पोस्ट्स

नव्या सामाईक चलनाचा प्रसवकळा,

इमेज
सध्या भारतात प्रसिद्दीभिलाषी लोक प्रसिद्धीसाठी  नवनवीन फंडे  अमलात आणत असले, भारताला न मिळालेल्या क्रिकेटच्या विश्वचषकाचा बाबत कवित्व करत असले तरी,  जगाच्या अर्थकारणात आमूलार्ग बदल होत आहेत .  आफ्रिकेच्या पश्चिम  भागातील 15 राष्ट्रांनी समाईक चलन स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय हा त्यापैकीच एक . भलेही जागतिक राजकारणात या राष्ट्रांचे महत्व यत्किंचित  असेल,  मात्र जगाची पऊले कोणत्या दिशेने जात आहेत याची चुणूक यातून दिसते . आपण खाली दिलेल्या नकाशात या देशांचे स्थान बघू शकतात . हे 15 देश पूर्वी फ्रान्सची वसाहत होते . त्याचा खुणा आजही या देशात आपणास दिसतात . या 15 देशांपैकी आठ देशांच्या मध्यवर्ती बँकेचे रोखे हे फ्रान्सच्या बँकेत ठेवले आहेत . फ्रान्सतर्फे त्यांचे चलन प्रसारित केले जाते .  तुम्हाला शेजारी आफ्रिकेच्या नकाश्यात जो हिरवा रंग दिसतोय त्या देशात सन 2020 च्या अखेरपर्यंत ECON  हे सामायिक चलन वापरण्यास सुरवात झाली असेल . आपसातील व्यापारामध्ये सुलभता यावी , या प्रमुख उद्देश्याने त्यांनी हे पाऊल उचललंय या प्रमुख उदेश्या बरो...

आपण कधी बघणार या प्रश्नांकडे

इमेज
काल दिनांक 14जुलैला टिव्हीवर बिबिसी न्युज बघताना एक माहितीपट बघीतला . माहितीपट भारतातील तृतीयपंथीयांच्या समस्येवर आधारित होता . त्यामध्ये काय सांगितले होते त्याचा उहापोह मी येथे करणार नाही . मला लक्ष वेधून घेयचे आहे . त्यांनी मांडलेल्या विषयावर . बीबीसी प्रमाणेच  आखाती देशातील प्रमुख वृत्तवाहिनी असलेल्या अल् जझीरा  या वृत्तवाहिनीवर मी भारतातील विविध समस्यांचे माहितीपट अनेकदा बघतो . (यावर कोणला  त्यांचा भारतविरोधी धोरणाचा वास येईल) चॅनेल न्यूज  एशिया या सिंगापूरच्या वृत्तवाहिनीवर सुद्धा  भारतातील झटपट सुरु होऊन लवकरच बंद पडणाऱ्या स्टार्टअपविषयी एक माहितीपट मी बघितला होता . मात्र भारतीय वृत्तवाहिन्यांवर मी या प्रकारचे माहितीपट कधीच बघितले नाही . भारतातील सर्व समस्या संपल्या आहेत , असेच काहीसे वार्तांकन भारतीय माध्यमांचे असते .ज्या समस्या अन्य परदेशी माध्यमांना सहजतेने दिसतात . त्या समस्या भारतीय माध्यमांना  का  दिसत नाही                भारतातील वृत्तवाहिन्या मनोरंजनाच्या बातम्या अध...

भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी

इमेज
           आपल्या भारताची रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे म्हणून ओळखली जाते . भारतीय रेल्वेत रोज ऑस्ट्रोलिया या देशाच्या एकूण लोकसंख्येएव्हढे लोक प्रवास करतात . भारतीय रेल्वेरुळांची एकत्रित लांबी एक लाख पंधरा हजार किलोमीटर आहे . भारतीय रेल्वे जगातील क्रमांक एकची सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार देणारी संस्था आहे अशी माहिती आपण नेहमीच ऐकतो . मात्र एव्हढीच भारतीय  रेल्वेची ओळख नाही त्यापेक्षा भारतीय रेल्वेची ओळख  ही  फार मोठी आहे . त्याची ओळख करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच .        भारतीय रेल्वेच्या तब्बल 16 उपकंपन्या आहेत . मी उपकंपन्या म्हणतोय हे लक्षात घ्या  , रेल्वेचे झोन आणि डिव्हिजन म्हणता नाहीये . रेल्वेचे झोन ,डिव्हिजन आणि रेल्वेच्या उपकंपन्या या पूर्णतः वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही  गोष्ट लक्षात घ्या . तर या 16 कंपन्या रेल्वेसाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवतात अथवा उत्पादने तयार करतात . काही कंपन्या भारतासाठी परकीय चलन देखील मिळवून देतात . सर्वप्रथम आपण या कंपन्यांची नावे...

जन्मकथा भारतीय अवकाश संशोधन संस्थेची

इमेज
      येत्या सोमवारी 15 तारखेला भारताच्या चंद्रयान 2ला सुरवात होईल .अन्य माध्यमातून चंद्रयानाचे विविध  टप्यांविषयी  आपणास माहिती मिळेलच, त्यामुळे परत मी काही  यावर  बोलणार नाही . मी बोलणार आहे ,चंद्रयानाचा  पालक संस्थेविषयी अर्थात इंडीयन स्पेस रिसर्च आँर्गनाझेशन किंवा जीला इसरो  या आद्यक्षरांनी ओळखले जाते त्या विषयी .  इसरो ही जगातील प्रमुख अंतराळ संस्था आहे . .  मुख्यतः भारत  कार्यक्षेत्र असले तरी भारताशेजारील छोट्या राष्ट्रांना देखील इसरो आपली सेवा पुरवते . या संस्थेचे मुख्यालय बंगळुरू आहे मात्र भारतात विविध ठिकाणी या संस्थेच्या विविध कार्यानंतर्गत  विविध कार्ये केली जातात . त्याची थोडक्यात माहिती लेखाच्या शेवटी  देण्यात येत आहे .                          इसरोची   स्थापना  भारतीय अणू विभागांतर्गत   15  ऑगस्ट 1969 ला करण्यात आली. संस्थेचे पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई होते . भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल...

मनोहारी चमत्कार सृष्टीचा चंद्रग्रहण

इमेज
 येत्या मंगळवारी अर्थात 16 जुलैला आकाशात एक अत्यंत मनोहारी दृश्य दिसणार आहे . यावेळी रात्री एक वाजून बत्तीस मिनिटांपासून पहाटे चार वाजेपर्यंत  आपल्याला आपला लाडका चंद्र काहीसा लाल झालेला दिसेल . मात्र घाबरू नका , तो कोणावर चिडल्याने लाल होणार नसून त्याला ग्रहण  लागल्याने तो लालसर होणार आहे . मित्रानो ग्रहण हा एक  सृष्टीचा एक मनोहारी चमत्कार आहे . तो तुम्ही अवश्य बघावा . येत्या मंगळवारी दिसणारे हे वर्षातील दुसरे मात्र भारतातून दिसणारे पहिले चंद्रग्रहण असणार आहे . तुम्ही खालच्या नकाश्यात हे ग्रहण कोणकोणत्या भागात दिसत आहे , हे बघू शकतात . तुम्ही  बघू शकतात . संपूर्ण आशिया खंड , युरोप खंड अंटार्टिका , दक्षिण अमेरिकका खंड आफ्रिका खंड या भागात हे दिसणार आहे . आणि चंद्रग्रहण आपण साध्या डोळ्याने बघू शकतो , त्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज नसते . मात्र सध्याच्या पावसाळी हवेत हे ग्रहण दिसू शकेल का हा प्रश्नच आहे . आपण देवाकडे प्रार्थना करू की , मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस हवामान पूर्णतः कोरडे ठेव त्या दोन दिवसात पाऊस पडू नको रे बाबा . 17 जुलैला रात्री एक वा...

आखाती देशातील अशांतता

इमेज
सध्या तेल उत्पादक असणाऱ्या आखाती देशांत प्रचंड प्रमाणात अशांतता आहे .10 जूलै रोजी इराणने युनाटेड किग्डम या या देशाच्या जहाजांना पकडल्याने त्यात भरच पडली आहे  या तणावाचा केंद्रबिंदू असणाऱ्या इराणबरोबर आपल्या भारताचे अनेक प्रकल्प सुरू आहेत . त्यांना यामुळे खीळ बसू शकते . शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने पाकिस्तानवर अंकुश ठेवण्यासाठी आपणास इरान अत्यंत महत्तवाचा देश आहे . (पाकिस्तान आणि इराण हे शेजारी  देश असले तरी  दोघांमध्ये अनेक विषयावर वाद आहे ) अफगाणिस्तानमध्ये भारताचे अनेक प्रकल्प सुरु आहेत . त्याना    आवश्यक ती मदत इराणमधून आपण करत असतो . याच इराणमध्ये आपण चागबहार हे बंदर विकसीत करत आहोत. जे चीन पाकिस्तानात विकसित करत असणाऱ्या ग्वादार या बंदरापासून हाकेच्या अंतरावर आहे . त्यामुळे  मूळ मुद्दा जरी इराण आणि अमेरिकेबरोबरच असला तरीआपणास  या मुद्यांना बगल देता येणे अशक्य आहे . आपणास याच चष्म्यातून या मुद्याकडे बघावे लागेल . याची सुरवात कशी झाली हे बघायचे असल्यांस आपणास बराक ओबामा यांच्या कार्यकाळापर्यंत मागे जावे लागते . बराक ओबामा अमेरिके...

आठवणीतील जुलै महिना

इमेज
             जूलै महिन्याचा पंधरवडा जसा जवळ येतो तश्या भारताचा विविध जखमांची आणि  समस्यांची खपली निघण्यास सुरवात होते मग ती कधी दहशतवादाचा प्रश्न असो लोकसंख्येचा प्रश्न असो किंवा प्रदुषणाचा प्रश्न असते किंवा भारताचे आँस्कर प्राप्तीचे स्वप्न कधी पूर्ण होणार ?भारताच्या 1991च्या  अर्थव्यवस्थेची ,अथवा गैरकारभाराची 26जूलै ची असते त्यातील दहशतवाद लोकसंख्या आणि  प्रदुषणाचा प्रश्न आणी भारताच्या आँस्कर वारीची बस चुकण्याची या सर्वांची एकञीत खपली निघते ती 9जूलै 10 आणि  11 जूलैला.  9जूलै हा जे अजून काही काळ जगले असते तर भारताला नक्कीच एखाद दुसरे ऑस्कर  मिळाले असते असे अप्रतीम चिञपट तयार करणारे गुरुदत्त यांचा जन्मदिवस दुर्दैवाने  ते गीता दत्त आणि  वहीदा रेहमान  यांच्या प्रेमाच्या काञीत सापडले आणि त्यांचा म्रूत्यु झाला 10 जूलै ला पुण्याचा मध्यवस्तीतील फरासखाना येथे बॉम्बस्फोट झाला होता तर 11जूलै ला मुंबईत पश्चीम रेल्वेवर साखळी बॉम्बस्फोट झाले होते माञ मुंबईतील बॉम्बस्फोट येव्हढेच 11जूलैचे महत्व नाही तर  ...