पोस्ट्स

आखाती देशातील अशांतता

इमेज
सध्या तेल उत्पादक असणाऱ्या आखाती देशांत प्रचंड प्रमाणात अशांतता आहे .10 जूलै रोजी इराणने युनाटेड किग्डम या या देशाच्या जहाजांना पकडल्याने त्यात भरच पडली आहे  या तणावाचा केंद्रबिंदू असणाऱ्या इराणबरोबर आपल्या भारताचे अनेक प्रकल्प सुरू आहेत . त्यांना यामुळे खीळ बसू शकते . शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने पाकिस्तानवर अंकुश ठेवण्यासाठी आपणास इरान अत्यंत महत्तवाचा देश आहे . (पाकिस्तान आणि इराण हे शेजारी  देश असले तरी  दोघांमध्ये अनेक विषयावर वाद आहे ) अफगाणिस्तानमध्ये भारताचे अनेक प्रकल्प सुरु आहेत . त्याना    आवश्यक ती मदत इराणमधून आपण करत असतो . याच इराणमध्ये आपण चागबहार हे बंदर विकसीत करत आहोत. जे चीन पाकिस्तानात विकसित करत असणाऱ्या ग्वादार या बंदरापासून हाकेच्या अंतरावर आहे . त्यामुळे  मूळ मुद्दा जरी इराण आणि अमेरिकेबरोबरच असला तरीआपणास  या मुद्यांना बगल देता येणे अशक्य आहे . आपणास याच चष्म्यातून या मुद्याकडे बघावे लागेल . याची सुरवात कशी झाली हे बघायचे असल्यांस आपणास बराक ओबामा यांच्या कार्यकाळापर्यंत मागे जावे लागते . बराक ओबामा अमेरिके...

आठवणीतील जुलै महिना

इमेज
             जूलै महिन्याचा पंधरवडा जसा जवळ येतो तश्या भारताचा विविध जखमांची आणि  समस्यांची खपली निघण्यास सुरवात होते मग ती कधी दहशतवादाचा प्रश्न असो लोकसंख्येचा प्रश्न असो किंवा प्रदुषणाचा प्रश्न असते किंवा भारताचे आँस्कर प्राप्तीचे स्वप्न कधी पूर्ण होणार ?भारताच्या 1991च्या  अर्थव्यवस्थेची ,अथवा गैरकारभाराची 26जूलै ची असते त्यातील दहशतवाद लोकसंख्या आणि  प्रदुषणाचा प्रश्न आणी भारताच्या आँस्कर वारीची बस चुकण्याची या सर्वांची एकञीत खपली निघते ती 9जूलै 10 आणि  11 जूलैला.  9जूलै हा जे अजून काही काळ जगले असते तर भारताला नक्कीच एखाद दुसरे ऑस्कर  मिळाले असते असे अप्रतीम चिञपट तयार करणारे गुरुदत्त यांचा जन्मदिवस दुर्दैवाने  ते गीता दत्त आणि  वहीदा रेहमान  यांच्या प्रेमाच्या काञीत सापडले आणि त्यांचा म्रूत्यु झाला 10 जूलै ला पुण्याचा मध्यवस्तीतील फरासखाना येथे बॉम्बस्फोट झाला होता तर 11जूलै ला मुंबईत पश्चीम रेल्वेवर साखळी बॉम्बस्फोट झाले होते माञ मुंबईतील बॉम्बस्फोट येव्हढेच 11जूलैचे महत्व नाही तर  ...

भारतीय कला आणि आपण

इमेज
दिनांक 9जूलै  2019 ची ही गोष्ट आहे,  मी डिडी इंडीया नामक वाहिनी बघत होतो.  त्या वाहिन्यावर ईशान्य भारतातील नृत्यप्रकारावर तयार केलेला एक माहितीपट (ड्याक्युमेंटरी) दाखवत होते.  माहीतीपट छान होता त्यामुळे मला खुप छान माहिती मिळाली.  त्या माहितीची मी पुनरावत्ती काही करत नाही, कारण त्या  कार्यक्रमाचे पुर्नप्रक्षेपण होते का?  यासाठी साठी तरी तूम्ही ती वाहिनी बघाल.  त्या शोध मोहिमेत जसे कोलंबसला भारत शोधताना अमेरीका सापडली तशाच अन्य चांगला कार्यक्रम सापडु शकतो . तेव्हा तूमचा तो आनंद मी का म्हणून हिरवावा ? आणि  दुसऱ्याने सांगितल्यापेक्षा एखादी गोष्ट स्वता:हून करण्यातली मजा काही औरच असते.                          त्यावेळी विचार आला आपल्या भारतात नृत्याचेच  किती प्रकार आहेत . कुचीपुडी भरतनाट्यम मोहिनीअट्टम असे काही सुप्रसिध्द प्रकार आपणास ज्ञात असतात.  माञ खास या लोककलेला समर्पित अशा कार्यक्रम  कोणत्याच वाहिनीवर होताना दिसत नाही . त्याची माहीती क...

जरी झाली आपणास जाउनी वर्षे 99

इमेज
या वर्षी एक ऑगट रोजी येणारी  लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी अत्यंत विशेष असणार आहे . कारण त्या पुण्यतिथीपासून लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरण दिनाचे 100वे  वर्ष सुरु होईल . लोकमान्य टिळकांचे निधन 1 ऑगस्ट 1920 ला झाले होते . शंभर वर्ष हा फार मोठा कालखंड झाला . त्यामुळे या पुण्यतिथीचे महत्व अन्यनसाधारण असणार आहे . लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वतंत्रलढ्यात फार मोठे योगदान दिले होते . ऑनी बेझंट या आयरिश स्वतंत्रलढ्यात महत्तवाची भूमिका बजावणाऱ्या महिला स्वातंत्र्यसैनिकेबरोबर त्यांनी होमरूल  चळवळ  ही सुरु केली . त्यांनी  केसरी या वृत्तपत्राद्वारे सामाजात लढ्याची धार कायम तेवत ठेवली .त्यांच्या लेखनामुळे अनेकांना स्वतंत्रलढ्यात भाग घेण्यासाठी स्फूर्ती मिळाली . मुंबईमधील गिरणी कामगार बाबू गेनू घे त्यापैकी एक महत्वाचे नाव . . त्यांनी पुण्यात अनेक संस्थांची उभारणी केली . ज्या मध्ये डेक्कन प्रोग्रेसिव्ह सोसयटी ही प्रमुख संस्था आहे . अनेक महत्वाच्या  महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषवले . सर परशुरामभाऊ हे महाविद्यालय त्यापैकीच एक . त्यांनी फक्त  क्रांतिकारी विचारा...

कला शाखेचा अंत ?

इमेज
  सध्या भारतासमोरचा सर्वात मोठा यक्षप्रश्न म्हणून बेरोजगारीकडे   समाजशास्त्रज्ञ   बघत आहेत . त्यावर सरकारही नवे उद्योग उभारण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे . मात्र या कारखन्यांमध्ये काम कोण करणार ? सर्व जण त्या कारखन्यात काम करु शकतील का ? याकडे कोणीही लक्ष देत नाहीये . मला तूम्हाला लक्ष वेधून घायचे आहे ते त्याकडे .  ज्यांना यांत्रिकीची जाण आहे   अश्या  व्यक्ती कारखान्यात कामगार म्हणून काम करतील . ज्यांना हिशेबाचे ज्ञान आहे अश्या व्यक्ती वाणिज्य शाखेतील कामकाज सांभाळतील मात्र प्रश्न उरतो तो कला शाखेतील विद्यार्थ्यांचा . त्यांच्याकडे यापैकी   कोणतेच कौशल्य नसणार . मग अशा बेरोजगार     तरुणाईने काय करायचे ? सध्या कोणीच त्यांच्या   प्रश्नाकडे    बघत नाहीये . माझ्या माहितीप्रमाणे अश्या कात्रीत सापडलेल्या तरुणाईची संख्या प्रचंड आहे .                  नाही म्हणायला " मानसशास्त्र " सारख्या ...

जब हमने दुनिया मांगी काटोंका हार मिला

इमेज
     चित्रपट हे समाजाचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाचे उत्कृष्ट माध्यम आहे याची   जाण भारतातल्या अत्यंत मोजक्या सिने निर्मात्यांना आहे , असे अत्यंत  खेदाने खेदाने म्हणावे लागते लागते . या    मोजक्या सिने निर्मात्यांमध्ये गुरुदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल . 9 जुलै हा  त्यांचा जन्मदिवस त्याप्रत्यर्थ त्यांना विन्रम आदरांजली .           गुरुदत्त यांनी भारतीय सिनेश्रुष्टिला  वेगळयाच उंचीवर नेऊन पोहचवले त्यांनी आधुनिक  तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या सिने निर्मितीत केला . त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरे देखील केले . मानवी  आयुष्यातील  दुःखांना रुपेरी पडद्यावर चित्रित करणे आणि त्यातून समाजाचे प्रबोधन करत मनोरंजन करणे यात त्यांचा  कोणी धरू शकणार नाही . दुर्दैवाने त्यांचे अकाली वयाच्या ३९  व्या वर्षी  निधन झाले त्यांचा 20 वर्षाच्या सिने कारकीर्दीतील   शेवटची 10 वर्षे अत्यंत  मह्त्तवाची आहेत . त्याचा विवाह,  त्यांचे असफल  प्रेमप्रकरण  आणि त्यांचा दुर...

चंद्रमोहिमांची पन्नासी

इमेज
मानवाने निल आँम्सस्टाँंगच्या माध्यामातून चंद्रावर पाउल ठेवले त्याला या जूलै महिन्यात 50 वर्षे अर्थात अर्ध्या  शतकाचा कालावधी उलटून गेला आहे . 20 जूलै 1969 ला युनाटेड स्टेटस् आँफ अमेरीका या देशाच्या निल आँमस्टाँगने मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा पृथ्वीबाहेरील  एका ग्रहावर पाउल ठेवले . त्यानंतर अनेक व्यक्ती चंद्रावर जाउन परत भुतलावर आल्या. अपवाद अपोलो 13 या यानाचा .(सुनिता विल्यम्स या आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकात गेल्या होत्या , नकी चंद्रावर ) या पन्नास वर्षात तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे . मात्र चंद्र वगळता अन्य कोणत्याही अवकाशातील ग्रहावर मानवाचे पदचिन्ह पडलेले नाही . नाही म्हणायला मंगळवार पाऊल  टाकण्याचे मानवाचे प्रयत्न सुरु आहेत . मात्र अजूनही त्याला यश मिळालेले नाही .         त्यावेळच्या महासता असणाऱ्या युनाटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि   युनाटेड सोव्हियत   सोशालिस्ट रशिया    या दोन महासत्तांच्या एकमेकांच्यावर अंतराळ विज्ञानात कुरघोडी करण्याचा प्रयत्नात मानवाची झालेली प्रगती .  दुसऱ्या महायुद्धानंतर उदया...