पोस्ट्स

शह+ आणि मात #

इमेज
  भारताने जगाला अनेक देणग्या दिल्या आहेत . जसे योगा, आयुर्वेद  , शुन्य, ज्या तत्वज्ञानावर विपश्नना केंद्र चालते असे  बौद्ध तत्वज्ञान ,  आणि बुद्धीबळ ही त्यापैकी काही उदाहरणे . त्यापैकी योगा , आयुर्वेद, बौद्ध तत्वज्ञान अद्वितीय आहेच त्यावर मी पामर नविन काय बोलणार . मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते बुद्धीबळ या खेळाकडे . बुद्धीबळ या खेळाचा उदय जरी भारतात झाला असला , तरी त्याची वृद्धी मात्र रशिया आणि फ्रान्स या देशात झाली . रशियाचा राष्ट्रीय खेळ म्हणून बुद्धीबळ ओळखला जातो .आणि बुद्धीबळाची आंतराष्ट्रीय संघटना म्हणून ओळख असणारी "फेडरेशन आँफ दी इचेस " अर्थात फिडे ही फ्रान्समध्ये उदयास आलेली संघटना आहे , आणि या संघटनेतर्फे सन 1966 पासून दरवर्षी 20 जूलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो         जगात सर्वाधिक वैवध्यपुर्ण असणाऱ्या मोजक्या खेळात याचा समावेश होतो .याची सुरवात , मध्य आणि आंतीम सारेच वैवध्यपुर्ण असते . क्रिकेट सारख्या  खेळात कोण जिंकणार याचा अंदाज बांधता येतो (क्रिकेट विश्वचषकाची आंतीम फेरीसारखे अपवाद असतात ) एखा...

गायकी क्षेत्रातील टँजिडी क्वीन गिता दत्त

इमेज
                     जूलै महिन्याची 20 तारीख उजाडली की सिने चाहत्यांना  आठवण होते ती ,गिता दत्त यांची . अविट गाण्याची प्रतिभा लाभलेली असून देखील , प्रतिभावन तसेच अत्यंत हळव्या मनाचा आपल्या पतीचा आग्रहास्तव त्याने निर्माण केलेले, दिग्दशीत केलेले अथवा त्याने अभिनेता म्हणून काम केलेले चित्रपट वगळता अन्यत्र फारसी  न गायलेली गायिका गिता दत्त . पतीच्या विवाह्यबाह्य  प्रेमप्रकरणाला कडाडुन विरोध करणारी गायिका म्हणजे गिता दत्त .एका प्रसिद्ध सिने अभ्यासकाचा मते  गीता दत्ता या गायीका क्षेत्रातील मिनाकुमारी आहे ज्याप्रमाने अंगी प्रचंड गुणवत्ता असूनही दुर्देवाच्या फेऱ्यात अडकल्याने मिनाकुमारी अभियानाच्या क्षेत्रात जास्त पुढे जाउ शकल्या नाहीत तोच प्रकार काहीसा गीता घोष चौधरी यांच्या बाबत घडला.                   गीता दत्त यांच जन्म सध्याचा बांगलादेशातील फत्तेपुर या गावी एका जमिनदार कूटूबात झाला. 1942 च्या सूमारास त्यांच्या कुटुबियांनी मुंबईत स्थलांतर केले .त्यांच्या ...

चेन्नइ , मराठवाडा , भविष्याची चाहुल देणारे ठिकाणे

इमेज
               आज हा मजकूर लिहित असताना, भारतातील आसाम, बिहार , आदी राज्यात पावसाने कहर केला  आहे , मात्र याच भारतातील मराठवाडा हा विभाग आणि चेन्नई या शहरात पाण्यासाठी वणवण करायची वेळ आलीये       आजमितीस मराठवाड्यात अत्यंत कमी पाणी आहे .तर चेन्नई शहरात रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आलीये . काही जण चेन्नई शहरातील पाण्याचा आणीबाणीला कर्नाटक बरोबर तामिळनाडू या राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सुरु असणाऱ्या वादाला जवाबदार धरतील . मात्र हा वाद  पाण्याचा अनुपलब्धतेमुळेच हा वाद  सुरु झालायं, हे मात्र नाकारुन चालणार नाही . मराठवाड्यात त्याचा भौगोलिक स्थानामुळे अत्यंत कमी पाउस पडतो . त्यातही जो काही पाऊस पडतो तो जमीन जांभ्या खडकांची असल्याने पाणी फारसे जमिनीत मुरत नाही . परिणामि दर एक दोन वर्षानंतर मराठवाड्यावर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येते . सध्याच्या बदलत्या हवामानाचा काळात  पावसाचा लहरीपणा वाढल्याने यामध्ये भरच पडत आहे . आत्यंतिक राज्यनिष्ठा असलेल्या कर्...

हम आपके साथ हे

इमेज
              सध्या आपला मराठवाडा पाण्यासाठी टाहो फोडत असताना भारताचा इशान्य भागात ब्रम्हपुत्रा नदीने अक्षरशः हाहाकार उडवला आहे . इशान्य भारतातील सर्वात मोठे आणि महत्तवाचे राज्य असणाऱ्या आसाममधील 33पैकी 30 जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे .एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या काझीरंगा अभारण्याचा 98% भाग पाण्याखाली गेला आहे . ज्यांना भारताच्या प्राकृतीक रचनेची जाण आहे , त्यांना हे पण लक्षात आले असेल की मेघालय, मिझोराम, मणीपूर नागालँड, अरुणाचल प्रदेश,त्रिपूरा या सर्व राज्यात आपणास बांगलादेशातून न जाता भारतीय हद्दीतून जायचे असल्यास आसामशिवाय तरणोपाय नाही .अरुणाचल या राज्याची तर बातच निराळी .मी या आधी सांगितलेल्या राज्यापैकी अरूणाचल  प्रदेश या राज्यात बांगला देशातून सहजतेने जाता येत नाही जर जायचे असल्यास बांगलादेशातून मणीपूर राज्यात तेथून नागालँड राज्यात तिथून मिझोराम राज्यात पहिल्यांदा जावे लागेल .तिथून मग अरुणाचल प्रदेशात जाता येईल. तर असे हे आसाम राज्य सध्या प्रचंड अस्या पूराच्या विळख्यात सापडले आहे .           ...

नव्या सामाईक चलनाचा प्रसवकळा,

इमेज
सध्या भारतात प्रसिद्दीभिलाषी लोक प्रसिद्धीसाठी  नवनवीन फंडे  अमलात आणत असले, भारताला न मिळालेल्या क्रिकेटच्या विश्वचषकाचा बाबत कवित्व करत असले तरी,  जगाच्या अर्थकारणात आमूलार्ग बदल होत आहेत .  आफ्रिकेच्या पश्चिम  भागातील 15 राष्ट्रांनी समाईक चलन स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय हा त्यापैकीच एक . भलेही जागतिक राजकारणात या राष्ट्रांचे महत्व यत्किंचित  असेल,  मात्र जगाची पऊले कोणत्या दिशेने जात आहेत याची चुणूक यातून दिसते . आपण खाली दिलेल्या नकाशात या देशांचे स्थान बघू शकतात . हे 15 देश पूर्वी फ्रान्सची वसाहत होते . त्याचा खुणा आजही या देशात आपणास दिसतात . या 15 देशांपैकी आठ देशांच्या मध्यवर्ती बँकेचे रोखे हे फ्रान्सच्या बँकेत ठेवले आहेत . फ्रान्सतर्फे त्यांचे चलन प्रसारित केले जाते .  तुम्हाला शेजारी आफ्रिकेच्या नकाश्यात जो हिरवा रंग दिसतोय त्या देशात सन 2020 च्या अखेरपर्यंत ECON  हे सामायिक चलन वापरण्यास सुरवात झाली असेल . आपसातील व्यापारामध्ये सुलभता यावी , या प्रमुख उद्देश्याने त्यांनी हे पाऊल उचललंय या प्रमुख उदेश्या बरो...

आपण कधी बघणार या प्रश्नांकडे

इमेज
काल दिनांक 14जुलैला टिव्हीवर बिबिसी न्युज बघताना एक माहितीपट बघीतला . माहितीपट भारतातील तृतीयपंथीयांच्या समस्येवर आधारित होता . त्यामध्ये काय सांगितले होते त्याचा उहापोह मी येथे करणार नाही . मला लक्ष वेधून घेयचे आहे . त्यांनी मांडलेल्या विषयावर . बीबीसी प्रमाणेच  आखाती देशातील प्रमुख वृत्तवाहिनी असलेल्या अल् जझीरा  या वृत्तवाहिनीवर मी भारतातील विविध समस्यांचे माहितीपट अनेकदा बघतो . (यावर कोणला  त्यांचा भारतविरोधी धोरणाचा वास येईल) चॅनेल न्यूज  एशिया या सिंगापूरच्या वृत्तवाहिनीवर सुद्धा  भारतातील झटपट सुरु होऊन लवकरच बंद पडणाऱ्या स्टार्टअपविषयी एक माहितीपट मी बघितला होता . मात्र भारतीय वृत्तवाहिन्यांवर मी या प्रकारचे माहितीपट कधीच बघितले नाही . भारतातील सर्व समस्या संपल्या आहेत , असेच काहीसे वार्तांकन भारतीय माध्यमांचे असते .ज्या समस्या अन्य परदेशी माध्यमांना सहजतेने दिसतात . त्या समस्या भारतीय माध्यमांना  का  दिसत नाही                भारतातील वृत्तवाहिन्या मनोरंजनाच्या बातम्या अध...

भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी

इमेज
           आपल्या भारताची रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे म्हणून ओळखली जाते . भारतीय रेल्वेत रोज ऑस्ट्रोलिया या देशाच्या एकूण लोकसंख्येएव्हढे लोक प्रवास करतात . भारतीय रेल्वेरुळांची एकत्रित लांबी एक लाख पंधरा हजार किलोमीटर आहे . भारतीय रेल्वे जगातील क्रमांक एकची सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार देणारी संस्था आहे अशी माहिती आपण नेहमीच ऐकतो . मात्र एव्हढीच भारतीय  रेल्वेची ओळख नाही त्यापेक्षा भारतीय रेल्वेची ओळख  ही  फार मोठी आहे . त्याची ओळख करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच .        भारतीय रेल्वेच्या तब्बल 16 उपकंपन्या आहेत . मी उपकंपन्या म्हणतोय हे लक्षात घ्या  , रेल्वेचे झोन आणि डिव्हिजन म्हणता नाहीये . रेल्वेचे झोन ,डिव्हिजन आणि रेल्वेच्या उपकंपन्या या पूर्णतः वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही  गोष्ट लक्षात घ्या . तर या 16 कंपन्या रेल्वेसाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवतात अथवा उत्पादने तयार करतात . काही कंपन्या भारतासाठी परकीय चलन देखील मिळवून देतात . सर्वप्रथम आपण या कंपन्यांची नावे...