पोस्ट्स

उद्या नंतरचा दिवस नव्हे , आजचा

इमेज
        इंग्रजीतील  एक अत्यंत  उत्कृष्ट    चित्रपट म्हणजे    " Day  After  Tomorrow"   अर्थात उद्यानंतरचा दिवस . हवामान बदलाविषयी महत्तवाची  माहिती    शास्त्रीय    पद्धतीने   मात्र तरीही रंजकतेने    देणारा हा चित्रपट . मात्र हा   उद्यानंतरचा दिवस    आजच   उजाडल्यासारखी    स्थिती    सध्याचा हवामानाकडे   बघून वाटण्यासारखी    स्थिती सध्या निर्माण झालीयें .          युरोपात प्रचंड उष्णतेची लाट आली आहे . आपल्या भारतात बहुसंख्य ठिकाणी अत्यल्प पाउस पडलाय . ज्या ठिकाणी तो पडलाय , त्या ठिकाणी अक्षरशः त्याने नकोसे केले आहे . आसाम आणि बिहारमध्ये प्रचंड पूर आले आहेत . काही दिवसापुर्वीचे    दिवस आठवा कडाक्याची थंडी पडल्याचे आणि त्यानंतर असह्य उन्हाचे दिवस तूम्हाला आठवेल . आणि आताचा पावसाचा लहरीपणा . सारेच बदल या चित्रपटाची ...

दुर्देवी घटनेचा अमृत महोत्सव

इमेज
येत्या 6आँगस्टला एका दुर्देवी घटनेला 74 वर्षे पुर्ण होवून 75वे वर्षे सुरु होईल. मानवाच्या आतापर्यतच्या ज्ञात इतिहासात फक्त दोनदा अणूबाँम्बचा वापर करण्यात आला , त्यापैकी पहिल्यांदा अणूबाँम्ब वापरण्याची ही घटना होती . जिचे दुष्परीणाम अजूनही आपणास दिसत आहे . हिरोशामा या जपानच्या शहरांवर संयुक्त संस्थाने अमेरीका या देशाने दुसऱ्या महायुद्धामध्ये जगातील पहिला अणूबाँम्बचा प्रयोग केला . या दुर्दैवी घटनेचेअमृत महोत्सवी  वर्ष ६ ऑगस्ट पासून सुरु होईल .दुसऱ्या महायुद्धात पूर्व बाजूला आघाडीवर असलेल्या जपानने या  लागोपाठच्या २ बॉम्ब हल्ल्यानंतर शरणागती स्वीकारली आणि दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाली यानंतर जपानच्या राज्यघटनेत आमूलाग्र बदल झाले . त्यांना लष्कर उभारण्यास मनाई करण्यात आली .         या अणुहल्ल्याचे दुष्परिणाम अजूनही जपानमध्ये दिसतात . अनेक व्यंग असणारी बालके तिथे अजूनही जन्माला येत असतात . जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळी क्षणार्धात लाखो व्यक्ती मृत्युमुखी पडल्या , हजारो व्यक्ती कायमच्या जायबंदी झाल्या . कित्येक किलोमीटरचा  परिसर सेकंदाच्या आता जळून ग...

टोल नाका जीव वाचण्याचे साधन

इमेज
नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल मधून लवकर सुटका  नसल्याचे एका ठिकाणी सांगितले आणि विविध चर्चेला उधाण आले . आपण आपले वाहन रस्त्यावर आणताना विविध कर भरतोच .  मग हा टोलचा भुर्दंड कशासाठी ?   आदी प्रतिक्रिमा  यावर विविध माध्यमातून उमटू लागल्या . मात्र सध्याच्या वाढलेल्या अपघाताच्या पाश्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी  आपणास टोल नाक्याचे महत्व दूर्लक्षून चालणार नाही , या टोल  नाक्याच्या सुयोग्य वापर केल्यास स्पीड गन सारख्या खर्चिक  उपाय ना योजता अपघाताला बऱ्याच मोठ्या प्रमाणांत आळा घालता येऊ शकतो .              आपणास दोन टोल नाक्यातील अंतर माहिती असतेच ते अंतर सूरक्षीत पणे पार करण्यासाठी किती वेळ लागेल हेही आपण सांगू शकतो . समजा तो कालावधी य आहे आता आपल्याला एकच करायचे .ते म्हणजे एका टोलनाक्यावरुन दूसऱ्या  टोरलनाक्यावर जाण्यासाठी क्ष रुपये टोल  असेल तर य कालावधीत पोहचणाऱ्या  वाहनांना टोल मधून काही प्रमाणात सवलत द्यायची तर य कालावधी पेक्षा कमी काळात हे अंतर पार करण्याऱ्या  वाहना...

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा .

इमेज
तिर्थस्वरुप  डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार  डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20  आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल 6 वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना  पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकऱ्याला  शोधण्याचा प्रयत्न केला .पण उपयोग शुन्य झाला. त्या बद्दल आम्हाला माफ करा . .हिंदुत्वाचा कैवार असलेले लोक आता सत्तेत आहेत . माञ प्रखर हिदुत्ववादी असणार्या स्वातंञ्यवीर सावरकरांचा विज्ञानवादी दृष्टिकोनाचा  त्यांना विसर पडलेला दिसतोय . ज्या कायद्यासाठी तुम्ही प्राणापर्ण केले तो कायदा सत्तेत आल्यावर रद्द करू म्हणणारे सध्या सत्तेत आहेत .माञ ते ही गोष्ट विसरलेत बहुदा . आणि  जे योग्यच आहे ना ?काही दिवसापूर्वी  कोल्हापुरच्या गोविंद पानसरे यांच्या हत्यारापर्यत सरकार पोहचलेय असी बातमी वाचली .  तेव्हा मनात विचार आला तूमच्या बाबतीत ही बातमी कधी वाचायला मिळेल जेव्हा मिळेल तो सुदिन असेल खरच .. सांगायचा मुद्दा ...

28 वर्षानंतर

इमेज
दिनांक 24 जूलै 1991 साली आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने तिच्याकडील सोने विमानात भरून जागतीक बँकेकडुन जमा करून अर्थव्यवस्था सुधारण्याससाठी कर्ज घेतले होते . आज 28 वर्षानंतर भारतीय अर्थव्यवस्था या धक्यातून पुर्णपणे सावरलीच नसून सध्या जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजीन बनू पहात आहे . ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे . त्याकाळी  त्यावेळची कोणतीही आर्थिक  ताकद आपणास कर्ज देण्यास तयार नव्हती आपल्या भारताकडे जेमतेम दोन तीन दिवस पुरेल इतकीच परदेशी गंजाजळी होती या परिस्थितीवर मात केली ती नंतर भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर  आणि  नंतर सलग  दोनदा पंतप्रधान झालेल्या आणि  देशात सुधारणेचे युग आणणाऱ्या  राजीव गांधी यांनी ज्यांना परदेशातून अक्षरशः उचलून आणले त्या मनमोहनसिंग यांनी . त्यांनी नरसिंह राव (बोलो तो लूक इस्ट पॉलीसीचे जनक )यांचा नेतृत्वाखाली  राबवलेल्या खाजगीकरण उदारीकरण जागतीकीकरण या तत्वाचा स्विकार केल्याने भारतीय अर्थव्यवस्था आजचा टप्पा गाठू शकली .  . प्रचंड प्रमाणात वाढलेला सरकारी खर्च माञ त्या प्रमाणात उत्...

सामाजिक वनीकरणात दुर्लक्षीलेले जाणारे मुद्दे आणि पर्यावरणीय हानी

इमेज
           सध्या अनेक ठिकाणी सामाजिकरित्या  वनीकरण केले जात आहे . समाजाच्या वनीकरणातील  सहभाग कौतुकास्पद असला , तरी या सामाजिक वनीकरणात काही मुद्दे अज्ञानामुळे दुर्लक्षले जात आहे ,  ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे . त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असा परिणाम होत आहे . त्यामुळे हे टाळणे अत्यावश्यक आहे . हे टाळण्यासाठीचा पहिला प्रयत्न म्हणजे असे मुद्दे समजून घेणे जे यामध्ये अंतर्भूत आहेत .        यातील पहिला मुद्दा म्हणजे सामाजिक  वनीकरणात वापरली जाणारी वृक्षे . सामाजिक वनीकरणात प्रामुख्याने लवकर वाढणारी झाडे लावली जातात . ज्यामध्ये अनेकदा निलगिरी सारख्या परदेशी वृक्षाची निवड केली जाते . जे चुकीचे आहे . या परदेशी झाडांवर पक्षी बसत नाहीत . त्यामुळे पक्ष्यांना या झाडांचा काहीही  उपयोग होत आंही . मात्र त्यांच्या नैसर्गिक अधिवास मात्र नष्ट झाला असतो .त्यामुळे पक्ष्यांची संख्या मात्र कमी होते . जे पर्यावरणाला हानी पोहचवणारे असते .  तसेच या झाडांमुळे जमिनीचा पोत देखील बदलतो  . आपण वड ,पिपंळ , ...

डोगंरीच्या तूरुंगातून

इमेज
                                 जूलै महीन्याची अखेर जशी जवळ येते , तश्या ज्या गोष्टींची आठवण होते , त्यात लोकमान्य टिळक हे अग्रक्रमी असतात . लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंञ्यलढ्यातील योगदान प्रचंड आहे यात वादच नाही . होमरुल चळवळ चा अपवाद वगळता गांधींसारखे कोणतेही आंदोलन लोकमान्य टिळकांनी केलेले आपणास दिसत नसले तरी त्यांचा लेखणीमुळे अनेकांना स्वातंञ्यलढ्यात प्राणापण करण्याची प्रेरणा मिळाली ज ्यात चाफेकर बधुंचा प्रामुख्याने समावेश करता येइल. (या चाफेकरांचा बलीदानातूनच स्वातंञ्यवीर सावरकरांना स्वातंञ्यासाठी प्राणापर्ण करण्याची स्फुर्ती झाली होती ) स्वामी विवेकानंदाना यूनाटेड स्टेट मध्ये जाण्याचा सल्ला आणि  त्यासाठी मदत उभारण्यात सूध्दा लोकमान्याचा वाटा होता. लोकमान्य टिळक आणि  स्वामी विवेकानंद यांचे मुंबई ते पुणे या दरम्यानचे संभाषण प्रसिध्द आहेच.                             लोकमान्य आणि  गोपाळ गणेश आगरकर यांच...