चंद्रमोहिमांची पन्नासी

मानवाने निल आँम्सस्टाँंगच्या माध्यामातून चंद्रावर पाउल ठेवले त्याला या जूलै महिन्यात 50 वर्षे अर्थात
अर्ध्या  शतकाचा कालावधी उलटून गेला आहे .20 जूलै 1969 ला युनाटेड स्टेटस् आँफ अमेरीका या देशाच्या निल आँमस्टाँगने मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा पृथ्वीबाहेरील  एका ग्रहावर पाउल ठेवले . त्यानंतर अनेक व्यक्ती चंद्रावर जाउन परत भुतलावर आल्या. अपवाद अपोलो 13 या यानाचा .(सुनिता विल्यम्स या आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकात गेल्या होत्या , नकी चंद्रावर ) या पन्नास वर्षात तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे . मात्र चंद्र वगळता अन्य कोणत्याही अवकाशातील ग्रहावर मानवाचे पदचिन्ह पडलेले नाही . नाही म्हणायला मंगळवार पाऊल  टाकण्याचे मानवाचे प्रयत्न सुरु आहेत . मात्र अजूनही त्याला यश मिळालेले नाही .
   
    त्यावेळच्या महासता असणाऱ्या युनाटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि   युनाटेड सोव्हियत   सोशालिस्ट रशिया    या दोन महासत्तांच्या एकमेकांच्यावर अंतराळ विज्ञानात कुरघोडी करण्याचा प्रयत्नात मानवाची झालेली प्रगती .  दुसऱ्या महायुद्धानंतर उदयास आलेल्या या दोन महासत्तांमध्ये पृथ्वीवर वर्चस्व गाजवल्यावर अंतराळ विज्ञानात त्यांची स्पर्धा सुरु झाली .   सुरवातीला युनाटेड सोव्हियत   सोशालिस्ट रशिया  याने प्रगती केली    त्यांनी सर्व प्रथम अंतराळात पहिल्यादा मानवाला पाठवले . प्रगती झालेली बघून तत्कालीन अमेरिकेच्या अध्यक्षांचे पित्त खवळले त्यांनी नासाच्या शास्त्रज्ञांना अधिक जोमाने काम करण्यास सांगितले . त्याची फलनिश्चिती 20 जुलै 1969 ला मानवाचे पहिले पाऊलचनद्रवर पडले .
 आतापर्यंत भारतासह 6  देशांनी चंद्रावर आपले अस्तिव जाणवून दिले आहे . भारत  रशिया , अमेरिका जपान , युरोपीय युनियन आणि चीन हे तीन
 काही अभ्यासकांच्या मते अमेरिका अजूनही चंद्रावर गेलेली नाही . 20 जुलै1969 ला एका स्टुडिओत हे चित्रीकरण करण्यात आले आणि ते दाखविण्यात आले . त्यासाठी ते अमेरिकेच्या फडफडणाऱ्या झेंड्याचे उदाहरण देतात . अर्थात प्रत्येक गोष्टीला बोलणारे लोक असतातच . मला त्या वादात पडायचे नाही . असो
मानवी इतिहासात हि फार मोठी घटना होती हेच खरे . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?