गणपती उत्सवाच्या निमित्ताने खास

 


वाचक मित्रानो आणि मैत्रीणीनो तुम्ही दहीहंडी उत्सवाच्या आंनद घेत असताना हा लेख वाचत असल्याची दाट शक्यता आहे कृष्ण भक्तीत रममाण झाल्यावर साधारणतः १२ दिवसांनी (जन्माष्टमी नंतर ८ दिवसानी पोळा आणि त्यानंतर ४ दिवसानी गणेश चतुर्थी या हिशेबाने) आपण बुद्धीची देवता गणरायाचे आगमन तितक्याच भक्ती भक्तिभावाने करू. (सध्याचा वादंग त्यावेळी मोठ्या प्रमाणात शांत झाला असेल) याची मला तरी खात्री आहे. या गणेशोत्वाच्या काळात आपण गणपतीच्या विविध मंदिरात त्याची मोठ्या श्रद्धेने पूजा करत असू. ही पूजा आपणास जास्तीत आनंदायी ठरो यासाठी गणपतीच्या विशेष प्रसिद्ध नसलेल्या साडेतीन स्थानची माहिती देण्यासाठी सदर लेखन. या सर्व ठिकाणी मी वेगवेगळ्या वेळी भेटी दिल्या आहेत सर्व ठिकाणी माझा अनुभव मन प्रसन्न करणारा होता. बुद्धीची देवता असलेल्या गणरायाच्या सुखकर्ता विघ्नहर्ता रूपाचे दर्शन मला सर्व ठिकाणी झाले. गणपती केवळ बुद्धीची देवता नाही तर प्रसंगी दात तूटला तरी चालेल भक्तांना त्रास देणाऱ्या असुरांचा संहार करणारी देवता देखील आहे या एकदंत गजाननाचे दर्शन मला सर्वच ठिकाणी झाले

मला हे माहिती आहे कि अनेक वाचकांचा गणपतीची साडेतीन स्थळे असे ऐकल्यावर गोंधळ होण्याची शक्यता आहे गणपतीची अष्टविनायक स्थाने आहेत साडेतीन शक्तिपीठे तर देवीची असतात असे त्यांना वाटू शकते  त्यांना मी सांगू इच्छितो की देवीबरोबरच गणपतीची देखील साडेतीन स्थाने आहेत किंबहुना पुणे शहर हे केंद्र मानल्यास सुमारे १५० किलोमीटरच्या परिसरात जासी गणपतीची स्तहने आहेत ज्यास अष्टविनायक म्हंटले जाते त्याच प्रमाणे नागपूर हे केंद्र मानून तेथून १५० किलोमीटरच्या परिघात सुद्धा गाणपतीची स्थाने आहेत ज्यास वैदर्भीय अष्टगणेश म्हणतात असो

तर गणपतीच्या विविध नावामध्ये एक नाव हे मयुरेश्वर आहे. गणपतीने मयुरेश्वर नावाच्या एका राक्षसाचा वध केल्याने त्या राक्षसाच्या इच्छेनुसार गणपतीला मयुरेश्वर हे नाव मिळाले तर या मयुरेश्वर या नावाच्या राक्षसाचा वध करताना राक्षसाचे शरीर ४ ठिकाणी पडले. आज ही स्थाने साडेतीन गणपती म्हणून ओळखली जातात.ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहराजवळ असलेले पद्मालय, जालना जिल्ह्यात असलेले राजूर तर पुणे जिल्ह्यातील वडगाव कांशबिंगे ही ३ पूर्ण पीठे समजली जातात आणि चिंचवड मोरया गणपती अर्धे पीठ समजले जाते 

पुणे जिल्ह्यातील वडगाव कांशबिंगे ता गणपती स्थानाचा विचार करता मंचर भीमाशंकर रस्त्यावर मंचर पासून ७ ते ८ किलोमीटर दूर असलेल्या स्थानाला सहज भेट देऊ शकतो. मंदिर छोट्याशा टेकडीवर आहे परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाचे मंदिर साधारणतः ज्या प्रकारच्या उंचीवर आहे त्याच्या सव्वापट उंचीच्या टेकडीवर हे मंदिर आहे मंदिराचा परिसर खूप शांत आहे मंदिर विशेष प्रसिद्ध नसल्याने काही मोजके दिवस वगळता विशेष गर्दीनसते. मंचरहून सकाळी साडेआठ आणि दूपारी साडेतीन वाजता थेट मंदिरच्या संरक्षण भिंतीपर्यंत बस सेवा आहे जर या बसेस न मिळाल्यास भीमाशंकर ला जाणाऱ्या कोणत्याही बसेसहूनआपण वडगाव कांशबिंगेच्या फाट्यावर येऊ शकतो तेथून अडीच किलोमीटरवर मंदिर आहे

जालना जिल्ह्यात असलेल्या राजूर चा विचार करता राजूर हे गाव जालना सिल्लोड या रस्त्यावर जालना शहरापासून 25किलोमीटरवर आहे. मंदिर काहीसे उंचावर आहे. इतक्या उंचीचा एका टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिर दगडात बांधलेले आहे. परीसरात अन्य काही मंदिरे देखील आहेत. मात्र मी जेव्हा मंदिराला भेट दिलीत्यावेळी या सर्व मंदिरांना मुळच्या दगडी स्वरुपात न ठेवता आँइल पेंटचा रंग देण्याचे कार्य चालू होते मुळच्या दगडी सौदर्याला काय चांगला फरक यामुळे पडतो, ते मंदिर प्रशासनच जाणे मला वैयक्तिक स्वरूपात हा प्रकार आवडत नाही, असो. काही वर्षापूर्वी मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. त्यावेळी सुरक्षेची विशेष काळजी घेवून जर दुर्घटना झाली तर परीस्थिती नियंत्रात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याचे परीसरात फिरताना लक्षात येते. परीसराची स्वच्छता राखण्यासाठी मंदिर प्रशासन विशेष प्रयत्नशील आहे. ज्याबाबत त्याचे कौतूक करावेच लागेल. मला मंदिर परीसरात सर्वच स्वच्छता कर्मचारी काम करताना दिसले. देवस्थानामार्फत निवासाची सोय आहे. मात्र खाण्याची सोय नाही. भाविकांनी मुक्काम केल्यानंतर आम्ही गावातून त्यांची सोय करतो असे मंदिर व्यवस्थापकांनी मला सांगितले मला मात्र गावात एकच हाँटेल असल्याचे गावातून फिरताना गावकऱ्यांनी सांगितले, त्यामुळे पोटाची सोय उत्तम नाही, याचे भान ठेवूनच गणपती दर्शनासाठी येणे उत्तम आहे. छत्रपतीसंभाजी नगर येथून जालन्यास दोन मार्गाने येता येते पहिला मार्ग म्हणजे सिल्लोड मार्गे आणि दुसरा मार्ग म्हणजे बदनापूर मार्गे त्यातील पहिल्या मार्गे आल्यास जालन्याचा आधी 25किमीवर मंदिर आहे. दुसऱ्या मार्गाने आल्यास जालना शहरात जावून तेथून सिल्लोडच्या रस्त्याने यावे लागते.

जळगाव जिल्ह्यातील पद्मालय या ठिकाणी पोहचण्यासाठी धुळे जळगाव मार्गावरील एरंडोल हे ठिकाण खूप सोईचे आहे. तेथून सुमारे पंधरा वीस मिनिटात आपण या ठिकाणी पोहोचू शकतो. जळगावहून एरंडोल या ठिकाणी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील एका मार्गावर पद्मालय आहे. एका सुंदर तळ्याच्या ठिकाणी हे मंदिर आहे. या ठिकाणी मंदिर संस्थनामार्फत राहायची सोय देखील करण्यात आली आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उजव्या आणि डाव्या दोन्ही सोंडेचे गणपती एकाच गर्भगृहात विराजमान झालेले दिसतात. जळगावहून येताना खुटवड या गावानंतर एक पाट लागतो. तो पाट ओलांडल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो या रस्त्यानेसुमारे सहा किलोमीटर गेल्यावर मंदिर लागते. मंदिर दगडी बांधणीतील असून या मंदिराला ऑईलपेंट देण्यात आला आहे. ज्यामुळे याचे मूळ सौदर्य काहींचे कमी झाले आहे असे मला वाटते

साडेतीन स्थळांपैकी अर्धे स्थळ म्हणून चिंचवडचे मोरया गणपती मंदिर ओळखले जाते जे अत्यंत प्रसिद्ध आहेच पुणे शहरापासून जवळ असलेल्या चिंचवड शहरात असेल्या या ठिकाणी पुणे आणि पिंपरी शहरातून सहजतेने

पोहोचता येते

मी आतपर्यंत वैदर्भीय गणेश वगळता अष्टविनायक आणि या साडेतीन गणपतीचे दर्शन घेतले आहे या गणपतीचे दर्शन घेणे मोठे भाग्यकारक आहे तरी आपण अवश्य याचे दर्शन घावे असे माझे आपणा ससांगणे आहे बोला गणपती बाप्पा मोरया

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास