पोस्ट्स

भारतीय कला आणि आपण

इमेज
दिनांक 9जूलै  2019 ची ही गोष्ट आहे,  मी डिडी इंडीया नामक वाहिनी बघत होतो.  त्या वाहिन्यावर ईशान्य भारतातील नृत्यप्रकारावर तयार केलेला एक माहितीपट (ड्याक्युमेंटरी) दाखवत होते.  माहीतीपट छान होता त्यामुळे मला खुप छान माहिती मिळाली.  त्या माहितीची मी पुनरावत्ती काही करत नाही, कारण त्या  कार्यक्रमाचे पुर्नप्रक्षेपण होते का?  यासाठी साठी तरी तूम्ही ती वाहिनी बघाल.  त्या शोध मोहिमेत जसे कोलंबसला भारत शोधताना अमेरीका सापडली तशाच अन्य चांगला कार्यक्रम सापडु शकतो . तेव्हा तूमचा तो आनंद मी का म्हणून हिरवावा ? आणि  दुसऱ्याने सांगितल्यापेक्षा एखादी गोष्ट स्वता:हून करण्यातली मजा काही औरच असते.                          त्यावेळी विचार आला आपल्या भारतात नृत्याचेच  किती प्रकार आहेत . कुचीपुडी भरतनाट्यम मोहिनीअट्टम असे काही सुप्रसिध्द प्रकार आपणास ज्ञात असतात.  माञ खास या लोककलेला समर्पित अशा कार्यक्रम  कोणत्याच वाहिनीवर होताना दिसत नाही . त्याची माहीती क...

जरी झाली आपणास जाउनी वर्षे 99

इमेज
या वर्षी एक ऑगट रोजी येणारी  लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी अत्यंत विशेष असणार आहे . कारण त्या पुण्यतिथीपासून लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरण दिनाचे 100वे  वर्ष सुरु होईल . लोकमान्य टिळकांचे निधन 1 ऑगस्ट 1920 ला झाले होते . शंभर वर्ष हा फार मोठा कालखंड झाला . त्यामुळे या पुण्यतिथीचे महत्व अन्यनसाधारण असणार आहे . लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वतंत्रलढ्यात फार मोठे योगदान दिले होते . ऑनी बेझंट या आयरिश स्वतंत्रलढ्यात महत्तवाची भूमिका बजावणाऱ्या महिला स्वातंत्र्यसैनिकेबरोबर त्यांनी होमरूल  चळवळ  ही सुरु केली . त्यांनी  केसरी या वृत्तपत्राद्वारे सामाजात लढ्याची धार कायम तेवत ठेवली .त्यांच्या लेखनामुळे अनेकांना स्वतंत्रलढ्यात भाग घेण्यासाठी स्फूर्ती मिळाली . मुंबईमधील गिरणी कामगार बाबू गेनू घे त्यापैकी एक महत्वाचे नाव . . त्यांनी पुण्यात अनेक संस्थांची उभारणी केली . ज्या मध्ये डेक्कन प्रोग्रेसिव्ह सोसयटी ही प्रमुख संस्था आहे . अनेक महत्वाच्या  महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषवले . सर परशुरामभाऊ हे महाविद्यालय त्यापैकीच एक . त्यांनी फक्त  क्रांतिकारी विचारा...

कला शाखेचा अंत ?

इमेज
  सध्या भारतासमोरचा सर्वात मोठा यक्षप्रश्न म्हणून बेरोजगारीकडे   समाजशास्त्रज्ञ   बघत आहेत . त्यावर सरकारही नवे उद्योग उभारण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे . मात्र या कारखन्यांमध्ये काम कोण करणार ? सर्व जण त्या कारखन्यात काम करु शकतील का ? याकडे कोणीही लक्ष देत नाहीये . मला तूम्हाला लक्ष वेधून घायचे आहे ते त्याकडे .  ज्यांना यांत्रिकीची जाण आहे   अश्या  व्यक्ती कारखान्यात कामगार म्हणून काम करतील . ज्यांना हिशेबाचे ज्ञान आहे अश्या व्यक्ती वाणिज्य शाखेतील कामकाज सांभाळतील मात्र प्रश्न उरतो तो कला शाखेतील विद्यार्थ्यांचा . त्यांच्याकडे यापैकी   कोणतेच कौशल्य नसणार . मग अशा बेरोजगार     तरुणाईने काय करायचे ? सध्या कोणीच त्यांच्या   प्रश्नाकडे    बघत नाहीये . माझ्या माहितीप्रमाणे अश्या कात्रीत सापडलेल्या तरुणाईची संख्या प्रचंड आहे .                  नाही म्हणायला " मानसशास्त्र " सारख्या ...

जब हमने दुनिया मांगी काटोंका हार मिला

इमेज
     चित्रपट हे समाजाचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाचे उत्कृष्ट माध्यम आहे याची   जाण भारतातल्या अत्यंत मोजक्या सिने निर्मात्यांना आहे , असे अत्यंत  खेदाने खेदाने म्हणावे लागते लागते . या    मोजक्या सिने निर्मात्यांमध्ये गुरुदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल . 9 जुलै हा  त्यांचा जन्मदिवस त्याप्रत्यर्थ त्यांना विन्रम आदरांजली .           गुरुदत्त यांनी भारतीय सिनेश्रुष्टिला  वेगळयाच उंचीवर नेऊन पोहचवले त्यांनी आधुनिक  तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या सिने निर्मितीत केला . त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरे देखील केले . मानवी  आयुष्यातील  दुःखांना रुपेरी पडद्यावर चित्रित करणे आणि त्यातून समाजाचे प्रबोधन करत मनोरंजन करणे यात त्यांचा  कोणी धरू शकणार नाही . दुर्दैवाने त्यांचे अकाली वयाच्या ३९  व्या वर्षी  निधन झाले त्यांचा 20 वर्षाच्या सिने कारकीर्दीतील   शेवटची 10 वर्षे अत्यंत  मह्त्तवाची आहेत . त्याचा विवाह,  त्यांचे असफल  प्रेमप्रकरण  आणि त्यांचा दुर...

चंद्रमोहिमांची पन्नासी

इमेज
मानवाने निल आँम्सस्टाँंगच्या माध्यामातून चंद्रावर पाउल ठेवले त्याला या जूलै महिन्यात 50 वर्षे अर्थात अर्ध्या  शतकाचा कालावधी उलटून गेला आहे . 20 जूलै 1969 ला युनाटेड स्टेटस् आँफ अमेरीका या देशाच्या निल आँमस्टाँगने मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा पृथ्वीबाहेरील  एका ग्रहावर पाउल ठेवले . त्यानंतर अनेक व्यक्ती चंद्रावर जाउन परत भुतलावर आल्या. अपवाद अपोलो 13 या यानाचा .(सुनिता विल्यम्स या आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकात गेल्या होत्या , नकी चंद्रावर ) या पन्नास वर्षात तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे . मात्र चंद्र वगळता अन्य कोणत्याही अवकाशातील ग्रहावर मानवाचे पदचिन्ह पडलेले नाही . नाही म्हणायला मंगळवार पाऊल  टाकण्याचे मानवाचे प्रयत्न सुरु आहेत . मात्र अजूनही त्याला यश मिळालेले नाही .         त्यावेळच्या महासता असणाऱ्या युनाटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि   युनाटेड सोव्हियत   सोशालिस्ट रशिया    या दोन महासत्तांच्या एकमेकांच्यावर अंतराळ विज्ञानात कुरघोडी करण्याचा प्रयत्नात मानवाची झालेली प्रगती .  दुसऱ्या महायुद्धानंतर उदया...

स्मरण ऐतहासिक समुद्र उडीचे

इमेज
                              स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे  ऐकताच मन आदराने अणि आनंदाने  भरून न येणारा खचितच एखादा मराठी माणूस असावा.   सावरकरांचे संपूर्ण आयुष्यच धगधगते अग्निकुंड होते असे  म्हंटल्यास ठरू नये . त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी त्यांना युनाटेड किंग्डम या देशातून भारतात आणताना फ्रांसच्या किनाऱ्यावर मारलेली उडी . 2019 या वर्षी या ऐतिहासिक उडीला 109 पूर्ण होत आहेत . याच उडीमुळे त्यांच्यावर हेगच्या आंतराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला . मुक्ततेसाठी त्यांनी केलेला हा प्रयोग जरी दुर्दैवाने फसला असला तरी त्याचे मोल विसरता येण्यासारखे नाही . जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर भारताला स्वातंत्र्य बऱ्याच आधी मिळाले असत कदाचित  देशाची फाळणी सुद्धा रोखली गेली असती.  मात्र आपल्या दुर्दैवाने हे घडले नाही.  ऑनी बेझंट  या सावरकरांना मदत देण्यात काही कारणाने कमी पडल्या  आणि सावरकर ब्रिटिशांचा कैदेत पकडले गेले . आणि त्यांना 2 जन्मठेपेची 50...

राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धा , एक दुर्लक्षीत स्पर्धा

इमेज
                       सध्या भारतात सर्वत्र इंग्लडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट या मुळातील भारतीयांचा नसणाऱ्या खेळाच्या विश्वचषकाची चर्चा मोठ्या जोमात सुरु आहे . इंग्लडची एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकात सत्ता असणाऱ्या 71 देशांपैकी हाताचा बोटावर मोजता येईल इतक्या देशात खेळला जाणारा हा खेळ . इंग्लडचा संपुर्ण वसाहतीतसुद्धा जो खेळ खेळला जात नाही असा हा खेळ .  भारतात राष्ट्रीय धर्म बघीतला जातो .                    मात्र या सर्व रणधुमाळीत  भारतात नुकत्याच  ज्या खेळाच्या  राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या तो बुद्धीबळ  हा खेळ मात्र दुर्लक्षीला गेला .तर सांगायचा मुद्दा असा की नुकत्याच 30 जून ते 7 जूलै दरम्यान बुद्धीबळाच्या राष्ट्रकुल संघटनेचा स्पर्धा दिल्लीत संपन्न झाल्या .मात्र या स्पर्धेला माध्यमांमध्ये तूरळक प्रसिद्धी मिळाली . अर्थात हे होणे स्वाभाविकच होते .   ...