमेज
                        कालचीच गोष्ट आहे , मला एका मित्राने  फोन  करून त्याच्या मुलाची व्यथा ऐकवली . त्यांची व्यथा अशी होती की, कितीही सांगितले.. विविध उपाय केले तरी त्याचा मुलगा काही केल्या वाचतच नव्हता . आपल्या मुलाने चांगले वाचनवीर व्हावे अशी इच्छा माझ्या मित्राची इच्छा होती मात्र त्याचा मुलगा काही केल्या ती पूर्ण करत नव्हता अखेरचा उपाय म्हणून तो माझ्याकडे आला होता तसा बघायला गेलो तर माझ्या मित्राने उपस्थित केलेला हा फक्त त्याचा एकटाच प्रश्न नाहीये .आजकाल अनेकांना या प्रश्नाने ग्रासलंय त्या अर्थी हा प्रश्न सामाजिक झाला आहे त्यामुळे हा प्रश्न अक्राळविक्राळ स्वरूप धारण करण्याच्या अगोदर त्याचे निराकारण करण्याच्या प्रयत्न केल्यास उत्तम या वचनानुसार हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे सदर लेखन आहे     तर मित्रानो मुलांच्या वाचनाची सुरवात होते ती पालकांपासून . पालक जर वाचणारे असतील तर मुले सुद्धा वाचायला लागतात हा सर्व साधारण इतिहास आहे  बाल  मानसशास्त्रज्ञांच्या विचार करता  ...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

इमेज
           मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले.त्यातील काही मी या आधी सांगितले आहेतच .त्यातील न सांगितलेले अनुभव आपल्यापर्यत पोहोचण्यासाठी आजचे लेखन.                    तर मित्रांनो, मी माझ्या पर्यटनाच्या तयारीची सुरवात संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरून त्या त्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेवून करतो ,हे आपणास आता ज्ञात झाले असेलच.त्यानुसार माहिती घेत मी सांगली जिल्हा स्थळदर्शनासाठी निघालो असताना नाट्यमय प्रसंग घडला. त्यांचे झाले असे की,   नरसोबाची वाडी हे देवस्थान सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असले तरी, प्रशासकीयदृष्ट्या ते कोल्हापूर जिल्ह्यात येते. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर त्याची माहिती नव्हती, आणि ...