पोस्ट्स

त्या वेळेस काय ?

इमेज
               पुण्यामध्ये तरुणांसाठी  मनोरंजन करण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत जसे  झेड ब्रीज  फर्ग्युसन  रोड कँम्प वगैरे माञ माझ्यासारखी अवलिया विचिञ  माणसे रविवार सायंकाळ घालवतात ती दांडेकर पुलावर हणजेच तेथील रामक्रूष्ण मठामध्ये रविवार सायंकाळी पाच ते साडेसात दरम्यान मुख्य मंदिराच्या खालच्या सभागृहात होणाऱ्या युथ फोरम या कार्यक्रमात (आता मनोरंजनाचे इतर चांगले पर्याय उपलब्ध असता ना तिथे जाणे हे अवलियाचेच लक्षण नाही का? )तिथे मठाचे स्वामी युथ वर्गास (मी जाणूनबुजून इंग्रजी शब्द वापरला आहे माझा पूर्वानुभवात एका यंग जनरेशनच्या मंचात तरुण हा शब्द असल्याने मूली तिथे येत नसल्याचे ऐकले होते म्हणून इंग्रजी शब्द ज्यात सर्व Gender includ )त्यांचा विविध समस्येबाबत मार्गदर्शन करत असतात त्यामध्ये आलेल्या अनुभवा विषयी मी बोलणार आहे           एका कार्यक्रमात तेथील स्वामीजी म्हटले होते,की  देवाला प्रत्येकाची परीस्थीती माहीती असते आणि ईश्वर त्यानुसारच...

संगीत दिनाच्या निमित्याने

इमेज
             वर्षातील काही दिवस विलक्षण हटके असतात . एकाच दिवशी दोन किंवा तीन महत्तवाचा घटना त्या दिवशी घडलेल्या असतात, अथवा आपल्या आयुष्यावर प्रचंड परीणाम करणाऱ्या दोन अथवा तीन बांबीविषयक दिन त्या दिवशी साजरा करण्यात येतो. वर्षातील 172 वा अथवा लिप वर्षातील 173 व्या दिवशी उगवणारा 21 जून असाच एक हटके दिन . या दिवशी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो.  आपण सर्वांनी वृत्तपत्रात वाचले आहे वाहिन्यांवर बघीतले आहे तो म्हणजे  आंतरराष्ट्रीय योग दिन . मात्र मी बोलणार आहे , मराठी वृत्तपत्रात फारसा चर्चीला न गेलेला दिन , अर्थात आंतरराष्ट्रीय संगीत दिन         संगीताचे मानवी आयुष्यातील स्थान अनन्य साधारण आहे . निव्वळ मनोरंजनासाठीच नव्हे तर , सध्याचा आधुनिक वैद्यकशास्त्रातसुद्धा अनेक दुर्धर  व्याधींचे निदान होण्या बरोबर त्यांच्यावर उपचार होण्यासाठी सांगीताचा केला जातो . त्याचप्रमांणे आंतरराष्ट्रीय राजकारणात  शांततेचे प्रतीक म्हणून देखील संगीताचा वापर होतो . तर या संगीता  प्रित्यर्थ...

वाचनाचे नवे स्वरूप

इमेज
         आपल्याकडे "वाचाल तर वाचाल " अशी एक म्हण प्रचलित आहे . जर वाचन केले तर प्रगती होतोय लोकांत मन मिळतो , मनुष्य बहुश्रुत होतो , अशा या म्हणीचा अर्थ . आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी अनेक महान व्यक्तिमत्व या वाचनामुळे घडली . समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा वाचनाचे महत्व आपल्या रचनेनेतून संगीतातले आहेच . ते म्हणतात "दिसामाजी काहीतरी ते लिहावे , प्रसांगी अखंडित वंचित जावे,  शहाणे करून सोडावे सकल  जण''  .         या वाचनाचे अनेक पर्याय सध्या आपणांकडे आलेली आहेत . पारंपरिक छापील पुस्तकांबरोबरच अत्याधुनिक अश्यां इ बुक सारख्या पुस्तकांमुळे  पुस्तकांचे विश्व अधिकच रुंदावले आहे . किंबहुना यामध्ये रोजच भर पडत आहे . आधुनिक साधनांमुळे कमी जागेत कमी खर्चात जास्त संख्येनं पुस्तके साठवली जात असलयाने पुस्तकांचे हे जग रुंदावत आहे . काही जण आधुनिक साधनांमुळे वाचन संस्कृती धोक्यात आल्याची ओरड करतात ,.मला हे मान्य नाही . माझ्या मते अशी ओरड करणारे निव्वळ छापील  पुस्तकांचा विश्वात रममाण होणारे असतात . वाचनाच्या  नव्य...

हेतू योग्य , कृती अयोग्य

इमेज
                      सध्या महाराष्ट्रातील शैक्षणिक वातावरण विविध वादांनी गाजतंय , ज्यात इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमाचा विषय प्रमुख आहे . अभ्यासक्रमात गणित विषयातील क्लिष्टता दुर व्हावी या उद्देशाने संख्या शिकवण्याची पद्धत याचा मुळाशी आहे . या बाबत एका वाक्यात सांगायचे झाल्यास , हेतू चांगला प्रामाणिक आहे, त्याबद्दल शंका घेण्यास वावच नाहीत, मात्र हे राबवण्याची पद्धत पुर्णतः.अयोग्य आहे                  शिक्षणाद्वारे  कमकुवत व्यक्तींचा क्षमता वाढवणे अपेक्षीत असताना, अस्तिवात असलेल्या क्षमतेला अनुसरुन अभ्यासक्रम राबवल्यास क्षमता अजून खालावेल मग त्या वेळेस दर्जा अजून खालवणार का ? हा प्रश्न आहे . क्षमता वाढवणे हाच एकमेव उपाय यावर आहे.                   आणि अश्या पध्द्तीने शिकलेले लोक आयष्यातील अडीअडचणींना तोंड देण्यास सक्षम होतील का ? मी एका ठिकाणी व्याख्यान ऐकलेले होते , त्यात त्यांनी सांगितले होते . आयुष्यातील अडचणींना घाबरायचे...

खेळांचा राजा बुद्धिबळ

इमेज
                                  आपल्याकडे आंब्याला फळांचा राजा , गुलाबाला फुलांचा राजा  म्हणून संबोधले जाते . त्याचा धर्तीवर खेळांचा राजा म्हणून कोणास संबोधायचे झाल्यास ती जागा घेण्यासाठी बुद्धिबळापेक्षा दुसरा दावेदार असूच शकत नाही , यात शंका नसावी . शारीरिक तंदरुस्तीबरोबर बुद्धीचे सामर्थ्य जोखणारा दुसरा खेळ असूच शकत नाही . काही जणांना आश्चर्याचे वाटेल, मात्र बुद्धिबळात शारीरिक क्षमता काशीकाय  जोखली जाते ? त्यांना मी सांगू  इच्छितो की  निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते हे तुम्हाला ज्ञात असेलच . जर तुमचा एखादा पाय अथवा एखादा हात जर जायबंदी असेल तर तुम्ही योग्य पध्द्तीने एखाद्या गोष्टीवर लक्ष देऊ शकणार नाही . आता शाररिक तंदुरुस्ती शिवाय आपण हातपाय जायबंदी होण्यापासून कसे काय रोखू शकू ? म्हणजेच एकाच वेळी शारीरिक आणि मानसिक कणखरपणा जोखणारा हा खेळ आहे .                  काही जण असे हि म्हणू शकतील की बाकीच्या सर्वच खेळात कमी अधिक प्रमाण...

माझे पहिले भाषणाची हकिकत भाग 2

इमेज
           वक्तृत्व ही एक कला आहे . याचा अनुभव मी नुकताच घेतला . त्या मागची पाश्वभुमी मी या आधीच सांगितली आहे . जर तूम्हाला त्याचे वाचन करायचे असल्यास लेखाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे .       जो सतत वाचतो , तो कालांतराने खुप छान लिहुही शकतो, मात्र माझ्या मते हा न्याय  वक्तृत्वास लावता येणे अशक्यप्राय आहे .जो सतत अन्य वक्त्यांचे वक्तृत्व ऐकतो ,तो छान बोलूच शकेल असे नाही . मीही अनेक भाषणे ऐकतो , म्हणून मी छान बोलू शकतो , असे म्हणणे धाडसाचे ठरेल .किमान माझा पहिला अनुभव तरी हेच सांगत आहे .      वक्तृत्व ही कला आहे, त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असे माझे मत आहे . शब्दांची गती, तयार भाषणात समोरच्या रसिकांचा मुड बघून यथायोग्य बदल करणे . ते बदल  आहेत, हे श्रोत्यांच्या लक्षात न येवू देणे .             उपस्थित मान्यवरांचा यथोचित उल्लेख करणे . प्रासंगिक विनोदाला , आधीच्या  वक्त्याच्या संदर्भ आपल्या आधीच तयार केलेल्या भाषणात जोड...

सिहासनची चाळीशी

इमेज
               चित्रपट हे समाजावर फार मोठा प्रभाव टाकणारे माध्यम आहे .मात्र याचा विचार फारच थोडे सिने निर्माते  करतात , असे सर्वसाधारण चित्र आहे . जे निर्माते याचा विचार करतात , त्यांनी निर्माण केलेले चित्रपट कालातीत ठरतात . जसे जुने सिने निर्माते गुरुदत्त . आपल्या मराठीत हा मान  द्यायचा झाल्यास निसंकोच तो मान  जब्बार पटेल याना द्यावा लागेल . त्यांनी निर्माण केलेला सिहासन हा चित्रपट निर्मण होऊन आज चाळीस वर्षे होत आली , तरी साध्याचाच चित्रपट बघत आहोत , असे वाटते. इतकी त्याची कथासूत्र सरस आहे , आणि त्याची बांधणी सुद्धा सरसच आहे . याचा प्रत्यय आपणास पहिल्या क्षणापासून येतो .                       चित्रपटाचा पहिल्या फ्रेम मध्येच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा लॉंग शॉट जवळ जवळ येते दिग्गु(निळू फुले ) या व्यक्तिरेखेवर स्थिरावतो . नंतर त्याचा प्रवास चित्रित करत चित्रपट सुरु होतो .एखाद्या सर्वोत्त्कृष्ट कथेला तितकीच साजेशी पटकथा कशी असावी , याचे यासारखे  उदाहरण खचित...