पोस्ट्स

ब्रेक्सिट एक अवलोकन

इमेज
                            ही कथा आहे एका घटास्फोटाची. फरक एव्हढाच की हा   घटस्फोट कोणत्याही दोन व्यक्तींचा नसून एका देशाने एका भरल्या गोकूळातून घेतलेल्या घटस्फोटाची. आपण बोलत आहोत ब्रेक्झीट विषयी. भरल्या गोकुळातून घटस्फोट घेणाऱ्या देशाचे नाव आहे ग्रेट ब्रिटन किवा युनाटेड किंग्डम आणि त्या भरल्या गोकूळाचे नाव आहे युरोपीयन युनियन. एकेकाळी परस्परांशी यूध्द खेळलेल्या देशांनी सुरवातातीला व्यापाराच्या सोइसाठी उभारलेली ही संघटना पुढे हे सहकार्य फक्त काही गोष्टीच्या व्यापाराचा पुरतेच मर्यादीत न रहाता पुढे या देशंनी आपसातील भेद विसरून एक खंड एक देश या भावनेतून त्या द्रुष्टीने टाकलेले पाउल म्हणजे ही संघटना होय . त्यासाठी त्यांनी खंडातील 28 देशांची मिळून एक संसद निर्माण केली एक चलन स्वीकारले सर्व्र देशंसाठी एकच व्हीसाचे धोरण स्वीकारले. अश्या भरल्या गोकूळातून ग्रेट बिटन बाहेर पडत आहे .                   तसेपण यूनाटेड किंग्डम जरी युरोपीय युनियनच्या भाग  असले तरी अनेक बाबतीत...

महाराष्ट्रत्तेर एस टी एक समस्या

इमेज
नुकतीच  मी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाला रात्री भेट दिली . तेथील दृश्य बघून  मी थबकलोच,  आपण महाराष्ट्रात नसून कर्नाटकमध्ये असल्यासारखा भास व्हावा असे ते दृश्य होते .  महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागातील शहर असूनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कर्नाटकच्या बसेसची संख्या जास्त होती . मागे मी हा प्रकार कोल्हापूर बसस्थानकावर बघितला होता .मात्र  कोल्हापूर कर्नाटक  सीमेपासून निव्वळ २५ किमी असल्याने मी हा प्रकार गांभीर्याने घेतला नव्हता . त्यानंतर याविषयीची अधिक माहिती मिळावी म्हणून कर्नाटक राज्य परिवहनाच्या  संकेतस्थळावर भेट दिली असता तेथील माहिती झोप उडवणारी होती. कर्नाटक सरकार राज्याबाहेर दुसऱ्या राज्यातील ४० मार्गावर सेवा पुरवते या ४० पैकी २९ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत .  मागे मी एकदा कराडला गेलो असता मी बेळगाव ते नीरा या मार्गावरील कर्नाटक परिवहन महामंडळाची बस ब घितली होती . मित्रानो नीरा हे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत असणारे गाव आहे . म्हणजेच तुम्ही समजू शकता कर्नाटक किती आतापर्यंत पोहोचले आहे . नाशिकहून बेळ...

राष्ट्रीय भूगोल दिनाच्या निमित्याने

इमेज
भूगोल , शालेय जीवनातील बहुतेकांचा नावडता विषय , मात्र तेव्हढाच उत्साहवर्धक विषय. या भूगोलाच्या विषयी जनसामान्यात असणारी भीती दूर व्हावी , त्याचे महत्व लोकांना समजावे , या उद्देशाने भारत सरकारकडून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय भूगोल दिन . १४ जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो .                त्यानिमित्याने समस्त भूगोल प्रेमींना खूप खूप शुभेच्छा . भूगोल मानवी आयुष्यातील अत्यंत मत्त्वाचा विषय आहे . रोजच्या जीवनातील अनेक बाबी या भूगोलाशी संबंधित आहेत . मकर संक्रांत हा सण तर त्याचेच एक प्रातिनिधिक स्वरूप .                        भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल( political geography  ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography )वगैरे . मात्र शालेय  अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय क...

योद्धा संन्यासी

इमेज
                                 मरगळलेल्या समाजाचा देश जो  स्वतःचे सत्व विसरलेला होता ,त्या देशाला गतवैभवाची आठवण करून देऊन स्वतःत आत्मविश्वास भरणारा , त्याला फिनिक्ष पक्षाप्रमाणे उभारी देणारा , जगातील अन्य देशांना स्वतःच्या देशाविषयी मनातील प्रतिमेत  नकारात्मक प्रतिमेपासून सकारात्मक बदलण्यास भाग पडणारा संन्यासी म्हणजे  स्वामी विवेकानंद , आणि त्यांचा देश म्हणजे आपला भारत देश .                        १२ जानेवारी ही त्यांची जन्मतारीख . त्याबद्दल त्यांना विन्रम आदरांजली . त्यांची जयंती भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केली जाते .                 स्वामीजींनी निव्वळ जगाला भारताविषयीची साप  गारुड्यांच्या देश ही प्रतिमा बदलून थोर ज्ञानाचा देश अशरायलाच लावली असे नव्हे तर , भारतातील गोरगरिबांची सेवा देखील केली . रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ही त्याचीच प्रतीके . मी...

साने गुरुजी आम्हाला माफ करा

इमेज
                 साने गुरुजी यांनी भाषाभगिनी संकल्पना मांडली. ज्या अंतर्गत विविध भाषेतील साहित्यीकांनी एकत्र येणे अपेक्षीत होते . नयनतारा  सहगल यांनी 92व्या मराठी साहित्य संमेलन हजेरी लावली असती तर ही संकल्पना पुढे आणता आली असती जी  त्यांच्या अनुपस्थीमुळे प्रत्यक्षात आलेली नाही मराठीतील उत्तुंग प्रतिभेचे लेखक असलेल्या साने गुरुजींच्या कल्पनेची पायमल्ली मराठी भाषिक व्यक्तींनीच  केली या इतके दुर्देवी घटना खचितच दुसरी कोणती असेल? साने गुरुजी आम्हाला माफ करा  गुरुजी एका भारतीय  भाषेतील पुस्तके भारतातील अन्य भाषेत अनुवादित करून  भाषा भाषांमधील लोकांनी परस्पर सुसंवाद करावा किती उत्तम कल्पना तुम्ही मंडळी त्यामुळे बंगाली संस्कृतीचे वातावरण असणारा कबुलीवाला हि कथा मराठी लोकांना अनुभवयास मिळाली . अन्य भाषेतील अनेक सुंदर सुंदर पुस्तके त्यामुळे मराठीत अनुवादित झाली अन्य भाषिक साहित्यांकांची पुस्तकांची मौज त्यामुळे मराठी रसिकांना चाखता आली . मात्र मराठीतील किती पुस्तके अन्य भाषेत भाषांतरित झाली हा संशोधनाचा विषय ठराव इतकी द...

लोकपाल हाजीर हो

इमेज
                        सध्या सर्वत्र आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झालीये सत्ताधिकाऱ्यांवर अनेक मुद्दे निव्वळ  निवडणुकीचे असल्याचा आरोप विरोधकांकडून केला  जात आहे . ज्यामध्ये १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा होणाच्या आरोप मुख्यतः केला जातोय . मात्र २०१४ साली सध्याचे सत्ताधिकारी निववळ  हेच आश्वासन देऊन आलेले नव्हते  . तर आम्ही अत्यंत ताकदवान लोकपाल आणू , हे पण आश्वासन त्यावेळच्या विरोधात असणाऱ्या आणि सध्या सत्ताधिकाऱ्यानी दिले होते . याला मागच्या सरकारच्या काळात उघडकीस आलेल्या भष्टाराच्या प्रकरणांची पार्श्वभुमी होती. तेव्हा हा मुद्दा अत्यंत महत्तवाचा होता . किंबहुना तत्कालीन सरकारचा पराभव होण्यासाठी हेच  महत्तवाचे कारण होते . तेव्हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकावरचे आंदोलन विशेष चर्चेत होते . तेव्हा माजी भारतीय प्रशाकीय अधिकारी अरविंद केजरीवाल यांनी हाच धागा पकडून आम आदमी पार्टी अर्थात आपची स्थापना केली आणि दिल्लीतील सत्ता स्थापन केली त्यां...

बदलते जग आणि मी

इमेज
                                   सध्या आपण सर्वच प्रचंड मोठ्या स्थितांतरांतून जात आहेत . ज्यामध्ये माणूस एकीकडी समाजकेंद्रीत सोडून व्यक्तिकेंद्रित होता चालला आहे . मग आपल्याकडे होणारी भूमिपुत्रांची होणारी  अथवा अमेरिकेतील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची  भूमिका तसेच वाढत्या आत्महत्या ही सगळी त्याचीच उदाहरणे आहेत . सध्या पारंपरिक प्रकारचा रोजगाराच्या संधी कमी होता असताना पूर्वी विचार ही  केलेली क्षेत्रे रोजगारासाठी उपलबद्ध होत आहेत जसे उबेर इट झोम्याटयो , स्वीगी सारख्या सेवा क्षेत्रातील रोजगार उपलब्ध होत असताना टेलिकॉम क्षेत्राला आलेली मरगळ,  विविध ऑनलाईन रिचार्ज सुविधांमुळे मोबाईल  मरगळ . एन डी टी व्ही सारख्या वाहिन्या कॅमेरामन संस्कृतीला ब्रेक देत रिपोर्टर कडूनच स्लेफी च्या माध्यमातून करत असणाऱ्या रिपोर्टींग किंवा सध्या नव्याने उदयास  सिटीझन जर्नालिस्ट या प्रकारामुळे वर्तमानपत्रात असणाऱ्या पत्रकारांच्या कमी होणाऱ्या संधी किंवा ईमेलच्या सुविधेमुळे बीएसएनएल सारखय...